जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार दिनांक: १५ पौष १९४१
यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ५ जानेवारी २०२०
सतलज नदीजवळ वसलेल्या फिरोझपूर शहराची लोकसंख्या साधारण सव्वा लाखाच्या आसपास! तुघलक राजवटीतील सुलतान फिरोजशहा ह्याने १४ व्या शतकात हे शहर वसवले. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर फिरोजपुर हे सीमेजवळचे महत्वाचे शहर झाले आहे. त्यामुळेच काल संध्याकाळी हुसैनिवाला सिमारेषेपाशी आम्हाला सैन्याची कवायत पाहता आली होती. ह्या शांत शहरात काल झोपही गाढ लागली होती.
मात्र सवयीप्रमाणे आज पहाटे ५ वाजताच जाग आली. आमचे आटपुन होईपर्यंत चहा नाश्ताही हजर झाला होता. वास्तविक दीडेक तास रपेट झाल्याशिवाय नाष्टा करणे श्विनला पसंत नव्हते आणि त्यातही चहाबरोबर नाष्टा .. ही तर कल्पनाच सहन होत नव्हती. चहा हा चहा आहे, त्याच्याबरोबर नाष्टा करणे म्हणजे चहाचा अपमानच. शिवाय पहिल्या चहाबरोबर नाष्टा म्हणजे तर घोर अपमानच! पण कसे कोण जाणे आज चहाबरोबर आलेले सँडविच आपोआप स्वाहा झाले.
ह्याचदरम्यान सोहन सोधी, गुरुमुखसिंग आणि हरबीर संधू हेही हजर झाले होते. गंधारमुळे सोहन सोधींशी परिचय झाला होताच. अतिशय साधा, शांत आणि सगळ्यांशी चटकन मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्याविषयी लगेचच आपलेपणा वाटू लागला होता. काल संध्याकाळपासूनची आमची सर्व व्यवस्था सोधींनी आपणहून आणि काळजीपूर्वक पाहिली होती. 'काम करो रब मिलही जायेगा' ही त्यांची धारणा होती.
हरबीर संधू आणि गुरुमुखसिंग हे देखील अतिशय साध्या आणि शांत स्वभावाचे! सोहन सोधींप्रमाणेच त्यांनीही आम्हाला अतिशय आपुलकीची वागणूक दिली होती. भल्या पहाटे आम्हाला पुढील मार्गात साथ करायला सोधींबरोबरच हे दोघेही आले होते.
ह्या त्रयीमुळे आमचा उत्साह नक्कीच वाढला होता. सूर्यनारायण अद्याप समाधीवस्थेतून जागा झाला नसला तरी आम्ही पुढील मार्गक्रमण करायला सिद्ध झालो होतो. अर्थातच नेहमीप्रमाणे कपड्यांचे चार थर, कागदांचे तीन थर आम्ही लपेटून घेतले होतेच. सायकलच्या हाताळ्याला लावलेल्या विजेऱ्या आम्हाला प्रकाश देणार होत्याच शिवाय फिरोजपुर येथील तीन मित्र आम्हाला दिशाही दाखवणार होते. त्यांच्याच जोरावर आम्ही तिमिरावर मात करणार होतो.
सोधींनी आम्हाला कालच सावध केले होते की हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आज दुपारी ३ -३.३० नंतर पावसाची शक्यता होती. त्यामुळे आम्हाला त्याआधी अमृतसरला पोचायला हवे होते. मुंबईत तर हवामान खात्याने पाऊस पडणार असा अंदाज दिला की पाऊस अजिबात पडणार नाही याची खात्री असते. मात्र सोधी हवामान खात्याच्या सुचनेशी पूर्ण सहमत होते.
देवधरांनी रात्री त्यांना भेटायला आलेल्या शाळेतील विश्वस्तांना आम्ही सकाळी शाळेत येऊ असे सांगितले होते. सोधींनी लगेचच काल रात्रीच पावसाच्या शक्यतेबरोबर हेही सांगितले होते की त्या शाळेत जायचे असेल तर अंतरही साधारण १५ किमीने वाढेल. वाटेत कोणालाही भेटायला स्पष्ट शब्दात नकार देणाऱ्या देवधरांना त्यांच्या स्नेहयाला मात्र 'नाही' म्हणता आले नव्हते. श्विनच्या सायकलसफरीचा मूळ उद्देशच नवीन ओळखी करून घेणे, संपर्क वाढवणे हा असतो. म्हणूनच तर काल लुधियानातून अनोळखी फोन येताच अंतर किती आहे ह्याचा अंदाज नसतानाही श्विनने तिथे जाता येईल का हा विचार केला होता. त्यामुळे अर्थातच ह्या शाळेत जायला श्विनची आडकाठी नव्हतीच.
अखेरीस आम्ही अमृतसरकडे जाणारा थेट रस्ता सोडून सतीयावाला बायपास जवळील विवेकानंद वर्ल्ड स्कुल या शाळेच्या दिशेने निघालो. पूर्ण अंधारातच आम्ही जात असल्याने आजूबाजूचा निसर्ग आम्हाला पाहता आला नाही. मात्र शाळा शहराबाहेर रहदरीपासून लांब अश्या शांत ठिकाणी असल्याचे मात्र जाणवत होते. शाळेचे आवार प्रशस्त आणि आखीव होते. तेथे पोचताच आमचे आपुलकीने स्वागत करण्यात आले. रवीराजांनी हजेरी लावली नसली तरी आज त्यांचाच वार म्हणजे रविवार होता. अर्थात त्यामुळे शाळेत विद्यार्थी मात्र नव्हते.
आमचे प्रेमपूर्वक स्वागत झाल्यावर आम्हाला एका दालनात नेण्यात आले. एका लांबलचक मेजाभोवती आम्ही सर्व सायकलस्वार, आमचे फिरोजपुर येथील सायकलमित्र आणि शाळेतील मान्यवर बसल्यावर आम्हाला शाळेविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. चहा बिस्किटांचाही समाचार घेण्यात आला. वातावरण अतिशय भारलेले होते. विद्यार्थ्यांबरोबर आमची भेट न घडल्याने तेथील विश्वस्तांना खंत वाटत होती. सर्व सायकलपटूंना शुभेच्छा देण्यात आल्या. सगळेच वक्ते अगदी मनापासून बोलत होते.
सभागृहातून बाहेर येऊन आम्ही पुन्हा शाळेच्या आवारात आलो. फुजी आणि तिच्या मैत्रिणी आमच्या प्रतिक्षेतच तिथे उभ्या होत्या. आम्ही त्यांच्याजवळ गेलो. इतक्यात शाळेच्या विश्वस्तांनी त्या शाळेत असणाऱ्या एका अनोख्या गोष्टीकडे आमचे लक्ष वेधले. तिथे एका बाजूला प्राथमिक शाळेतील मुलांसाठी चक्क सायकल मार्ग होता. अर्थातच आम्हालाही त्या मार्गावरून जाण्याचा मोह आवरला नाही. त्या चक्राकार मार्गावर सायकलवताना शाळेच्या ह्या उपक्रमामुळे शाळेत भेट दिल्याबद्दल आम्हाला निश्चितच आनंद झाला. शाळेच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासाठी आठवड्यातून अर्ध्या तासाच्या केवळ २ तासिका असण्याच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद वर्ल्ड स्कुलचा हा उपक्रम नक्कीच वाखाणण्याजोगा होता.
गणितासारख्या विषयांद्वारे केवळ मानसिक व्यायाम घडवण्याबरोबर विवेकानंद शाळेत पाहिलेल्या अश्या अभिनव उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायामाचीही लहानपणापासून सवय लावली तर निरोगी नागरिक घडविण्यास नक्कीच हातभार लागू शकतो. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी हॉकीचा जादूगार ध्यानचंद ह्याच्या जन्मदिवसानिमित्त 'सशक्त भारत (फिट इंडिया) हा संदेश देताना म्हटले होते की 'फिट इंडिया हे जन आंदोलन झाले पाहिजे'. फिट इंडिया हे राष्ट्रीय ध्येय व आकांक्षा झाली पाहिजे. त्यांनी सांगितले होते की जरी ह्याची सुरुवात सरकारने केली असली तरी नागरिकांनी स्वतः ह्याचे नेतृत्व केले पाहिजे आणि हे आंदोलन यशस्वी केले पाहिजे. ह्याच संदेशामुळे प्रेरित होऊन आमच्या पुणे जम्मू सायकलसफरीचा उद्देशही सशक्त भारत (फिट इंडिया) ह्या संदेशाचा प्रसार करणे हाच होता. त्यामुळेच विवेकानंद शाळेच्या ह्या अनोख्या उपक्रमामुळे आम्ही प्रभावित झालो होतो. खरंतर रोज तीन तासाच्या मानसिक व्यायामच्या आधी तेवढाच वेळ रोज शारीरिक व्यायामही शाळा कॉलेजमध्ये घडला तर सशक्त भारताचे स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल.
आम्ही विवेकानंद शाळेतून निघालो तेव्हा साधारण ८.३० चा सुमार झाला होता. तिमिरावर अजून तेजोनिधीने पूर्ण वर्चस्व मात्र मिळवले नव्हते. अंधुक उजेडातच आमची पुढील वाटचाल सुरू झाली. सोधी, हरबीर आणि गुरुमुखसिंग आम्हाला मार्गदर्शन करत होते. रस्ता मोकळाच होता. सायकलयात्री धीम्या गतीने पण ठामपणे जात होते. काही वेळातच आमचा रस्ता एका महामार्गाला काटकोनात भिडला. झिरा गावाजवळ आम्ही पोचलो होतो. समोर जाणारा रस्ता झिरा गावाकडे जात होता. साधारण ४०-४५ किमी अंतर पार झाले होते. आता पुन्हा एकदा जठराग्नी जागृत झाला होता. सगळेजण तडक सहाय्य वाहनात ठेवलेल्या मेव्याकडे वळले. आमची फिरोजपुर येथील मित्रमंडळी आता परत जाणार होती.
रात्री झोपेचा वेळ वगळला तर फिरोजपूर येथिल मंडळींचा सहवास आम्हाला जेमतेम १०-१२ तासांचा. मात्र या कालावधीत त्यांनी आम्हाला जे सोनेरी क्षण अनुभवायला दिले होते ते हृदयाच्या कप्प्यात कायमसाठी जपले जाणार होते. सोधी, हरबीर, गुरुमुख ह्यांनी आमची जी काळजी घेतली त्यामुळे सादुलशहर, अबोहारप्रमाणेच फिरोजपुर येथेही आमचे घट्ट नाते निर्माण झाले होते.
सोधीजी, जो आपली काळजी करतो तोच ईश्वर. रब वोही तो है... जो लोगोंका खयाल रखता है. वह तो हमारे साथही सफर कर रहा है. बस उसका नाम और रूप बदलता रहता है. कभी वो डॉ जितेंद्र होता है, कभी हरजित, कभी सोहन सोधी, कभी हरबीर तो कभी गुरुमुखसिंग!