'पेडल रिपब्लिक' ...
राष्ट्रीय दिनांक २४ अग्रहायण १९४१
राष्ट्रीय कॅलेंडरचा ९ वा महिना- 'अग्रहायण'ची अखेर जवळ आली होती. तेजोनिधी अतिदक्षिणेकडे झेपावत होता. आजचा वारही त्याच्याच नावावर बेतलेला... रविवार!
डोंबिवली शहरातील सायकलपटूंचा एक समूह नेहमीप्रमाणेच भास्कराने जागे व्हायच्या आतच दौड घेण्यास सज्ज झाला होता. डोंबिवली शहरातील चार रास्ता ...या नियोजित ठिकाणी जमा झालेले सायकलपटू आज विशेष उत्साहात होते. सगळ्यांनी एका रांगेत दौड सुरू केली. पाहता पाहता टिळक पुतळा, पेंढरकर महाविद्यालय पार करत फौज कल्याण शीळ रस्त्याला लागली. प्रत्येक सायकलस्वाराने शिरस्त्राण परिधान केले होते. तसेच प्रत्येक सायकलनेही अग्रभागी दिवा परिधान केला होता. शिस्तबद्ध सायकलिंगसाठी हा गट प्रयत्नशील होता, .. नव्हे ती तर ह्या गटात सामील होण्याची प्रमुख अट होती. अन्यथा कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी सक्त ताकीद गटनायक सौमित्र सामंत नेहमीच देत असे.
सामंत पेट्रोल पंपापाशी पोचल्यावर सगळ्यांनी थोडा विसावा घेतला. काही सदस्य चार रास्ता ऐवजी सामंत पेट्रोल पंपापाशीच येणार होते, तेही आता सामील झाले. सगळ्यांचा उत्साह पाहताच रवीराजानेही धुक्याची चादर दूर केली होती.
लयबद्ध पद्धतीने एका पाठोपाठ एक सर्व सायकलस्वार शीळ फाटा येथे पोचले. लगेचच त्यांनी डावीकडे मोर्चा वळवला. आजचे नियोजित ठिकाण आता जवळ येत होते. पनवेलकडे जाणारा हा महामार्ग नेहमीच गजबजलेला असे. काही सदस्य थोडे पुढे गेले होते. मात्र खारघरकडे जाणाऱ्या फाट्यापाशी ते सदस्य इतर सदस्यांसाठी थांबले होते. सगळेजण पुन्हा एकत्र भेटल्यावर तो समूह खारघरच्या सेंट्रल पार्कच्या दिशेने जाऊ लागला. दुतर्फा रुंद आणि स्वच्छ रस्ता पाहताना सगळ्या सायकलींचा उत्साह आणखीच वाढत होता. प्रभातफेरीसाठी निघालेले आबालवृद्ध त्या प्रशस्त रस्त्यावर दिसत होते. ह्या मोकळ्या रस्त्यावर आणि मोकळ्या हवेचा अनुभव विलक्षण सुखावत होता. प्रत्येकजण तेथे आपापल्या गतीने पुढे सरकत होता.
थोड्याच अवधीत खारघरचे सेंट्रल पार्क आले.
एकाशेजारी एक अश्या रांगेत सगळ्या सायकली हारीने उभ्या केल्यावर सगळेजण त्या विस्तीर्ण पार्कमध्ये शिरले. डोळे विस्फारतील अशी हिरवळ नजरेस पडत होती. पार्कमध्ये बऱ्यापैकी गर्दी असली तरी त्याच्या एकंदर क्षेत्रफळामुळे कोठेही गर्दी होत नव्हती. एका ठिकाणी काही स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. शेजारीच विस्तीर्ण प्रेक्षागृह होते. सायकलपटूंचा समूह त्या प्रेक्षागृहाच्या अत्यंत उंचीवर गेला.
सभोवताली दिसणारे दृश्य मनात साठवून सगळेजण चार पायऱ्या खाली उतरले.
आणि मग सगळ्यांचाच उत्साह अगदीच टिपेला गेला. ज्या क्षणाची सर्व सदस्य वाट पाहत होते , तो क्षण जवळ आला होता. आपल्या कवेत धरलेली गुंडाळी बाहुबली मेघेश हळूहळू उलगडत होता. त्या ठिकाणी व्यायामासाठी आलेले इतर लोकही कुतूहलाने थांबून बाहुबलीकडे पाहत होते. मेघेशने हळूहळू आपले दोन्ही हात दोन विरुद्ध बाजूला लांबवत नेले....अन टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला...
बहुबलीच्या दोन्ही बाहूंमध्ये उलगडलेल्या त्या फलकावर अक्षरे झळकत होती....
'Experience the road little differently...
PEDAL REPUBLIC'
शिस्तबद्ध सायकलिंगचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ह्या सायकलसमूहाने एक पेडल पुढे मारले होते...
'पेडल रिपब्लिक' ह्या गटाच्या घोषणाफलकाचे उदघाटन खारघर येथील विशाल अश्या सेंट्रल पार्कमध्ये शेकडो उपस्थितांच्या साक्षीने झाले होते.