जागतिक शास्त्रिय निधर्मी सौर दिनांक: भारतीय सौर ४ पौष १९४१
यूरोप खंड आणि ख्रिस्ती धर्मावर आधारित अशास्त्रीय सौर दिनांक: २५ डिसेंबर २०१९
मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावणारी नर्मदा भरुचजवळ खंबातच्या आखातास मिळते. अंकलेश्वर शहर नर्मदेच्या दक्षिण काठावर आहे, तर भरूच शहर नर्मदा नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. ही दोन शहरे शालिवाहन शक १८०३ (ख्रिस्ती वर्ष १८८१) मध्ये बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडली गेली आहेत.
पौराणिक कथेनुसार भरुच शहर आज जिथे स्थित आहे तिथे प्रत्यक्ष लक्ष्मीचा रहिवास होता. लक्ष्मीने तात्पुरता निवास करण्यासाठी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगु ऋषी ह्यांना इथे वास्तव्याला परवानगी दिली. भृगु ऋषींच्या नावावरून ह्या शहराचे भृगूकच्छ असे नाव पडले.
भरुचचा ज्ञात इतिहास ८००० वर्षांचा आहे. भरुच शहर हे सलग रहिवास असलेले भारतातील काशी (वाराणशी) पाठोपाठ दुसरे स्थान आहे. ख्रिस्तपूर्व काळापासूनही भरुच शहर रोमन, ग्रीक, पर्शियन, इत्यादी पश्चिमात्यांनाही ज्ञात होते.
चंद्रगुप्त विक्रमादित्य, गुप्त घराण्यातील इतर राजे ह्यांनी पाचव्या शतकापर्यंत, तर नंतर गुर्जर राजांनी ७ व्या शतकापर्यंत येथे राज्य केले. ८ वे शतक ते १३ वे शतक राजपूत राज्यांनी येथे राज्य केले. सोळंकी राजवटीतील राजा सिद्धराज जयसिंह ह्याने भरुच भोवती तट उभे करून भक्कम दरवाजा बांधला. त्याला मलबारी दरवाजा म्हणत. त्यालाच नंतर काटोपोर दरवाजा व नंतर झाडेश्वरी दरवाजा असे म्हणत. चंगेजखानाने १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात राज्य केल्यानंतर मुघलराज हुमायून ने येथे राज्य केले. मराठा साम्राज्यही येथे काही काळ होतेच.
अश्या सर्वात मोठा इतिहास असलेल्या भरुच शहरातील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या आवारात राहण्याची तसेच पोटोबाचीही उत्तम सोय झाली होती.
रात्री जेवण झाल्यावर निशाराणीही लगेच प्रसन्न झाली. तसेही दिवसभर पाय मारून झाल्यावर इतर कोणत्याही विवंचना मनाला न शिवू देता निशाराणी मोहिनी घालतेच. त्यातच इतक्या प्रसन्न आणि मनमोहक वातावरणामुळे रात्री जेवण करून बिछान्यावर पडताच तिने गारुड केले. शांत झोप झाल्यामुळे सगळे सायकलस्वार ताजेतवाने झाले. अस्मादिकांनी बाहेर येऊन फुजीला सज्ज केले आणि पटांगणात फेऱ्या मारत इतरांची वाट पाहू लागले. फेऱ्या मारताना सहजपणे बाजूला उभ्या असणाऱ्या अश्वशक्तीधारी चारचाकींकडे लक्ष गेले. तेथे पाच सहा चारचाकी उभ्या होत्या. त्या सगळ्या चारचाकींनी धारण केलेल्या पाटीवर MH ही अक्षरे झळकत होती. पुढील आकडे मात्र वेगवेगळे होते. महाराष्ट्र राज्यातून आलेल्या वाहनांना पाहून कुतूहल जागे झाले. मात्र त्या वाहनांचे मालक आणि चालक यापैकी कोणीही तिथे नव्हते.
हळूहळू पटांगणात इतर सगळे सायकलस्वार जमले. आपापल्या सायकलींच्या विजेऱ्या सुरू करत त्यांनी स्वामीनारायण मंदिरातील पटांगणातुन महामार्ग गाठला. आता फुजीसह इतर सर्व सायकलींच्या चाकांना त्या गुळगुळीत हमरस्त्याची सवय झाली होती. त्यामुळे अल्पावधीतच सगळी मनुष्यशक्तीधारी वाहने वेग पकडू लागली. सातही स्वार एकमेकांच्या साथीने दौडत होते. वातावरणात किंचित सुखद गारवा होता. उजव्या बाजूला तेजोनिधी क्षितिजावर येत होता. पूर्व दिशेला गुलाबी रंग चढत होता. निसर्गाच्या कॅनव्हासवरील ते चित्र विलोभनीय होते.
मोकळा खड्डेविरहीत रस्ता, शांत वातावरण, गुलाबी क्षितिज ह्यांचा आनंद घेत तासाभराच्या अवधीतच १९ किमी अंतर पार झाले होते. आता अर्थातच पृथ्वीवरील अमृताची निकड भासू लागली होती. चहा मिळाल्यावर ह्या संपूर्ण आनंदाची परमावधी लाभणे शक्य होते.
चहापान झाल्यावर पुन्हा तासाभराची दौड झाली. क्षुधाशांतीचीही गरज होतीच. त्यामुळे पुन्हा एक थांबा घेत उदरभरण केले....आणि अचानक लक्षात आले की माझ्या मावशीचा भ्रमणध्वनी सापडत नाहीये. एक शक्यता अशी होती की त्या भ्रमणध्वनीला स्वामीनारायण मंदिराचे विश्रामगृह आवडले असावे. ज्या सद्गृहस्थांनी आमची तेथे राहायची सोय केली होती, त्यांना देवधरांनी ताबडतोब भ्रमणध्वनी करून खात्री करायला सांगितले. त्यांना विश्रामगृहात जाऊन खात्री करेपर्यंत वेळ जाणार होता. शिवाय एव्हाना चर्चेमध्येही बराच वेळ गेला होता. त्यामुळे स्वामीनारायण मंदीर येथून परत निरोप येईपर्यंत न थांबता सर्व सायकलस्वारांनी पुढे जायचे आणि गौतमने निरोप येईपर्यंत आहे तेथेच थांबायचे असे ठरले. जर स्वामीनारायण मंदिरातील विश्रामगृहात भ्रमणध्वनी सापडला तर गौतम त्याच्या टेम्पोसह परत मागे जाऊन पुन्हा आम्हाला बडोदा येथे गाठू शकत होता.
सगळे सायकलस्वार बडोद्याच्या दिशेने वेगात निघाले. बडोदा शहर ज्या विश्वामित्री नदीच्या काठावर वसले आहे ती विश्वामित्री नदीसुद्धा नर्मदेप्रमाणेच खंभातच्या आखतासच मिळते. बडोद्याच्या वेशीपाशी पोहोचताच ३-४ वर्षांपूर्वी अस्मादिक आणि नयना आघारकर यांनी विजयादशमीच्या दिवशी बडोदा येथे केलेल्या सायकलस्वारीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळेस माझी शालेय मैत्रीण वैशाली आणि तिचे पती संदीप भोसले ह्यांच्या घरी आमचा पाहुणचार झाला होता. अर्थात त्या वेळेस बडोदा येथेच आमची सायकलसफर संपूर्ण झाली होती, तर ह्यावेळी थेट जम्मूपर्यंत जायचे होते. अगदी आजच्या दिवशीही मुक्काम बडोद्याच्या बराच पुढे होता. त्यामुळे वैशाली आणि संदीप ह्यांना वाटेतच भेटायचे ठरले होते. संदीपच्या दिलखुलास स्वभावाचा अनुभव मागील वेळेस आला होताच.
आम्हाला अहमदाबाद येथे सामील होणाऱ्या सायकलपटूंपैकी आसाभाई पटेल यांचे स्नेही श्री गद्रे हेही आम्हाला बडोदा येथे भेटून आम्हाला बडोद्याहून पुढील जाणारा खुष्कीचा मार्ग दाखवणार होते. तसेच आमच्या अहमदाबाद चमूतील श्री रसिकभाई पटेल ह्यांची भाचीही आमच्या आगमनाची प्रतीक्षा करत होती. वैशाली, संदीप आणि गद्रे ह्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे सल्ला मसलत करत आम्ही बडोद्यामध्ये शिरलो. शहरातील मकरपूरा पोलीस स्टेशनच्या चौकात सर्वजण आमची वाट पाहत होते. आम्ही तेथे पोहोचताच एकच जल्लोष सुरू झाला. त्या चौकातच एकमेकांची खुशाली विचारत सर्वजण रमले होते.

खरंतर एव्हाना जठराग्नी भडकू लागला होता, मात्र एकमेकांना भेटल्याच्या आनंदात, गप्पांमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष होत होते. बडोदेकरही आमचा पाहुणचार नक्की कुठे करायचा ह्याचा खल करत होते. आम्ही यावेळी वैशालीच्या घरी जाऊ शकलो नाही याचे तिला आणि संदीपला जेवढे वाईट वाटत होते तेवढेच मलाही वाईट वाटत होते. मात्र घड्याळबाबा आमच्या मानगुटीवर बसले होते. घरी पाहुणचार नाही करता आला तरी तो व्यवस्थित झाला पाहिजे ह्यावर बडोदेकर ठाम होते.
आमच्यासाठी काय करू आणि काय नको असे संदीपला झाले होते. पाहुणचारात काहीही कमी पडू नये यासाठी तो कायम सजग होता. आमच्या तोंडून उच्चार व्हायचा अवकाश तो मदत करायला तत्पर होता. गौतम मागे राहिला आहे हे ऐकताच संदीप गौतमला आणायला थेट बडोद्याच्या वेशीपर्यंत जायला तयार होता.
मात्र इतक्यात आमच्या क्षुधाशांतीची व्यवस्था करण्याबद्दल चर्चा सुरू झाली. सर्व बडोदेकरांचे एकमत होऊन आम्हा सर्व सायकलस्वारांची वरात बडोदेकरांबरोबर जवळच्याच एका सुप्रसिद्ध खाद्यपदार्थगृहाकडे निघाली. थोड्याच वेळात 'भाईलाल शिवलाल' ह्या क्षुधाशांतिगृहात शिरलो. दुकानाबाहेर सगळ्या सायकली हारीने उभ्या करून सर्व स्वार दुकानात शिरले. दुकानदाराने सगळ्या सायकलस्वारांचे स्वागत केले. दुकानात तर विविध पदार्थांची उपलब्धता होती. आम्हाला कोणत्या पदार्थांची मेजवानी द्यायची यावर बडोदेकरांनी थोडासा खल केला.
सगळेच पदार्थ अतिशय ताजे दिसत होते. अखेरीस आम्हाला बाहेरील गोल मेजाभोवती कोंडाळे करून उभे राहायला सांगून मधील मेजावर खाद्यपदार्थ येऊ लागले.
समोर येणारी मेजवानी पाहताच सर्व सायकलस्वार त्यावर तुटून पडले. हातातोंडाची लढाई सुरू झाली. मेजावर मधोमध आलेल्या त्या खाद्यपदार्थांभोवती सर्व सायकलस्वारांनी घेराव घातला होता. क्षणाक्षणाला समोरील थाळी रिकामी होत होती. मात्र लगेचच त्याची जागा दुसरी थाळी घेत होती. खरतर अजून आजचा टप्पा पूर्ण झाला नव्हता, जेमतेम ७० किमी अंतरच पार झाले होते. अजून जवळपास निम्मे अंतर बाकी असल्याने थोडा संयम ठेवणे भाग होते. मात्र समोर येणारे पदार्थ त्या अंतराची काळजी दूर ठेवत होते. जठराग्नी शांत झाला तरी रसनेची तृप्ती होत नव्हती. मात्र विश्वामित्री काठावरील बडोदेकर रहिवाश्यांच्या पाहुणचारामुळे सगळ्या सायकलस्वारांचे मन तृप्त झाले होते.