शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

No helmet no ride

It was beautiful morning today when Shwinn started for c2w (#cycle to work) ride. The atmosphere was pleasant. C2w is daily affair for Shwinn. But she was more delighted as she knew, being last friday of Gregorian month, many of her friends might do c2w today in Mumbai today.


The Sun was slowly moving upward in the sky. The students had reached the school. So there was less rush on the road, when Shwinn started the ride. However the narrow roads doesn't allow to put next gear. Shwinn was calm & steady till it reaches 90 feet road in Thakurli. Once it reaches there, Shwinn put next gear. 

90 feet road is parallel to rail line. Its always fun to watch the trains moving slowly but parallel to us. It reminds me my schooldays. My school was just opposite to railway. I was in 4th std when double decker train started. I don't remember how but even without having watch,  I always rush to window to see the doubledecker train just before it pass. There might be not even single day in 4th std that teacher had not punished me for the same. But in spite of daily punishments, every next day the same drama had repeated.

But the Shwinn is not aware of such punishments. She enjoys when train passes parallel to her. 

'Patri pul' was packed today, so Shwinn had to slow down. Unfortunately, the rear tyre was getting jammed yesterday, as & when I used rear break. So today I had to use only front break to slow down Shwinn. But Shwinn had no fear. We passed patri pul, durgadi fort easily. But it was real test when we started climb on bridge after Durgadi fort. The horsepowered pollution friendly vehicles were moving at the pace of snail. And Shwinn had to get through with only front gear. But since it was daily affair, Shwinn find its way nicely.

But the traffic at Kongaon was just waiting for Shwinn. Still it moved ahead with ease. Then though there was rush, the traffic was moving. Shwinn crossed Govegaon, Ranjnoli & turned at Ranjnoli on Nashik Thane Highway. Thats the road, Shwinn like the most. 

Most of the cyclists get bored with heavy traffic. But since its highway, the road is wide & horsepowered pollutionfriendly vehicles moves away from you. Yes, you should be alert all the time. But Shwinn enjoys the ride on this highway.

The climb ahead of Pimplas always tests your skill. But you gets recharged when the rocks on both sides of road after climb welcomes you. If you ve spare time, you can relax there enjoying the nature. What I enjoy riding Shwinn is it gives me oportunity to connect myself & also with the nature.

Shwinn crossed the Sai mandir at Dapode & speed up towards Mankoli. It was not easy to slow down with front break but Shwinn did it nicely. It was steady ride then till Kharegaon bridge....

Shwinn had to slow down there again as we heard a break on other side of divider. Oh! A two wheeler was moving ahead parallel to road without driver. The biker was already on the street on his right shoulder well behind the vehicle. Luckily he had wore the helmet, so survived. It reminds me the #kalyan cyclists slogan 'no helmet no ride'.

Shwinn moved ahead & crossed Majiwada & turned to left. Shwinn took flyover opposite Korum mall & rushed to Tin hath naka. This signal is too long as vehicles from 6 directions meets here. But Shwinn takes advantage of three roads while turning towards Mulund checknaka. Today Shwinn finds first signal itself & it moved to Mulund checknaka & completed its cycle2work ride.

#dombivlicyclingclub #dombivlicycleclub #tjsbbank #ismartcommute #saveoursahyadri #cyclingzens


श्विन अभावी....

१९ ऑगस्ट २०१७

कालच गुलजार यांची जन्मतारीख होती. हळव्या मनाचा कवी! खरच मराठी असो वा हिंदी...पण कविता, चित्रपटसंगीत यांनी आपले जीवन समृद्ध नक्कीच केले आहे.

कोणतीही भावना असो ती ज्यांना पद्यात मांडता येते, ते खरोखरीच भाग्यवान. मला कविता लिहिता येत नसल्या तरी, श्विनमुळे रोज लिखाणाची सवय लागली होती.
मात्र गेला आठवडाभर घरीच असल्यामुळे श्विनसवारी बंदच होती. त्यामुळे काही लिहायलाही सुचत नव्हते. खरतर सूर्य उगवत होता आणि मावळत होता यापलीकडे कोणत्याही भावना जाणवत नव्हत्या.

#dombivlicyclingclub च्या सदस्यांचे प्लॅन्स रोज समजत होते. #tjsbbank मधील घडामोडी कळत होत्या. पण मी मात्र घराबाहेर पडू शकत नाही हि भावना अस्वस्थ करणारी होती.

काहीजणांचे फोन आले की तू लिही! पण काय लिहिणार? श्विन समोर असून तिच्याबरोबर फिरायला जाता येत नाही तर....

श्विनसवारी नसल्यामुळे 'खाली हाथ शाम आई है खाली हाथ जायेगी' अशीच अवस्था झाली आहे. सात दिवसानंतर विचार केला निदान श्विन जवळ तरी जाऊया.

श्विनकडे जाण्यासाठी टेरेसचा दरवाजा उघडला. समोर गुलाबाची फुलं छान उमलली होती. माझ्या आवडत्या मघई पानांचा वेलसुद्धा स्वागत करत होता. मात्र श्विनकडे पाहिले, तर ती मात्र हिरमसून मान वळवून उभी होती. समोरचे गुलाबही श्विनच्या चेहऱ्यावरील उदासी घालवू शकत नव्हते.

श्विनजवळ मी फार थांबू शकलो नाही. मीसुद्धा उदास झालो होतो आणि डोळ्यासमोर एकच चेहरा समोर आला ...राजेश खन्ना!

किशोरदांचा आवाज, राजेश खन्नाचा अभिनय असणारी गाणी सुरु केली आणि उदास भावसुद्धा किती आनंद देतो हे लक्षात आले.

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

उल्हास खाडी परिक्रमा

भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरच्या सौर माघ या महिन्याची आज शेवटची म्हणजे ३० तारीख! ख्रिस्ती कॅलेंडरही भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे सौर कॅलेंडर. त्यानुसारची तारीख १९ फेब्रुवारी!
हिंदू आणि मुस्लिम यांचे कॅलेंडर मात्र चांद्र कॅलेंडर. तरीही काहीजण अज्ञानामुळे आणि हट्टामुळे हिंदू राज्य निर्माण करणाऱ्या आणि तेही शककर्ता (नवीन चांद्र कॅलेंडर निर्माण करणारा) शिवाजीमहाराजांची जयंती चक्क सौर कॅलेंडरप्रमाणे म्हणजे तारखेने साजरी करतात. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या ह्या ख्रिस्ती शिवजयंतीच्या सुट्टीची संधी साधत आज श्विन आणि स्कॉटने उल्हास खाडीची परिक्रमा करायचे ठरवले होते.  

डोंबिवली शहराला उल्हास खाडीने वेगळेच वैभव प्राप्त करून दिले आहे. श्विन आणि स्कॉटने आज अंमळ उशिरानेच सुरुवात केली होती. अरुणमहाराजांनी मात्र त्यांची परिक्रमा सुरु केली होती. डोंबिवली शहरातील शिक्षणाची दुकाने सुरु होत असल्याने त्याभोवती गर्दी झाली होती. 
तेथून वाट काढत श्विन आणि स्कॉटची उल्हास खाडीच्या परिक्रमेला सुरुवात झाली. 

ग्रामदैवत श्री गणेशमंदिरासमोरून मंदिरातील मूर्तीला मनोमन नमन करून, ठाकुर्ली मार्गे ९० फिट रस्ता गाठला तेव्हा वेग घेता आला. दुर्गाडी किल्ल्या जवळील चौकात शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला कुर्निसात करून आम्ही पुलावरून खाडीचे पात्र पार केले. सुदैवाने कोनगावात वाहतूककोंडी झाली नाही. त्यामुळे झपाट्याने रांजनोली नाका गाठत येथे श्विन स्कॉटने नाशिक ठाणे महामार्गाला वळण घेतले. वाहने अधिक असली तरी रुंद महामार्ग असल्याने येथे मार्गक्रमण करणे श्विनला नेहमीच आवडते. खरेतर हा श्विनच्या चाकाखालचा रोजचाच रस्ता. तेथून रेल्वेमार्गावरील चढ चढताना समोर दिसणारी खिंड थकवा जाणवू देत नाही. हा चढ चढल्यावर आलेल्या लांबलचक उतरणीने आणि जाणवणाऱ्या वाऱ्यामुळे उत्साह वाढत होता. 

दापोडे जवळील साईमंदिरात आम्ही शिरलो. तेथील प्रसन्न वातावरणाने मन भारून गेले. त्या परिसरात छोटा फेरफटका मारताना सर्व जगाचा विसर पडतो. मुंबई/ ठाण्याहून शिर्डीपर्यंत पदयात्रा करणाऱ्या भाविकांची येथे निवासाची व्यवस्था केली जाते. तसेच काही प्रकारचे व्यावसायिक शिक्षणही येथे दिले जाते. गोळवलकर गुरुजींची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. वेगवेगळी फुलझाडे आणि हिरवळीने सर्व विवंचना विसरल्या जातात. येथे काही वेळ थांबून आम्ही मानकोलीकडे वळलो. दरम्यानच्या उतारावर चांगलाच वेग साधता आला होता. मानकोली पार केल्यावर डाव्या बाजूला पुढच्या दिशेस मुंब्रा डोंगररांगा दिसू लागल्या. ह्या डोंगररांगा आणि उल्हास खाडीचे पात्र यांच्या पार्श्वभूमीवर फोटोसेशन करणे मला नेहमीच आवडते.

तेथून पुढे खारेगाव टोल पार करत मुंब्रा शहराकडे वळल्यावर मात्र रहदारीची वर्दळ  जाणवू लागली. सकाळची वेळ असल्याने मुंब्रा शहरातील बाजार भरला नव्हता त्यामुळे त्या रहदारीतून लवकर सुटका करून घेत शिळ फाटा गाठला. आता जठराग्नी तप्त होऊ लागला होता. त्याला आहुती देणे गरजेचे होते. मिसळीच्या आशेने आज 'कोकणरत्न'कडे दुर्लक्ष करत आम्ही पुढे निघालो. मात्र दुर्दैवाने देसाई गाव येथील 'लाल वडा' हॉटेल बंद असल्याने रपेट तशीच सुरु ठेवावी लागली. सुदैवाने 'पालवा'पुढील चढ सहजपणे पार झाला. मानपाडा जवळ येताच केलेल्या निरापानामुळे पुन्हा उत्साह आला. मिसळीचा योग हुकला तरी, भोपरहून पुढे येताच अय्यंगार बेकरीत केक आणि शेजारीच मिळालेल्या अप्रतिम इडली सांभारने क्षुधाशांती केली.
त्यानंतर मात्र विनाथांबा स्वगृही परतत श्विन आणि स्कॉटची उल्हास खाडी परिक्रमा सुफल संपन्न झाली.

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

जोडी तुझी माझी

राष्ट्रीय कॅलेंडरची शेवटची तिमाही म्हणजे सायकलप्रेमींसाठी पर्वणीच. ह्या काळातील आल्हाददायक वातावरण नेहमीच सायकलसफारींसाठी अनुकूल असते.
श्विन आणि स्कॉट जोडीने ह्याच वातावरणाचा लाभ घेण्याचे ठरवून आज अंबरनाथ येथील शिवमंदिराला भेट देण्याचे ठरवले होते. घरातून निघताना सूर्योदय झाला नव्हता. समोर लावलेल्या विजेरीमुळे श्विनचा रुबाब वाढला होता. श्विन आणि स्कॉटने दीनदयाळ रस्ता, पूर्वपश्चिम उड्डाणपूल, भोपर मार्गे मानपाडा रस्ता गाठला तोपर्यंत मात्र थोडाफार उजेडू लागले.

मलंगगडाशेजारी सूर्यबिंब क्षितिजावर येऊ लागले तोपर्यंत श्विन आणि स्कॉटने कोळेगाव गाठले होते. सायकलींनी वेग घेतला होता, मात्र क्षितिजावरील गुलाबी सफरचंद वेग मंदावत होते. मारुतीरायाला जन्मताच त्याचा लोभ का पडला हे सहजच जाणवत होते. श्विन आणि स्कॉटला मात्र मलंगगडाशेजारून अवतारणाऱ्या त्या प्रकाशगोलाची फिकीर नव्हती.
नेवाळी फाट्याला क्षणभर विसावून श्विन- स्कॉटने पुन्हा वेग पकडला आणि थेट अंबरनाथ येथील शिवमंदिर गाठले. ११ व्या शतकातील हे पुरातन शिवालय वालधुनी नदीकाठी वसलेले आहे. साधारणपणे ख्रिस्ती शक १०६० च्या सुमारास दगडात कोरलेले हे हेमाडपंथी मंदिर शिलाहार राजा छित्तराज याने बांधले असून त्याचा पुत्र मुंमुनी याने ह्या मंदिराची पुनर्रचना केली आहे असे ऐकिवात आहे. गर्भगृहात जाण्यासाठी साधारण २० पायऱ्या उतरून खाली जावे लागते. मात्र हे गर्भगृह वरील बाजूस पूर्ण न करता आकाशाशी नाते जोडत आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराशेजारी छोटा हौद असून तेथे अनेक कासव वास्तव्य करून आहेत. नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीनिमित्त गेले तीन संध्याकाळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या खाणाखुणा मंदिरासभोवती आढळत होत्या.
परत निघाल्यावर श्विन आणि स्कॉटने लोकनगरीमार्गे जाणारा रस्ता निवडला. मात्र हा रस्ता कच्चा आणि चढणीचा असल्याने थोडी परीक्षा घेणारा होता. मात्र दोन्ही सायकली MTB श्रेणीच्या असल्याने त्यांनी ती परीक्षा पार पाडली.

एव्हाना पोटातील कावळे (पेटके चुहे/ butterflies in stomach) ओरडायला लागले नसले तरी जागे होऊ लागण्याची चिन्हे दिसू लागली होती. मग पाइपलाइन रस्त्यालगतच्या वैभव उपहारगृहात क्षुधाशांतीचा होम पार पाडला.

सुर्यानेही अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. स्कॉटची सफारी सुरु होऊन जेमतेम २ आठवडे होत असतानाच स्कॉटने ४०-५० किमी अंतर पार करण्यास सुरुवात केली होती.

नेवाळी फाटा येथे पृथ्वीवरील अमृताचा आस्वाद घेणे ओघानेच आले. पुण्यनगरीत अमृततुल्य पेय मिळत असले तरी मुंबईत मात्र 'तुल्य' नव्हे प्रत्यक्ष (पृथ्वीवरील) अमृतच मिळते. नेवाळी फाटा येथे अमृताचा लाभ घेऊन स्कॉट आणि श्विनचा परतीचा पुढील प्रवास सुरु झाला.

आदित्यनारायण अस्तित्वाची दाहक जाणीव करून देऊ लागले होते. त्यामुळे स्कॉट आणि श्विनचा वेग मंदावला.
वाशी येथून २१ किमी ची मॅरेथॉन पूर्ण करून परत येत असलेला Ajit Shirwalkar घारीवली गावाजवळ भेटताच श्विनला पुन्हा उत्साह संचारला. त्या उत्साहातच आजची सफारी पूर्ण करून श्विनने आणि स्कॉटने घर गाठले

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

एक 'लों(ब)कल'लेला प्रवास

महानगरी मुंबईच्या मध्य उपनगरात राहून लोहमार्गावरील विद्युतरथाने प्रवास न केलेला मध्यमवर्गीय सापडणे म्हणजे समुद्रात बुडी मारून कोरडा राहून दाखवण्यासारखेच आहे.

माझे मुंबईच्या ह्या जीवनवाहिनीशी नियमित नाते जुळले ते ख्रिस्ती वर्ष १९९० अर्थात भारतीय सौर वर्ष १९१२ मध्ये. या जीवनवाहिनितून प्रवास करणारे सहप्रवासी एका कुटुंबाचाच भाग असतात. त्यानंतर सुमारे १८ वर्ष मुंबईच्या या विद्युतरथाचा नियमित अनुभव गाठीशी बांधल्यानंतर मी ३ वर्षाकरीता चिंचवडला गेलो. तेथून परत आलो आणि परत ठाण्याच्या कार्यालयात रुजू झालो त्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या या विद्युतरथातील प्रवासीसंख्या खूपच वाढल्याचे जाणवले. पण इथेही लवकरच छान सहप्रवासी मिळाले.

मात्र अधूनमधून सायकलने ठाण्याचा प्रवास करू लागलो. हळूहळू सायकलचा प्रवास सुखद वाटू लागला. तरी अधूनमधून सरकारी विद्युतरथ तर कधीकधी श्विनबरोबर कार्यालयात जाणे सुरु झाले.

आजचा दिवस लोहमार्गावरून प्रवास करण्याचाच होता. श्विन कालच चिखलाने लडबडून आली होती, तिला रात्री स्वच्छ केले होते. पण आज तिला घरी ठेवून डोंबिवली लोहमार्गस्थानकाकडे निघालो. काल दिवसभर शिडकावा करणारा वरुण आज शांत होता. पण तरीही डोंबिवली स्थानकापर्यंत जाईपर्यंत नखशिखांत भिजलो होतो. फरक इतकाच की अंगावरून धावणाऱ्या धारा पर्जन्यधारा नसून घामाच्या धारा होत्या.

फलाटावर पंख्याची दिशा पाहून उभे राहण्याची जागा पटकावली. पंखा फिरताना दिसत असला तरी घामाच्या धारा कमी न होण्यासाठी प्रवाशांना चुकूनही वारा लागू नये याची काळजी पूर्णपणे घेण्यात आली होती. आत्तापर्यंत घाम पुसत पुसत रुमाल ओलाचिंब झाला होता. पुन्हा घाम पुसला तर चुकून रूमालाचाच घाम अंगाला लागेल अशी परिस्थिती आली होती. पण इतक्यात 'ज्यासाठी केला होता अट्टाहास' ती मुंबईची उपनगरीय जीवनवाहिनी फलाटाला लागली.

पोत्यात गहू भरावेत तसे प्रवासी कोंबल्यावर शेवटी मीही गाडीत चढलो. दरवाजातील प्रवासी उभा होता त्याच्यामागेच मी उभा राहिलो. यात मेख अशी होती, की पुढील स्थानकांवरील प्रवाशांची पहिली झटपट त्याच्याशी होईल, पण दरम्यान मला थोडातरी वारा मिळेल.

दिवा स्थानक आल्यावर विरुद्ध दिशेला दरवाजा असूनही प्रवासी चढलेच. अजूनतरी माझी अवस्था ठीकठाक होती. पण मुंब्रा स्थानक आल्यावर मात्र २ जणांच्या जागेत ६ प्रवासी कोंबले जाऊ लागले. आधारासाठी उजवा हात दरवाजाच्या एका कडेला दाबून ठेवत डावा पाय विरुद्ध दिशेला फिरवला. या आसनाचे नाव पतंजलीऋषींनी लिहून न ठेवल्याने मी केवळ कृती सांगितली आहे.
गाडी सुरु होता होता लोकांचा आरडाओरडा, शिव्या, धक्काबुक्की याना ऊत येऊ लागला. एव्हाना माझ्या पुढील आसनाची अथवा आसनाच्या पुढील क्रियेची सुरुवात झाली होती. या अवस्थेत डाव्या पायाचा घोटा किंचित तिरका ठेवून कमरेवरील शरीर खांद्यापर्यंत सरळ रेषेत ठेवणे आणि मान शक्य तेवढी तिरकी करत डोळे बंद करावे लागतात. शेजारच्या माणसाचा हात मानेशेजारी आल्यास मान टेकवण्याचीही सोय होते का याकडे माझे लक्ष होतेच.

या अवस्थेत उभा असतानाच कळवा स्थानकात गाडीने प्रवेश केला. मुंगीच्या पुढील डाव्या पायाची करंगळी ठेवायलाही जागा नसतानाही एकदोन कळवाकर कसे चढले हे मला शेवटपर्यंत कळले नाही. पण त्यांचे दरवाजातील लोकांशी असलेले ऋणानुबंध मात्र लक्षात आले. ठाणे स्थानकात थोडे सरळ उभे राहता आले, आणि माझी आसन मुक्तता झाली. एव्हाना माझी उभ्या उभ्याच समधीवस्थेतील तल्लीनताही अनुभवून झाली होती.

तिथून पुढे गाडी निघाली की मुलुंडलाच थांबणार या अपेक्षेने ठाणे स्थानकातच मुलुंडसाठी मागील प्रवाशांनी मोर्चेबांधणी सुरु केली. पुन्हा एकदा उजवा आणि डावा असे दोन्ही हातांचे पंजे  दरवाजावर दाबून मागून येणाऱ्या ५०० किलोच्या रेट्याला थांबवण्याची करामत करावी लागली.

मात्र अधिक परीक्षा न घेता गाडी मुलुंड स्थानकात शिरली आणि मी विनासायास गाडीतून मुलुंड स्थानकात उतरलो.

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

My First Love

V met in college days, when I was in 12th standard.
Our relationship was for almost 20 years since then.
Throughout these 20 years, I didn't go anywhere in city without her.
We had many great memories...Whether it's college days, picnics.

Yes, she was black, simple.
She always helped & supported me, whenever I do my seasonal business for all these 20 years.

It was very tough decision, when I decided to get separated.....

I ve more beautiful, charming darling now wid me. But still I couldn't forget my 20 year lasting college love.

After such a long relationship, 10 years back, I gave my HERO Black to son of our maid. 😞

I hope my HERO🚲 is still fine & not yet Rusting in peace.

माझी व्हॅलेंटाइन

तिला मी प्रथम पाहिले तेव्हा मी माध्यमिक शाळेत असेन. पाहताक्षणीच ती मला आवडली होती. मात्र मी डोंबिवलीला आणि ती पुण्याला...त्यामुळे रोजची भेट होणे शक्य नव्हते. मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी पुण्याला जात असे. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये आमची भेट होत असे.

तिची माझी ओळख माझा मावसभाऊ- हर्षुने- करून दिली होती. मी मावशीकडे गेलो की मी तिला घेऊन रोज फिरायला जात असे. ती ठेंगणी आणि पितवर्णीय होती. आमची गट्टी चांगलीच जमली होती. पहिल्यांदा हर्षू आमच्याबरोबर येत असे. पण नंतर मात्र तो नसला तरी मी तिच्याबरोबर फेरी मारायला जातच असे.

आमच्या पहिल्या ओळखीतच आम्ही एकमेकांबरोबर झुडुपांमध्ये आदळलो होतो आणि मी तिच्या प्रेमात पडलो होतो.

हो ती होती माझ्या मावसभावाची- हर्षुची सायकल. हि तीच सायकल होती जिच्यामुळे मला नवीन जगाची...सायकलिंगची ओळख झाली. अगोदर दोन - तीन वर्ष मी काळ्या रंगाच्या घोडा सायकलवर सायकलिंग शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण होपिंगच्या पुढे काही तो सरकला नाही. मात्र हर्षुने मला होपिंग न करताच सरळ त्या पिवळ्या सायकलवर बसवून पेडलिंग सुरु करायला सांगितले. मग मात्र ती पितवर्णीय सायकल न डगमगता सरळ धावू लागली. मला वाटले होते की हर्षू आमच्याबरोबर आहे, पण आम्हाला एकटे सोडून तो केव्हाच मागे राहिला होता. पुढे T जंक्शन आल्यावर मात्र उजवीकडून किंवा डावीकडून आमच्या दुकलीवर अश्वशक्तीधारी वाहने आदळण्याचा धोका वाटल्याने मी तिचे हँडल रस्त्याच्या डावीकडे वळवले. आणि ... एकमेकांच्या बाहुपाशात शेजारील झुडुपांमध्ये आदळलो. 

मात्र माझा आत्मविश्वास वाढला होता. पुढच्याच प्रयत्नात मी तिला T जंक्शनला डावीकडे वळवले. पण तिथून काही अंतरावर आणखी एक T जंक्शन होते जेथून उजवीकडे वळल्यावर हमरस्ता लागणार होता. त्यामुळे त्या दुसऱ्या T जंक्शनला मी पायउतार झालो. U टर्नची शिकवणी झाली नव्हती. पण आता हर्षुही जवळ नव्हता. 

पॅडल मारत सायकलवरील बॅलन्स सांभाळणे शिकलो तरी आता सायकलवर बसवणार कोण? मग काय तिला हातात धरून आमची वरात निघाली ती थेट घरापर्यंत! आता मात्र सायकल चालवता येण्याचा (आणि तिला चालवत नेण्याचाही) आत्मविश्वास आला होता. त्यानंतर सायकलवर बसायला कधी शिकलो ते नक्की काही आठवत नाही. हर्षू शिक्षणानिमित्त पुणे सोडून कलकत्त्याला गेला. मात्र त्यानंतरही प्रत्येक सुट्टीत मावशीकडे जाणे आणि त्या पितवर्णीय सुबक ठेंगणीबरोबर फिरायला जाणे सुरूच राहिले. तिने मला दिलेली साथ कधीच विसरता येणार नाही.

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

खरी कमाई

तुम्ही रोज काय आणि किती कमावता?

TJSB HOUSE मधून निघता निघता श्विनने क्षुधाशांती आटोपली. दोन्ही टायर टम्म झाल्यावर श्विन सफारीसाठी तयार झाली. दिवसभर एका जागी थांबून कंटाळल्यामुळे, ऑफिस सुटल्यावर श्विनने लगेच वेग घेतला. तसेही ऑफिसमधून निघताना थोडा उशीर झाला होता आणि श्विनच्या पोटपूजेतही थोडा वेळ गेला होता.

श्विन ऑफिसबाहेर पडत असताना वर्षाराणीने काही थेट शिंपडून आमचे स्वागत केले. मग मात्र माजीवाडा नाक्यावरील पुलापर्यंत श्विन भरधाव पोचली.
दुर्दैवाने आज पुलावर वाहतूककोंडी झाली नव्हती. त्यामुळे उधळलेल्या सर्व अश्वशक्तीधारी वाहनांना मन देत श्विनला उजवीकडे नाशिक रस्त्याला लागण्यासाठी वाट पहावी लागली.

पुढेही वाहनांची गर्दी लोढा साईमन्दिरापर्यंत नव्हती. पुढे मात्र  सर्व वाहनांची ढकलगाडी सुरु झाली. त्या वाहनांमधून वाट काढत पुढे जात असताना एक सायकलिस्ट शिरस्त्राण, सायकल क्लबचा T शर्ट आणि शॉर्ट अशा पेहरावात दिसला. मग त्याला follow करत कल्याण रस्त्याला लागलो.

तिथल्या गर्दीत वाट काढत पुढे एकमेकांना समांतर येत आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. वारकरी समाजाप्रमाणे सर्व सायकलिस्टची एकच ओळख असते. तिथे ना कोणी कमिशनर असतो ना कोणी झाडूवाला.
सर्व सायकलिस्ट जात, धर्म, देश, लिंग, वय, पद या आणि अश्या सर्व भेदांपलीकडे एकाच पातळीवर असतात... ते म्हणजे ते सर्व 'सायकलिस्ट' असतात.

श्विनमुळे रोजच नवीन ओळख होत होती. मग तो #powaipedals चा Johnson Minj असो, की काल नावही न कळलेला मोटोरसायकलिस्ट असो की आज ओळख झालेला Nitin Suryawanshi.

गप्पा मारता मारताच कळले की नितिनने BRM च्या एकदोन नव्हे तर तब्बल १० स्पर्धा पार केल्या आहेत.
माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे तोही रोज कल्याण ते ठाणे #cycle2work करतो. नितीन, त्याचा एक मित्र आणि मी तिघांची ऑफिसहून परत निघण्याची वेळही एकाच असल्याचे समजल्याने उद्यापासून एकत्रच येऊ असे ठरवत आम्ही दुर्गाडिपाशी एकमेकांचा निरोप घेतला.

श्विनमुळे जॉन्सन, काल भेटलेला मोटारसायकलिस्ट, ऑफिसमधील सफाई कामगार, ऑफिस कॅन्टीनमधील कामगार आणि आज भेटलेला नितीन अशी माझी खरी कमाई रोजच वाढत होती. श्विनमुळे माझी अशी खरी कमाई रोजच होत आहे. तुम्ही रोज किती आणि काय कमावता.

#cyclingzens #ismartcommute #tjsbbank #dombivlicyclingclub #saveoursahyadri #bikesport

पवनमहाराजांचा रुद्रावतार

#Shravanchallange day 18. Indian National date Saur Shravan 18, shake 1939

आज सकाळी श्विनसवारी सुरु झाली तेव्हा आदित्यमहाराज प्रसन्न मुद्रेने स्वागत करत होते. वातावरण उत्साही होते. डोंबिवली, ९० फूट रस्ता, पत्री पूल करून श्विनने दुर्गाडी किल्याजवळील पूल सहजपणे पार केला. सर्वत्र रवीमहाराजांच्या कृपेने सर्व रस्ते कोरडे होते.

नाशिक ठाणे रस्त्यावर पिंपळास पुढील पूल आणि खिंडीनंतर आजही गोवंश मेजवानीची माजा घेत होता. त्यांचे निसर्गाबरोबरील हितगुज मला पुढे जाऊ देईना. एक गोंडस वासरू सुखेनैव चरत असल्याचे पाहून मी त्याला मोबाईलकॅमेरात टिपू लागलो. हे लक्षात येता भाव न खाता त्याने मला कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे पोझ द्यायला सुरुवात केली. त्याचे मनसोक्त फोटोसेशन करून मी निघालो.

लोढा साईमंदिरापाशी असलेल्या चढावरून ठाण्याकडे पहिले तर क्षितिज काळेकुट्ट दिसत होते. हि तर वरूणराजाच्या अस्तित्वाची ठळक निशाणी होती. तरी ठाणे अजून १३ किमी लांब असल्याने मी जाईपर्यंत पाऊस थांबण्याची 'छोटीसी आशा' होती.
 पण क्षणार्धात माणकोलीच्या अवकाशातही काळे ढग दिसू लागले आणि दोनचार थेंब अंगावर पडले. मात्र उताराचा फायदा घेत माणकोलिपर्यंत सुसाट जाण्याचा श्विनचा निर्धार होता. तो उतार जेमतेम संपला अन पवनमहाराजांनी रुद्रावतार धारण केला. मग मात्र अस्मादिकांनी ताबडतोब पावसाळी शिरस्त्राण आणि पावसाळी चिलखत धारण केले.

 श्रावणाने नेहमीप्रमाणेच पर्जन्यमहाराजांना थोड्याच वेळात आवर घातला. मात्र यावेळेपर्यंत सरकारच्या मेहरबानीमुळे रस्त्यात तयार झालेली तळी पूर्ण भरली. आदित्यनारायणाने पुन्हा दर्शन दिल्यामुळे अंगावरील चिलखत सुकले तरी रस्ते कोरडे होऊ शकत नव्हते. त्यामुळे आभाळ निरभ्र झाले तरी रस्त्यावरील तिथप्रसादाचा नखशिखान्त अभिषेक होऊ नये म्हणून पावसाळी चिलखत घालूनच पुढे प्रवास करावा लागला.
माणकोली येथे रेनकोट का घातला नाही म्हणून वरुणराज संतापले होते, तर अंजुरदिवेपासून रेनकोट का घातला म्हणून आदित्यमहाराजांनी आग ओकायला सुरुवात केली.

या दोघांच्या तावडीत आयताच सापडल्याने आधी पावसाने आणि नंतर घामाने भिजूनच मी ऑफिसला पोचलो....

#saveoursahyadri #tjsbbank #dombivlicyclingclub #ismartcommute #cyclingzens

सात हजारी मनसबदार

सातहजारी मनसबदार

सौर श्रावण १७, शके १९३९.

आजची #office2home राइड खासच होती.

TJSB House मधून श्विनने सुरुवात करून सर्व्हिस रोडने माजीवाडा नाका गाठला. तेथे नेहमीप्रमाणे पुलावरील वाहनांच्या रांगेमुळे श्विनला आजही पुलावर उजवीकडे नाशिक महामार्गाकडे सहजपणे वळता आले. खरेतर सगळी अश्वशक्तीधारी वाहने रडतखडत जात असताना श्विनने चांगलाच वेग पकडला होता. अर्थात आजची राइड पूर्ण होताना जी विशेष गोष्ट घडणार होती त्यामुळेही श्विन रंगात आली होती.
इतर वाहनांची हि गम्मत पुढे पुन्हा पुन्हा अनुभवास येत होती. पिंपळास फाटा, रांजणोली नाका येथे सर्व अश्वशक्तीधारी वाहने गोगलगायीच्या गतीनेच जात होती. रांजणोली नाक्याला तर फक्त श्विनच कल्याणकडे झटकन वळू शकली. बाकीची वाहने मात्र एकमेकांकडे गुरगुरत उभी राहिली होती.
कोनगावातही अशीच गम्मत अनुभवून श्विन दुर्गाडी किल्ल्याकडे पोचली. तोच 'तुम्ही रोज ठाण्याला जाता का.. मी तुम्हाला रोज बघतो' असे म्हणत एक मोटरसायकलिस्ट श्विनला समांतर गाडी चालवू लागला. गप्पा आणि ओळख वाढवण्याची इच्छा होती, कारण अशी प्रशंसा केवळ सायकलिस्टलाच मिळू शकते.

मात्र आज दुर्गाडी येथे पोचताच एक विशेष टप्पा पार केल्याने श्विनला एक सेल्फी दुर्गाडी किल्यासह घ्यायचा होता. मग त्या मोटरसायकालिस्टचा निरोप घेतला आणि श्विन थांबली.

ग्रेगोरियन कॅलेंडर वर्ष २०१७ मध्ये Sunil Gavaskar सुनील गावस्करच्या एकूण कसोटी धावा १०१२२ इतके किमी अंतर पार करायचे उद्दिष्ट समोर ठेवून सुरु झालेल्या वर्षातील १ जानेवारीपासून ७००० किमी चा टप्पा दुर्गाडीसमोरच पूर्ण झाला होता. शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षिने हा टप्पा पूर्ण करण्यापेक्षा मोठे भाग्य तरी काय असेल.

श्विनची २०१७ मधील आत्तापर्यंतची घोडदौड:

जानेवारी २०१७- १५२२ किमी
फेब्रुवारी २०१७- १०१६ किमी
मार्च २०१७- ११२० किमी
एप्रिल २०१७- ११०६ किमी
मे २०१७- ८१० किमी
जून २०१७-५०७ किमी
जुलै २०१७ -६४१ किमी
१ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट-  २८५ किमी
एकूण ७००७ किमी

#ismartcommute #cyclingzens #dombivlicyclingclub #tjsbbank #saveoursahyadri

जॉन्सन मिन्ज... एका अवलियाशी ओळख

शनिवार दिनांक भारतीय सौर श्रावण १४, शके १९३९
 #cycle2work केल्यावर #office2homecycleride ओघानेच आली.
दिवसभर पाऊस नसल्याने रस्ते कोरडे होते. त्यामुळे श्विन खुशीत होती. त्यातही माजीवाडा नाक्यावरील कल्याण/नाशिककडे वळणाऱ्या पुलावर वाहतूककोंडी झाल्यामुळे श्विन सर्व वाहनांना पार करीत आरामात नाशिक रस्त्याला लागली. सर्व स्वयंचलित वाहने श्विनपेक्षा कमी गतीने जात असल्याने पुलावरून उजवीकडे वळण्यास श्विनला कोणतेही वाहन आडकाठी करू शकत नव्हते.
नाशिक रस्त्यालाही श्विन वेगात पुढे निघाली. पावसाअभावी  रस्त्यामध्ये पडलेले (राखलेले) वीतभर ते ५-१० फुटांचे तलाव मात्र ओस पडले होते. अगदी खारेगाव टोलपुढील पुलावरही सरकारी कृपेने असे तलाव दिसत होते. या सगळ्या तलावांना वळसा घालून श्विन मार्गक्रमण करत होती.
माणकोली पुढील चढ संपून उतार सुरु होताच नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांची लांबच लांब रांग दिसू लागली. मग मात्र श्विनने नाशिक महामार्गाऐवजी पिंपळास कोनागाव रस्त्याचा पर्याय निवडला. त्या रस्त्यावर अपेक्षित असलेले खड्डे आठवून मन घट्ट केले आणि उजवी दिशा पकडली. पण इतक्यात काही स्वयंचलित दुचाकी नाशिक रस्त्याने पण विरुद्ध दिशेने जाताना दिसल्यावर श्विनने पुन्हा विचार बदलून त्या दुचाकीस्वारांपाठोपाठ मार्ग पत्करला. सुमारे २ किमी पर्यंत लागलेली रांग बाजूला ठेवून रांजनोली नाक्यावर श्विनने कल्याणकडे मोर्चा वळवला.
तेथून जेमतेम एक किमी अंतर पार होत नाही तोच एक सायकलिस्ट हेल्मेट घालून सायकल हातात घेऊन जाताना दिसला.
अश्या वेळी श्विन न थांबली तरच नवल. तो होता Powai Pedals चा Johnson Minj. ह्या निमित्ताने त्याच्याशी ओळख झाली. एव्हाना संध्याकाळचे सात वाजले होते. जॉन्सन ५.३० वाजल्यापासून सायकल रिपेअर करण्यासाठी दुकान शोधत होता. तो पवईहून निघून माळशेज घाटात पोचून रात्री ट्रेक करून उद्या सकाळी मुंबईत परतणार होता. मात्र त्याच्या सायकलने पुढे जाण्यास नकार दिल्याने बिचारा हताश झाला होता.
त्याला या ठिकाणची माहिती नव्हती. पण कल्याण ५-६ किमी अंतरावर आहे असे वाटून तो चालत निघाला होता.
अश्या अडचणीच्या वेळी मला पहिले नाव आठवते ते विलास उर्फ Gajanan Keshav Vaidya चे. माझ्या माहितीप्रमाणे जवळचे दुकान म्हणजे Durgesh Zipre चे. विलासनेही तेच सांगितले. मग मात्र जॉन्सनला रिक्षा करून दिली आणि कोनगावात थांबायला सांगितले.
रिक्षा नजरेआड होऊ नये म्हणून पाठोपाठ श्विन निघाली. श्विनने वेग कायम राखला आणि कोनगावात रिक्षापाठोपाठच श्विन पोचली. तिथून पुढे दुर्गाडी पूल पार करेपर्यंत सर्व वाहने कुर्मगतीने जात होती. श्विन, मी, जॉन्सन आणि त्याची सायकल पुलावरील पायवाटेने झपाझप दुर्गाडी चौकात पोचलो.
दुर्गेशच्या दुकानात जाईपर्यंत जॉन्सन चे अंतरंग उलगडले. BRM च्या २०० किमी, ३००किमी, ४००किमी आणि ६०० किमी अश्या चारही स्पर्धा त्याने एका वर्षात पूर्ण केल्या होत्या. तेही एकदा नव्हे तर दोनदा. त्याहून महत्वाचे म्हणजे त्याने या स्पर्धा रोड बाईक किंवा हायब्रीडने नव्हे तर MTB (Mountain bike) ने पूर्ण केल्या होत्या.
२०० किमी  अंतराची BRM जास्तीत जास्त १३.५ तासात पूर्ण करायची असते, तर ६०० किमी ची BRM ४० तासात पूर्ण करावी लागते. तुमची झोपसुद्धा या ४० तासातच समाविष्ट असते.
दुर्गेशाच्या दुकानात गेलो तर तो आमची वाट पाहताच होता. विलासपाठोपाठ मी त्याला आम्ही येणार असल्याचे कळवले होते. दुर्गेशच्या करामती ऐकताच जॉन्सन थक्कच झाला. दुर्गेशने तयार केलेली ३सीटर tandem सायकल, मोटार बाइक प्रमाणे दिसणारी रॉकी, हाफ बाइक, फोल्डिंग सायकल अश्या दुर्गेशच्या वेगवेगळ्या कलाकृती पाहून तो थक्कच झाला.
सायकल बिघडल्यामुळे माळशेजला जाता आल्याचे शल्य दूर होऊन अभावितपणे तो म्हणाला, ' अच्छा हुआ मेरे सायकलको प्रॉब्लेम हुआ'. मग मी, दुर्गेश आणि जॉन्सनने ३सीटर तांडेम सायकलवर एक फेरफटका मारला. रॉकी आणि हाफ सायकल चालवण्याची हौसही जॉन्सनने पूर्ण करून घेतली.
एव्हाना माळशेज ऐवजी पुन्हा मुंबईला जाण्याचा निर्णय जॉन्सनने घेतला होता.
मग दुर्गेशने नेटाने काम करून जवळपास ९.३०- ९.४५ ला मी आणि जॉन्सन पुढे निघालो.
दुर्गाडीहून गोविंदवाडी बायपासमार्गे आम्ही पत्रिपुलापाशी आलो. पत्रिपुल ओलांडल्यावर जॉन्सनला शिळफाटा-महापे-आयरोली-मुलुंड मार्ग समजावून मी उजवीकडे ठाकुर्ली - डोंबिवली कडे वळलो. अखेरीस ऑफिसहून निघून घरी पोचेपर्यंत ४ तासांचा प्रवास झाला असला तरी जॉन्सन बरोबर झालेल्या ओळखीचे मोल/ संचित मोठे होते

#cyclingzens #ismartcommute #dombivlicyclingclub #tjsbbank

हिरवा निसर्ग हा भवतीने

#Shravanchallangeday 14. Saturday- Scientific solar date Bhartiy Saur Shravan 14, shake 1939

शनिवार असल्याने वातावरणातही उत्साह होता. सकाळचे कोवळे उन्ह अंगावर घेत श्विन #cycle2work साठी निघाली. डोंबिवलीतील खड्डे आज पाण्याविना ओस पडले होते. ठाकुर्ली कल्याण रेल्वेला समांतर जाणाऱ्या नवीन कल्याण रस्त्यावर श्विनने वेग वाढवला.
तेथील ओपन जिमपाशी एक सायकल होती, पण सायकलस्वार बहुदा ओपन जिमवर व्यस्त होता.
दुर्गाडी किल्ला आणि पुढील चौकातील अश्वारूढ शिवाजीमहाराज यांचे दर्शन होताच श्विनलाही स्फुरण न चढल्यासच नवल. नवीन दुर्गाडी पुलावरून श्विन पुढे दौडत निघाली, पण कोनगावातील अडथळ्यांची शर्यत सुरु होताच श्विनची चाल मंदावली. पण ती काही काळच.

मग मात्र गोवे-रांजनोली जवळील पावसाअभावी कोरडे पडलेले खड्डे वगळता श्विनची चाल लयीत सुरु होती. आज श्रावणाने वरुण राजाला रजेवर पाठवले होते आणि अरुणमहाराज त्यांचे दर्शन द्यायला उत्सुक होते. काल ऑफिसला जाताना लोकलप्रवासात प्रचंड घामाघूम झाले असले, तरी आज श्विनबरोबर असताना पवन राजे सतत हजर होते.
डोंबिवली स्थानकात पंख्याखाली उभा राहून रुमाल ओला होईपर्यंत काल घाम येत होता, पण आज पवनराजांमुळे नैसर्गिक वारा घामाचे थेंबही येऊ देत नव्हता.
पिंपळास पुढील चढावर मात्र घर्मबिंदू अवतरले, पण तो चढ चढताच पवनराजांनी पुन्हा एकदा ताजेतवाने केले. खिंडीपुढील उतारावरून जात असताना थांबणे श्विनला आवडत नसे. पण त्या उतारावरील डाव्या बाजूच्या एका छोट्याश्या तळ्याच्या मोहामुळे मी श्विनला थांबवले.
त्या तळ्याच्या सर्व बाजूने वृक्षराजी होती. तळे छोटेच असले तरी सर्व बाजूने असलेल्या त्या हिरवाईची छटा त्या तळ्यात खुलून दिसत होती. दुर्दैवाने त्या तळ्याच्या काठावर मात्र सर्वत्र फेकून दिलेल्या डिशेस पसरल्या होत्या. ज्या नैसर्गिक तळ्याने इतका सुखद अनुभव दिला त्याच तळ्याची अशी विटंबना करणारे महाभाग किती क्रूर असावेत.

मात्र त्याच्या आसपास असलेल्या हिरवळीवर फुलपाखरे, चतुर सुखेनैव संचार करत होते. पण ऑफिसला वेळेवर जायचे असल्याने त्यांच्याशी करत असलेल्या गुजगोष्टी मला आवरत्या घ्याव्या लागल्या.
तिथून पुढे उतार संपता संपता मानवाच्या सोयीसाठी झालेल्या नैसर्गिक संपत्तीची आणखी एक हानी नजरेस पडली. एक दुर्दैवी साप तिथे चिरडला गेला होता.
महामार्ग हवेतच पण ते बांधताना अशी हानी होणार नाही याची काळजी घेता येईल का? अनेक जंगलातून रस्ते बांधले जातात त्यावेळी जंगली प्राण्याची नैसर्गिक वाट अडवली जाते. रस्ता ओलांडताना दिलेल्या धडकेत सापासारखे सरपटणारेच नव्हे तर वाघ, बिबळ्यासारखे प्राणीही नष्ट होत असतात. रस्ते बांधताना कित्येक औषधी झुडुपेच नव्हे तर वृक्षही नष्ट केले जातात. मानव निसर्गावर मात करत असताना अश्या रस्त्यांसाठी काहीतरी उपाय नक्कीच शोधायला हवा. कारण अश्या रीतीने होणाऱ्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास माणसाच्याच अंगावर उलटू शकतो, नव्हे तसा तो अनेकदा उलटलाही आहे.
शक्य तेथे बोगदे बांधून जंगलातील रस्ते केल्यास काही प्रमाणात हि नैसर्गिक संपत्ती वाचवता येईल. तज्ञ मंडळी यखेरीज अनेक उपाय सुचवू आणि योजू शकतील.

असो, इतका विचार करेपर्यंत श्विनने माणकोली पार केले होते. तेथुन पुढे डावीकडे दिसणाऱ्या मुंब्रा डोंगररांगांवर काळे ढग जमा झाले होते. इतक्यात एक दोन पावसाचे थेंब माझ्या अंगावर पडल्यासारखे वाटले. मी ९० अंशात वर पहिले तर ढग अजिबात नव्हते. मग सरळ रेषेत पुढे ठाण्याच्या क्षितिजावर पहिले तर काळसर ढग दिसत होते. शाळेत वैदिक शिक्षण न मिळाल्याने निसर्गाच्या संकेतांचीं ओळख विसरलो असलो तरी श्विनने पुन्हा निसर्गाच्या चाहुलखुणांची ओळख करून दिली होती. त्यामुळे ठाण्याच्या क्षितिजवरील काळ्या ढगांमध्ये 'उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम' अशी परिस्थिती असल्याचे मी ओळखले.
ठाणे शहरात पोचताना आकाशात ढगांनी छत धरले असले तरी ते केवळ अरुणमहाराजांचे दर्शन थांबवण्यासाठीच होते.

#tjsb बँकेच्या प्रवेशद्वारातून श्विनने दिमाखात प्रवेश करेपर्यंत वरुण आणि अरुण यांचा पत्ता नसला तरी पवनमहाराज साथ करतच होते.
#saveoursahyadri #dombivlicyclingclub #ismartcommute #cyclingzens

चिखलाचा अभिषेक

सकाळप्रमाणेच घरी परत निघतानाच श्रावणसरींनी सलामी दिली. पण #tjsb bank च्या गेटबाहेर पडेपर्यंत मात्र वरूणराजाचा उत्साह संपला. मात्र निघतानाच मिळाल्या जोरदार सलामीमुळे आणि रस्त्यात अपेक्षित असलेल्या चिखलाच्या अभिषेकाच्या चाहुलीमुळे मी जय्यत तयारीतच निघालो.

माजीवडा नाक्यावरील नाशिककडे वळणाऱ्या पुलावर वाहनकोंडी झाल्यामुळे श्विनला उजवीकडे वळायला मदतच झाली. खारेगाव टोल मागे टाकला आणि डावीकडे नजर फिरवली. दुरवरील क्षितिजापर्यंत केवळ हिरवा रंग आणि मध्येच वाहणारी खाडी हे चित्र प्रसन्न करीत होते.

खरंच अशी दृश्य रोज पहायची तर केवळ सायकलसफारीच हवी. कोणत्याही इतर वाहनाने हि मौज अनुभवता येणे अवघडच. निसर्गाचे रूप पाहत श्विनसह तिथे थांबलो आणि 'डोळ्याने पाहीन रूप तुझे' असे निसर्गदेवतेला म्हणत पुन्हा श्विनला वेग दिला.

वरूणदेवता आणि सरकारचे संबंधित कर्मचारी, प्रजेचे प्रतिनिधीत्व करणारे राजकारणी यांच्या कृपेने ठाणे नाशिक रस्त्यावर चिखल मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपदात गणेशमूर्ती या मातीच्याच असाव्यात यासाठी तर हि खटपट नाही ना अशी शंका मनात डोकावली.

मात्र सकाळप्रमाणेच वरूणराजांची हद्द मानकोलीपर्यंतच संपली. पुढे पिंपळासपर्यंत तरी रस्ता कोरडा होता.

मात्र पिंपळास पासून पुन्हा एकदा खड्डे आणि चिखलमय प्रवास सुरु झाला.

काल संध्याकाळी नवीन कल्याण रस्त्यावर रोज डोंबिवलीतील अरुणोदय शाळेपासून कल्याणला ऑफीसला जाणाऱ्या स्वप्नीलशी ओळख झाली होती. काल त्याला #dombivlicyclingclub (DCC) ची माहिती देऊन येत्या रविवारच्या राइडचे निमंत्रणही दिले होते. तो आज मात्र दिसला नाही.

रोज घरी पोचल्यावर माझी आंघोळ ठरलेलीच. पण मणभर चिखलाने माखलेल्या श्विनलाही आंघोळ घालावी लागली, मगच माझा स्वगृहीप्रवेश झाला

#ismartcommute #cyclingzens #dombivlicyclingclub #

श्रावणसरी

#shravanchallange day 12. Scientific solar date Bharatiy Saur Shravan 12,shake 1939

श्विनला #cycle2work साठी तयार करत होतो, तोच श्रावनसरींनी आमचे स्वागत केले. अर्थातच काही क्षणातच त्या शांतही झाल्या. मात्र तरीही आभाळ काळ्या ढगांनी आच्छादलेलेच होते.
नेहमीप्रमाणेच डोंबिवली, ठाकुर्ली पार करून नवीन कल्याण रोडला पोचलो. तेवढ्यात पुढे एक सायकलिस्ट जात असलेला दिसला. समव्यसनी दिसल्यावर ओळख तर व्हायलाच हवी ना! पुन्हा पुन्हा विचारून त्याचे नाव विसरलो. पण त्याचे आडनाव लोखंडे मात्र लक्षात राहिले. तो कल्याणला मेट्रो मॉल जवळ लोकग्राम मध्ये राहत असल्याचे समजले.त्याच्याबरोबर राइड करता करता त्याला #dombivlicyclingclub (DCC) ची माहिती देऊन त्याला येत्या रविवारी संडे राइडचे आमंत्रणही दिले.
@ritesh savala काही महिन्यांपूर्वी मला इथेच भेटला होता. त्यालाही मी असेच आमंत्रण दिले होते. थोड्याच अवधीत तो DCC चा सर्वात नियमित सभासद झाला आहे.

लोखंडे नवीन कल्याण रस्त्यावरील ओपन जिम पाशी थांबला. श्विन आणि मी मात्र पुढे निघालो. गोविंदवाडी बायपास वरील चार पाच तिहेरी आणि तेवढेच एकेरी गतिरोधक ओलांडून दुर्गाडी पुलापाशी पोचलो, तोच वरूनराजाने हुलकावणी दिली. पण त्याचा कावा ओळखून मी शांतपणे पुढे जात राहिलो.

पुढे टोल नाका जवळ आला, तिथे रस्त्यात वीतभर लांबीपासून १० फुटापर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या तळ्यांची मालिकाच सुरु झाली. अर्थातच श्विनचा वेग मंदावला. खरेतर, टोल का देऊ नये याचा भक्कम पुरावाच टोल नाक्याच्या दोन्ही बाजूला हजर होता.

रांजनोली येथून नाशिक ठाणे महामार्गावर वळलो आणि हिरव्या रंगाने लक्ष वेधून घेतले. हा महामार्ग कोपर वसई रेल मार्गावरून जातो, तिथून डाव्या बाजूला  ९० अंशात मान वळवली क्षितिजावर डोंबिवली दिसत होती. तर रस्त्यात पुढे डाव्या बाजूला हिरवी टेकडी अन उजव्या बाजूला खिंड होती. तिथे फोटोसेशन करून मानकोलीला पोचलो.

मानकोली सोडताच लांबवर डावीकडे मुंब्रा डोंगररांगा दिसतात. आजमात्र तिथे फक्त काळा रंग दिसत होता. समोर ठाण्याच्या दिशेने पाहिले तर तिथेही काळे क्षितिज.

आज श्रावणाचे काय बिनसले असा विचार करीत मी बॅग मधून रेनकोट काढला. मी रेनकोट घालेपर्यंत, लगेचच श्रावणाची सर धावत आली. आषाढाचा जोर नसला तरी समोरील क्षितिजाचा रंग पाहून मी तयारीतच होतो. मानकोली इथे सुरु झालेल्या श्रावणसरी खारेगाव टोल नाका येईपर्यंत मला ताजातवाना करतच होत्या. '...क्षणात फिरुनी ऊन पडे'चा काही पत्ता नव्हता.

मात्र #tjsb bank च्या मुख्य कार्यालयापर्यंत श्रावणसरींनी माझी साथ काही सोडली नाही.

#saveoursahyadri #cyclingzens #ismartcommute

श्रावणाचा उपद्व्याप

भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर श्रावण ११,शके १९३९

#cycle2work साठी जायला मिळणार हे समजताच श्विनचा आनंद द्विगुणित झाला होता. मी रोज ठाण्याला जात असलो तरी गेल्या २-३ महिन्यात श्विनला हि संधी फारच कमी वेळा मिळत होती.

सारखं नेवाळी फाटा किंवा शिळ फाटा जाऊन घरी येऊन श्विनचे समाधान होत नव्हते. त्यामुळेच आज cycle2work साठी निघताच श्विन खुश झाली. नेहमीप्रमाणे पाऊस पहाटेच पडून गेला होता. त्याच्या पाऊस(पाउल)खुणा रस्त्यावर दिसत होत्या.

डोंबिवली आणि ठाकुर्ली पार करून नवीन कल्याण रस्त्याला लागलो, तेव्हा श्विनने छान वेग पकडला होता. या रस्त्यावर सायकल चालवण्याची मौज निदान डोंबिवलीकरांना तरी आगळीच. #KDMC मधील खड्डेरहित रस्ता म्हणून याचा काही भाग तरी म्युझिअम मध्ये ठेवावा. त्यापाठोपाठ पत्री पूल पार करून दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो.

इथे मात्र गुळगुळीत नवीन रस्त्यावर वाहनचालकांना कसा त्रास द्यावा याचा उत्तम नमुना बघायला मिळतो. हा रस्ता सुरु होताच लगेच आणि नंतर गोठ्याअगोदारचा पूल सुरु होताना तिहेरी गतिरोधक तेही चार चार फुटावर का लावले ह्याचे समाधानकारक उत्तर देणाऱ्याला बक्षीस द्यायला हरकत नाही. याशिवाय इतर गतिरोधक आहेत ते वेगळेच.

दक्षिणायनाच्या अखेरच्या तिमाहीत दुर्गाडी पुल फ्लेमिंगो पक्ष्यांनी बहरलेला असतो. आता उत्तरायनाच्या अखेरच्या तिमाहीत ती कसर आज तरी कावळ्यांनी भरून काढली होती. श्विनला अर्थातच कावळ्यांची शाळा बघण्यात रस नव्हता.

कोनगाव, गोवे, रांजनोली या गावातून जाताना अश्वशक्तीवर चालणाऱ्या वाहनाच्या गर्दीमुळे श्विनचा वेग मर्यदितच होता. पण नाशिक ठाणा रस्त्याला लागताच श्विनने पुन्हा लय पकडली.

श्रावणामुळे सर्वत्र पसरलेली हिरवी चादर डोळ्यांना सुखावत होती. त्यामुळे पिंपळास पुढील चढ कसा पार झाला हे कळलेच नाही. तो चढ चढलो आणि बकऱ्यांचा एक कळप रस्त्याच्या कडेला हिरव्या मेजवानीवर तुटून पडलेला दिसला. त्यांचे फोटोसेशन करून पुन्हा मार्गाला लागलो. तिथून पुढे असलेल्या उतारावरून श्विनने वाऱ्याशी स्पर्धा सुरु केली.

डाव्या हाताला लांबवर मुंब्रा डोंगर दिसू लागताच मी फोटो घेण्याची संधी शोधू लागलो. डोंगरावर काळे ढग जमा झाले होते. पण इतक्यात मी समोर ठाण्याच्या दिशेने समोर पहिले तर तिथेही काळ्या रंगाने आभाळ रंगवले होते. अर्थात श्रावणाची चलाखी माहित असल्याने मी निर्धास्त होतो. मी फोटोसाठी संधी शोधत असतानाच श्रावणाने हळूहळू वरुणराजाला इशारा केला. तरी मी मात्र बेफिकीर होतो. श्रावणाची खोड्या काढण्याची सवय माहित असल्याने मी सुरुवातीला दुर्लक्ष केले. हे पाहताच श्रावणाने वरुणराजाला मोकळीक दिली. मग मात्र नाईलाज झाला असे दाखवत मी रेनकोट चढवला. अंजुरदिवे ते खारेगाव टोल इतका २-४ किमी रस्ता पार करेपर्यंत पवनकुमारांनी वरुणराजाला लगाम घातला. मला रेनकोट घालायला लावायचा उपद्व्याप आटपून श्रावणानेही आपण त्या गावचेच नाही असा अविर्भाव केला. मग भर उन्हात मी रेनकोट घालून ऑफिसला पोचलो.

#ismartcommute #tjsbbank #saveoursahyadri #cyclingzens #dombivlicyclingclub

मलंगगडाची श्रीमंती

#shravanchallange day8
भारतीय राष्ट्रीय दिनांक श्रावण ८, शके १९३९.
जगातील बहुतांश देश ख्रिस्ती असल्याने जास्तीत जास्त देशात ख्रिस्ती कॅलेंडर वापरले जाते, मात्र ते एकमेव जागतिक कॅलेंडर नव्हे. नेपाळसारख्या छोट्या देशातही official कामकाजात त्यांचे हिंदू धर्मावर आधारित राष्ट्रीय कॅलेंडर वापरले जाते. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने भारताने सूर्याच्या परिभ्रमणावर आधारित शास्त्रीय कॅलेंडर राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून स्वीकारले जे कोणत्याही धर्मावर आधारित नाही. जर आपण स्वातंत्रानंतरही ख्रिस्ती कॅलेंडर वापरले तर आपला देश हा ख्रिस्ती देश अथवा ख्रिस्ती देशाचा गुलाम देश ठरतो.

RBI आणि सर्व शासकीय कार्यालयात भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर वापरले जाते. तसेच ते प्रत्येक नागरिकाने सर्व ऑफिशियल कामकाजात वापरायला सरकार आणि RBI ने परवानगी दिली आहेच.

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरच्या शके १९३९ मधील श्रावण ह्या पाचव्या महिन्याची आज ८ तारीख अर्थात #shravanchallange day 8.

रविवार असल्याने long ride चा श्विनचा मनसुबा होता. मात्र सकाळी घरातून निघेपर्यंत ७ वाजले होते. मग #dombivlicyclingclub (DCC) च्या रविवार राइडसाठी सामील व्हायचे ठरवले.
बिराजदारांनी सर्वजण खिडकाळीला जाणार असल्याचे कळवले होते, त्यामुळे मी आणि श्विन तेथे पोचलो. तर DCC मेंबर्स तेथे अजून पोहोचतच होते. सर्वांनी खिडकाळी येथील महादेवाचे दर्शन घेतले. तोपर्यंत अनेक वेगवेगळ्या सायकल भेटल्यामुळे श्विनचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यात @durgesh zipre ने बनवलेली डबल सायकल होती, @sarang mulye ची ३२ वर्षांची घोडा सायकलही होती. खिडकाळीच्या तलावावर सर्वांचे छान फोटोसेशन झाले. इतक्यात उनपाऊस सुरु झाला. उन्हात पडणारा पाऊस ही श्रावणाची मक्तेदारी. हा उनपाऊस सुरु झाला की पुन्हा बालपण आठवते. 'नागडा पाऊस' हे ह्या पावसाचे नावही हटकून आठवते.
खिडकाळीहुन लगेच परत घरी जायची श्विनची तयारी नव्हतीच. पण व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या उक्तीप्रमाणे खिडकाळीहून पुढे अनेक पर्याय समोर येऊ लागले. पण अखेरीस आधी खिडकाळी गावात जायचे ठरले. महादेव मंदिरातून खिडकाळी गावात जायला निघणार तोच संघमित्राच्या सायकल मध्ये हवा कमी असल्याचे लक्षात आले. हवा भरतानाच मला शंका आली कि टायर खराब झाला असल्याने सारखी पंक्चर होणार. खिडकाळी गावात पोचेपर्यंत माझी शंका खरी ठरली. त्यामुळे तिला घरी जावे लागणार होते.
DCC मधील हरहुन्नरी सभासद @pushkar joshi आणि #gandhar dombivlikar यांना पोहण्याचे वेध लागले होते, तर सारंग घोळ गणेश मंदिराला जाण्यासाठी घोळ घालू लागला होता. मी आणि ममताने मात्र  श्री #Malanggad ला जायचा निर्णय घेतला होता. @bhimashankar birajdar याना फितवण्याचा माझा प्रयत्न मात्र तोकडा पडला. मग खिडकाळी गावातून पुन्हा शिळ कल्याण रस्त्याला येताच सर्वजण आपापल्या मार्गाने निघाले. डॉक्टर सुनील पुणतांबेकर आणि काहीजण घरी परत जाणार होते, तर पुष्कर आणि टीम डुंबायला तलाव शोधायला निघाली.

पण माझा मलंग गडाचा प्लॅन ऐकताच @yogesh choughule हा दुर्गप्रेमीही लगेच आम्हाला सामील झाला.

मग मी, ममता आणि योगेश नेवाळी फाट्याकडे वळलो. श्रावणातील वातावरण आमचा उत्साह वाढवतच होते. नेवाळी फाट्याला कधी पोचलो हे कळलेही नाही.
 नेवाळी फाट्याला पोचून मलंग गडाकडे वळलो मात्र,... रस्त्याच्या एकंदर रुंदीची ९०% जागा व्यापणारा आणि जवळपास १० फूट लांब असा छोटासा खड्डा (की तलाव?) आमचे स्वागत करत होता. पुढे नेवाळी गावात रस्त्यावर इतके लांबरुंद नसले तरी छोटे छोटे तलाव तर पावलापावलावर नजर पडत होते. मला उगाचच #malishka चे '#mumbai tula BMC var bharavasa nay ka' हे गाणे आठवले.

मात्र श्विन पुढे जाताच ह्या तलावांकडचे लक्ष पार उडाले. सर्वत्र पसरलेली हिरवी चादर पाहता पाहता मन हरपून गेले होते. जसजसा मलंगगड जवळ येऊ लागला तसे निसर्गाच्या जादूसमोर आम्ही स्वतःला पार विसरून जाऊ लागलो.
मलंगगडाने पांघरलेली हिरवी शाल पाहू की त्या शालीभोवती घुटमळणाऱ्या ढगांची सोनेरी किनार लाभलेली दुलई पाहू! त्यातच निमिषार्धात जोरदार पाऊस तर निमिषार्धात ऊन, तर कधी नागडा पाऊस अशी उधळण श्रावणाने सुरु केली.

मलंगगडाजवळ जाता जाता तर किती फोटो घेऊ आणि किती सौंदर्य डोळ्यात साठवून ठेऊ हेच कळेनासे झाले होते. मलंगगड येताच नेहमीप्रमाणे चहा तर हवाच होता. पण श्रावणासरींनी आम्हाला भाजी खायचाही आग्रह केला होता. गप्पा मारता मारता योगेशचे अनेक पैलू उलगडू लागले. मलंगगडाच्या निसर्गाबरोबरच योगेशच्या ओळखीची ठेवही आज मिळाली होती.

परत निघण्याचे मनात नव्हते पण पर्याय नव्हता. निसर्गाची उधळण मागे ठेवून आम्ही परत निघालो. मलंगगडाभोवतीचा परिसर मागे पडला आणि नेवाळी गावातील फुटाफुटावरील छोटेछोटे तलाव पुन्हा स्वागताला हजर झाले. नेवाळीनाक्यावरील ९०% रस्ता व्यापणारा तलाव ओलांडून आम्ही बदलापूर काटई पाइपलाइन रोडला लागलो. तेथे गावठी भाजी घेण्याचा मोह काही आवरला नाही. रेनकोट टोपी सर्वकाही श्विनलाच सांभाळायला दिले होते. हॅन्डलला लावलेल्या टोपीत भाजी ठेवली आणि परतीच्या मार्गाला लागलो, आणि लगेचच जोराचा पाऊस सुरु झाला. वरुण राजाने चांगलेच पेचात पकडले होते. टोपी घालू शकत नव्हतो कारण त्यात भाजी होती. पावसाचा जोर पाहता 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' असे म्हणत निमूटपणे श्विनबरोबर रस्त्याच्या कडेला थांबलो. ममता आणि योगेश सुद्धा त्यांच्या सायकलबरोबर होतेच.

मात्र श्रावणाने आपला हट्ट सोडला नाही. थोड्याच वेळात त्याने वरूणराजाचा उत्साह आवरता घेतला आणि श्विनने घराकडे धाव घेतली.

#saveoursahyadri #ismartcommute #cyclingzens #tjsbbank #

पवनकुमाराची धमाल

#Shravanchallange चा आज ६ वा दिवस. भारतीय सौर श्रावण ६, शके १९३९.

रोजच #cycle2work पुन्हा सुरु करायचा विचार करत होतो. पण जागा झाल्यावर श्विनपासून फार वेळ लांब राहणे जमत नव्हते. Cycle2work करायचे तर जागा झाल्यावर घरी २ तास थांबावे लागणार होते. त्यामुळे मी रोज नेवाळी फाटा किंवा शिळ फाटा येथे जात होतो.
पण आज मात्र घरी वेळ काढून cycle2work करायचे नक्की केले.

वास्तविक  Tjsb Sahakari Bank च्या मुख्य कार्यालयात रुजू झाल्यावर अजून श्विनला ठाण्याला यायची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आज श्विनही आज खुश होती. श्रावणाची छाप वातावरणात पडली होतीच, पण तरी सावधगिरी म्हणून मी रेनकोट बरोबर घेतला. पण गरम होऊ नये म्हणून तो न घालता, श्विनलाच तो सांभाळायला दिला.

बऱ्याच दिवसांनी कोनगाव - राजनोली - मानकोली (नाशिक ठाणे हायवे) ह्या मार्गाने जात होतो. कोन-पिंपळास मार्ग उन्हाळ्यातच फुटलेला असल्याने पावसाळ्यात त्या मार्गाची परीक्षा घेण्याचा प्रश्नच नव्हता.

राजनोलीहुन (कल्याण फाटा) मानकोली कडे निघालो खरा! वरुणास्त्र म्यान केलेले असले तरी पवनकुमार चांगलेच उत्साहात होते. वारा उजवीकडून डावीकडे जोरात वाहत असल्याने श्विनचा वेग मात्र मंदावला होता. त्यामुळे श्विन हिरमुसली तरी आजूबाजूला पसरलेला श्रावणाची हिरवी उधळण पाहून मी खुश होतो.

मानकोली पार करून पुढे निघालो आणि हिरवा रंग पांघरलेला मुंब्रा डोंगर डावीकडे दिसू लागला. मुब्रा डोंगराची रांग फारच सुंदर दिसत होती. त्याचे फोटो घेऊन मी पुढे निघालो. ठाणे शहर नजरेच्या टप्प्यात येत असताना पवनकुमाराना भलतीच लहर आली. उलट दिशेने इतक्या जोरात वर येऊ लागला कि जोरजोरात पॅडल मारूनही श्विन फारशी पुढे सरकेनाशी झाली. एव्हाना अंदाजे २५ किमी सायकलिंग झाले होते. दरम्यान वरुण राजाने दोन तीन वेळा हूल दिली होती, पण ashadhchallange चा अनुभव असल्यामुळे मी रेनकोट घातला नव्हता. आकाशही निरभ्र होते. ऑफिस जेमतेम ६-७ किमी वर होते. पण जोरात वाहणाऱ्या पवनकुमाराने भराभरा काळे ढग डोक्यावर गोळा केले. मग वरूणराजानाही थोडे स्फुरण चढले. आता मात्र रेनकोट घालावा लागणार अशी चिन्हे दिसू लागली. पण पवनकुमाराने माझ्या ऐवजी वरूणराजाचीच गम्मत केली होती. वरूणराजाची गोळा केलेली सर्व शस्त्रास्त्रे म्हणजे ढगांना पवनकुमारांनी हा हा म्हणता पळवून नेले.

#dombivlicyclingclub #ismartcommute #cyclingzens

सायकलचा इतिहास

भारताच्या अधिकृत कॅलेंडरच्या श्रावण ह्या ५व्या महिन्याची आज ४ तारीख अर्थातच त्यामुळे #shravanchallange चा ४ था दिवस.

भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर हे ख्रिस्ती धर्माप्रमाणे सौर कॅलेंडर आहे. सौर (कॅलेंडर) वर्ष पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणारा वेळ.
मात्र भारतातील सर्वोधिक लोकसंख्या असलेले हिंदू आणि मुस्लिम दोघांचेही कॅलेंडरवर्ष हे चांद्र वर्ष आहे. चांद्र (कॅलेंडर)वर्ष म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला लागणारा काळ.

हिंदू कॅलेंडरच्या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची आज तृतीया (३ री तिथी).

श्रावण हा हिंदू महिना सुरु झाल्यापासून इंद्रदेवाने वरुणास्त्र आवरते घ्यायला सुरुवात केली होतीच. त्यामुळे आज श्विनबरोबर बाहेर पडताना रेनकोट घेतला नाही. पाऊस सुरु नसला तरी ढगांनी पांघरलेल्या पडद्यामुळे सूर्यदेवाला मात्र श्विन आणि माझ्या जोडीचे दर्शन घेता येत नव्हते.

मानपाडा रोड संपून कल्याण शिळ रस्त्याला लागलो खरा. पण तेथे मात्र श्विन आणि माझ्यात द्वंद्व सुरु झाले. नेवाळी फाट्याला जाऊन वाटेत हिरवळ अनुभवायची का खड्डे टाळण्यासाठी बदलापूर पाइपलाइन ऐवजी शिळ फाट्याला जायचे ह्याचा निर्णय होत नव्हता. मात्र अखेरीस आज श्विनचाच विजय झाला आणि आम्ही शिळ फाट्याकडे निघालो.

श्विनला चांगलाच हुरूप आला. श्विनचा आनंद द्विगुणित करायला 'पवनकुमारही' तयार होते. मात्र पवनकुमारांनी श्विनला पाठीमागून ढकलण्याऐवजी डावीकडून उजवीकडे ढकलायला सुरुवात केल्याने श्विनच्या वेगावर अडथळा येऊ लागला. अर्थात मी मात्र वाऱ्यामुळे खुश होतो.

'कोकणरत्न' चे बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही परत फिरलो. परत येतानाही रस्ता खड्डेविरहित आल्याने श्विनने आज राइडची चांगलीच मजा लुटली.

माझी श्विन हि सायकलची नक्की कितवी पिढी हे माहित नाही. पण ह्या 'सायकलवंशाचा' थोडी माहिती करून घेउया....

* The first manpowered land vehicle was constructed by Giovanni Fontana in 1418.

*The term 'bicycle' first entered into popular usage in France in 1860

*The prototype of mountain bike was not developed until 1977.

* In 1817 Karl Von Drain, German baron, invented a horseless carriage that would help him to get around faster. The two wheeled peddleless device was propelled by pushing your feet against ground. The machine beacame known as 'draisine' & led to creation of modern day bycycle.

* Although Leonardo Da Vinci drew some rough sketches of a contraption that looked like bycycle, Frenchman De Sevrac built the first bycycle type vehicle in 1690. It was referred to as hobbyhorse. Hiwever it didnot have pedals. Those were added in 1840 by scottish blacksmith, Kirkpatric Macmillan, who was credited with inventing first bicycle.

* The term bycycle was not introduced until 1860s, when it was coined in France, to describe new kind of two wheeler with mechanical drive.

* Orville & Wilbur Wright, the brothers who built first airplane, operated first bike repair shop in Dayton, Ohio. They used their workshop to build the 1903 Wright flyer.

* Before the word 'bicycle' bacome popular (coming from French word 'bicyclette'), bimes were typically called 'velocepedes'

* You may have heard of the penny-farthing, an early type of bicycle that featured a front wheel significantly larger than rear. The name from old British Penny & Farthing coins which represents large & small wheels.

खड्डयांची महिरप

भारतीय राज्यघटनेवर आधारित आणि शास्त्रीय सौर कॅलेंडरच्या वर्ष १९३९ च्या श्रावण महिन्याची आज ३ तारीख. अर्थातच #shravanchallange चा ३ रा दिवस.

राईडसाठी तयार होत असताना अचानक वरूनराजाने रौद्र रूप धारण केले. मग त्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मी सुद्धा रेनकोटरुपी चिलखत आणि शिरस्त्राण चढवले.
श्विनला तयार करून निघालो मात्र आणि नित्यनियमप्रमाणे वरूनराजाने वरुणास्त्र म्यान केले. माझा चिलखत आणि शिरस्त्राण चढवण्याचा खटाटोप वाया गेला तरी, श्विन मात्र बाहेर फिरायला मिळणार म्हणून खुश होती.

#कल्याणडोंबिवली महानगरपालिका (#kalyandombivlimunicipality), येथील सर्व आजी आणि माजी नगरसेवक , स्थापत्य अभियंते (civil engineers) यांच्या कृपाप्रसादामुळे श्विनला बिल्डिंगबाहेर पडल्यापासूनच रस्त्यावर जपून ठेवलेल्या सौंदर्यस्थळांचा (खड्डयांचा) लाभ मिळायला सुरुवात झाली.
#दीनदयाळ रस्ता (#dindayal road) चे नुकतेच काँक्रिटिकरण करण्यात आले, मात्र #सम्राट चौक (#samrat chowk) येथे चहुबाजूने खड्डयांची महिरप जपण्याचे कौशल्य मात्र उल्लेखनीय आहे. तसेच सम्राट चौकापुढे रस्ता २ इंच तुटल्यासारखा ठेवल्याने सर्व वाहनांना रस्त्यावर उडी मारण्याचा आनंदही घेता येतो.
मात्र श्विन ने ही उडी आणि खड्डयांची महिरप टाळून पुढे मार्ग काढला.
मानपाडा रस्ता संपता संपता पुन्हा एकदा गाय आणि वासरू यांचा कळप समोरून येत होता. मी सायकल चालवता चालवता त्यांची त्यांची संख्या मोजायची प्रयत्न केला. पण श्विन आणि तो कळप विरुद्ध दिशेने जात असल्याने तो प्रयत्न फोल गेला तरी २०-२५ जणांचा तो कळप नक्कीच होता. कोणतेही घड्याळ न वापरता त्यांना वेळ कशी समजते कोणास ठाऊक!
पुढे बदलापूर पाइपलाइन रोडला लागल्यावर श्विनने छान वेग पकडला. श्विनला तर तोच रस्ता पकडून सरळ जात रहावेसे वाटत होते. मात्र घड्याळ माझ्या मनगटावर नसले तरी मानगुटीवर होते. त्यामुळे श्विनचे मनसुबे आवरते घेत, मी श्विनची दिशा बदलली.
मग मात्र श्विनचा वेगही मंदावला. पाइपलाइन रोडवर 'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे' चा प्रत्यय येत होता. मग श्विनचे लक्ष तिकडे वळवत तिचा पुढे जाण्याचा मनसुबा मी आवरता घेतला होता याचे भानही उरले नाही.
परतीच्या वाटेवर मात्र #KDMC ला लाजवेल अश्या नजाकतीने रस्त्यावर खड्डयांची नक्षी जपली होती. जर कोणी कर्जत- बदलापूर कडून डोंबिवली कडे येत असेल तर त्याला आधीच डोंबिवली येत असल्याचे लक्षात यावे यासाठी तर  MMRDA (का आणखी कोणी) ने हा उपक्रम केला नसेल ना!

#saveoursahyadri #tjsbbank #cyclingzens #ismartcommute

MH12

Indian calendar month Saur Sharavan began yesterday. But I missed d ride. But today when its 2nd day of Indian month Shravan 1939, Hindu month Shravan begins.
I had ride today to welcome months having same name but from both different calenders viz 1) Indian National calender which is only secular calendar of the world & is solar calender and
2) Hindu calender formed after the name King Shalivahan.

Hindu month Shravan is supposed to be most auspicious month of the year having lots of festivals. In fact every Monday & Friday is treated as holy day.
Coincidently this time Hindu Shravan month also started on Monday.

So it was great feeling to ride today morning. Normally I do yoga (asans) & pranayam after ride. But today I do it before my ride.

Therefore, I was much fresh when started the ride. The Shwinn was also fresh after yesterday's rest.

I crossed the east west overbridge & then took left for char rasta. Shwinn was much slower there. As Shwinn goes little further, I noticed a group of children were walking by the road. There were some beautyspots on the road due to Municipality. So  to save Shwinn from those beautyspots, I decided to then took Shwinn behind the children. I slowed down Shwinn further. As I reached the 'beautysopts' of the road, I push breaks slightly to wait the children pass. But still tyres brushed for 3-4 inches & Shwinn goes further in spite of the breaks.

It was effect of very very slight dash from behind. It was so slight that Shwinn might not realsed it.

I just turn back expecting a two wheeler. But it was four wheeler. I looked at the car & noticed the number..... Oh it was 'MH- 12'.

The car was slow. I slowed shwinn further to let the car come parallel to me. Then I look at the driver, raise fingre besides thumb & signalled 'what...'.

Oh God! I got much more shock rather than the dash. 'MH 12' said 'S..O..R..R..Y'.

I couldn't believe what I heard. MH 12 & 'SORRY'

There can't be any more suprise for you, when 'MH 12' expressed such words to you. My further ride to Nevali phata was just celebration for the same.

The 2nd day of#shravanchallange turned to be much pleasant for me. Unfortunately I couldn't meet none of the #dombivlicyclingclub member during the ride to share the experience.

But the Shravan showered me to double my happiness.

#saveoursahyadri #tjsbbank #ismartcommute #cyclingzens

श्विनच्या मार्गात श्वानपथके

आषाढ संपता संपता वरूणराजाने चांगलाच ताल धरला आहे. मात्र मी सायकलिंगला निघालो की सुरताल आवरून ठेवण्याचा प्रघात वरुण राजाने आजही कायम ठेवला होता.
श्विनला आज कोणी सोबत मिळाली नव्हती. मात्र 'अकेले है तो क्या गम है, चाहे तो अपने बस मी क्या नही' असा विचार करत श्विनची राइड सुरु होती.
मानपाडा रस्ता संपता संपता समोरून गाय आणि वासरूंचा एक कळप येत होता. एक वासरू सगळ्यात मागे राहिलेले पाहून एक श्वानपथक त्या वासरावर तोंडसुख घेऊ लागले. ५- ६ जणांच्या त्या पथकाला घाबरून ते वासरू जर उधळले असते तर मधल्या मध्ये मी आणि श्विनची ताटातूट होण्याचा संभव होता. त्यामुळे श्विनने वाट थोडी वाकडी करून मार्ग काढला.
बदलापूर पाइपलाइन रोडला लागल्यावर तर अक्षरशः दर २-४ किमी मागे एक अशी अनेक श्वानपथके वाट पाहत असल्यासारखीच श्विनकडे बघत होती. अश्यावेळी मी ती पथके जवळ यायच्या आधीच श्विनचा वेग कमी करत होतो. अर्थात त्या टोळक्याकडे लक्ष असून त्यांच्या डोळ्याला डोळा न भीडण्याची काळजी घ्यावी लागत होती. न जाणो एखाद्याला श्विनचे आकर्षण वाटायचे.
तरीही तळोजा फाट्याला एका श्वानाला श्विनचे आकर्षण वाटलेच. पण ते थोडक्यात आवरले.

नेवाळी फाट्यापर्यंत कोणीही सायकलिस्ट न दिसल्याने आश्चर्य वाटत होते. पण परत निघाल्यावर मात्र (बहुतेक) बदलापूरचे दोन सायकलिस्टस आणि त्यांच्या बरोबर आणखी एकजण बाईकवर जाताना दिसले. ते सायकलिस्टस  आणि बरोबरचा यंत्रचलीत दुचाकीवरील स्वार पाहता पाहता माझ्या पुढे निघून गेले. त्या दोन सायकल पाहता मला अभिषेक कोयंडे (@abhishek koyande) च्या सायकलचीच आठवण झाली.
थोड्या अंतरावरच आणखी एक सायकलिस्ट समोरच्या दिशेने येताना दिसला. एकमेकांना अंगठे दाखवून प्रोत्साहित करून आम्ही दोघंही आपापल्या दिशेने पुढे गेलो.

पाइपलाइन रोडवरील आजची श्वानसंख्या पाहता उद्यापासून नेवाळी फाट्या ऐवजी शिळ फाट्याला जायचे ठरवत मी घरी परतण्यासाठी कल्याण शिळ रोडला वळलो तर तेथेही श्वानपथके तयारच होती.

पूर्वी पावसाळा आला की खेकडे आणि बेडकांची लगबग दिसायची. मात्र प्राणिप्रेमींमुळे कुत्र्यांची संख्या वाढत असली, तरी वेगाने झालेल्या शहरीकरणामुळे आजच्या बालगोपाळाना मात्र खेकडे आणि बेडूक चित्रातच दिसतील.

#saveoursahyadri #tjsbbank #cyclingzens #ismartcommute

मोहीम शिंग्रोबा

#ashadhchallange day 25, Indian National date Ashadh 25th 1939

मोहीम शिंग्रोबा

मुंबई हुन पुण्याला जुन्या महामार्गांने जाताना खंडाळा घाट सुरु झाला की वाहनाच्या खिडकीकडे गर्दी होत असे.... अजूनही होते.

शिंग्रोबा च्या देवळात आपले पैसे देणे खरोखरच भाग्याचे समजले जाते.

#dombivlicyclingclub च्या Sanjay Datye आणि Bhimashankar Birajdar यांच्याबरोबर आज खंडाळा घाटात चढाई करून शिंग्रोबा मंदिराचे दर्शन घ्यायचे निश्चित केले होते.
काल झोपायला उशीर झाल्याने मी जर ५.३० पर्यंत फोन केला नाही तर माझी वाट बघू नका असे सांगितले होते, पण सुदैवाने ४.३० च जाग आली.
अर्थात तरी नेहमीप्रमाणे मला निघायला उशीर झालाच. दोघांनाही चार रास्ताला यायला सांगून निघालो. पण तिथे पोचताच दात्येंचा फोन आला की त्यांची सायकल puncture आहे.

DCC चे बॉण्डिंग इथेही कामी आले. बिराजदार अजून पोचले नव्हते. त्यांना त्यांची सायकल घरी ठेवून सारंगकडून डबल सायकल आणायला सांगितली. पण इथेही प्रॉब्लेम होता. सारंग माहुलीला जाणार होता. मग लगेच त्याला फोन करून आम्ही तिघे त्याच्याकडे पोचलो. Durgesh Zipre नी DCC ला दिलेली डबल सायकल आज उपयोगी आलीच.

श्विनला अनोखी सोबत मिळाल्याने श्विनही खुश झाली. आम्ही निघालो, तर वाटेत vinit shetye आम्हाला पाहून आमच्यामागे येऊ लागला. त्याला वाटत होते की आम्ही DCC च्या रेग्युलर संडे राइडला जात आहोत. मग त्याला आमचा प्लॅन सांगितला.

आषाढसरी मात्र आजही श्रावणसरींच्याच रुपात अवतरत होत्या. डोंबिवली मागे पडून शिळ फाटा जवळ आला आणि एकजण 'मानवशक्ती' ऐवजी 'अश्वशक्ती' (की 'यंत्रशक्तीवर') चालणारी दुचाकी घेऊन आमच्याकडे आला. हेल्मेट मुळे मी ओळखले नाही. त्याने हेल्मेट काढले,तर साक्षात मेघेश बाहुबली समोर! बिचारा रात्रपाळी करून घरी जाऊन लगेच पुन्हा ऑफिसला जाणार होता. पण तरी त्याचा उत्साह कायम होता.

मग शिळ फाट्याला चहा घेऊन मेघेशला निरोप दिला. निसर्ग आमच्यावर पूर्णपणे खुश असावा. 'अरुण' चे दर्शन नव्हतेच, पण वरुणलाही निसर्गदेवता जास्त काळ दर्शन देऊ देत नव्हती. पण वरुण चा खोडकरपणा काही कमी नव्हता. पाऊस आला म्हणून रेनकोट घातला की रेनकोट ओला करून आणि आमच्या चेहऱ्यावर ताजेतवाने करण्याइतपत दर्शन देऊन वरुणराज गायब होत होते. मग काय गरम होऊ नये म्हणून पुन्हा रेनकोट काढावा लागत होता.

दरम्यान पळस्पे फाट्याला नाश्याचा प्लॅन मात्र आम्हाला पुढे ढकलावा लागला. अखेरीस शिळ फाट्याला चहा घेतल्यानंतर चौक फाट्याला वडापाव वर समाधान मानावे लागले. जोशिकाका ठरल्याप्रमाणे महड फाट्याला भेटल्यावर आम्ही खोपोलिकडे कूच केले.
खोपोली सोडल्यावर अवघ्या ३ किमी अंतरावर शिंग्रोबा मंदिर आहे. बिराजदार-दात्येंची डबल सायकल आणि जोशीकाकांची सायकल सिंगल स्पीड असल्याने त्यांना चालत घाट चढण्यावाचून पर्याय नव्हता. घाटाच्या सुरुवातीला फोटो सेशन केल्यावर आम्ही पुढे निघालो. तर पुढे पुण्याचा जयेश कहार हा सायकलिस्ट भेटला. तो पुण्याहून येऊन घाट उतरून परत चालला होता. DCC चे इतर तीन शिलेदार मागे राहिल्याने जयेशबरोबर सायकलिंग करत घाट चढत होतो. पण इतर तिघे चालत येत असल्याने खूपच मागे पडल्यामुळे जयेश बरोबर selfie घेऊन मी थांबलो.
शिंग्रोबा मंदिरापाशी आम्ही पोचलो तेव्हा वरुणराजाही प्रसन्न झाला होता. दर्शन घेऊन आणि फोटो काढून आम्ही परत निघालो. नितीनने केलेल्या वर्णनामुळे बिराजदार घाटातील वडे खाण्यासाठी फार उत्सुक होते. तेथे पोचलो, तर वरुणराज चांगलेच रंगात आले. वडे-भजी वर ताव मारून खोपोलीला उतरलो. जोशिकाका खोपोली रेल्वे स्टेशनकडे वळल्यावर आम्ही पळस्पे फाट्याकडे सुसाट परतलो.

दरम्यान खोपोलीनंतर ५-७ किमी नंतर वरूण राजाचा जोर ओसरून पुन्हा त्याचा आमच्याबरोबर खेळ सुरु झाला.

पळस्पे फाट्याला पुन्हा नाश्ता केला आणि पुढे निघालो. तेव्हा ३ वाजले होते. दिवसभरात भास्कराचे दर्शन झाले नव्हते, मात्र पनवेलच्या पुढे आल्यावर काही काळ मात्र भास्कराचार्यांचे दर्शन झाले. कळंबोली ते शिळ फाटा दरम्यानच्या टोल नाक्याचा हॉल्ट हा हवाच. येथील कर्मचारी सायकलिस्टसचे नेहमीच चांगले स्वागत करतात. तेथे पाणी भरून घेऊन, नेहमीप्रमाणे कोकनरत्न येथे चहासाठी थांबलो.

तेथे ममताचा फोन आला की ती आम्हाला receive करायला सायकलने येत आहे. DCC चे कुटुंब किती घट्ट आहे याचीच हि प्रचिती होती.

आमच्या १४६ किमी च्या या राइडमध्ये सारंग, विनीत, मेघेश, जोशिकाका आणि ममताबरोबर DCC चा प्रत्येक सभासद मानसिकरित्या सहभागी होताच.

जाता जाता ज्या शिंग्रोबा मंदिरात आम्ही गेलो होतो, त्याबद्दल थोडक्यात:
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा
शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते . शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेढरं चरायला नेत असे.त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते . परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकारयांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले.ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते . जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भार्षेत धनगरांच्या मौखिक वाङ्मयाचे “छापील’ ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले व १९६६ ते १९९१ या ख्रिस्ती वर्षाच्या काळात धनगरांच्या चालीरीती,संस्कृती,ओव्या, इतिहास, पशुपालन पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले.

आषाढसरी

सौर आषाढ महिन्याची आज २३ तारीख. सकाळी लवकर बाहेर निघता येणार नसल्याने नेवाळीची मॉर्निंग राइड करता येणार नव्हती. त्यामुळे आळसावलो होतो. बऱ्याच दिवसात #cycle2work केलं नव्हतं, त्यामुळे मग मॉर्निंग राइड चुकल्याची संधी साधायचे ठरवले. आळसामुळे निघावसं वाटत नव्हतं. निघता निघता आणखी उशीर झाला तर मात्र रेल्वेने जायच असा दिलासा मनाला देत होतो. पण सगळं पटकन आवरलं आणि cycle2work ला पर्याय उरला नाही.

अखेर cycle2work साठी श्विनकडे गेलो मात्र, आणि आळस कुठल्या कुठे पळून गेला.

आषाढाने आज मात्र जोर धरला होता म्हणून मी रेनकोट घालून निघालो. पण आषाढाच्या पर्जन्यधारा माझ्यावर काही प्रसन्न झाल्या नाहीत.

वाटेत एक सायकलिस्ट पंक्चर झालेली सायकल हातात घेऊन चालत जात होता. माझ्याकडे पंप असल्याने त्याला हवा भरून दिली. त्याला पुढे ३-४ किमी च जायचे असल्याने एवढ्या कामगिरीवर तो त्याच्या ऑफिसला पोचेल असे वाटले. बिचारा त्यालाच ऑक्सिजन मिळल्यासारखा खुश झाला होता. अर्थात ह्याचे महत्व मला चांगलेच माहित होते. (२ महिन्यांपूर्वी पंप नसल्याने दोन-तीन वेळा ६-६ किमी चालल्यावर सायकलला हवा भरायला मिळण्याचे महत्व कोण विसरणार.)

नाशिक ठाणे महामार्गावर आषाढाने हिरवा रंग भरला होता. आषाढाच्या जादूने माझा आवडता मुंब्रा डोंगर छानच सजला होता. त्याचे फोटो घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नव्हते.

आषाढसरी माझ्यावर प्रसन्न नसल्या तरी, ढगांनी मात्र घरापासून ऑफिसपर्यंत माझ्यावर मस्त छत पुरवले होते.
शेवटी आषाढसरींनाही राहवले नसावे. मी ऑफिसपासून जेमतेम ४००-५०० मीटरवर म्हणजे तलावपाळीच्या एका बाजूला पोचलो मात्र, हळुवार पर्जन्यधारा सुरु झाल्याच आणि रेनकोट तरी ओला झाला.

#cyclingzens #dombivlicyclingclub #tjsbbank #saveoursahyadri #ismartcommute

आषाढाची हूल

आषाढ म्हणजे संततधार! आषाढ म्हणजे सूर्याला गिळून टाकणार आभाळ! आषाढ म्हणजे मुसळधार!

असाच काहीसा रंग आज राइडसाठी निघताना होता. काही दिवस कोरडे गेल्यावर आज मेघमल्हार ऐकायला मिळेल अशी खात्रीच वाटत होती. त्यामुळे रेनकोटचा पक्का जामानिमा करून घरातून बाहेर पडलो. पाऊस हलकासा सुरु असला तरी पुढील रागदारीची चाहूल दाखवत होता.

राइड सुरुवात करताना त्यामुळेच फार प्रसन्न वाटत होते. मानपाडा रस्त्यावर पोचेपर्यंत एकंदर वातावरण आषाढाचेच होते.....


घरापासून ३-४ किमी सायकलिंग झाले असेल -नसेल, तर पुढे पावसाचा पत्ताच नव्हता. त्यातला त्यात समाधान म्हणजे आज निदान रेनकोट ओला तरी झाला होता. बदलापूर पाइपलाइन रोड वर काही सायकलिस्टस दिसले. त्यांना हात दाखवत मी नेवाळी फाट्याला पोचलो. त्यामुळे आषाढाने निराश केले तरी समव्यसनी भेटल्याने उत्साह कायम होता.

मात्र, परत येताना पुन्हा एकदा आजही बदलापूर पाइपलाइन रोडवर एक साप वाहनाखाली चिरडून गतप्राण झालेला दिसला. पुन्हा एकदा #saveoursahyadri मधील @anand pendharkar आणि #bibhas amonkar यांची आठवण झाली.

#dombivlicyclingclub #cycle2work #cyclingzens #ismartcommute #tjsb

गुरुपौर्णिमा

आज गुरुपौर्णिमा. त्या निमित्ताने दत्त मंदिरात जाण्याची पर्वणी DCC ने साधली हे उत्तमच.
या निमित्ताने माझ्या काही सायकल गुरूंविषयी...
मला आठवते त्याप्रमाण माझ्या मामेबहिणी मला जवळपास तीन वर्ष होप्पिंग चा प्रयत्न करत सायकल शिकवत होत्या.
मात्र मी होपिंग च्या पुढे काही जात नव्हतो.
शेवटी माझ्या मावसभावाने मला आधी सायकलवर बसवले आणि मला पॅडल मारायला सांगून माझ्याबरोबर धावत येत सायकलला स्पीड दिला. त्याने हात कधी सोडला ते कळले नाही, पण वळणावर मला लक्षात आले तेव्हा सायकल थांबवायची कशी ते न कळल्याने मी बाजूच्या झाडीत घुसवण्याचा पर्याय निवडला.
तेव्हा हे माझे पहिले तीन गुरु.
नंतर ११-१२ व्या इयत्तेत मला मिळालेली सायकल मी २० वर्ष चालवल्यावर मी ती देऊन टाकली. मग दोनच वर्षात मधुमेह हा मित्र आणि गुरू भेटला. त्याने व्यायामाचे महत्व पटवले.
दरम्यानच्या काळात माझी मावशी- डॉ निरुपमा भावे नी पन्नाशीनंतर पुन्हा सायकलिंग सुरु करून सायकलवर भारतातील बहुतेक भागात सायकलिंग केले होते.
तिला मी सहजपणे मला सायकल घेण्याविषयी सांगितले. माझे सहज सांगणे तिने मनावर घेतले आणि मला सायकल घेऊन दिली. तिचे घर डेक्कन (पुणे) ला तर मी राहत होतो चिंचवडला. रेल्वे स्टेशनवर नियम नीट न सांगितल्याने आणि मावशीने सांगितल्याप्रमाणे मी ते २० किमी अंतर सायकलनेच पार केले आणि माझे सायकलिंग पुन्हा सुरु झाले. हि माझी पहिलीच गियर सायकल. तेव्हा मावशीच्या मार्गदर्शनाप्रमाणे सायकलिंग सुरु केले. पुणे सायकल प्रतिष्ठान तर्फे इंदोर झांसी प्रवास २०१० मध्ये केला तेव्हा जुगल राठी या आणखी सायकल गुरूशी भेट झाली. शेवटच्या दिवशी खजुराहो ते झांसी हे १८० किमी अंतर राठींनी एकट्यानेच पूर्ण केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे ६२. (आजही ६९-७० व्या वर्षी त्यांच्यात दरदिवशी २०० किमी सायकलिंग ची जिद्द आहेच.)

त्यानंतर प्रत्येकच लॉन्ग टूर च्या निमित्ताने वेगवेगळे सायकल गुरू भेटतच राहिले.
आप्पा (धनंजय मदन) बरोबर असले किंवा नसले तरी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे. त्यांना भेटण्याची दोन मिनिटांची संधी मिळाली तरी त्यात अप्पा सहजपणे महत्वाचा सल्ला देतात.
YHAI मधील प्रमोद बोरकर, किशोर केणी तसेच saveoursahyadri मधील प्रशांत ननावरे, आशिष आगाशे, सुमित पाटील हेही सायकलिंग मधील माझे गुरुच.

गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व सायकल गुरूंना सादर प्रणाम

SOS चा ध्यास

वेगवेगळ्या सायकल ग्रुप बरोबर पर्यावरण वाचवा हा संदेश देत मी सायकलिंग केले होते. त्या सायकल दौऱ्यात पर्यावरणाविषयीची कळकळ कुठेही दिसून आली नव्हती.
मात्र SOS च्या पहिल्याच कार्यक्रमात वेगळेपण जाणवले. म्हणूनच मग मी पुन्हा एकदा माझा मुंबई गोवा सायकलिंग प्लॅन कॅन्सल केला आणि सह्याद्री च्या डोंगरखोऱ्यात सायकलिंग साठी सहभागी व्हायचे निश्चित केले. अर्थातच या मोहिमेत सामील झाल्यामुळे दृष्टिकोनात जो फरक झाला त्यामुळे माझा निर्णय किती योग्य ठरला हे रोजच जाणवते.
आनंद, बिभास सर यांची कळकळ मनाला भिडली होती. अविनाशचा साधेपणा मन जिंकून गेला होता.
हे सगळं आज आठवायचे कारण म्हणजे रोजच्या प्रमाणे सकाळी नेवाळी फाट्याहुन सायकलिंग करत परत येताना दिसलेला वरील फोटोतील साप.

महामार्ग हवेतच, पण ते हवे असताना निसर्गातील जीवांची हानी कशी कमी करता येईल हा विचार परत येताना मात्र मनाला खिन्न करत होता.

मात्र पुढे शेतातील सुरु असलेली कामं पाहून मानवाने एक हात जरी पुढे केला तरी निसर्ग मात्र त्याच्या ओंजळीपेक्षा खूप जास्त परत देणार आहे याची खात्री पटली आणि पुन्हा मन उल्हसित झाले

नभ मेघांनी आक्रमिले

'नभ मेघांनी आक्रमिले' अशीच परिस्थिती आजही सकाळी होती. मी थोड्याश्या आळसातच सायकलिंगसाठी घराबाहेर पडलो. मात्र सायकलजवळ जाताजाताच आळस पळून गेला होता.

पाऊस मात्र सुरु नव्हता. उशिरा निघाल्यामुळे आज नेवाळी फाट्यापर्यंत न जाता बदलापूर पाइपलाईन रोडला लागताच १-२ किमी जाऊनच परत वळलो.

#dombivlicyclingclub चे रोज राइडला जाणारे @riteshsavala, @गंधारडोम्बिवलीकर, @arnavkulkarni आणि इतर सदस्य राईड संपवून बहुदा लवकर परत फिरले होते. त्यामुळे जरी आज कोणाशीच संपर्क झाला नाही, तरी नेहमीप्रमाणेच स्वतःशी संवाद साधण्याची संधी सायकलिंग करताना आजही मिळालीच.

घराबाहेर पडताना वरुण राजाने दाखवलेला रागरंग घरी परत निघालो तेव्हाही तसाच होता. सूर्यदर्शनाचा पत्ता नव्हताच, पण आषाढधारांचाही पत्ता नव्हता.

मी मात्र पाऊस येईल या अंदाजाने आजही रेनकोट घालूनच सायकलिंग करत होतो.
घरी परत येईपर्यंत पाऊस काही आला नाही, पण तरीही रेनकोट घालून मी चिंब भिजलो होतो....पर्जन्यधारांनी नाही तरी घामाच्या धारांनी.

#cyclingzens #cycle2work #ismartcommute #tjsbbank #saveoursahyadri

राष्ट्रीय कॅलेंडर

सौर आषाढ महिन्याची आज ७ तारीख. डोंबिवली सायकल क्लब (#dombivlicyclingclub ) च्या 'आषाढ चॅलेंज' (#ashadhchallange) चा ही अर्थातच ७ वा दिवस.
आजही आषाढ चांगलाच प्रसन्न होता. आषाढ सरींनी छान जोर धरला होता. अश्या वेळी सायकलिंग करण्याचा आनंद खरोखरच अवर्णनीय! नेहमीप्रमाणे आजही नेवाळी फाट्याला जायचे ठरवले आणि सायकल दामटवायला सुरुवात केली. सुरुवातीलाच देवी चौक आणि नंतर चार रास्ता येथे ट्रॅफिक जॅम झाला होता. पुन्हा एकदा इतर सर्व वाहने अडकली असताना,  माझ्या 'श्विन'ने (shwinn) सहजगत्या मार्ग काढला.
भजनकीर्तनात जसे तल्लीन होता येते, तशीच अवस्था सायकलिंग करतानाही अनुभवायला येते. नेहमीप्रमाणेच मी स्वतःशी संवाद साधत होतो. पाइपलाइन रोडला वळल्यावर थोड्याच वेळात @gandhar दिसला. सायकल थोडी पुढे नेऊन मी परत वळलो.  गंधार पुन्हा भेटेल असे वाटत होते आणि तसेच झाले.
गंधारबरोबर Arnav Kulkarni होताच. त्यांच्याशी गप्पा मस्तच रंगल्या. अर्णवने भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरबद्दल विचारले आणि मग त्याला थोडक्यात माहिती दिली.
भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर वर्ष हे सुद्धा ख्रिस्ती वर्षाप्रमाणेच सौर वर्ष आहे, त्यामुळे हे वर्षही ३६५ वर्षांचे आहे. यातही लिपवर्ष असते. सूर्य उत्तर गोलार्धात शिरतो त्या दिवशी भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यानंतर १८५ दिवस सूर्य उत्तर गोलार्धात असतो म्हणून चैत्र या पहिल्या महिन्यात ३० तर वैशाख हा दुसरा महिना ते भाद्रपद हा सहावा महिना या सलग महिन्यात प्रत्येकी ३१ दिवस असतात. तर सूर्य दक्षिण गोलार्धात १८० दिवस असतात तेव्हा शेवटचे ६ महिने असल्याने या शेवटच्या सलग ६ महिन्यात प्रत्येकी ३० दिवस असतात. लीप वर्षात चैत्र या १ लय महिन्यात ३१ दिवस असतात. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय वर्ष हे पूर्णपणे शास्त्रीय (scientific), निधर्मी (secular), आणि अत्यंत सोपे असे कॅलेंडर वर्ष आहे. हे राष्ट्रीय कॅलेंडर वर्ष असल्याने हे कॅलेंडर सर्व व्यावसायिक आणि शासकीय कामकाजात वापरणे याला भारतीय घटनेअंतर्गत (constitution) मान्यता आहेच. किंबहुना रिझर्व्ह बँक आणि सर्व शासकीय कार्यालयात भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर प्रमाणे तारीख लिहिली जाते.
#cyclingzens #ismartcommute #tjsbbank #cycle2work

Rain rain come again

"Ye re Ye re Pavasa" (Rain Rain come again)

#ashadhchallange day 5 (Indian national date: Saur Ashadh 5, Shake 1939)
#Ramzan id #Hindu tithi Ashadh shukl tritiya (3), Shake 1939

Since it was public holiday on account of #RAMZAN ID it was nice opportunity for #dombivlicyclingclub (DCC) members to have back to back group ride.
Sanjay Datye had proposed to ride to temple near Ambernath. But unfortunately he couldn't join by morning since having fever. So we changed our minds. Ritesh Savla & Vinay Kondalkar met me at Vico naka & we decided to ride to K2Cycles, Badalpur. But unfortunately Ritesh's cycle had problem. So we were 2 down even before starting our ride.
Jayshree Pandit met us at Samant petrol pump as decided. Unexpectedly Chetan Patkar & Vishwanath Iyer also joined us. Ronak Soochik passed us as he had planned Palva & return.

It was fantastic atmosphere. The rain was there but not bothering much. It was really fantastic ride when we have #rainy season, #greenery by road. The sky was covered by clouds all the way. It was really fantastic view to watch #malang gad hillrange surrounded by clouds. I had covered myself with raincoat to protect from mud. Though we had mudguards, those are not sufficient. So evenif its not raining, you have to wear raincoat to protect from mud.
On the way, we passed by Nevali phata. Due to the public violence few days back, there were so many police vans gathered at Nevali phata today also. The signs of burned road are still there. On the way we also noticed police van burned by mob that day.
We proceed to Badlapur. K2 was hardly 20-30 meters away & Vinay's cycle tyre got burst. Big nail was there. Probably his cycle had learned from our discussion what was our destination.
So now it was 3rd wicket. He decided to return by rail. We had vadapav & Mamta joined us.
With deletion & addition still we were 5 DCC members together.

नक्षी ....पावसाळी भेट

आषाढ महिन्याची आज ३ तारीख.
अर्थात 'आषाढ चॅलेंज' या डोंबिवली सायकलिंग क्लब च्या उपक्रमाचा ३ रा दिवस.

उन्हाळ्यातील 'बिट द हीट' या २१ दिवसांच्या उपक्रमाप्रमाणेच पावसातील 'आषाढ चॅलेंज'  (#Ashadhchallange) या ३१ दिवसांच्या उपक्रमातही Arnav Kulkarni आणि गन्धार डोम्बिवलीकर या दोघांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

सौर आषाढ १ ला हा उपक्रम सुरु झाला मात्र त्या दिवशी #डोंबिवलीतेठाणे (#Dombivli to #Thane) या #cycle2work प्रवासात पावसाने हुलकावणी दिली. त्याच दिवशी परतीची राइडलाही वरूणराजाने साथ दिली नाही.

आज सुट्टी असल्याने डोंबिवली शिळ डोंबिवली अशी राईड करायची ठरवली. Ritesh Savla आणि इतर सर्वजण लवकर जाणार होते, मी मात्र उशिराने निघालो. रस्ते पावसाने चिंब झाले होते. वाटेत पावसाचे शिंतोडे उडायला सुरुवात झाली होती.
परवाचा अनुभव असल्याने रेनकोट घेतला नव्हता. पावसात भिजत राईड करायचे ठरवले आणि पाऊस अंगावर घेत कल्याण शिळ रस्त्याला लागलो. एव्हाना थोडाफार भिजलो होतोच. पाऊस अजून येईल याची वाट पाहत शिळ कडे सायकल दामटवली.
गंधारने आजच हिंदू धर्माचा ४ था महिना आषाढ (ज्याच्या नावावरून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरच्या महिन्याचे नाव ठरवले गेले) सुरु झाल्याचे कळवले होते.
जरी सकाळी ८ नंतर प्रतिपदा असली तरी सुर्योदयावेळी अमावस्या असल्याने आजची तिथी अमावस्याच असल्याने हिंदू धर्मानुसार आषाढ खरेतर उद्या सुरु होईल.
उद्या सूर्योदया आधीच प्रतिपदा संपून सूर्योदयाच्या वेळी द्वितीया असल्याने उद्या ची तिथी द्वितीया असेल आणि प्रतिपदचा क्षय असेल(म्हणजे कोणत्याही दिवशी आषाढ प्रतिपदा असणार नाही).

असो. चांद्र आषाढ महिन्याचे स्वागत पाऊस जोरदार करेल असे वाटत होते. शिळ रस्त्यावर जागोजागी दुचाकींना चाकावर लावण्यासाठी कव्हर उपलब्ध होती. पाऊस जेमतेम असला तरी बरेचजण तेथे कव्हर लावून घेत होते.

शिळ फाटा येथे पोचून मी परत फिरलो. पण वरुण राजा काही प्रसन्न होत नव्हता. मात्र अरुणही त्रास देत नव्हता हीच समाधानाची बाब.

पाऊस पडेल याची वाट पाहत मी मानपाडा रस्त्या ऐवजी मी थोडा लांबून पेंढारकर कॉलेज कडून सायकल आणली. मात्र वरुण काही प्रसन्न झाला नाही.

मनसोक्त भिजायला न मिळाल्याने नाखुषीने घरी पोचलो आणि ....

पाहतो तर काय... वरुण राजाने भिजू दिले नाही तरी माझ्या कपड्यांवर फर्मास नक्षी काढून दिली होती.

Back on Wheels

Sometimes its better to have break when you are facing problems consistently.

But after the break, you should start afresh at right time.

I had taken a gap of almost 2 weeks after facing consistent punctures & was looking for right opportunity to start again.

#dombivlicyclingclub (DCC) members are so charged now that they always give you such opportunities.

Yesterday, there was an exciting call by DCC for today's morning ride. It was good rain also. So there was fantastic opportunity for first rainy ride of this year. But unexpectedly Bangladesh fightback yesterday night to defeat NZ, which keeps me awake late night. So I couldn't get up early & missed d ride.

Oh! Did I missed d opportunity to start cycling again?

But I was lucky. Neelesh Chinchankar asked me for afternoon ride. We had not meet for long period. So I was also eager to ride with him. So my cycling plan gets revived. Vinit Shetye & Rudhir Moghe also missed morning ride. So they were also ready to join.

As decided I met Vinit at @charrasta. Neelesh called us to join at @gaondevi mandir manpada road.

Charrasta was packed, but our cycles escaped as usual. Though it was afternoon, there was heavy traffic on Manpada road. Its high time for Dombivlikars to quit two wheelers & four wheelers and use cycles.
Actually Dombivlikars should be serious for PUC (Please Use Cycle).

It was fantastic atmosphere at Badlapur pipeline road. Meanwhile Rudheer called me & informed to meet at Taloja phata.

So we continued our ride to Nevali phata.  Neelesh asked for tea at Nevali phata. Though it was not raining, the atmosphere was fantastic. So @tea was the right choice there.

But we decided to ve tea at Taloja phata while returning & wait for Rudheer there.

We were about to enter Hotel Nisarg, but I noticed a tea stall. I always like to have tea at Tea stall rather than Hotel. So we turned there.
As expected the tea was awesome. As we met Rudheer, we decided to return back. Meanwhile we decided to visit Vijaykumar Sakhare (Sakharekaka). But since he was not available, we returned back to home to conclude much important ride for me.

Welcome monsoon

'Jeshth' is really fantastic month. Its the month which relieves you from hot summer days & welcomes monsoon. Secondly its the month which have longest days. Solar month Jeshth has last day when Sun reaches top of Northern hemisphere. So till Jeshth ends you ve daylight for longer period.

Obviously its nice month to have cycling plans with friends. By d way, since Ritesh Savla had joined #dombivlicyclingclub, cycling plans are there all d 365 days.

We decided to ve #Titwala #Ganeshmandir ride today. As decided Chetan Patkar was there at #Dombivli #Ganeshmandirsansthan by sharp 6 am. I reached within next 10 minutes.
We had planned to ride via Thakurli 90 ft road. But Since there was new schoolboy who didnt know DCC's initial Sunday route to Milapnagar Ganeshmandir, we decided to guide him there. So we changed our route & joined other DCC members at Milapnagar.
It resulted as good decision as few more  DCCians joined us there for Titwala ride. Sarang Muley, Bhimashankar Birajdar, Nayana Agharkar also joined us.

It was already 7 am when we started from Milapnagar Ganeshmandir. Considering the group size, I guessed we can reach Titwala Ganeshmandir within 75 minutes. One of DCCian, who was not interested to join us, suspected & strongly urgued we can't reach within 75 minutes. But I was very much sure.

Sarang & Birajdar had single speed double cycle as usual. We started comfortably. Chetan was ahead of us & didn't look back for us after Kalyan. There are two routes since Shahad. Since Chetan didn't wait there, we were confused which route he took.

We 4 continued via Vitthalmandir. The route is beautiful. Many of other cyclists crossed us from opposite direction. It always encourages when you meet such cyclists. I raised thumb fingre at each of them & they also reciprocated in same way. Thats the great feeling.

There were few climbs on the road. Since Sarang & Birajdar had single speed cycle, they were little bit slow. Myself & Nayanamadam also slowed down for them few times.

But still we reached Titwala Ganeshmandir exactly within 75 minutes as I guessed earlier.

I had planned return immediately with just 'Kalas darshan'. But nobody was in hurry to return. So we decided to enter temple. We were about to enter the temple, when Chetan called us. He had reached within 60 minutes well before time expected.

After Ganeshdarshan, we had misal. As usual it was fantastic.

We took other route which goes parallel to Titwala Ambivli rail track while returning. Though there was no rain, there were clouds. So sun didn't bother us. But Neera was must. Chetan had again left us behind. But myself, Sarang & Birajdar had Neera. Further we took Birla college road to avoid Kalyan station traffic. Chetan met us again after patri pul. So as we 5 started together, we were also together to conclude our ride today.

मलंगबाबाची वाडी

मी शाळेत असताना निसर्ग भ्रमंती साठी लांब जाण्याची गरज नव्हती. डोंबिवली मध्येच निसर्गाचे अनेक रंग अनुभवायला मिळत होते.

पण गेली २-३ दशकात सिमेंटची जंगले निर्माण होताना डोंबिवलीतील आंबा, चिक्कू, जांभळे, सीताफळ, चिंच, बोर, वड, पिंपळ, साग याबरोबर अनेक वनस्पती नष्ट झाल्याने आता आपल्याला तोच निसर्ग शोधायला पैसे मोजून लांब जावे लागते.

पण सायकलिंग च्या छंदामुळे मला हा निसर्ग डोंबिवली जवळ पुन्हा भेटू लागला आहे.

याअगोदर सुद्धा सायकलने मलंगगडाची वारी झाली आहे. मात्र आज नेवाळी फाट्यावरून सरळ मलंगगडाकडे न जाता नेवाळी गावापुढे करवले गावाकडे वळलो.
डोंबिवली तील जुने दिवस पुन्हा आठवले.
डाव्या बाजूला मलंगगड ठेवून सायकलिंग सुरु होते. तेवढ्यात डावीकडे नजर गेली ती सायकलला समांतर उडणाऱ्या सुंदर खंड्या पक्षाकडे. उडताना त्याचे रंगीत पंख छानच दिसत होते. चोचीत दीड वित लांबीच्या सापाला पकडून तो आपल्याच नादात उडत होता. प्रथमच चांगला कॅमेरा बरोबर न ठेवल्याचे दुःख झाले.
पुढे गेल्यावर पुन्हा लांबवर एक खंड्या दिसला. पण तो खूप लांब होता.
अरुंद पण खड्डेविरहित मार्गावरून सायकलिंग करण्याची मजा काही औरच.
पुढे शनिदेवाचे मंदिर दिसले. अनेक भक्त ओलिते कपडे घालून शनिदेवाचे दर्शन घेत होते. मंदिर छोटेसे पण स्वच्छ आणि सुंदर होते.
वाटेत आमचे लक्ष गेले पोसरी गावातील कृषिपर्यटन केंद्राकडे. आमचा सायकलिस्ट मित्र अमित तेथे राहिला होता. अमितने आम्हाला आत नेले.
तेथील कर्मचारी नरेश लाकडे तोडत होता. आम्ही आल्याचे कळताच त्याने आम्हाला अतिशय उत्साहाने सर्व परिसर दाखवला. आम्बराई मध्ये आंबे मात्र नव्हते. समोरच एक म्हशींचा गोठा होता. म्हशींची किंमत प्रत्येकी फक्त एक लाख.
आम्ही ज्या मलंगगडाकडे निघालो होतो तो अजून लांबवरच दिसत होता.
पोसरी, करवले वरून पुढे मलंगबाबाची वाडी ला पोचलो. मलंगगडाच्या पायथ्याशी चहा घेऊन आणि फोटो काढून आम्ही परत निघालो.

रंग सायकलचे

असे म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बहुतेक पूढे सायकलिस्ट होणारे सर्वजण पाळण्यात एकाच लयीत पाय हलवत असावेत.

असो! मला आठवणारे माझे पहिले खेळणे म्हणणे तीन चाकी सायकल. तिने माझ्या बालपणीच्या जीवनात रंग भरले. मी जवळपास १० वर्षांचा होईपर्यंत ती सायकल चालवली.

नंतर माझा एक मित्र बनेश फेणे त्याच्यामुळे मला सायकलिंग आवडू लागले. बनेशचे घर फुरसुंगीला तर शाळा पुण्याला. त्याच्या सायकलिंगमुळे त्याला फास्टर फेणे म्हणतात. तो गेली ५०-६० वर्ष १५ वर्षांचाच आहे. (बनेश म्हणजे भा रा भागवतांचा फास्टर फेणे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल). तर ह्या बनेशच्या सायकलिंगमुळे माझ्या जीवनात वाचनाचे रंग भरले गेले.

१५ व्या वर्षी मला दोन चाकी सायकल येऊ लागली. नंतर १६व्या वर्षी मला घेतलेल्या सायकल ने माझे विश्वच व्यापून टाकले. ती माझी पहिली प्रेयसी.

माझ्या ह्या हिरो ब्लॅक सायकलने माझे जीवन रंगबेरंगी केले. कोणाची साथ असो वा नसो ती माझ्याबरोबर येण्यास नेहमीच तयार.
२० वर्ष ह्या सायकलने मला निसर्गातील हिरवा रंग अधिक जवळून दाखवला. शीळ फाट्या पुढील चढावर करवंदाच्या जाळीतील हिरवी करवंदे खायला मला हीरो ने नेहमीच साथ दिली. गणेशपुरीची गरम पाण्याची कुंड , कर्नाळा अभयारण्यातील निसर्गमेवा आणि पशु पक्षी यांची गट्टी हिरो मूळेच जमली.

२००९ मध्ये घेतलेल्या पहिल्या गियर सायकल -फोमास मुळे मध्य प्रदेश, झांसी, उत्तर प्रदेश येथील समाज जीवनातील विविध रंग अनुभवता आले. फोमास सायकल ४ जानेवारी २०१२ ला चोरीला गेल्यावर भारतातील गरिबी किती तीव्र आहे ह्याचा काळा रंगही दिसला.

मग तेव्हापासून आजपर्यंत मला श्विन साथ देत आहे.
सायकलिंग मुळे मिळालेल्या अनुभवांमुळे अनेक रंग लाभले.

DCC मुळे मिळालेले मैत्री चे रंग, SOS मुळे मिळालेले निसर्गप्रेम, सहकार्य यांचे रंग, cycle2work मुळे चिकाटी, सातत्य यांचे रंग, लांब पल्ल्याच्या सायकलिंग फेरीतील समांजस्याचे रंग असे अश्या अनेक रंगाची उधळण सायकलने सुरूच ठेवली आहे.

एक puncture दिवस

भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर फाल्गुन १५, शके १९३८ (ख्रिस्ती दिनांक ५ मार्च २०१७

मुंबईतील सर्व सायकलिस्ट एकत्र यावेत ही संकल्पनाच खूप भन्नाट आहे.

सायकल कट्टाच्या निमित्ताने आज अनेक जुने नवे सायकल मित्र पुन्हा भेटले.

डोंबिवली प्राईड रन साठी जवळपास २० सायकलिस्ट चा ताफा तयार ठेवूनही सायकल कट्टयासाठी जायला इतर सायकलिस्ट होते. डोंबिवली सायकल क्लबची ही ताकद डॉ. पुणतांबेकर यांच्या सातत्यामुळे आहे.

खरेतर मी आज सायकल घेऊन घराबाहेर पडणार तोच संजय दाते यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांची सायकल puncture असल्याने ते आज सायकलने न येता रेल्वेने येणार आहेत.

सायकलिंग सुरु करण्या आधीच puncture. पण DCC ची ताकद येथेही कामी आली.
मी त्यांना विचारले की दुसरी सायकल मिळाली तर तुम्ही सायकलने याल का? त्यांचा होकार समजताच लगेच ममताला तिची सायकल द्यायला सांगितले. ममता नाही तर तिची सायकल तरी कट्ट्याला जाऊ शकणार होती.

मग ती सायकल घेऊन आमची सायकल कट्टयाकडे दौड सुरु झाली. दरम्यान मिलापनगर येथे महाजनकाका भेटले. ते कट्टयापर्यंत येणार नव्हते म्हणून लगेचच परत गेले. पुढे ठरल्याप्रमाणे वाटेत सामंत पेट्रोल पंपपाशी दुर्गेश आणि त्याचा मुलगा भेटले.
बऱ्याच दिवसांनी शीळ फाट्यापुढचा चढ चढायची संधी मिळाली. त्यानंतर महापेपर्यंत पोचताच दातेंनी घेतलेली ममताची सायकल puncture झाली.

दुर्गेश असल्यामुळे puncture चे काम लवकर होऊ शकले.
पुढे कोपरखैरणे, वाशी मार्गे पुढे खाडीवरील पूल ओलांडताना खूप छान अनुभव आला.

जवळपास ३०-३५ किमी सायकलिंग केल्यामुळे सायकलला नाहीतरी आम्हाला इंधनाची गरज होती. मानखुर्द स्टेशनसमोर इडली वाड्यावर ताव मारून सायकल कट्ट्याला पोचलो.

तेथे सर्व मित्र मैत्रिणींना भेटून आणि कट्याची मजा अनुभवून परत निघालो तेव्हा १.३० वाजून गेले होते.
हॉटेलसमोरील रांग बघून सायन ला जेवण करण्याचा बेत रद्द केला.

वाटेत हॉटेल शोधता शोधता पुन्हा वाशी खाडीवरील पूल आला. अखेरीस वाशीला जेवण करून पुढे निघालो. सकाळची थंड हवा आता नव्हती आणि जेवण झाले होते त्यामुळे शीळ फाट्याचा चढ न चढता वळसा घेऊन शिळ फाट्याला पोचलो.
मग अर्थातच कोकणरत्न येथे चहा आणि विश्रांती घेऊन डोंबिवली ला पोचलो.
ममताची सायकल परत देऊन दातेना मी पूर्व पश्चिम पुलाजवळ निरोप दिला आणि दिवसाचा शेवटही नाट्यमय झाला.
त्यांना निरोप देऊन काही सेकंदातच माझी सायकल puncture झाली.

Puncture ने सुरुवात झालेली ही सायकलयात्रा अखेरीस puncture नेच संपली.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...