सोमवार, २९ जानेवारी, २०१८

पहिले सायकलमित्र संमेलन

डोंबिवली ही सांस्कृतिक नागरी. हिंदू नववर्षस्वागतयात्रेची सुरुवातही डोंबिवली नगरीतच झाली. आज दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी डोंबिवलीमध्ये अशीच एक नवी सुरुवात झाली. ते निमित्त होते 'पहिले सायकल मित्र संमेलन'.

सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर नियमित सायकलिंग करणाऱ्यांनाही ही कल्पना नवीन होती. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्थापन झालेल्या डोंबिवली सायकल क्लबचे सदस्य डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी एक स्वप्न पाहिले होते. जसजसे ( #dombivlicyclingclub ) डोंबिवली सायकल क्लबची सदस्य संख्या वाढत गेली तसतसे डॉक्टरांचे स्वप्न दृढ होत गेले. नॅशनल युथ ऑर्गनायझेशनचे श्री कमलाकर क्षिरसागर, क्रीडाभारतीचे श्री ऋषिकेश यादव यांनी हे स्वप्न सत्यात उतरवायला केवळ पाठिंबाच दिला असे नव्हे तर त्यांनी स्वतःलाही हे स्वप्न साकार करण्यासाठी झोकून दिले.

डोंबिवली सायकल क्लब चे सदस्य तहानभूक विसरून काम करू लागले होते. राज्यभरातील सायकलमित्र. सायकल क्लब यांच्याशी संपर्क करून त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जात होते. सायकलमित्र संमेलन हि कल्पनाच नवीन असल्याने काहीजण कुतूहलाने तर काही जण साशंकतेने होकार कळवत होते. डोंबिवली सायकल क्लब प्रमाणेच कल्याण, ठाणे येथील सायकलपटूही संमेलनाच्या तयारीसाठी जातात होते. संमेलनचाच दिवस जवळ येऊ लागताच नॅशनल युथ ऑर्गनायझेशनच्या कार्यालयात लग्नघराप्रमाणे वातावरण वाटू लागले. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

बुलढाणा ते डोंबिवली असा चार दिवसात ५०० किमी चा सायकल प्रवास करून श्री संजय मयूरे, तर सांगली ते डोंबिवली असा प्रवास करून केवळ ८० वर्षांचे श्री गोविंदकाका परांजपे संमेलनाच्या आदल्या दिवशी सकाळी डोबिवली येथे पोचले. चिंचवडहून कलावंतीण दुर्ग ला जाऊन श्री सुनील ननावरे आणि त्यांचे सहकारी तसेच चिंचवडहुन थेट डोंबिवली येथे श्री सुनील पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे संध्याकाळी आगमन झाले.

२८ जानेवारी २०१८ रोजी पहाटे ६.३० वाजता डोंबिवली येथील ५ निरनिराळ्या ठिकाणाहून सायकलयात्रेला सुरुवात झाली. ठाणे येथील केवळ ९१ वय असलेले श्री भाटेकाका, सांगलीचे परांजपेकाका, श्री मयूरे सायकलयात्रेत सामील झाले होते. सर्व सायकलयात्रा टिळक पुतळ्यापाशी एकत्र येऊन पुढे सावित्रीबाई फुले नाट्यगृहापाशी येऊन थांबल्या. तेथे दोन भाग्यवान विजेत्यांना सायकली भेट देण्यात आल्या. त्यानंतर सर्वांनी सायकल मित्र संमेलनासाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रवेश केला.

तेथील कलादालनात Durgesh Zipre श्री दुर्गेश झिपरे याने बनवलेल्या निरनिराळ्या सायकल प्रदर्शनात ठेवल्या होत्या. फोल्डिंग सायकल, हाल्फ सायकल, दोघांनी चालवायची तांडेम सायकल, तिघांनी चालवायची तांडेम सायकल, ९० औशांत जोडलेली सायकल, वेगवेगळे आकार असलेली दोन चाके असलेली सायकल अश्या सायकली तेथे पाहावयास मिळत होत्या. त्याचप्रमाणे Amar Kulkarniश्री अमर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शनही तेथे भरवण्यात आले होते.

सायकल संमेलनासाठी श्री रवींद्र चव्हाण, श्री संजय केळकर, श्री निरंजन डावखरे, शीर राहुल दामले असे राजकीय क्षेत्रातील मान्यवरही संमेलनासाठी आवर्जून उपस्थित होते. श्री भाटेकाका यांनी खुमासदार शैलीत त्याचे सायकलचे अनुभव सांगितले. हृषिकेश यादव यांनी सायकलचा सचित्र इतिहास उपस्थितांना सांगितला. सर्व सायकलपारु, आणि सायकल क्लब याना एक समान व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या सायकल कट्ट्यासंबंधी Prashant Gautam Nanaware श्री प्रशांत ननावरे यांनी माहिती दिली. Rajesh Khandekar राजेश खांडेकर यांनी जगप्रवास करताना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले.
'मुलुंडकी सायकलवाली' Cyc Firoza (FIROZA SURESH) हिने रोजच्या कामकाजातील सायकलचा उपयोग यासंबंधी मार्गदर्शन केले. खेडोपाड्यात शाळा लांब असल्याने शाळाबाह्य मुलींची संख्या वाढत आहे. हे वास्तव लक्षात घेऊन ज्यांच्याकडे सायंकाळी धूळ खात पडून आहेत त्यांनी त्या सायकली देणगीदाखल देण्याचे आवाहन ऍडव्होकेट स्वाती दीक्षित यांनी केले.

मानसिक आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण  करणारे श्री Sachin Gaonkar सचिन गावकर यांनीही मार्गदर्शन केले. दिल्ली ते मुंबई सायकलने प्रवास करणारे अंध तरुण, तसेच ज्ञान प्रबोधिनीमार्फत पुणे ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करणारे ७ वी ते ९ वी तील ५० विद्यार्थी यांनी सर्वाना भारावून टाकले. Pallavi Tope Surve पल्लवी सुर्वे हिने युथ हॉस्टेल ऑफ इंडिया (ययी) तर्फे मुंबई- गोवा, गोवा- कन्याकुमारी, कन्याकुमारी- कोलकाता, कोलकाता- दिल्ली असा आयोजित केलेल्या सायकल सफरींसंबंधी माहित ईडीला तसेच आगामी दिल्ली - मुंबई सायकल सफारी मध्ये सामील होण्याचे सर्वांना निमंत्रण दिले.

प्रेक्षकातील आणखी दोन भाग्यवान निवडून त्यांना सायकल भेट देण्यात आल्या. संपूर्ण वंदे मातरम गीताने 'पहिले सायकलमित्र संमेलन'चा समारोप झाला. श्री निरंजन डावखरे आणि श्री संजय केळकर यांनी पुढील सायकल मित्र संमेलन ठाण्याला आयोजित करण्याचा आग्रह धरला. मात्र चिंचवडहुन आलेले सायकलमित्र यांनी पुढील सायकल मित्र संमेलनही डोंबिवलीतच भरवा असा केलेला आग्रह संमेलनाच्या यशाची पावतीच होती.

#tjsbbank #saveoursahyadri #cyclingzens #ismartcommute #cycle2work #

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...