बुधवार, ३० जानेवारी, २०१९

Which is the most revolutionary invention of the world? It must be a wheel. Cycle, which runs on two wheels, is the only vehicle which brings all human beings together. Cycle brings equal pleasure to all right from milkman, dabbawala to Prime Minister of the nation.

It felt necessary to provide common platform to all cycle lovers to express their views. So Cycle Summit was initiated for the same for the first time at Dombivli on 28th January 2018. Lake city Thane always welcome new & innovative ideas. So during first cycle summit held at Dombivli itself, Thaneites insisted to organise 2nd Cycle Summit at Thane. Thus the 2nd Cycle Summit is organised at Dr Kashinath Ghanekar Auditorium Thane on 3rd February 2019. This is the first full day Summit to be held with Cycle as the main theme.

Cycle rally of approx 1200 cyclists will start from Shivaji Maidan, Thane by 7 am. Members of various cycle clubs, college students, various citizens including prominent leader of city Shri Sanjay Kelkar will participate in the rally. Right from World famous Mumbai's dabbawala, to postman -who is a friend to each house of the city, will be part of the rally. Nevertheless the police who protects us in the city & Airforce personnel who protects at border will also participate in the rally. The rally will conclude at Dr Kashinath Ghanekar Auditorium. The cycle rally is free for participants. Thane Municipal Corporation will provide free T Shirts, cap & snacks to the participants.


Recycle Club, Swatv & iCAN has taken initiative for the Cycle Summit. Sports Ministry (Maharashtra state), Office of Police Commissioner Thane & Thane Municipal Corporation has extended the valuable co-opearation for the Summit. Various cycle clubs not only from Mumbai, Thane & Dombivli & other regions from Maharashtra but also from regions outside Maharashtra like Surat & Ankleshwar will participate in the cycle rally.

Apart from cycle clubs, many other organizations as Futardo's school of Music, FOCI, Rotary Club of Thane Suburban, Innerwheel club of Thane Garden City, Sanskar Bharati & Fortis Hospital have also contributed for the Cycle Summit.

Police Band is organised at Dr Kashinath Ghanekar Auditorium at 8 am. Thereafter Futadro's School of Music Mumbai will entertain the audience till 8.30 am. The registration process will also be completed simultaneously till 8.30 am.

Mr Vinod Tawade (Guest of Honor), ,Mr Eknath Shinde (Chief Guest), Mrs Minakshi Shinde, Mr. Sanjiv Jaiswal, Mr. Vivek Phansalkar Sir, Mr. Rajesh Narvekar (Chief Guest), Mr. Naresh Mhaske (Swagatadhyaksh), Mr Deepak Mejari (Sammelanadhyaksh) will add the value to the Summit. Shri Sanjay Kelkar will also participate in the Cycle Summit after participating in the Cycle rally.

Among others, Summit also has objective to foster bycycling as a viable means of trsnsport, and as a means to address wealth and health disparities that exists in our communities. The Summit seek to empower individuals to take control of their transportation, health, and sense of community.

Event Schedule:
1) 8.30 am to 9 am: Exhibition opening
2) 9 am to 10 am- Summit Opening ceremony, condolence to Khalekaka and felicitation to Mr. Vikram Pendse (Cycle Gaurav), youngest Ironman of Asia Ravija Singhal, presentation on infrastructure & cycling by mulundki cyclewali & cycle2work idol Firoza Suresh.
3)Maharashtra Govt scheme for Cycle
4) Touring & Cycling (Interview)
5) International Cycling & cyclists ( Interview of
- Dr Mahajan bros (RAAM winners)
- Lt Col Bharat Pannu (RAAM)
- Mr Ulhas Joshi
- Mr Yogi (Nashik)
- Lily Panich (USA)
- Paning Yame ( Assam)
- Taka Tamut (Arunachal)
- Santosh Dubey (Airforce, Assam)

6) Making of Ironman-
-Mr Chetan Agnihotri (Ironman)
- Amar Miyaji (Ironman)
- Dr Milind Pimprikar (Sports Orthopedic)
- Dr Mustafa Topiwala (Sports Physiotherapists)

7) Musical entertainment by Futardo's school of Music

8) Guidance & Presentation by experts:
a) Business opportunities, in Cycle, Cycling & Presentation & beyond
b) Cadence
c) AV presentation by eminent cyclists

9) Lucky Draw

Paryavarana Dakshata Mandal has shouldered the responsibility of sovenier. Kirti Printers will take care of priniting.

The Summit is not only for professional or other cyclists or only for cycle related businessman. It's also for common man, also for the mom, dad & elders who run to balance a child riding cycle for the first time. So see you on 3rd February 2019 at Dr Kashinath Ghanekar Auditorium at 8 am.

Ticketing partner: BOOK  MY SHOW

Website of the Summit :
https://2ndcyclesummit.com/
जगाच्या इतिहासात लागलेला सर्वात क्रांतिकारी शोध कोणता? याचे उत्तर 'चाकाचा' शोध हेच असावे. ह्या दोन चाकांच्या साहाय्याने चालणारी सायकल हे सर्व स्तरातील लोकांना जवळ आणणारे वाहन म्हणायला हरकत नाही. दुधवाले, डबेवाले यापासून पंतप्रधान पदावरील व्यक्तीपर्यंत कोणालाही सहजसाध्य असणारी सायकल ही सगळ्यांनाच समान आनंद देते.

सर्व स्तरातील सायकलप्रेमींना एकत्र येण्यासाठी, आपापल्या भूमिका/अपेक्षा मांडता येण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी 'सायकल मित्र संमेलन' ही संकल्पना मांडण्यात आली. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहराने नवनवीन संकल्पना स्वीकारताना नेहमीच पुढाकार घेतला. डोंबिवली येथे भरलेल्या पहिल्या सायकल मित्र संमेलनातच पुढील सायकलमित्र संमेलन ठाण्यात व्हावे असा आग्रह ठाणेकरांनी धरला. त्यानुसार ३ फेब्रुवारी २०१९ रोजी २ रे सायकल मित्र संमेलन ठाणे येथे आयोजित करण्याचे ठरले. सायकल ह्या संकल्पनेला धरून पूर्ण दिवस भरणारे हे पहिलेच सम्मेलन असेल.

सकाळी ७ वाजता शिवाजी मैदान येथून सुमारे १२०० सायकलपटूंच्या सायकलफेरीला सुरुवात होईल. ह्या सायकलफेरीमध्ये विविध सायकल क्लबचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक हे सहभागी असतीलच. मात्र त्याचबरोबर साता समुद्रापार कीर्ती मिळवणारे मुंबईचे डबेवाले, घरोघरी जिव्हाळा जपणारे पोस्टमन, आपल्या संरक्षणाची जबाबदारी निभावणारे पोलीस आणि एअरफोर्स मधील सदस्यही ह्या सायकलफेरीमध्ये सहभागी होणार आहेत. सदर  सायकलफेरीचा समारोप डॉ काशिनाथ घाणेकर सभागृह येथे करण्यात येईल. हि सायकलफेरी निशुल्क असून सहभागी सायकल पटूंना ठाणे महानगरपालिकेतर्फे मोफत टी शर्ट, टोपी व नाश्ता देण्यात येईल. त्यानंतर डॉ काशिनाथ घाणेकर सभागृह येथे संमेलनाची सुरुवात येईल.

रिसायकल क्लब, स्वत्व आणि iCAN यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या संमेलनाला क्रीडा मंत्रालय (महाराष्ट्र राज्य), पोलीस कमिशनर ठाणे, ठाणे महानगरपालिका यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच मुंबई, ठाणे, डोंबिवली पासून पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रभरातील अनेक सायकल क्लब तसेच सुरत, अंकलेश्वर अश्या महाराष्ट्राबाहेरील शहरातील सायकलक्लबचाही सहभाग सदर संमेलनात असणार आहे. सायकल क्लब्स व्यतिरिक्त फुटार्दो'ज स्कुल ऑफ म्युझिक, FOCI, रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन, इनर्वहिल क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी, संस्कार भारती, फोर्टीस हॉस्पिटल अश्या अनेक संस्था ह्या संमेलनात सहकार्य करत आहेत.

 सकाळी ८ वाजता काशिनाथ सभागृह येथे पोलीस बँड आयोजित करण्यात आला असून त्यानंतर सकाळी ८.३० पर्यंत फुटयार्दो'ज स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई द्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील. त्याचदरम्यान संमेलनासाठी नोंदणी करण्यात येऊन ८.३० वाजता प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येईल. 

मा. श्री विनोद तावडे (आदरणीय अतिथी), मा. श्री एकनाथ शिंदे (प्रमुख पाहुणे), मा. सौ मीनाक्षी शिंदे, मा. श्री संजय जयस्वाल, मा. विवेक फणसळकर, मा. श्री राजेश नार्वेकर (प्रमुख पाहुणे), मा. श्री नरेश म्हस्के (स्वागताध्यक्ष), मा. श्री दीपक मेजारी (संमेलनाध्यक्ष) यांची उपस्थिती सदर संमेलनास लाभणार आहे.

संमेलनाच्या अनेक हेतूंपैकी वाहतुकीचे प्रमुख साधन,  त्याचबरोबर वित्त आणि आरोग्य यामधील सामाजिक फरक दूर करणारे साधन म्हणून सायकल हा पर्याय पुढे आणण्याचा हेतूही आहेच. नागरिकांनी आपल्या वाहतुकीची समस्या, आरोग्यविषयक समस्या अश्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्यासाठी उत्तेजन देणे हाही या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे.

संमेलनाची रूपरेषा:
१)९ ते १० दरम्यान उदघाटन समारंभ झाल्यावर दिवंगत सायकलपटू खळे काका यांना श्रद्धांजली तसेच पुणे येथे सायकल संग्रहालय निर्माण करणारे श्री विक्रम पेंडसे, आशियातील सर्वात तरुण आयर्नमन श्री रविजा सिंघल यांना गौरवण्यात येईल तसेच मुलुंडकी सायकलवाली आणि मुंबईतील CYCLE2WORK ची आदर्श फिरोझा सुरेश हिचे सादरीकरण करण्यात येईल.
२) महाराष्ट्र सरकारतर्फे सायकलविषयक धोरणांची माहिती दिली जाईल
३) त्यानंतर सायकलपटूंच्या सायकलसफरीविषयक मुलाखती घेतल्या जातील.
४) आंतर राष्ट्रीय सायकलिंग संबंधीे RAAM मधील सहभागी डॉ महाजन बंधू, ले कर्नल भारत पन्नु, श्री. उल्हास जोशी, श्री.  योगी, लिली पानीच (अमेरिका), पनिंग यामे ( आसाम), टाका तामुत ( अरुणाचल), श्री संतोष दुबे (एयर फोर्स, आसाम) यांच्या मुलाखती आणि मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात येईल.

५) मेकिंग ऑफ आयर्न मॅन या कार्यक्रमा अंतर्गत श्री चेतन अग्निहोत्री (आयर्न मॅन), श्री अमर मियाजी (आयर्न मॅन), डॉ मिलिंद पिंपरीकर, डॉ नेमुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन करण्यात येईल.

६) त्यानंतर सांगीतिक मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला जाईल.
७) नंतर तज्ञ सायकल पटूंचे मार्गदर्शन आणि सादरीकरण करण्यात येईल.

८) कार्यक्रमाचा समारोप करत असताना दोन भाग्यवान विजेत्यांना ओरोबोरस या सायकल कंपनीतर्फे लकी ड्रॉ द्वारे २ सायकली भेट देण्यात येतील.

पर्यावरण दक्षता मंडळाने संमेलनाच्या स्मरणीकेची जबाबदारी घेतली असून कीर्ती प्रिंटर्स हे संमेलनाच्या मुद्रणाची जबाबदारी सांभाळत आहेत.

हे सम्मेलन केवळ व्यावसायिक किंवा हौशी सायकलपटू किंवा सायकल व्यवसायिक ह्यांच्यासाठी नव्हे तर आपले मूल प्रथम सायकल चालवत असताना त्यांच्या बरोबर धावणाऱ्या आई, बाबा, दादा, ताई यांच्यासाठीही हे सम्मेलन आहे. तेव्हा, तुम्ही येताय ना... ३ फेब्रुवारी २०१९ सकाळी ८ वाजता डॉ काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे!

Ticketing partner: BOOK  MY SHOW

Website of the Summit :
https://2ndcyclesummit.com/

मंगळवार, १५ जानेवारी, २०१९

जोडी तुझी माझी

भा रा भागवत यांचा कथानायक फास्टर फेणे हा माझा लहानपणचा आदर्श! त्याचे कारनामे वाचताना मी गुंग होत असे. त्याच्याचमुळे मला सायकलिंग ची आवड निर्माण झाली होती. मात्र सायकल चालवण्याची कला मला महाविद्यालयामध्ये गेल्यानंतरच साध्य झाली. साधारण १९८६ च्या सुमाराला मला माझी पहिली सायकल मिळाली. ती होती काळ्या रंगाची हिरो सायकल! तेव्हापासून सायकलचे आणि माझे अतूट नाते सुरू झाले. हिरो घरी आल्यापासून डोंबिवली शहरात फिरताना माझ्याबरोबर हिरो असणार हा अलिखित नियमच झाला होता. वीस वर्षे साथ दिल्यानंतर एका गरजू मुलाला मी हिरो भेट दिली. अर्थातच त्यानंतर माझे सायकलिंग मात्र थांबले.

त्यानंतर दोन वर्षांनी माझी चिंचवड येथे बदली झाली.  सुदैवाने मला तिथे गेल्यावर दोन- तीन महिन्यातच एक मार्गदर्शक मित्र भेटला. खरतर तो आमचा पिढ्यानपिढ्यांचा स्नेही. त्याने मला व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. तो मित्र होता मधुमेह! माझी मावशी डॉक्टर निरुपमा भावे हिने मला सायकलिंग सुरू कर असा सल्ला दिला आणि मी हो म्हणतोय न म्हणतोय तोपर्यंत तिने मला सायकल घेऊनही दिली.  तिच्या घरापासून माझ्या घराचे अंतर जवळपास २० किलोमीटर होते. रेल्वेने सायकल घरी आणायची तर त्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. रस्ता रेल्वे मार्गालगतच होता. मावशीने सुचवले जेवढी सायकल चालवता येईल तेवढी चालव आणि मग हवी तर रेल्वेतून ने. मात्र मी अगदी सहजपणे ते पंधरा वीस किलोमीटर अंतर सायकलनेच पार केले. दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळचे सायकलिंग सुरू झाले. आठवडाभरातच रोज तीस किलोमीटरची सकाळची सायकलफेरी नियमितपणे सुरू झाली. त्याच दरम्यान इंदोर झाशी ह्या साधारण एक हजार किलोमीटर अंतराच्या सायकल फेरीचा आनंदही घेतला.

तीन वर्षांनी माझी बदली पुन्हा ठाणे येथे झाली. मी परत डोंबिवली येथे राहू लागलो. मात्र डोंबिवलीतील रस्त्यांच्या भयानक अवस्थेमुळे माझे रोजचे सायकलिंग अनियमित झाले. मी त्यावर उपाय शोधून काढला. मी आठवड्यातून एकदा डोंबिवलीहुन ठाण्याला ऑफिसला सायकलने जाऊ लागलो. तसेही चिंचवडहून परत आल्यावर लोकलची वाढलेली गर्दी त्रासदायक वाटत होतीच. लोकलने ऑफिसला जाताना होणारी धक्काबुक्की, लोकांचे शिव्याशाप, लोकलची रोजची अनियमितता ह्यावर cycle2work हा उपाय छानच होता. हळूहळू मी जवळपास रोजच cycle2work करू लागलो. लोक वर्षातून एकदा किंवा महिन्यातून एकदा किंवा फारतर आठवड्यातून एकदा सहलीला जातात. मात्र cycle2work मुळे मी रोजच सहलीला जाऊ लागलो. ह्याचबरोबर वर्षातून एकदोनदा ५०० किमी किंवा अधिक अंतराची सायकल फेरी होतच होती.

महाविद्यालयात असताना पाहिलेले मुंबई गोवा सायकलसफरीचे स्वप्न मला पुन्हा पडू लागले होते. मी मुंबई गोवा सफरीचे नियोजन करू लागलो. मात्र सतत ४ वर्ष पूर्ण नियोजन करूनही मला ती सफर पूढे ढकलावी लागत होती. यादरम्यान मी गोवा कन्याकुमारी सायकलसफरही केली, पण मुंबई गोवा सफर काही केल्या सुरु होत नव्हती. सततच्या अडथळ्यांमुळे माझा निर्धार मात्र अधिक तीव्र होत होता. चौथ्यांदा मुंबई गोवा सफर पुढे ढकलावी लागली तेव्हा नयना आघारकर यांनी म्हटले, 'तुझे मुंबई गोवा रद्द होते आहे यामागे काहीतरी विधिलिखित असेल'.
२०१७ साली मी cycle2work करत वर्षभरात  सुनील गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२ एवढे म्हणजे १०१२२ किमी सायकलिंग करण्याचे ठरवले. मात्र त्यातील चार महिने आजारपणामुळे मला सायकलिंग करता आले नाही. त्यामुळे शेवटच्या दोन महिन्यात मी ऑफिसला जाण्याआधी आणि ऑफिसहून आल्यावर परत सायकलिंगला जाऊ लागलो. डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत माझे १०१२२ किलोमीटरचे ध्येय पूर्ण झाले. मात्र ह्यादरम्यान माझा घरात राहण्याचा वेळ कमी झाला.

माझी पत्नी मीरा हिलासुद्धा सायकलिंगची आवड होतीच. मी पुण्याहून डोंबिवलीला परत आल्यावर एक जुनी सायकल तिला मिळाल्यावर ती एकदोनदा माझ्याबरोबर सायकलिंगला आलीही होती. मात्र ती सायकल जड असल्याने तिने तेव्हा सायकलिंगचा नाद सोडला होता. मात्र २०१७ ह्या वर्षातील अखेरच्या दोन महिन्यातील माझ्या रोजच्या सायकलिंगमुळे माझ्या बरोबर राहण्यासाठी तिने पुन्हा सायकलिंग सुरु करायचे ठरवले. ह्यावेळी मी माझ्या मावशीचाच कित्ता गिरवला. जसे माझ्याकडून होकारातील पहिले अक्षर बाहेर पडताच संधी साधत मला फार विचार करू न देता मावशीने सायकल घेऊन दिली होती, त्याचप्रमाणे माझ्या पत्नीने होकारातील पहिले अक्षर बाहेर काढताच मीही संधी साधली.

कल्याणला साहिर शेखच्या मार्गदर्शनाप्रमाणे घेतलेली स्कॉट मात्र माझ्या पत्नीला चांगलीच आवडली. ह्या हलक्या वजनाच्या सायकलशी ... स्कॉटशी तिची लगेचच गट्टी जमली. आठवडाभरातच तिचेही रोजचे २५-३० किमी सायकलिंग सुरु झाले. त्याबरोबर मुंबई गोवा सायकलसफरीसाठी माझ्याबरोबर येणार असल्याचे तिने जाहीर केले. मग आठवडाभर ती रोज २५-३० किमी सायकलिंग करत असे आणि दर रविवारी आम्ही दोघं एकत्र ५०-१०० किमी सायकलिंग करू लागलो. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढत होता. वैशाख महिन्याच्या रणरणत्या उन्हात डोंबिवली ते तळेगाव ही पहिली शतकी सायकलफेरी करायचे ठरले. ह्या सफरीमध्ये खोपोली खंडाळा घाटसुद्धा तिने पार केला. दर रविवारच्या सफरी सुरु होत्याच. पावसाळ्यातदेखील पुन्हा एकदा डोंबिवली तळेगाव सायकलफेरी पूर्ण केली. महड गणपती, टिटवाळा गणपती, अंबरनाथ शिवमंदिर, मलंगगड अश्या सायकलसफरी सुरूच होत्या.

मी पुन्हा डोंबिवली गोवा सायकलसफरीचा आराखडा आखला. ह्यावेळी ही सफर पूर्ण होणार ह्याचा पहिल्यापासूनच विश्वास वाटत होता. गोवा सफरीच्या तयारीसाठी मीराने माझ्या मावशीचा डॉ निरुपमा भावे यांचाही सल्ला घेतला. मावशीच्या आश्वासक सल्यामुळे मीराचा आत्मविश्वासही वाढला. ही सफर आखत असल्यापासून अनेकांचे सहकार्य लाभत गेले. एकंदर सफर ५ दिवसांची ठरवली. या सफरीदरम्यान अनेक ओळखीच्या लोकांचे मार्गदर्शन/ सहकार्य मिळत होतेच, पण कित्येक नवीन ओळखी होत होत्या आणि त्यांचेही सहकार्य वेळोवेळी लाभत होते. 'देणाऱ्याचे हात हजारो, किती घेशील दो करांनी' अशी अवस्था होत होती. डोंबिवली गोवा सफर विनासायास पार पडली.

नयना आघारकर यांचे म्हणणे खरे ठरले होते. गोवासफर मी माझ्या पत्नीबरोबरच पूर्ण व्हावी यासाठीच कदाचित यापूर्वी लांबणीवर पडत होती.
सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी शेजारी बसलेली पत्नी असो की युद्धासाठी घरातून निघताना ओवळणारी पत्नी असो, ती साथ करत असते तेव्हा कार्याला यश मिळणे क्रमप्राप्तच असते. 
 सावित्रीने प्रत्यक्ष यमालाही परत पाठवले होते. मग ही तर केवळ सायकलसफर होती

ह्या सफरीदरम्यान आलेल्या विलक्षण अनुभवांमुळे गोवा सफर पूर्ण होताच माझ्याबरोबर माझी पत्नीही पुढील सायकलसफरीचे स्वप्न पाहू लागली होती....

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

फुजीनामा

निधर्मी (secular) दिनांक: भारतीय सौर २२ पौष १९४०
(हिंदू तिथी : पौष शुक्ल ६, शके १९४०)


सडपातळ आणि कमनीय बांधा, नाकीडोळी नीटस, लालसर रंग असलेली फुजी घरात येऊन बरेच दिवस झाले होते. तसे पाहिले तर श्विन आणि फुजी या दोघांचे वय जवळपास सारखेच. श्विनची चाल दमदार, कोणत्याही ठिकाणी जायला नेहमी तयार. तर हायब्रीड फुजी श्विनपेक्षा चपळ आणि जलद. फुजी श्विनपेक्षा दिसायलाही देखणी!

फुजी घरात आल्यावर तर श्विनची उचलबांगडी करायचाही विचार मनात आला होता. खरतर समाजमाध्यमांवर तसा संदेशही प्रसारित केला. तो संदेश प्रसारित करून मी मुलुंड स्टेशन येथे बसमध्ये चढलो आणि छातीत शब्दशः धडधडायला लागले, श्वास अडकल्यासारखा वाटायला लागला.... न जाणो कोणी श्विनला मागणी घातली तर! बसमधून उतरेपर्यंत अक्षरशः जीवाची घालमेल होत होती. जीवाचा तुकडाच तो.. तो असा कोणाला द्यायचा? मी वागळे इस्टेट येथील रोड नं १६ या थांब्यावर उतरलो तोवर पुष्करचा 'श्विनची उचलबांगडी करू नकोस' असा संदेश आला होताच. इतक्यात मेघेशचा फोन आलाच.... 'शशांक, श्विन तुझ्याकडेच राहू दे. श्विनला दूर करू नकोस. श्विनने तुला खूप चांगली साथ दिली आहे, यश दिले आहे'. माझ्या मनाची घालमेल मी न सांगताच दूर अंतरावर असूनही जिवाभावाच्या दोन्ही मित्रांना जणू समजली होती. मी तर जणू या दोघांच्या संदेश/ फोनची वाटच पाहत होतो. मी तात्काळ मेघेशला म्हटले,'नाहीरे, मी श्विनला दूर करणार नाही. अरे, 'श्विन' हीच तर माझी ओळख आहे'. खरोखरच सायकलजगतातच नव्हे तर इतरत्रही माझी ओळख शशांक म्हणून नव्हे तर श्विन म्हणूनच झाली होती. मी श्विनला दूर करणार नाही असे मेघेशला सांगताच माझ्या छातीतील धडधडही थांबली, श्वास पुन्हा मोकळा झाला.

अर्थातच, काही चूक नसूनही नव्याने घरात आलेल्या फुजीकडे दुर्लक्ष होऊन पुन्हा श्विनचेच कौतुक सुरु झाले. फुजिला उद्या फिरायला नेऊ, आज श्विनलाच घेऊन जाऊया असे करता करता बरेच दिवस झाले. MTB घराण्यातील श्विनवर माझा अधिक विश्वास. हायब्रीड घराण्यातील सदस्यांवर मी सहजी विश्वास ठेवायला तयार नव्हतो. फुजी मात्र काहीही तक्रार न करता शांत होती. तिला केवळ एक संधी हवी होती. आज ख्रिस्ती कॅलेंडरच्या महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने कार्यालयात जायचे नव्हते. मग अस्मादिकांनी श्विनबरोबर नेवाळी फाट्याला फिरायला जायचे ठरवले. सकाळची आन्हिके उरकून मी गच्चीमध्ये उभ्या असलेल्या श्विनकडे गेलो. श्विनशेजारीच इतके दिवस दुर्लक्ष झालेली फुजी उभी होती. श्विनसह फुजीची विचारपूस करू लागताच ती लगेचच खुलली. बरेच दिवस एका जागी थांबूनही फुजी आळसावलेली नव्हती. नेवाळी फाट्याला जाण्यासंबंधी विचारताच फुजी ताबडतोब तयार झाली. ती उत्साहात पुढे येताच श्विनसुद्धा समजूतदारपणे जागेवर थांबली. फुजीला बाहेर नेण्यासाठी तयार व्हायलाही विशेष वेळ लागला नाही. मुळातच खानदानी देखणेपण असल्याने तिला फार नट्टापट्टा करावा लागला नाही.

फुजीची डोंबिवली शहरातील आज पहिलीच दौड होती. हायब्रीड घराण्यातील फुजीची दौड सावधपणेच सुरु झाली. आम्हा दोघांनाही एकमेकांची सवय नव्हती. एकमेकांचा अंदाज घेत डोंबिवली शहर आम्ही मागे टाकले. एव्हाना फुजीने लय पकडली होती. पेंढरकर महाविद्यालयावरून पुढे जात फुजीने कल्याण शिळ रस्ता गाठला. तेथे तिच्या हायब्रीड घराण्यातील वैशिष्ट्येे ती सहजतेने दाखवू लागली. काटई नाका येथे डावे वळण घेत फुजीने बदलापूर पाइपलाइन रस्ता पकडला.

दक्षिणेच्या टोकाकडून परतीच्या प्रवासाला लागून सूर्याला अजून महिना व्हायचा असल्याने सूर्यकिरणे आल्हाददायक वाटत होती. सूर्योदयानंतर दोन तास होऊनही काटई नाक्यापुढे धुक्याची चादर पसरलेली दिसत होती. मात्र फुजी थांबायला तयार नव्हती. पहिलीच एकत्र दौड असूनही फुजी आणि माझे सूत सहजच जुळले होते.

फुजीने अंबरनाथ औद्योगिक परिसर मागे टाकत बदलापूर शहराकडे धाव घेतल्यावर मात्र मी फुजीचा लगाम खेचला. सहजच एकंदर अंतर आणि वेळेचा अंदाज घेतला तर एकमेकांचा अंदाज घेत सावध सुरुवात करूनही फुजीने तिच्या हायब्रीड घराण्याचे नाव राखत श्विनच्या सरासरी वेगापेक्षा जवळपास २०- २५% अधिक वेग राखला असल्याचे जाणवले. शिवाय अजूनही फुजीला विशेष श्रम झाल्याचे जाणवत नव्हते. तेथून मात्र  माघारी फिरवत मी फुजीला परतीच्या मार्गाला लावले. फुजीची काहीही तक्रार नव्हती. अवखळ श्विन बऱ्याचदा माझ्या नकळत दिशा बदलू न देता पुढे जात असे. पहिल्याच फेरीत तरी फुजीने असा विचार केला नव्हता... किमान आचरणात तरी आणला नव्हता. परतीच्या प्रवासातही फुजीने वेग कायम राखला. संधी मिळाल्यावर हायब्रीड घराण्याचे नाव सार्थ करत वेगवान दौड करणाऱ्या फुजीने पहिल्याच फेरीत घरी येईपर्यंत नाबाद अर्धशतकी दौड पूर्ण केली होती.. तेही दिवसभराच्या पहिल्या सत्रातच! फुजीची हि अर्धशतकी दौड विनाथांबाही होती, तरीही घरी पोचल्यावर फुजी ताजीतवानी होती.

दिवसातील दुसरे सत्र अजूनही बाकी होतेच. मात्र दिवसातील दुसऱ्या सत्रात स्कॉटबरोबर श्विनला संधी द्यायची की फुजीला पहिल्याच दिवसात शतक साजरे करायची संधी द्यायची हे अवघड कोडे अस्मादिकांना पडले होते.


रविवार, ६ जानेवारी, २०१९

I am on the road again

सायकलवरून १५९ दिवसात २९००० किमीची जगप्रदक्षिणा करणाऱ्या वेदांगी कुलकर्णी हिचे अनुभव ऐकण्याचा योग नुकताच आला. जगप्रवास करण्याबद्दल वेदांगीचे कौतुक आहेच, मात्र त्याबरोबर कौतुक वाटत होते ते तिची आई (अपर्णा कुलकर्णी) आणि वडील  (विवेक कुलकर्णी) यांचे. तिच्या जगप्रवासातील विलक्षण आणि थक्क करताना आठवण झाली एका मित्राची आठवण झाली- जो स्किट (Josiah Skeats)ची. ह्या पठ्ठ्याने इंग्लंड ते ऑस्टेलिया ह्या दरमनाचा प्रवास दोनदा केला आहे. एकदा सायकलने रस्त्यांवरून तर एकदा जलमार्गाने बोटीतून.

श्विन स्कॉटची मुंबई गोवा सायकलफेरी झाली, त्यानंतर श्विन स्कॉटच्या रोजच्या सरावाला स्वल्पविराम पडला होता. श्विनचे cycle2work आठवड्यातुन जेमतेम एकदा होऊ लागले होते. सौर कॅलेंडरच्या पौष महिन्यातील थंडीचा अनुभव घेत सकाळी लोळत पडण्याचाच तो परिणाम होता. मात्र वेदांगीचे अनुभव आणि जो ची आठवण यांच्यामुळे येता रविवार मात्र सत्कारणी लावायचे श्विन स्कॉटने ठरवले होते. त्या इच्छेचा पूर्तता होण्यासाठीच की काय २ दिवसांपूर्वी एक फोन आला. तो होता एका बालमित्राचा- महेश (मयूर) राणेचा. महेश आणि मी तसे म्हटले तर जन्मापासूनचे मित्र. मात्र तो बदलापूरला राहायला गेल्यावर म्हणजे जवळपास ३५ वर्षे आमची गाठभेट नव्हती. गेल्या काही काळात फोनवर बोलताना मात्र ती ओढ अजून कायम असल्याचे जाणवत होते. २ दिवसांपूर्वी फोनवर बोलताना त्याने घरी येण्याचे आमंत्रण दिले ते श्विनने तत्क्षणी स्वीकारले. 

त्यानुसार आज श्विन आणि स्कॉट बदलापूरला जायला निघाले. सूर्यदेवाचे आगमन होऊन यंव वेळ झाला होता. मात्र सौर पौष महिन्यातील सूर्य हा सुखद उब देत होता. अतिशय संथपणे श्विन स्कॉटने डोंबिवली शहर मागे टाकले. कल्याण शिळ रस्त्याने न जाता आज माणगाव - उंबर्ली रस्त्याने श्विन स्कॉटने बदलापूर पाइपलाइन रस्ता गाठला. आपली संथ गती दोघेही कायम राखत होते. पाइपलाइन रस्त्याने जातानाही दोघांनी कोणतीही घाई केली नाही. मलंगगडकडे जाताना लागणारा नेवाळी चौक हा खरेतर श्विन स्कॉटचा हक्काचा थांबा. मात्र आज तिथेही न थांबता श्विन स्कॉट पुढे निघाले. बदलापूर शहरात शिरताना एक फलक आहे. तो पाहणाऱ्यावर मोहिनी पडते आणि नजरबंदी झाल्याप्रमाणे आपण पुढे जात राहतो याची श्विनला जाणीव होती. श्विनने स्कॉटलाही त्यासंबंधी जागरूक केले. त्या फलकावर 'नेरळ २० किमी' असे लिहिले आहे. हे वाचून श्विनने स्वतःच्याच नकळत एकदा नव्हे किमान दोनदा तरी नेरळ गाठले होते. आज मात्र महेशकडे जायची सूचना मेंदूकडे ठळकपणे नोंदवली गेली होती. त्यामुळे तो फलक पाहताच मन बहकले जाऊ लागले तरी आज त्या मनावर मेंदूने विजय मिळवला. कात्रप येथील महेशच्या बंगल्यात त्याच्या वडिलांनी आमचे स्वागत केले. महेश भटिंडा येथे गेल्यावर त्याची तब्बेत बिघडल्याने त्याला तिथेच थांबावे लागले असल्याचे त्याने कळवले होते. मात्र त्याच्या वडिलांना भेटण्याविषयी त्याने आग्रहाने सांगितले होते. महेश घरी नसल्याची कोणतीही जाणीव न होऊ देता महेशच्या बाबांनी आणि महेशच्या अर्धांगिनीने श्विन स्कॉटचे स्वागत केले. त्यांच्याशी गप्पा मारताना मधला ३५ वर्षांसाज अंतर केव्हाच नाहीसे झाले. महेश न भेटल्याबद्दल खंत वाटत असली तरी त्याच्या बाबांना भेटल्याचे समाधानही होते.



परत निघताना मन मात्र तिथेच राहू इच्छित होते. श्विन स्कॉट डोंबिवलीकडे वळले खरे पण नेरळचा फलकाने घातलेली मोहिनी परत जादू करू लागली. मात्र मोठ्या निर्धाराने त्या मोहिनीची जादू झुगारून श्विन स्कॉटने डोंबिवलीची दिशा धरली. वाटेत अंबरनाथ औद्योगिक परिसरातील वैभव स्नॅक्स हे उपहार गृह श्विनच्या आवडीचेच. तेथे उदरभरण करून श्विन स्कॉट पुढे निघाले. बदलापूरच्या ओढीने जाताना नेवाळी फाटा येथील चहा टाळला असला तरी परत घरी येताना मात्र तो मोह आवरला नाही.


नेवाळी फाट्याहून परत घरी येताना जो (josiah skeats)ने शिकवलेले गाणे मनात रुंजी घालू लागले....
"I am on the roads again...."

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...