सोमवार, २९ जानेवारी, २०१८

पालीचे वारकरी

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एका बाजूला इतिहास प्रसिद्ध सरसगड तर दुसऱ्या बाजूला वाहणारी अंबा नदी अश्या निसर्गरम्य सान्निध्यात  एक गाव वसले आहे- ‘पाली.’  
पाली येथील बल्लाळ नावाच्या गणेशभक्त बालकाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या बालकाने पुजलेल्या शिळेत कायम वास्तव्य करून राहिलाय तो ‘पालीचा बल्लाळेश्वर’. भक्ताच्या नावाने प्रसिद्धी पावलेला अष्टविनायकातील हा एकमेव गजानन.
असं म्हणतात, की पेशवेकाळात या देवस्थानाला कौल लावून न्यायनिवाडे होत. ‘सिंधुदेशेऽतिविख्याता पल्लीनामाऽभुवत्पुरी’ असा उल्लेख आलेला आहे. यातील पल्ली म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर विनायक.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव येथे साजरे होतात.माघी उत्सवाची यात्रा फार मोठी असते. सुमारे १५ ते २० हजार लोक यात्रेला येतात. माघी उत्सवात शुद्ध पंचमीला लळीत करण्याची फार जुनी प्रथा आहे. तृतियेला देवाची पालखी निघते. पालखीत नारळ व मूर्ती ठेवतात. पालखी पाली गावात घरोघरी जाते. लोक देवाची पूजा करतात.माघी चतुर्थीला श्रीगजानन मध्यरात्री येथे भोजनास येतात अशी श्रद्धा असल्याने त्यावेळी भाविकांची फार गर्दी होते. 
माघी चतुर्थीला पाली येथे  नित्यनियमाने येणारे हजारो भाविक आहेत. त्यात कल्याणचे विलास (गजानन) वैद्य, शेखर वैद्य हे बंधू या भाविकांमधील विशेषच. गेली ३३ वर्षे माघी चतुर्थीनिमित्त हे दोघे कल्याणहून १२५ किमी अंतरावरील पाली हे गाव सायकलने गाठतात. ह्यात त्यांना त्यांचा आत्तेभाऊ कुमार वेलणकर याचीही साथ ठरलेलीच.
गेल्या ४ वर्षांपासून डोंबिवली सायकल क्लबचे सदस्यही विलास बरोबर पालीच्या वारीत सहभागी होत आहेत. मार्गशीर्ष महिन्यापासूनच सर्वांना पालीला जायचे वेध लागतात. या वर्षी माघी चतुर्थी होती सौर माघ १ शके १९३९ या तारखेला म्हणजेच ख्रिस्ती तारीख २१ जानेवारी २०१८ रोजी.  मात्र दिनांक ८ माघ शके १९३९ (ख्रिस्ती दिनांक २८ जानेवारी २०१८) रोजी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या 'पहिल्या सायकल मित्र संमेलन'ची तयारी सुरु असल्याने डोंबिवली सायकल क्लबचे किती सभासद येतील याविषयी साशंकता होती. अखेरीस एकूण १० जणांचा वारकरी संप्रदाय माघी चतुर्थीनिमित्त तयार झाला. 
पहाटे ६ वाजता डोंबिवली येथून निघणारे सारंग मुळ्ये, योगेश चौघुले, प्रितेश चौघुले आणि मी चार रास्ता येथे एकत्र जमलो. आम्हाला शिळ फाटापर्यंत साथ देण्यासाठी भीमाशंकर बिराजदारही तेथे आले होते, फोटोसेशन करून आम्ही मार्गस्थ झालो. सामंत पेट्रोल पंप येथे कल्याणहून येणारे वारकरी भेटणार होते. आम्ही तेथे पोहोचेपर्यंत कल्याणकर आलेही होते. मग वेळ न दवडता आम्ही शिळ फाटा गाठण्याचे ठरवले. पहाटे ६ वाजता डोंबिवली येथून निघणारे सारंग मुळ्ये, योगेश चौघुले, प्रितेश चौघुले आणि मी चार रास्ता येथे एकत्र जमलो. आम्हाला शिळ फाटापर्यंत साथ देण्यासाठी भीमाशंकर बिराजदारही तेथे आले होते, फोटोसेशन करून आम्ही मार्गस्थ झालो. सामंत पेट्रोल पंप येथे कल्याणहून येणारे वारकरी भेटणार होते. आम्ही तेथे पोहोचेपर्यंत कल्याणकर आलेही होते. ट्रीप्पल सीट सायकलवर दुर्गेश, शेखर आणि बडोद्याहून दरवर्षी पालीसाठी येणारा आमचा मित्र स्वार होते. मग वेळ न दवडता आम्ही शिळ फाटा गाठण्याचे ठरवले. 
सकाळची वेळ असल्याने कल्याण शिळ महामार्गाला रहदारी तुरळक होती. आम्ही सर्वजण एकापाठोपाठ चाललो होतो. सर्वांच्या सायकलींनी वेग पकडला होता. आमच्या लक्षात येईपर्यंत आम्ही शिळ फाटा गाठलाही होता. शिळ फाटा येथे चहापान हे प्रत्येक पाली वारीच्या वेळी ठरलेलेच. सगळ्यांनी चहाचा आस्वाद घेतल्यावर पनवेलच्या दिशेने निघण्यासाठी तयारी सुरु झाली खरी, पण बिराजदारांना परत जावे लागणार होते. पण त्यांना अमच्याबरोबरही अधिक वेळ घालवायचा होता. मग तेथे फोटोसेशन करण्यातही थोडा वेळ आम्ही थांबलो. पुढेमागे करत अखेरीस आम्ही पनवेलच्या दिशेने कूच केले आणि बिराजदारांना मात्र परत फिरण्याशिवाय पर्याय उरला नाही.
आम्ही पुढे सरकत असताना रविमहाराजही साथ करत होते. तळोजा फाटा सोडून पुढच्या चौकात पोचल्यावर मात्र आम्ही सेवा रस्ता पकडला. मी आणि योगेश चोघुले एकापाठोपाठ होतो. बाकी सगळेजण थोडे पुढेमागे झाले होते. कळंबोली सर्कलला मात्र पुन्हा सर्वजण एकत्र आले. पनवेल जवळ येत असताना रस्त्यावरील गर्दी वाढत होती. सारंगच्या सायकलला भगवा ध्वज लावलेला होता. पनवेल S T स्टँड जवळ एके ठिकाणी एका दुचाकीला भगवा ध्वज लावलेला मला दिसला. मात्र त्या दुचाकीभोवती काहीजण घोळका करून उभे होते. मग मी ध्वज लावलेले वाहन आणि वाहनस्वार बघण्यासाठी थांबलो. मी वारंवार पाहूनही अंदाज येईना. त्या वाहनाभोवती ओळखीचे चेहरे दिसेना. मग मात्र ध्वज लावलेले वाहन म्हणजे सारंगची सायकल नसल्याची खात्री करत मी पुढे निघालो. ह्या वेळात बाकी सगळे पुढे निघून गेले होते. मात्र लगेचच मी त्यांना गाठले. पळस्पे फाटा येताच आम्ही पुढील थांबा घेतला. येथे नाश्ता आणि चहा हेही पालियात्रेत नेहमीच ठरलेले. 
गप्पागोष्टी, फोटोसेशन करत सगळेजण पुन्हा ताजेतवाने झाले. आता कर्नाळा येथील छोटा घाट लागणार होता. सर्व सायकली घाट पार करायला सज्ज होत्या.
आमच्या पाठोपाठ कुमार त्याच्या धूर सोडणाऱ्या दुचाकीवरून येत होता. सायकलस्वारांबरोबर त्यांना साथ देत अश्वशक्तीधारी दुचाकीवरून येणे वाटते तेवढे सोपे नाही. खरे तर सगळ्या सायकलींना आळीपाळीने साथ देत आमच्यापेक्षा कुमारचीच खरी परीक्षा होती.
कर्नाळ्याच्या दिशेने कूच करताना ध्वज लावलेल्या सारंगच्या सायकलपाठोपाठ श्विन जात होती. सारंग, त्याची ३२ वर्षीय सायकल आणि सायकलवर ध्वज यांचे आणि या सगळ्याच्या सावलीचे मनसोक्त फोटो काढत मीही जात होतो. कर्नाळ्याचा घाट सुरु होताच सारंग मागे पडला आणि मी पुढे सरकलो. श्विन ३*७ वरून प्रथम ३*६ आणि नंतर ३*५ गियरवर धावू लागली. थोडा अधिक चढ लागताच मी २*५ साठी खटका दाबला मात्र... श्विनची चेन सटकू लागली. मी आणि सारंग सगळ्यात मागे असल्याने कुमार आमच्या बरोबरच होता. मी श्विनला थांबवल्यावर त्याने थोडी खटपट केली. पण श्विन काही मनावर घेईना. पण मी श्विनची नस अन नस ओळखत होतो. मग चेनवर जास्त ताण न येण्यासाठी हळूहळू पेडल मारत मी घाट चढलो. अभयारण्याअगोदराचा उतार सुरु होत असतानाच एका सायकलने जागेवरच ठाण मांडले होते. दुर्गेश त्या सायकलची विचारपूस करत असताना आजूबाजूच्या झाडांवर आणि उंचवट्यांवर तेथिल स्थानिक शेपटीवाले द्विपाद आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. ते मानवाचे पूर्वज असल्याचे आम्हाला माहित असले तरी त्याच नात्याने ते आमच्याशी प्रेमाने वागतील का पूर्वजांना अपेक्षित मानवंदना आम्ही देत नसल्याने आमच्यावर रागावतील याची कल्पना नसल्याने आम्ही जरा सावधपणेच त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. हो, कदाचित आमचे लक्ष नसल्याचे दिसताच ते वाटेतील टोल आमच्या सामनातून वसूल करतील हि भीती होतीच. त्यांच्या मार्कटलीला कॅमेराबद्ध करून आणि सायकल ठीकठाक करत आम्ही पुढे निघालो. 
आम्ही ९ सायकलस्वार एकमेकाना साथ देत जात अभयारण्य मागे टाकल्यावर कर्नाळ्याच्या अंगठ्याचे जवळून दर्शन होऊ लागले. आम्ही काहीजण तेथे फोटो काढत थांबत पुढे सरकत होतो. मी आणि विलास मागे राहिलो. इतक्यात विलासला समोरील रिसॉर्ट मध्ये काम करत असलेल्या त्याच्या मित्राची आठवण झाली. विलासने त्याला बोलावून घेतले आणि माझी ओळख करून दिली.आमचे गप्पाष्टक रंगत होते, मात्र इतर सवंगडी पुढे गेले असल्याने आम्ही त्याचा निरोप घेतला.
आपटे फाट्याला सगळे सवंगडी आमची वाट पाहत होते. तेथे विलासचा शिरढोण येथे राहणारा शिवप्रेमी मित्रही त्याच्या सवंगड्यांसह  आमची वाट पहात होता. एकमेकांची ओळख करून सरबत/ चहा घेऊन दोन्ही गट पुन्हा आपापल्या मार्गाला लागले. आता आम्हाला पेण गाव खुणावत होते. भास्कराचार्यही ऐन भरात आले होते. आम्ही सायकली दामटवत पेण गाठले. येथील जेवणाची सोय नेहमीप्रमाणेच उत्तम होती. जठराग्नी तृप्त झाल्यावर (आणि जेवण अंगावर आल्यावर) पेडल मारणे कठीणच होते. पण पाली गाठण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सगळ्या सायकली हळूहळू निघाल्या. 
आता सत्याग्रह करण्याची पाळी होती योगेशच्या फायरफॉक्सची. त्या निमित्ताने आमची भोजनोत्तर विश्रांतीही झाली. पुढे लगेचच वडखळ येथे चहाच्या निमित्ताने आम्ही थांबलो. जेवणानंतरची रपेट जेवणानंतरच्या व्याख्यानाएवढी कठीण नसली तरी थोडी अवघडच. वडखळनंतर पुन्हा थोड्या वेळात आम्ही चहापान केले.
आता वाकण फाटा येथे एका वडापावच्या दुकानात मला जायचे असल्याने मी सगळ्यात पुढे निघालो आणि तेथे पोचून सगळ्यांना त्या दुकानात वडापाव/ चहाचे निमंत्रण दिले.
आता पाली अवघ्या ८ किमी वर होते. 
सूर्य उतरणीकडे वळला होता. वडापाव, चहा, उसाचा रस याद्वारे जिव्हा तृप्त करून आम्ही निघालो खरे पण निसर्गाची रंगसंगती कॅमेराबद्ध करण्याचा मोह सोडवेना. मनसोक्त फोटोसेशन करून श्विन आणि तिच्या मैत्रिणींनी पाली कडे कूच केले. पाली हाकेच्या अंतरावर राहिले असते सुधागड (की सरसगड?) च्या सान्निध्यात फोटो काढण्याचा मोह मलाच काय श्विनलाही पडला.
पुढे पाली गावात अभूतपूर्व उत्साहात भाविक जमले होते. गर्दीतून वाट काढत आम्ही भक्त निवासपाशी पोचलो. आपापल्या सायकलींना विसावाकक्षात ठेवून आम्ही भक्तनिवासमधील आमच्या कक्षाचा ताबा घेतला. आंघोळ आटपून आणि सामान ठेवून बल्लाळेश्वराचे दर्शन आणि वैभव यांचे अनुभवण्यासाठी आम्ही मंदिरात गेलो तोपर्यंत रात्रीचे ७.३०- ८ झाले होते. भाविकांची गर्दी बल्लाळेश्वराच्या पायाशी नतमस्तक होत होती. दर्शन करून आम्ही निघेपर्यंत घड्याळबाबा १० वाजल्याचे सांगत होते. मंदिराबाहेर येऊन सभोवतालची सजावट पाहणे खरोखरच नेत्रदीपक होते. संपूर्ण मंदिर आणि परिसर लखलखत होता. डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे काय ते समजत होते. तेथील उत्सव, लोकांचा उत्साह, सजावट यांचे वर्णन करणे खरेतर शब्दांच्या पलीकडलेच.
नेहमीप्रमाणेच मंदिराजवळच आमची जेवण्याची व्यवस्था केली होती. तेथे पंगतीला लाभ घेत पोटभर जेवण करून आम्ही पुन्हा भक्तनिवासकडे वळलो. निद्रादेवी लवकर प्रसन्न होईल याची खात्री नसली तरी दुसऱ्या दिवशी लवकर परत निघायचे असल्याने तिची आराधना करणे क्रमप्राप्त होते. बल्लाळेश्वराचे वैभव आणि एकंदर उत्सव वातावरण यांवर निद्रादेवीचा असर मात्र कमी पडत होता.



डोंबिवली सायकल क्लब

नदीचे कोंदण लाभलेली डोंबिवली नगरी वृक्षराजीने समृद्ध होती. आंबा, चिंच, बोरं, चिक्कू, जांभूळ, सीताफळ, नारळ असे अनेक वृक्ष आणि भातशेतीने डोंबिवली सजली होती. २० व्या शतकाच्या अखेरच्या दशकात  नवउच्चमध्यमवर्ग स्थिरावत असताना मात्र डोंबिवली चे रूप बदलत येथील वृक्षराजी आणि भातशेती झपाट्याने नाहीशी होत गेली. केवळ बैलगाडी या वाहनाची ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये धूर ओकणारी वाहने दिसू लागली. मात्र तरीही डोंबिवली कॉलेजच्या प्रांगण सायकलने व्यापलेले होते. धूर ओकणाऱ्या दुचाकी अपवादात्मकच दिसत.
२१ वे शतक उजडताना मात्र धूर ओकणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांनी शहर व्यापून टाकले. शहरातील काही सायकलप्रेमी मात्र निष्ठेने आपापली शहरांतर्गत कामे सायकलनेच करत होती.
दरम्यान नोकरीनिमित्ताने ३ वर्षे पुण्याला असताना तेथील सायकल क्लब बरोबर जोडला गेल्यावर डोंबिवली मध्येही असा क्लब सुरु करण्याचा विचार मनात बळावत होता.
डोंबिवली येथे पुन्हा बदली झाल्यावर ऑर्कुट द्वारे Anand Parvate बरोबर याविषयी चर्चाही झाली. आनंद, Pradip Adur, Vaishal Dharamsey यांनी #dombivlicyclingclub ची स्थापनाही केली. दुर्दैवाने हा गट अल्पायुषी ठरला.
भारतीय राष्ट्रीय कॅलेण्डरचा शके १९३३ मधील फाल्गुन महिना सुरु होता. माझा आत्येभाऊ अजित अभ्यंकर याच फोन आला. त्याने दीपक देशपांडे (डी डी) यांच्या ऑफिसमध्ये एकत्र जमून सायकल क्लब सुरु करत असल्याचा निरोप कळवला. मी उत्सुकतेने डिडींच्या ऑफिसमध्ये पोचलो. तो शनिवारचा दिवस होता. दीपक देशपांडे, त्यांचे चिरंजीव, डॉ सुनील पुणतांबेकर, आनंद, अडुरकाका, देवनारायण, देव गायकवाड, अजित अभ्यंकर आणि मी (शशांक वैद्य) असे ९ जण तेथे जमलो होतो. एकमेकांची ओळख करून घेत आम्ही एकत्रितरित्या दर रविवारी सायकलिंग करण्याचे ठरवले. हि होती डोंबिवली सायकल क्लब (DCC) ची मुहूर्तमेढ!
लगोलग आमचे एकत्र सायकलिंग सुरु झाले. क्लब स्थापन झाला ती तारीख होती भारतीय सौर फाल्गुन १६, शके १९३३ अर्थात ख्रिस्ती दिनांक फेब्रुवारी ५, २०१२.
हिंदूनववर्ष दिन गुढीपाडवा जवळच आला होता. गणेशमंदिरसंस्थान आयोजित नववर्षस्वागतयात्रा हे तर डोंबिवली चे भूषण. DCC ची स्थापना झाल्यावर लगोलग DCC ला स्वागतयात्रेत सामील होण्याचे भाग्य लाभले. स्वागतयात्रेतील अग्रक्रमाने स्थान DCC ला मिळाले. क्लब स्थापन होताच जणू गणरायाचा अशीर्वादच DCC ला लाभला.
दर रविवारी सकाळी एकत्रित रित्या सायकलिंग सुरु झाले. दर आठवड्याला नवनवीन सभासद जोडले जाऊ लागले. दीपक देशपांडे यांच्या करड्या शिस्तीमुळे सर्वजण विशिष्ट लयीत जात असत.
डोंबिवली शहर, जवळपासचा परिसर यांचे अंतरंग आम्हाला खुणावत होते. एकत्रित सायकलिंग करत असताना आमच्याच शहराची नव्याने ओळख होत होती. सिमेंटच्या जंगलाने व्यापलेल्या शहरात आणि जवळपासच्या परिसरात अजून निसर्गाचा किती ठेवा उपलब्ध आहे हे अचंबित करत होते.
गंधार कुलकर्णी आणि इतरांच्या संपर्कातून शाळा कॉलेजमधील किशोरवयीन  डोंबिवलीकरही DCC शी जोडले जाऊ लागले.
डोंबिवली-ठाणे- डोंबिवली असा माझा cycle2work उपक्रम सुरु असताना वाटेत अनेक सायकलपटू भेटत. त्यांना रविवारी DCC च्या सायकलफेरीचे आमंत्रण देणे नित्याचेच!
डॉ. पुणतांबेकर अतिशय निष्ठेने दर रविवारच्या सायकलफेरीला हजर असत. त्यांची नियमितता वाखाणण्यासारखी होतीच. शिवाय त्यांचा जनसंपर्क, मनमिळाऊ स्वभाव यामुळेही DCC ची सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढत राहिली.
सदस्य संख्या वाढली त्याचप्रमाणे DCC सदस्यांची भूकही वाढत होती. मग DCC सदस्यांनी बदलापूर, भिवंडी, नेरळ, टिटवाळा या व इतर प्रदेशांवरही सायकलस्वारी करण्यास सुरुवात केली. 'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना' हा मंत्र जपत DCC सदस्य इतरांना सायकलकडे आकृष्ट करत होते.
१९९० च्या दशकापासून नित्यनियमाने दरवर्षी माघी चतुर्थीनिमित्त कल्याण पाली सायकलयात्रा करणाऱ्या Gajanan Keshav Vaidya याला DCC सदस्य सामील झाले. यंदाची DCC सदस्यांची ४ थी कल्याण/ डोंबिवली -पाली वारी!
दरम्यान DCC मधील सदस्य आपली भूक भागवण्यासाठी इतर क्लबबरोबरही दीर्घकालीन सायकल दौरेही करत होतेच.
अश्या वेळी असे दौरे DCC ने ही आयोजित करायला हवेत असे मनोमन वाटत होते.
मी आणि अय्यरकाका यांनी केलेला अष्टविनायक दौरा हा केवळ DCC सदस्यांनी सहभाग घेतलेला पहिला साप्ताहिक दौरा ठरला. तर DCC सदस्यांपैकी ममता परदेशी ही ५०० किमी हुन अधिक अंतर सोलो सायकलिंग करणारी पहिली सायकलपटू ठरली.
DCC सदस्यांनी केवळ रविवारी सायकलिंग न करता, आठवड्यातील इतर दिवशीही नियमित सायकलिंग करावे या उद्देशाने एक अनोखा उपक्रम सुरु करण्याचे ठरले. या उपक्रमात सलग २१ दिवसात किमान १४ दिवस सायकलिंग करणे अपेक्षित होते. सायकलिंग मधील सातत्य वाढवणे, इतरांना सायकलिंग कडे वळवणे या बरोबरच DCC चा प्रसार करणे हि प्रमुख उद्दिष्ट्ये या उपक्रमाद्वारे साध्य करायची होती. या उपक्रमात २१ जणांनी भाग घेतला. फेसबुक सारख्या प्रसारमाध्यमांचा उपयोग करून उपक्रमातील सहभागी सायकलपटूंनी आपली मोहीम इतरांपर्यंत पोचवणेही अपेक्षित होते. उपक्रम चांगलाच यशस्वी झाला. मुंबई, पुणेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही 'कोणती सायकल घेऊ'असे फोन येऊ लागले. उपक्रमात सहभागी झालेल्या सायकलपटूंना प्रमाणपत्र देण्यास RAAM (Race Across Amerika) चे विजेते डॉ हितेंद्र महाजन हजर राहणे हा सर्व सहभागी सायकलपटूंकरीता आनंदाचा धक्का होता.
केवळ ९ जणांनी स्थापन केलेल्या डोंबिवली सायकल क्लब ने सहाव्या वर्षी चांगलेच बाळसे धरले. सदस्यसंख्या जवळपास २०० पर्यंत पोचली.
डॉ पुणतांबेकर यांनी अनेक वर्षे मनाशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला काळ अनुकूल होता. ते स्वप्न होते -डोंबिवली येथे सायकल मित्र संमेलन आयोजित करण्याचे.
नॅशनल युथ ऑर्गनायझेशन #nationalyouthorganization  चे श्री कमलाकर क्षीरसागर आणि क्रीडाभारतीचे श्री ऋषिकेश यादव यांच्या सहकार्याने डोंबिवली सायकल क्लब DCC) सायकल मित्र संमेलनासाठी सज्ज झाला. Sahir Shaikh च्या #bikeport चा सहभागही महत्वाचाच. त्यानंतर केवळ DCC च नव्हे तर महाराष्ट्रातील इतर अनेक सायकल क्लबमधील सदस्यांनी दिलेल्या प्रतिसादाची फलित म्हणजेच राष्ट्रीय दिनांक सौर फाल्गुन ८, शके १९३९ अर्थात ख्रिस्ती दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी भरणारे 'पहिले सायकल मित्र संमेलन'!

- शशांक वैद्य
#tjsbbank #ismartcommute #saveoursahyadri #zenscycle2work #cycle2work #cyclingzens #cyclekatta #bikeport #kalyancyclist

पहिले सायकलमित्र संमेलन

डोंबिवली ही सांस्कृतिक नागरी. हिंदू नववर्षस्वागतयात्रेची सुरुवातही डोंबिवली नगरीतच झाली. आज दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी डोंबिवलीमध्ये अशीच एक नवी सुरुवात झाली. ते निमित्त होते 'पहिले सायकल मित्र संमेलन'.

सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर नियमित सायकलिंग करणाऱ्यांनाही ही कल्पना नवीन होती. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्थापन झालेल्या डोंबिवली सायकल क्लबचे सदस्य डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी एक स्वप्न पाहिले होते. जसजसे ( #dombivlicyclingclub ) डोंबिवली सायकल क्लबची सदस्य संख्या वाढत गेली तसतसे डॉक्टरांचे स्वप्न दृढ होत गेले. नॅशनल युथ ऑर्गनायझेशनचे श्री कमलाकर क्षिरसागर, क्रीडाभारतीचे श्री ऋषिकेश यादव यांनी हे स्वप्न सत्यात उतरवायला केवळ पाठिंबाच दिला असे नव्हे तर त्यांनी स्वतःलाही हे स्वप्न साकार करण्यासाठी झोकून दिले.

डोंबिवली सायकल क्लब चे सदस्य तहानभूक विसरून काम करू लागले होते. राज्यभरातील सायकलमित्र. सायकल क्लब यांच्याशी संपर्क करून त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जात होते. सायकलमित्र संमेलन हि कल्पनाच नवीन असल्याने काहीजण कुतूहलाने तर काही जण साशंकतेने होकार कळवत होते. डोंबिवली सायकल क्लब प्रमाणेच कल्याण, ठाणे येथील सायकलपटूही संमेलनाच्या तयारीसाठी जातात होते. संमेलनचाच दिवस जवळ येऊ लागताच नॅशनल युथ ऑर्गनायझेशनच्या कार्यालयात लग्नघराप्रमाणे वातावरण वाटू लागले. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

बुलढाणा ते डोंबिवली असा चार दिवसात ५०० किमी चा सायकल प्रवास करून श्री संजय मयूरे, तर सांगली ते डोंबिवली असा प्रवास करून केवळ ८० वर्षांचे श्री गोविंदकाका परांजपे संमेलनाच्या आदल्या दिवशी सकाळी डोबिवली येथे पोचले. चिंचवडहून कलावंतीण दुर्ग ला जाऊन श्री सुनील ननावरे आणि त्यांचे सहकारी तसेच चिंचवडहुन थेट डोंबिवली येथे श्री सुनील पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे संध्याकाळी आगमन झाले.

२८ जानेवारी २०१८ रोजी पहाटे ६.३० वाजता डोंबिवली येथील ५ निरनिराळ्या ठिकाणाहून सायकलयात्रेला सुरुवात झाली. ठाणे येथील केवळ ९१ वय असलेले श्री भाटेकाका, सांगलीचे परांजपेकाका, श्री मयूरे सायकलयात्रेत सामील झाले होते. सर्व सायकलयात्रा टिळक पुतळ्यापाशी एकत्र येऊन पुढे सावित्रीबाई फुले नाट्यगृहापाशी येऊन थांबल्या. तेथे दोन भाग्यवान विजेत्यांना सायकली भेट देण्यात आल्या. त्यानंतर सर्वांनी सायकल मित्र संमेलनासाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रवेश केला.

तेथील कलादालनात Durgesh Zipre श्री दुर्गेश झिपरे याने बनवलेल्या निरनिराळ्या सायकल प्रदर्शनात ठेवल्या होत्या. फोल्डिंग सायकल, हाल्फ सायकल, दोघांनी चालवायची तांडेम सायकल, तिघांनी चालवायची तांडेम सायकल, ९० औशांत जोडलेली सायकल, वेगवेगळे आकार असलेली दोन चाके असलेली सायकल अश्या सायकली तेथे पाहावयास मिळत होत्या. त्याचप्रमाणे Amar Kulkarniश्री अमर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शनही तेथे भरवण्यात आले होते.

सायकल संमेलनासाठी श्री रवींद्र चव्हाण, श्री संजय केळकर, श्री निरंजन डावखरे, शीर राहुल दामले असे राजकीय क्षेत्रातील मान्यवरही संमेलनासाठी आवर्जून उपस्थित होते. श्री भाटेकाका यांनी खुमासदार शैलीत त्याचे सायकलचे अनुभव सांगितले. हृषिकेश यादव यांनी सायकलचा सचित्र इतिहास उपस्थितांना सांगितला. सर्व सायकलपारु, आणि सायकल क्लब याना एक समान व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या सायकल कट्ट्यासंबंधी Prashant Gautam Nanaware श्री प्रशांत ननावरे यांनी माहिती दिली. Rajesh Khandekar राजेश खांडेकर यांनी जगप्रवास करताना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले.
'मुलुंडकी सायकलवाली' Cyc Firoza (FIROZA SURESH) हिने रोजच्या कामकाजातील सायकलचा उपयोग यासंबंधी मार्गदर्शन केले. खेडोपाड्यात शाळा लांब असल्याने शाळाबाह्य मुलींची संख्या वाढत आहे. हे वास्तव लक्षात घेऊन ज्यांच्याकडे सायंकाळी धूळ खात पडून आहेत त्यांनी त्या सायकली देणगीदाखल देण्याचे आवाहन ऍडव्होकेट स्वाती दीक्षित यांनी केले.

मानसिक आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण  करणारे श्री Sachin Gaonkar सचिन गावकर यांनीही मार्गदर्शन केले. दिल्ली ते मुंबई सायकलने प्रवास करणारे अंध तरुण, तसेच ज्ञान प्रबोधिनीमार्फत पुणे ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करणारे ७ वी ते ९ वी तील ५० विद्यार्थी यांनी सर्वाना भारावून टाकले. Pallavi Tope Surve पल्लवी सुर्वे हिने युथ हॉस्टेल ऑफ इंडिया (ययी) तर्फे मुंबई- गोवा, गोवा- कन्याकुमारी, कन्याकुमारी- कोलकाता, कोलकाता- दिल्ली असा आयोजित केलेल्या सायकल सफरींसंबंधी माहित ईडीला तसेच आगामी दिल्ली - मुंबई सायकल सफारी मध्ये सामील होण्याचे सर्वांना निमंत्रण दिले.

प्रेक्षकातील आणखी दोन भाग्यवान निवडून त्यांना सायकल भेट देण्यात आल्या. संपूर्ण वंदे मातरम गीताने 'पहिले सायकलमित्र संमेलन'चा समारोप झाला. श्री निरंजन डावखरे आणि श्री संजय केळकर यांनी पुढील सायकल मित्र संमेलन ठाण्याला आयोजित करण्याचा आग्रह धरला. मात्र चिंचवडहुन आलेले सायकलमित्र यांनी पुढील सायकल मित्र संमेलनही डोंबिवलीतच भरवा असा केलेला आग्रह संमेलनाच्या यशाची पावतीच होती.

#tjsbbank #saveoursahyadri #cyclingzens #ismartcommute #cycle2work #

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

तळेगाव सर

#margshirshchallange

भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९३९
अर्थात ख्रिस्ती दिनांक नोव्हेंबर २५, २०१७
Sunil Gavaskar यांच्या कसोटी सामन्यातील एकूण धावांइतक्या किमी ख्रिस्ती वर्ष २०१७ मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प केल्यावर शतकी खेळी होणेही महत्वाचेच.

बऱ्याच दिवसात शतकी दौड न केल्यामुळे श्विनही कंटाळली होती. तळेगावला एक काम मार्गी लावायचे असल्याने मी ही संधी साधायचे ठरवले. नेमकी श्विनची आरोग्यचाचणीही आधी मोंट्राच्या मोहम्मदने केली होती. त्यात काही त्रुटी होत्या त्या #bikeport मध्ये Sahir Shaikh ने दूर केल्या होत्या. साहिरला भेटण्याचे अनेक वेळा ठरवून आधी जमले नव्हते. पण यावेळी नेमका तोही योग जुळून आला होता. उमद्या मनाच्या साहिरने श्विनला शतकी राइडसाठी सुसज्ज केले होते.

दरम्यान शेवटपर्यंत हो ना करता करता #dombivlicyclingclub चे आणखी ४ सदस्य यायला आज सज्ज झाले होते. सदासर्वदा मदतीला धावून येणारा Sarang Mulay, Yogesh Dhage, Yogesh Choughule आणि त्याचा भाऊ Pritesh Choughule सामील झाल्यामुळे माझाही उत्साह पंचगुणीत झाला होता.

स्वतःला सामील होता येत नसले तरी अश्या राईडला जाणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमेल त्याप्रमाणे सामील होणारे Bhimashankar Birajdar यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांचा उत्साह वाढवत होती.

सकाळी ५.४५ ला #tjsbbank च्या #dombivli पूर्व शाखेसमोर आम्ही ५ जण जमलो आणि निघण्याच्या आधीच बिराजदार मार्गशीर्षातील थंडीत आम्हाला सामील झाले. आमची टूर निघाली तेव्हा सारंगच्या ३२ वर्षीय सायकलवर झळकणारा झेंडा डौलात फडफडत होता. डोंबिवली मागे टाकून मानपाडेश्वर मंदिरासमोरील सामंत पेट्रोल पंप कधी आला हे आम्हाला उत्साहाच्या भरात कळलेही नाही. तेथे न थांबता आम्ही वाटचाल सुरूच ठेवली. दरवर्षीच्या कल्याण पाली सायकलयात्रेत Gajanan Keshav Vaidya (विलास) ने लावलेल्या सवयीप्रमाणे आम्ही शिळ फाट्याला पनवेलच्या दिशेने वळताच चहासाठी पहिला मुक्काम केला. चहापान झाल्यावर बिराजदारांना परत जावे लागणार होते. पुढे यावे न यावे हा विचार करत बिराजदार पेचात पडले. अखेरीस नाराजीनेच त्यांनी परत जायचा निर्णय घेतला.

इतक्यात ममताचा फोन आला. तळेगाव पर्यंत येणे तिलाही जमणार नव्हते, पण थोडा वेळ तरी राइडचा आनंद घेता यावा यासाठी तिची घालमेल सुरु होती. आम्ही पुढे पनवेलकडे जात असल्याचे सांगितले. आम्ही पुढे निघाल्यावर निराश मनाने बिराजदार परत फिरले. आमचे पंचक पनवेलच्या दिशेने जात होते. रस्त्यावर खड्डे फार नसले  तरी अरुंद आणि वर्दळीचा होता. आम्ही एकामागोमाग जात होतो. नावडे फाट्यापुढे रस्ता खराब असल्यामुळे आम्ही सेवा रस्त्याने जायचा निर्णय घेतला. कळंंबोली नाक्याला आम्ही पुन्हा मुख्य मार्ग पकडला आणि पनवेलला पोचलो. तिथे नाश्त्यासाठी थांबा घेतला. आमचा नाश्ता होईपर्यंत ममताही पोचली. बिराजदारांप्रमाणेच तिलाही पुढे येण्याची इच्छा असली तरी परत फिरण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.

पनवेल सोडल्यावर रस्ताही रुंद आणि छान असल्यामुळे सर्व सायकली सुसाट दौडू लागल्या. सर्व सायकलींनी सूर पकडला होता. श्विन थांबायला तयार नव्हती. कधी दोघे तर कधी तिघे तर कधी सर्व पाचजण एकत्र अशी आमची राइड सुरु होती. मध्येमध्ये छोटे थांबे घेत आम्ही जात होतो. खोपोली येताच आम्ही नाश्त्यासाठी पुन्हा थांबलो. नष्टयावर ताव मारून झाल्यावर मात्र खरी कसोटी सुरु होणार होती.

नाश्ता करून निघाल्यावर लगेचच चढ सुरु झाला. पहिल्याच चढावर सर्वांचा दम निघू लागला. सारंग आणि योगेश ढगे दोघांकडेही बिना गियरची सायकल असल्याने ते दोघे चालतच घाट चढणार होते. योगेश चौगुले, प्रितेश आणि मी पुढे निघालो. #saveoursahyadri मोहिमेमध्ये Sumit Patil यांच्या मार्गदर्शनामुळे घाट चढण्याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले होतेच. त्यामुळे श्विन आत्मविश्वासाने घाट चढत होती. टाटा सायमाळ येथील चहाची टपरी, शिंग्रोबा मंदिर आणि (कोरडा पडलेला) धबधबा येथे थांबण्याचे ठरवले होतेच. त्याप्रमाणेच थांबे आम्ही शिंग्रोबा मंदिराशी थांबलो. तिथे फोटोसेशन आणि विश्रांती घेऊन निघेपर्यंत झेंडाधारी ३२ वर्षीय घोडा सायकलसह सारंगचे आगमन झाले. मला तळेगावला लवकर पोचुन काही कामे उरकायची असल्याने सारंग येताच मी पुढे निघालो.

प्रितेश माझ्या मागोमाग आलाच. (कोरडा पडलेल्या) धबधब्यापाशी गेल्यावर प्रितेश थोडा मागे पडला. पण तळेगावला ठरलेल्या वेळेत पोचायचे असल्याने मला थांबणे शक्य नव्हते. काम, काळ, वेग ह्या शाळेतील गणिताने माझ्या मनात आजही घर केले होते. श्विन संथ गतीने पण न थांबता पुढे जात होती. पाहता पाहता मी खंडाळा गाठले. तेथे मारुतीरायाच्या देवळात त्यांना नमस्कार करून मी पुन्हा पुढे निघालो. लोणावळा जवळ आल्यावर निराचा आस्वाद घेतला आणि पुढे अन्नपूर्णा हॉटेलपाशी पोचून इतरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क न झाल्याने त्यांना मी पुढे जात असल्याचे कळवून मी प्रवास सुरु ठेवला.

घाट चढून झाल्यामुळे श्विन पुन्हा १*२, २*२, २*३ अश्या गियर ऐवजी ३*७ गियर वर स्थिरावली होती. अर्थातच श्विनने वेग पकडला होता. माझे लक्ष तळेगावकडे लागले होते. त्यामुळे श्विन आणि माझी लय चांगलीच साधली होती. खोपोली घाट चढल्यावर कामशेतचा चढ तर जाणवलाही नाही. श्विनचा सूर चांगलाच लागला होता. पण सारंगने टोनी दा धाबासमोरील चहा, वडा, लस्सीचे अप्रतिम वर्णन केल्यामुळे तिथे चहासाठी थांबलो.

तिथे फक्कड चहा घेत इतर चौघांना संपर्क साधला तेव्हा समजले योगेश चौगुलेच्या सायकलने अचानक असहकार पुकारल्याने ते चौघेही लोणावळ्यात अडकले होते.

वेळेचा अंदाज घेत मी पुढे जात असल्याचे सांगून श्विनची चाल पुन्हा सुरु झाली. वडगाव गेल्यावर एक १५-१७ वर्षाचा मुलगा माझ्या जोडीला आला. त्याला लगेच वळायचे होते पण त्या थोड्या वेळात त्याच्या सायकलबद्दल बऱ्याच गप्पा मारायची त्याची इच्छा होती. त्याची अखंड बडबड सुरु होती. पण एकदाही स्वतःबद्दल न बोलता त्याच्या सायकलबद्दलच बोलत होता. सायकलबद्दलचे त्याचे प्रेम सहजपणे समजत होते. तसेही सर्वच सायकलिस्ट त्यांच्या सायकलबद्दल हळवे असतातच. तो वळल्यावर मी पुढे तळेगावकडे निघालो. तळेगाव चाकण रस्त्याला लागल्यावर भाग्यश्री हॉटेलमध्ये मटकी भेळ खाल्ल्याशिवाय तळेगावमध्ये प्रवेश करण्याचे पाप मी करू शकत नव्हतो. भेळेवर ताव मारल्यावर मात्र श्विन थेट गंतव्यस्थानी पोचली.

लोनाडचा ठेवा

#dombivlicyclingclub (DCC) ची सदस्यसंख्या आणि सदस्यांचा उत्साह शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. कोणत्याही घटकाला उत्साह वाढत असताना एक निश्चित कार्यक्रम/ ध्येय वेळेनुसार मिळत गेले तर ते पोषक ठरते. याच उद्देशाने DCC ची रविवारची राइड ठरलेलीच.

मात्र इतक्यावर समाधान मानतील तर ते DCC सदस्य कसले? यासाठी मध्यम आणि लांब पल्ल्याच्या सायकल राइड हव्यातच. आज १५ किमी अंतरावरील लोनाड जवळील अंदाजे ५ व्या शतकातील बौद्ध लेणी आणि लोनाड गावातील प्राचीन शिवमंदिर पाहायला जायचे ठरले.
नेहमीप्रमाणे मिलापनगर येथील गणेशमंदिर येथे DCC सदस्य जमले. तेथे सर्व नवीन आणि जुने सदस्यांची ओळख झाल्यावर दोन गट करायचे ठरले. मिलापनगर येथील ३१ जणांची उपस्थिती DCC ची ताकद दर्शवत होती. प्रत्यक्षात पुढे आणखी ४ जण सामील झाल्याने आज ३५ जण DCC राइडला हजर होते. दोन गटांपैकी एक गट डोंबिवली मध्ये राइड करणार होता, तर दुसरा गट ठरल्याप्रमाणे लोनाडला जायला सज्ज झाला.

लोनाडला जाणार गट पुढे निघाला. @ritesh savla ह्या गटाचे नेतृत्व करत होता. @pushkar joshi, @sanjay datye, @nayana agharkar,@jayshree pandit, @meghesh kulkarni (बाहुबली), @vikas nagada, @anand parvate, @arnav kulkarni, @dev gaikwad, ज्यू. बिराजदार आणि इतर यांच्या पाठोपाठ मी सर्वात शेवटी जात होतो. वाटेत @rohan sakhare, @durgesh zipre आणि त्याचा मुलगा सामील झाले.

कल्याण शिळ रस्त्याने पत्री पूल, दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी चौक, आधारवाडी मार्गे आम्ही गांधारी पूल गाठला. येथून रस्ता अरुंद होत असला तरी वर्दळ कमी असल्याने आरामात  सायकलिंग करता येत होते. गार वारा श्रमाची जाणीव होऊ देत नव्हता. दोन्हीकडे हिरवळ असल्याने डोळेही सुखावत होते.

#kalyan cyclist आज पिसे डॅमला जाणार होते. ते परत येत असताना आम्हाला दिसले. DCC आणि kalyan सायकलिस्टस दोघांचा मार्ग बराचसा सारखाच होता. सावड गावपुढील चौकात उजवीकडे साधारण ६ किमी वर पिसे डॅम, तर सावड गावपुढील त्याच चौकात डावीकडे ३ किमी वर लोणाड जवळील लेणी आहेत. कल्याण सायकलिस्टच्या ग्रुपमधील रॉय, सचिन आणि इतर सायकलिस्ट परत येत असताना आम्ही सावड गावापर्यंत पोचत होतो.

सावड नाक्याहून डावीकडे वळणाऱ्या रस्त्याला आम्ही लागलो, तेथे वृक्षसंवर्धनाचे काम सुरु होते. पुष्करला त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. सावड नाक्याहून जाताना लोणाड लेणी रस्त्याच्या उजव्या बाजूला आहेत. वळेपर्यंत लेण्यांकडे जाणारा चढ कळत नाही. मात्र मला त्या चढाची, अरुंद आणि मातीच्या रस्त्याची कल्पना असल्याने मी श्विनचे गियर टप्प्याटप्प्याने बदलले. पहिला चढ फार तीव्र नसल्याने ३७ वरून ३६ मग ३५ आणि शेवटी २५ (२*५) चा गियर टाकत श्विन पूढे सरकली. मात्र पुढे पूढे चढ अधिकच तीव्र होऊ लागताच गियर २४, २३, २२ टप्प्याटप्प्याने पण पटापट बदलले. मात्र तरीही चढ तीव्र वाटू लागल्याने अखेरीस १२ च्या गियरने श्विनने सर्व चढ पार केला. चढ संपताच पुन्हा टप्प्याटप्प्याने गियर २५ वर आणून ठेवले.

लेण्यांपाशी पोचल्यावर तेथील टाक्यातील पाणी काढून चेहऱ्यावर मारले. चढ चढ़तानाचे सर्व श्रम लगोलग नाहीसे झाले. DCC चे सर्व सदस्य खुश झाले होते. लेण्यांपाशी गप्पा, थोडेफार खाणे आणि फोटोशूट करत सर्वजण विसावा घेत होते.

जानवल ह्या गावाजवळील टेकडी वर साधारण ५ व्या शतकात दगडात कोरलेली ही हिंदू आणि बौद्ध लेण्यात बुद्धांच्या पूर्वजन्मातील जातककथांपैकी वेषांतर जातक यावर आधारित कलाकृतीअसून सोबत हरीती आणि पंचिका या देवता आहेत. कालांतराने ह्या बौद्ध लेण्यांना हिंदू देवालयाचे स्वरूप देत येथे खंडेश्वरी आणि महिषसुरमर्दिनी यांचाही समावेश केला गेला.

नालासोपारा येथून जुन्नर या सातवाहन राजवटीतील राजधानीकडे जाणारे बौद्ध साधू वाटेत या लेण्यांमध्ये मुक्काम करीत असत. येथील चैत्यगृह (प्रशस्त प्रार्थना दालन) हे प्रमुख दालन असून इतर दोन- तीन अर्धवट काम झालेली दालनेही येथे आहेत.

भूस्खलनामुळे बाहेरील व्हरांड्याचे नुकसान झाले असून चार खांबांपैकी (पिलर) एका खांबांची हानी झाली आहे. इतरही तीन खांब फार चांगल्या अवस्थेत नाहीत. लेण्यांच्या पायाखालील अवैध खोदकामामुळेही या वारशाची हानी होत आहे.

येथे विसावा घेऊन आणि दुर्गेशच्या फोल्डिंग सायकलचे प्रात्यक्षिक पाहून सर्वजण लोणाड गावातील शिवमंदिराकडे निघाले. लोणाड गावात शिरता शिरता पुष्कर आणि मेघेश याना मातीच्या खापऱ्या दिसल्या. भाकरीची चव वाढवणाऱ्या या खापऱ्या बनवण्याची कार्यपद्धती समजावून घेत दोघंही पुढे आले, तोपर्यंत इतर सर्वजण गावातील शिवमंदिरापाशी पोचले होते. हे शिवमंदिर १ ल्या शतकातील असून इथली संस्कृती किती प्राचीन आहे याचा पुरावा देत तग धरून उभे आहे. मंदिर बाहेरून सध्या ढासळत्या अवस्थेत असले तरी आतील गाभारा सुरक्षित असून येथे नेमाने पूजा अर्चा होत असते. मंदिरामागील विस्तीर्ण तलाव परिसराची शोभा वाढवत आहे.

सर्वजण मंदिरापाशी गप्पा मारत असता आनंद मात्र पुरातन शिलालेख शोधण्यासाठी बेचैन होता. मंदिराहुन परत येताना आम्ही परत जानवलच्या दिशेने मागे न जाता सोनाळे बापगाव रस्त्याकडे पुढे निघालो. बापगाव येथील चौकात उजवी दिशा घेत गंधारी पुलाच्या दिशेने आमची फौज दौड करू लागली. पुष्कर आणि देव यांनी सकाळी एक महत्वाचे ठिकाण येताना थांबण्यासाठी हेरून ठेवले होते. त्यामुळे तिथे थांबणे भाग होते. सर्वजण आनंदाने तेथे थांबले तोपर्यंत सूर्य हजेरी जाणवू देऊ लागला होता. देव आणि पुष्कर यांनी हेरून ठेवलेल्या निराकेंद्रावर सर्वांनी निरापान केले आणि घराकडे कूच केले.
#cycle2work #tjsbbank #saveoursahyadri #cyclingzens #bikeport

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...