जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार दिनांक: १५ पौष १९४१
पोलीस चौकीमधील कर्मचाऱ्यांनी आपुलकीने केलेला पाहुणचार स्वीकारून फुजी(श्विन), ट्रेक आणि रसिकभाई नदीवरील पुलावरून पुढे निघाले. पूल संपताच चांगलाच उतार दिसत होता. बाकीचे स्वार पुढे जाऊन एव्हाना बराच वेळ झाला होता. त्यामुळे त्या उताराचा फायदा घेत तिघेही वेग वाढवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो उतार संपताच पुन्हा एकदा फुजी, ट्रेक आणि रसिकभाईंना लगाम खेचावे लागले. कारण डाव्या बाजूला असलेल्या क्षुधाशांतिगृहात पुढे गेलेले सायकलस्वार जठराग्नीला आहुती देत बसले होते.
फुजी, ट्रेक आणि रसिकभाई तेथे पोहोचेपर्यंत पुढे गेलेल्या सायकलस्वारांचे अर्धेअधिक उदरभरण झाले होते. गरम गरम पराठा आणि चहाने सगळ्यांचा अंतरात्मा तृप्त झाला होता. बाकीचे सायकलस्वार इथे बराच वेळ थांबले असल्याने त्यांनी पुढे जायला सुरुवात केली. देवधर मात्र फुजी, ट्रेक आणि रसिकभाईंसाठी थांबले होते. पराठा आणि चहावर ताव मारून फुजी (श्विन), ट्रेक, रसिकभाई आणि देवधरही पाठोपाठच निघाले.
सकाळपासून काही क्षण वगळता सूर्यदर्शन घडलेच नव्हते, पूर्ण मळभ होते. त्यामुळे वातावरण अगदीच निराशाजनक होते. सोधी आणि इतर फिरोजपुरकरांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळी चिन्हे दिसतंच होती. त्यामुळे अमृतसरला लवकरात लवकर पोचणे आवश्यक होते. मात्र एकंदर वातावरणामुळे सगळे सायकलस्वार निराश झाले होते. अमृतसरला लवकर पोचण्यासाठी फुजी आणि ट्रेक वेग घेण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात तेही सामान्य वेगातच जात होते. मात्र आता पुणेकरांच्या सायकलचे चाकच पुढे जायला तयार नव्हते. पुणेकरांचा उत्साह पूर्ण मावळला होता. फुजीने त्यांना पावसाच्या शक्यतेमुळे पाय चालवण्याची आठवण केली. ट्रेक आघाडीवर होती. पण पुणेकरांनी आता पूर्ण हार पत्करली होती. मागे राहिलेल्यांना सोडून पुढे जाणे फुजी(श्विन)ला पटत नव्हते. त्यामुळे फुजीने ट्रेकलाही थांबवले. सगळेचजण खोळंबून राहिले. थोडावेळ तिथे थांबून सायकलस्वार पुन्हा पाय मारू लागले, पण त्यात ना जीव होता ना जोर. नेहमी वेगात जाणारे स्वार आता पूर्णपणे मंदावले होते.
अर्थात त्यामुळे आता अकराच्या अकरा सायकलस्वार आणि सहाय्य वाहन सगळेच एकत्र जात होते. संपूर्ण काफीला आता एक झाला होता. त्याला वेग देणे गरजेचे होते. रस्ता बऱ्यापैकी रुंद झाला होता. पुन्हा एकदा अय्यरकाकांनी आघाडी घेतली. फुजी त्यांच्याबरोबर आघाडीवर होती. मध्ये थांबल्यामुळे आणि नंतर संथ गतीने पाय मारल्यामुळे वेळ बराच गेला होता. वातावरणातील मळभ तसेच होते. त्यामुळे आता पुणेकरांनाही पुन्हा चहा, नाश्त्याची आठवण होऊ लागली
आठ पदरी रस्त्याला दुरदूरपर्यंत काहीही दिसत नव्हते. बराच वेळ गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला दोन क्षुधाशांतिगृह दिसत होती. फुजीने थांबा घेतला. अय्यरकाका मात्र त्यांच्याच नादात पुढे गेले. बाकी सगळे सायकलस्वार तेथे थांबून चर्चा करत होते. रस्त्यापलिकडील क्षुधाशांतिगृहात काय मिळू शकेल ह्याचा अंदाज घेणे गरजेचे होते. मध्ये असलेल्या दुभाजकामुळे सहाय्य वाहन तिथे नेता येणार नव्हते. इतक्यात सगळ्या सायकलस्वारांना पाहून समोरील क्षुधाशांतिगृहातील सेवकच हमरस्ता ओलांडून सायकलस्वारांना आमंत्रण द्यायला आला. सहाय्य वाहन आणि सायकली रस्त्याच्या डावीकडेच ठेवून त्याने चहानाश्त्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. सर्व वाहने सुरक्षित राहतील याचीही त्याने खात्री दिली. सगळेजण कंटाळले होतेच. त्यामुळे क्षणभर विचार करून सगळ्यांनी सायकली रस्त्याच्या डावीकडे ठेवून त्या क्षुधाशांतिगृहाकडे मोर्चा वळवला. एव्हाना अडीच वाजले होते.

पाचवे शीख धर्मगुरू श्री अर्जुनदेवजी ह्यांनी सोळाव्या शतकात स्थापन केलेले तरण तारण साहिब हे शहर आता जवळच होते. मात्र आम्ही त्या शहरामध्ये न जाता महामार्गावरून थेट पुढे जाणार होतो. अमृतसर अजून साधारण ३० किमी अंतरावर होते. चहा नाष्टा झाल्यावर सगळ्या सायकलस्वारांनी वेग पकडला. तास दीड तासातच सगळेजण अमृतसर शहराच्या वेशीवर पोचले.
अमृतसर शहरात प्रवेश करतानाच सगळ्यांना उत्साह वाटू लागला. सगळ्यांच्या सहमतीने आता मोहितने आघाडी घेतली. बाकी सायकलस्वार त्याच्या पाठोपाठ जात होते. पुढे जाता जाता एक उड्डाणपूल लागला. तो चढत असताना त्याचा अंदाज आला नाही. मात्र आम्ही जसजसे आम्ही पुढे जाऊ लागलो तसतसे तो उड्डाणपूल आणखीच आकर्षक वाटू लागला. दुर्दैवाने आधी अंदाज नसल्याने कॅमेरा बंद होता. पुलावरील रस्ता फार रुंद नव्हता आणि सगळे सायकलस्वार एकापाठोपाठ होते. त्यामुळे कॅमेरा सुरू करण्यासाठी क्षणभरसुद्धा थांबणे शक्य नव्हते. सगळेजण वेगात जात होते. अमृतसर येथील मॉल ते भंडारी पूल ह्यांना जोडणारा हा उड्डाणपूल तब्बल ३.७०० किमी लांबीचा होता.
उड्डाणपूल संपताच आम्ही लवकरच आमचे गंतव्यस्थान असलेल्या 'हॉटेल रोझवूड इन' या फॅब हॉटेलच्या साखळीतील हॉटेलमध्ये पोचलो. आम्ही थोडा आराम करतोय न करतोय तोच सुनील ननावरेंनी ज्याचा संदर्भ दिला होता त्या कुश पन्नूने संपर्क केला. काहीजण संध्याकाळी सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग येथे जाणार होते. पण कुशने सांगितले की तिथे पाऊस सुरु होता. मी आणि अय्यरकाका चहासाठी बाहेर पडलो तर खरोखरच पावसाला सुरुवात झाली होती. बहुधा आम्ही हॉटेलमध्ये सुखरूप पोचण्याचीच तो वाट पाहत होता. थोड्याच वेळात कुश आणि अमृतसर बायसायकलिंग क्लबमधील इतर सदस्य आमचे स्वागत करायला हॉटेलमध्ये पोचले.
आम्ही सगळेजण हॉटेलच्या प्रवेशद्वारातील दालनातच उभे होतो. हॉटेलमधील स्वागतकक्षातील कर्मचारीही आमच्याकडे कौतुकाने आणि कुतूहलाने पाहत होते. मिठाई आणि गप्पांनी चांगलीच रंगत आणली होती. पावसाने आज आमच्यासाठी कळ काढली त्यामुळे आम्ही समाधानी होतो. आम्ही थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तयारी करून आलो होतो. मात्र पावसाची अपेक्षाच आम्ही केली नव्हती. आता पुढील प्रवास वरुणराजावरच अवलंबून होता.

,,👌👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा