भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर जेष्ठ १, १९४१
31st day partial ride of A Pan India Commute 35days challange
जेष्ठ ह्या भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याची आज सुरुवात. राष्ट्रीय कॅलेंडर हे खिस्ती कॅलेंडरप्रमाणेच सौर कालगणनेवर आधारित आहे. हिंदू कॅलेंडरमध्येही जेष्ठ ह्याच नावाचा महिना असला तरी हिंदू कॅलेंडर चांद्र कालगणनेवर आधारित आहे. हिंदू कॅलेण्डरचा जेष्ठ महिना मात्र अजून काही दिवस (काही तिथी) लांब आहे.
राष्ट्रीय कॅलेंडरमधील नवीन महिन्याची सुरुवात होत असताना #justride च्या सदस्यांबरोबर सायकलफेरीला जायला मिळणे हा योग छानच होता.
#justride चे सदस्य रोज सकाळी नियमितपणे आणि अत्यंत शिस्तबद्धरित्या सायकलफेरीचा आनंद घेत असतात. हि सायकलफेरी एक दिवस आधीच ठरत असल्याने ती नियोजनबद्ध असते. त्याचमुळे आजची फेरी नेवाळी फाटा येथे जाणार असल्याचे कालच समजले होते. ८ वर्षांपूर्वी पुण्याहून डोंबिवलीला परत आल्यावर एकटाच सायकलफेरीला जात असताना शिळ फाटा आणि नेवाळी फाटा हाच श्विनचा (सुरुवातीला फोमास) नियमित पल्ला असायचा. #cycle2work नसेल तेव्हा हा पल्ला गाठायला श्विनला नेहमीच आवडत असे. गेल्या ८ वर्षात हि जवळीक वाढतच होती. कधी गन्धार डोम्बिवलीकर आणि Arnav Kulkarni Marcella बरोबर तर कधी स्कॉट बरोबर जाऊन नेवाळी फाट्याशी श्विनची चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळेच जस्ट राईडची सायकलफेरी नेवाळीला ठरल्याचे समजताच श्विनने तातडीने आपला सहभाग नोंदवला.

श्विनने सकाळी ६ वाजता घरातून प्रयाण केले तेव्हा बऱ्यापैकी उजाडलेले होते. सूर्य उत्तर गोलार्धाचे अत्युच्य शिखर गाठण्याच्या जवळ असल्याचे स्पष्ट जाणवत होते. श्विनने संयतपणे सुरुवात केली. थोड्या वेळातच ओंकार चौधरी, @rahul ghatwal आणि @ritesh savala भेटले. पेंढरकर कॉलेजमार्गे कल्याण शिळ महामार्गाला लागत असताना @Saumitra samant सामील झाला.
डोंबिवली शहराबाहेर पडल्यावर सगळ्यांनी वेग घेतला. थोड्या वेळातच काटई नाका येथे पोचत उजवे वळण घेतले. कोळेगाव पार होतेय न होतेय तोच श्विनचे लक्ष ओंकारच्या सायकलच्या मागील चाकाकडे गेले. ते चाक खाली बसत होते. हे आरितच होते. डॉ राहुल घाटवळ हे माणसांप्रमाणेच सायकलवरही किती कुशलतेने आणि जलद उपचार करू शकतात हे पाहण्याची संधी आयतीच चालून आली. डॉ राहुल आणि रितेश यांनी ताबडतोब सायकलच्या मागील चाकाचे निरीक्षण सुरु केले. त्यावर हात फिरवत असतानाच डॉ राहुल यांच्या हाताला धातूचा एक तुकडा लागला. तो काढून फेकून दिल्यावर डॉ राहुल यांनी लगोलग म्यान केलेली शस्त्रे बाहेर काढली. जेथे अरित झाले होते तेथे डॉ राहुल शस्त्रक्रिया करीत असताना रितेशही हातभार लावत होता. अरित काढण्याचे काम सुरु असताना गप्पाष्टकही रंगले होते.
शस्त्रक्रिया पूर्ण होऊन सायकलच्या रबरी नळीच्या जखमेवर पट्टी लावून झाल्यावर मात्र सर्वजण वेगाने नेवाळी फाट्याच्या दिशेने निघाले. श्विनचे लक्ष घड्याळबाबांकडे होतेच. नेवाळी फाटा येथे पोचताच अमृतपानाचा अध्याय रंगला. त्यातही प्रत्येकाने विविधता जपली होती. वेळेचे गणित बिघडू न देण्यासाठी श्विनने परतीचा प्रस्ताव ठेवला. तो लागलीच सर्वसंमत झाल्यावर सगळेजण माघारी निघाले. बदलापूर पाइपलाइन रस्ता मोकळाच असल्याने लगेचच वेग मिळाला. कोळेगाव येथील चौकात मात्र धुराचा प्रचंड लोट येताना दिसत होता. तेथे एका टेम्पोच्या मागच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. मोजकी लोक सोडली तर सगळेजण लांबवरूनच पाहत होते. धुराचे प्रमाण मात्र वाढतच होते. वेळेचा अंदाज घेत श्विन आणि सहकाऱ्यांनी काढता पाय (की काढता टायर?) घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा