सूर्यनारायण उत्तर गोलार्धात असताना म्हणजे भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरच्या सौर चैत्र ते सौर भाद्रपद या पहिल्या सहा महिन्यात या वर्षी तरी श्विनसफारीला लगाम लागला होता. मात्र उद्या सूर्य पुन्हा विषुववृत्तावर येईल तेव्हा दिवस आणि रात्र समसमान असतील. अर्थातच भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचे पहिले सहा महिने संपतील.
निदान राष्ट्रीय वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात म्हणजे सूर्य दक्षिण गोलार्धात असताना श्विन राहिलेली कसर पूर्ण करत पुन्हा योग्य मार्गाला लागेल. त्याच तयारीसाठी आज श्विनने पुन्हा नेवाळी फाटा येथे जाण्याचे ठरवले. इतक्या दिवसात उशिरा उठण्याची सवय लागल्याने श्विनने उशिरानेच सुरुवात केली. त्यामुळे गर्दीचा मानपाडा रस्ता टाळत श्विनने लांबचा ९० फुटी मार्ग पत्करला. तेथून पत्रिपुलानजीक कल्याण शिळ रस्त्याला लागताच पत्रिपुलाच्या दिशेने अडकलेली असहाय्य आणि हतबल झालेली अश्वशक्तीधारी वाहनांची रांग दिसू लागली. त्या वेढ्यातून मार्ग काढत श्विनने कल्याण शिळ रस्ता पकडला. तेथून मात्र श्विनला चांगलीच लय सापडली. श्विनने झपाट्याने बदलापूर पाइपलाइन रस्त्यामार्गे नेवाळी फाटा गाठला.
गन्धार डोम्बिवलीकर आणि Arnav Kulkarni Marcella यांच्या साथीने नेवाळी फाटा येथील अमृताचा लाभ घेण्याची परंपरा त्यांच्या अनुपस्थितीत श्विनने आजही पाळली. गन्धार मातृभाषेतील शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारतभ्रमण करत काश्मीरमध्ये पोचला आहे. आज स्कॉटही जोडीला नसल्याने नेवाळी येथील लघु उद्योजकांना मदत करण्याचे कार्य श्विनला एकट्यानेच पार पाडावे लागले. चहा पिणे म्हणजे तेथील चहाच्या टपरीधारकाला अर्थातच लघु उद्योजकाला मदतच नाहीका !
तेथून परतीच्या मार्गाला लागल्यावर मात्र पाइपलाइन रस्त्यावरील कोट्यवधी खड्डयांचा विचार करत तळोजा फाट्यापुढे श्विन सेवा रस्त्याला लागली. सेवा रस्त्याला लागताच श्विनचा रस्ता अडवला गेला. खरं पाहता दोन चार चाकीच काय पण बहुचाकी अश्वशक्तीधारी वाहनेही श्विनला अडवू शकत नसत. ऊन, पाऊस, वारा या कशाचीही पर्वा न करता श्विन मार्ग काढत असते. मात्र आज गोष्टच वेगळी होती. सेवा रस्त्याला लागल्यावर श्विनवर जणू गारुडच केले गेले. श्विनचे देहभान पूर्णपणे हरपले होते. मंत्रमुग्ध झालेली श्विन जागच्या जागी थांबली. थोडे भानावर येत पॅडल मारायला जावे तर पुन्हा थांबावे लागत होते.
ती जादू होती सेवा रस्त्याच्या दुतर्फा फुललेल्या छोट्या छोट्या पण सुंदर फुलांची आणि त्याभोवती उडणाऱ्या मोहक फुलपाखरांची! तसे पाहता हि फुले सर्वसामान्यच... कुणाच्याही नजरेत न भरणारी. फुलांचा राजा गुलाब, तसेच मोगरा, कमळ ह्यांचा रुबाब काही औरच...त्यामुळे ती अनेकांना आवडतात. मात्र सेवा रस्त्यावरील हि फुले त्या 'आवडत्या' यादीत नसली तरी कुणाची 'नावडती' ही नव्हेत. मुळात एखादी गोष्ट आवडणे किंवा नावडणे हे तेव्हाच घडते जेव्हा आपण त्या गोष्टीची दखल घेतो. सेवा रस्त्यावरील ह्या फुलांची तर कोणी फारशी दखलही घेत नसावे. ह्याबद्दल ह्या फुलांची काहीच कुरकुर नसते. ती बिचारी जागा मिळेल तिथे त्या जागेचे सौंदर्य खुलवत असतात. श्विनचा रस्ता अडवला होता तो ह्याच फुलांनी,.. त्याचबरोबर ह्याच फुलांभोवती पिंगा घालणाऱ्या अनेक फ़ुलपाखरांनी. त्या फुलांचे आणि फुलपाखरांचे फोटो काढण्यात काळवेळाचे भानही हरपले होते. 'अजून एक.. अजून एक' असे लहान मुलांसारखे स्वतःला समजावत श्विनने फोटो काढण्याचा सपाटाच लावला. फुलपाखरे स्वच्छंदपणे उडत असल्याने ती श्विनच्या छायाचित्रीकरणाला जुमानत नव्हतीच, पण वाऱ्याच्या तालावर डोलणारी फुलेही काही कमी नव्हती. एखादे फुलपाखरू एका जागी बसले म्हणून त्याकडे फोटोसाठी वळावे तोच ते सेकंदाचाही विसावा न घेता उडू लागे. त्याचा नाद सोडावा तर दुसरेही फुलपाखरू तसेच खेळ खेळत असे. सभोवती उडणाऱ्या अनेकविध असंख्य फुलपाखरांपैकी एकाला तरी कॅमेरात कैद करण्याची श्विनची खटपट मात्र व्यर्थ ठरत होती. अखेरीस लांबवर बसलेल्या एका फुलपाखराला कैद करत तसेच एका लांबवर उडत असलेली दोन फुलपाखरे आणि एक पाखरू यांना कॅमेरात कैद करत श्विनने परतीचा मार्ग पकडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा