भारतीय राष्ट्रीय दिनांक चैत्र ९, शके १९४०
#21dayscyclingcampaign day 9
सूर्याचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो तेव्हा जगातील एकमेव शास्त्रिय सौर कॅलेण्डरचा म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॅलेण्डरचा पहिला महिना सुरु होतो.
भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर मधील महिन्यांची नावे हिंदू कॅलेंडरमधील महिन्यांच्या नावाप्रमाणेच ठेवली असल्याने आणि जेव्हा भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर सुरु केले तेव्हा वर्ष क्रमांक १ असा न देता तत्कालीन शालिवाहन शकाचा क्रमांक दिला गेल्याने भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर म्हणजे हिंदू कॅलेंडर (पंचांग) असल्याचा गैरसमज निर्माण होतो.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आज श्विन आणि स्कॉटने पहाटेच कूच केले. अद्याप उजाडले नव्हते त्यामुळे पथदिव्यांच्या उजेडात प्रवास सुरु झाला. संथ गतीने सुरुवात करत श्विन आणि स्कॉटने पूर्वपश्चिम पूल गाठला. तेथून गती वाढवत श्विन-स्कॉटने गियर बदलला.
सकाळची वर्दळ सुरु झाली नव्हती त्यामुळे रस्ता मोकळाच होता. श्विनच्या पुढच्या गियर व्हील वरील दात झिजल्यामुळे गेले काही दिवस दुसऱ्या गियरवर चेन सटकत होती. भोपरकडे जाणारा चढ दिसू लागताच मी थोडा आधीच पुढचा दुसरा गियर टाकला. मात्र अखेरीस चढ सुरु होताच पुन्हा चेन सटकू लागली. पॅडल मारत चेनवर जोर देण्यात काहीच अर्थ नव्हता. मग पुन्हा तिसरा गियर टाकत श्विनला पूढे नेले.
उंबर्ली रस्त्यावरून जाणे श्विनला आवडत नाही, पण अचानक आज श्विनने तो मार्ग निवडला. येथील पहिला चढ फार लांबीचा नाही. सूर्य उगवत असताना ह्या चढावरून जाणे हा खूप सुंदर अनुभव असतो. Vaishal Dharamsey चा हा आवडता रस्ता. Ankur Agarwal आणि वैशाल यांचे उंबर्ली येथील तळे हे आवडते ठिकाण. #dombivlicycleclub चे इतर सदस्य देखील ह्या तळ्याभोवती अनेकदा मौज अनुभवत असतात.
येथून जाताना लागणारा दुसरा छोटा चढ अचानक समोर येत असताना नवीन सायकलिस्टची मात्र गडबड उडते. हा दुसरा चढ संपून सरळ गेले की उंबर्ली तळे. मात्र उजवीकडे वळल्यावर आपण काटई बदलापूर पाइपलाइन हमरस्त्याला लागतो. श्विन स्कॉटने पाइपलाइन रस्त्याला प्रवेश केला आणि तळोजा फाटा पार केला.
येथून पुढे नेवाळी फाटा कधी गाठला हे कळलेही नाही. गन्धार डोम्बिवलीकर आणि Arnav Kulkarni Marcella ह्यांनी येथे चहा पिण्याची सवय लगेच परत फिरू देईना. मग अमृतपान करत श्विन आणि स्कॉटने विश्रांती घेतली. परत फिरलो तोपर्यंत सूर्यमहाराज आगमनाची वर्दी देऊ लागले होते. श्विनने काटई नाक्याची दिशा पकडली तरी पूर्वेकडील क्षितिजावर दिसू लागलेले गुलाबी सफरचंद मला आकर्षित करत होते. त्यामुळे श्विन काटईकडे जात असताना माझी मान आणि मन मात्र मागे वळत होते. थोडा वेळ श्विनबरोबर मी पुढे गेलो खरा पण जेमतेम २ किमी अंतरावर मात्र मी श्विनला थांबवले. तिला रस्त्याच्या बाजूला थांबवून तिची दिशा बदलून उभे केले. श्विनच्या मानेवरून दिसणारा सूर्यगोल कॅमेराबद्ध करणे हा माझा आवडता छंद. सूर्याचे मनसोक्त फोटो काढूनच मी श्विनला परतीचा रस्ता पकडू दिला. एव्हाना स्कॉट बरीच पुढे गेली होती. तळोजा फाटा पार करत असताना रस्ता दुभाजकाच्या पलीकडे विरुद्ध दिशेने जाणारे Bhimashankar Birajdar दिसले. एकमेकांना नेहमीच्या थाटात सलामी देत आम्ही दोघेही आपापल्या दिशेने मार्गक्रमण सुरु ठेवले. एव्हाना सूर्य क्षितिजावरून बराच वर आला असला तरी अजून गारवा जाणवत होता. त्याच शांत वातावरणाचा लाभ उठवत श्विनने घर गाठले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा