सूर्याचा दक्षिण गोलार्धात प्रवेश होतो तो दिवस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॅलेण्डरच्या ७ वा महिना अश्विन महिन्याची आज १ तारीख.
राष्ट्रीय कॅलेंडरच्या आश्विन महिन्याचे स्वागत करण्यासाठी आजचा दिवस साजरा करत शतकांचा दुष्काळ दूर करण्याचे श्विन आणि स्कॉटने ठरवले होते. आज राष्ट्रीय दिनांक अश्विन १ असला तरी हिंदू धर्माच्या कॅलेंडरनुसार आज भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील १४ वी तिथी म्हणजेच चतुर्दशी अर्थात अनंत चतुर्दशी होती. त्यामुळे आज शतकी राइड करण्यासाठी गणेशदर्शनाखेरीज अन्य कोणती योग्य जागा असणार. त्यामुळे श्विन स्कॉटने महडच्या वरदविनायक या अष्टविनायकातील गणपतीचे दर्शन घ्यायचे ठरवले.
सूर्य दक्षिण गोलार्धात शिरल्यामुळे आता दिवस १२ तासांपेक्षा कमी असणार होता. श्विन आणि स्कॉटने राइडला सुरुवात केली तेव्हा सूर्योदय होऊन गेला होता. डोंबिवली बाहेर पडताच श्विन स्कॉटने लगेचच वेग घेतला. नेहमीप्रमाणे शिळ फाट्याजवळील टोल नाक्याला पहिल्या विश्रांतीसाठी थांबा घेतला तेव्हा तेथील कर्मचारी संदीप उतेकर यांनी नेहमीप्रमाणेच विचारपूस केली . चहासाठी त्यांना नकार देत श्विन स्कॉट ने पुढे कूच केले. फारशी वर्दळ नसल्याने श्विन स्कॉटने थेट पळस्पे फाटा गाठला. तेथे इडली सांबार वर ताव मारता मारता श्विनला आठवण झाली अष्टविनायक मोहिमेवर असलेल्या चिंचवडमधील सायकलमित्रांची.
लगेचच सुनिल ननावरे यांना फोन लावला. अष्टविनायक मोहिमेदरम्यान काल पर्यंत ६ गणपतींचे दर्शन घेऊन त्यांनी रात्री कर्जतजवळ मुक्काम केला होता. आज सकाळी तेथून निघून तेही महडच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे आज त्यांचे भेट नक्कीच होणार होती. हवामान खात्याने पुढील ५ दिवस दिलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजावर पूर्ण पाणी पडून सूर्य तेजाने तळपू लागला होता. मात्र अधूनमधून त्याची दाहकता कमी करत श्विन आणि स्कॉटचे सूर्यापासून संरक्षण करण्याचे काम काही ढग करत होते. मात्र ते ढग पावसाचे नसून पूर्ण कोरडे होते.
महड जवळ येत असताना उन्हाची तीव्रता वाढत होती. साधारण ३-४ किमी वर महड असताना श्विनला वाटेत एक साप पडलेला दिसला. त्याबरोबर श्विन जागीच थांबली. तो साप अजिबात हालत नसल्याचे समजल्याने श्विनने जवळ जाऊन पाहायचे ठरवले. जवळ गेल्यावर समजले की त्या सापाला दोन तीन ठिकाणी मार लागलेला असल्याने तो हलु शकत नसला तरी त्याने मान किंचित उचलली होती. ते लक्षात येताच श्विनने त्याचे फोटो काढून लगेच पुढे कूच केले.
स्कॉट श्विन तेथे पोचताच अष्टविनायक मोहिमेवरील चिंचवड येथील ग्रुपची लगेचच भेट झाली. सर्वांनी एकत्रच वरद विनायकाचे दर्शन घेतले. सुनील पाटील, सुनील ननावरे भेटताच saveoursahyadri ह्या मोहिमेमधील आठवणींना उजाळा मिळाला. इतर सदस्यांशी ओळख झाली आणि मग सर्वांचा एकत्रित फोटोही काढला गेला. महडहून पालीला जाताच त्यांची अष्टविनायक यात्रा पूर्ण होणार होती. हि यात्रा म्हणजे दोन्ही सुनीलने पुढील महिन्यात आयोजित केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या दीर्घकालीन मोहिमेची एक प्रकारे पूर्वतयारीच होती. खरं तर श्विनलाही त्यांच्या बरोबर काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा करायची होती. मात्र त्या यात्रे दरम्यान रोज कमीत कमी १५० किमी अंतर कापण्याचा त्यांचा इरादा ऐकताच श्विनने माघार घेतली होती. दोन चार दिवस १५०-२०० किमी ची श्विनची तयारी असली तरी महिन्यापेक्षा जास्त दिवस रोज १५० किमी पेक्षा जास्त अंतर कापणे श्विनला अवघड वाटत होते.
फोटोसेशन होताच अष्टविनायक ग्रुप पालीच्या दिशेने वळला तर श्विन आणि स्कॉट परत डोंबिवली च्या दिशेने वळले. एव्हाना मध्यानं उलटून गेल्यामुळे सूर्य पूर्ण शक्तीनिशी तळपू लागला होता. श्विनने हेल्मेटच्या आत डोक्याला लावलेला रुमाल आता ओला करून नाकावर बांधला. चौक फाटा येथे नाश्ता आणि चहा घेवून दोघेही पळस्पे फाटा येथे पोचले. चौक फाटा येथे नाश्ता झाल्यावर एव्हाना तासभर उलटला होता. चौक येथे हलका नाश्ता झाल्यामुळे भुकेची जाणीव झाली तरी ती तीव्र नव्हती. त्यामुळे केवळ कोकम सरबत घेऊन दोघंही पुढे निघाले. मात्र पळस्पे फाटा येथे नाश्ता न केल्याची चूक श्विनला जाणवू लागली. श्विनचा वेग मंदावला. तरी पुन्हा शिळ फाट्याजवळील टोलपर्यंत जाऊनच थांबण्याचे श्विनने ठरवले.
टोल च्या ऑफिसमध्ये जाऊन उतेकरांची चौकशी केली तर ते ऑफिस ऐवजी टोल बूथमध्ये गेल्याचे कळले. मग त्यांच्यासाठी महडचा प्रसाद ठेवून डोंबिवली कडे निघण्याची तयारी करत असतानाच समोरून उतेकर आले. त्यांचा चहाचा आग्रह आता मात्र मोडवेना. तेही डोंबिवलीकरच असल्याने श्विन आणि स्कॉट बद्दल त्यांना कौतुक होतेच. तेथे चहापान करून मग श्विन स्कॉट नाश्त्यासाठी थेट खिडकाळीला पोचले. तेथे नाश्ता करून श्विन स्कॉट घरी पोचले तेव्हा strava ने १३१ किमी अंतराची नोंद केली होती. श्विनने यापेक्षा अधिक अंतर काही वेळा पार केलेले असले तरी अवघ्या ८ महिन्यांपूर्वी सायकलजगतात प्रवेश केलेल्या स्कॉटचा १३१ किमी हा आजपर्यंतचा उचांक होता.
राष्ट्रीय कॅलेंडरच्या आश्विन महिन्याचे स्वागत करण्यासाठी आजचा दिवस साजरा करत शतकांचा दुष्काळ दूर करण्याचे श्विन आणि स्कॉटने ठरवले होते. आज राष्ट्रीय दिनांक अश्विन १ असला तरी हिंदू धर्माच्या कॅलेंडरनुसार आज भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील १४ वी तिथी म्हणजेच चतुर्दशी अर्थात अनंत चतुर्दशी होती. त्यामुळे आज शतकी राइड करण्यासाठी गणेशदर्शनाखेरीज अन्य कोणती योग्य जागा असणार. त्यामुळे श्विन स्कॉटने महडच्या वरदविनायक या अष्टविनायकातील गणपतीचे दर्शन घ्यायचे ठरवले.
सूर्य दक्षिण गोलार्धात शिरल्यामुळे आता दिवस १२ तासांपेक्षा कमी असणार होता. श्विन आणि स्कॉटने राइडला सुरुवात केली तेव्हा सूर्योदय होऊन गेला होता. डोंबिवली बाहेर पडताच श्विन स्कॉटने लगेचच वेग घेतला. नेहमीप्रमाणे शिळ फाट्याजवळील टोल नाक्याला पहिल्या विश्रांतीसाठी थांबा घेतला तेव्हा तेथील कर्मचारी संदीप उतेकर यांनी नेहमीप्रमाणेच विचारपूस केली . चहासाठी त्यांना नकार देत श्विन स्कॉट ने पुढे कूच केले. फारशी वर्दळ नसल्याने श्विन स्कॉटने थेट पळस्पे फाटा गाठला. तेथे इडली सांबार वर ताव मारता मारता श्विनला आठवण झाली अष्टविनायक मोहिमेवर असलेल्या चिंचवडमधील सायकलमित्रांची.
लगेचच सुनिल ननावरे यांना फोन लावला. अष्टविनायक मोहिमेदरम्यान काल पर्यंत ६ गणपतींचे दर्शन घेऊन त्यांनी रात्री कर्जतजवळ मुक्काम केला होता. आज सकाळी तेथून निघून तेही महडच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे आज त्यांचे भेट नक्कीच होणार होती. हवामान खात्याने पुढील ५ दिवस दिलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजावर पूर्ण पाणी पडून सूर्य तेजाने तळपू लागला होता. मात्र अधूनमधून त्याची दाहकता कमी करत श्विन आणि स्कॉटचे सूर्यापासून संरक्षण करण्याचे काम काही ढग करत होते. मात्र ते ढग पावसाचे नसून पूर्ण कोरडे होते.
महड जवळ येत असताना उन्हाची तीव्रता वाढत होती. साधारण ३-४ किमी वर महड असताना श्विनला वाटेत एक साप पडलेला दिसला. त्याबरोबर श्विन जागीच थांबली. तो साप अजिबात हालत नसल्याचे समजल्याने श्विनने जवळ जाऊन पाहायचे ठरवले. जवळ गेल्यावर समजले की त्या सापाला दोन तीन ठिकाणी मार लागलेला असल्याने तो हलु शकत नसला तरी त्याने मान किंचित उचलली होती. ते लक्षात येताच श्विनने त्याचे फोटो काढून लगेच पुढे कूच केले.
घरी आल्यावर Gajanan Keshav Vaidya, Rahul Ghatwal आणि Sanjay Lokare यांच्याशी चर्चा करताच तो अतिविषारी मण्यार असल्याचे समजले
दरम्यान ननावरेंचा फोन आल्यामुळे चिंचवडचा ग्रुप महडला पोचल्याचे समजले. थोड्याच वेळात श्विन आणि स्कॉटही महडला पोचले.स्कॉट श्विन तेथे पोचताच अष्टविनायक मोहिमेवरील चिंचवड येथील ग्रुपची लगेचच भेट झाली. सर्वांनी एकत्रच वरद विनायकाचे दर्शन घेतले. सुनील पाटील, सुनील ननावरे भेटताच saveoursahyadri ह्या मोहिमेमधील आठवणींना उजाळा मिळाला. इतर सदस्यांशी ओळख झाली आणि मग सर्वांचा एकत्रित फोटोही काढला गेला. महडहून पालीला जाताच त्यांची अष्टविनायक यात्रा पूर्ण होणार होती. हि यात्रा म्हणजे दोन्ही सुनीलने पुढील महिन्यात आयोजित केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या दीर्घकालीन मोहिमेची एक प्रकारे पूर्वतयारीच होती. खरं तर श्विनलाही त्यांच्या बरोबर काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा करायची होती. मात्र त्या यात्रे दरम्यान रोज कमीत कमी १५० किमी अंतर कापण्याचा त्यांचा इरादा ऐकताच श्विनने माघार घेतली होती. दोन चार दिवस १५०-२०० किमी ची श्विनची तयारी असली तरी महिन्यापेक्षा जास्त दिवस रोज १५० किमी पेक्षा जास्त अंतर कापणे श्विनला अवघड वाटत होते.
फोटोसेशन होताच अष्टविनायक ग्रुप पालीच्या दिशेने वळला तर श्विन आणि स्कॉट परत डोंबिवली च्या दिशेने वळले. एव्हाना मध्यानं उलटून गेल्यामुळे सूर्य पूर्ण शक्तीनिशी तळपू लागला होता. श्विनने हेल्मेटच्या आत डोक्याला लावलेला रुमाल आता ओला करून नाकावर बांधला. चौक फाटा येथे नाश्ता आणि चहा घेवून दोघेही पळस्पे फाटा येथे पोचले. चौक फाटा येथे नाश्ता झाल्यावर एव्हाना तासभर उलटला होता. चौक येथे हलका नाश्ता झाल्यामुळे भुकेची जाणीव झाली तरी ती तीव्र नव्हती. त्यामुळे केवळ कोकम सरबत घेऊन दोघंही पुढे निघाले. मात्र पळस्पे फाटा येथे नाश्ता न केल्याची चूक श्विनला जाणवू लागली. श्विनचा वेग मंदावला. तरी पुन्हा शिळ फाट्याजवळील टोलपर्यंत जाऊनच थांबण्याचे श्विनने ठरवले.
टोल च्या ऑफिसमध्ये जाऊन उतेकरांची चौकशी केली तर ते ऑफिस ऐवजी टोल बूथमध्ये गेल्याचे कळले. मग त्यांच्यासाठी महडचा प्रसाद ठेवून डोंबिवली कडे निघण्याची तयारी करत असतानाच समोरून उतेकर आले. त्यांचा चहाचा आग्रह आता मात्र मोडवेना. तेही डोंबिवलीकरच असल्याने श्विन आणि स्कॉट बद्दल त्यांना कौतुक होतेच. तेथे चहापान करून मग श्विन स्कॉट नाश्त्यासाठी थेट खिडकाळीला पोचले. तेथे नाश्ता करून श्विन स्कॉट घरी पोचले तेव्हा strava ने १३१ किमी अंतराची नोंद केली होती. श्विनने यापेक्षा अधिक अंतर काही वेळा पार केलेले असले तरी अवघ्या ८ महिन्यांपूर्वी सायकलजगतात प्रवेश केलेल्या स्कॉटचा १३१ किमी हा आजपर्यंतचा उचांक होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा