भारतीय राष्ट्रीय दिनांक अश्विन १, १९४०
हिंदू तिथी भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, शालिवाहन शके १९४०
ज्याप्रमाणे अंतर मोजण्यासाठी किलोमीटर आणि मैल ही दोन एकके आहेत, त्याचप्रमाणे कालमापन करण्यासाठी चांद्र आणि सौर अश्या दोन पद्धती आहेत.
चंद्राला पृथ्वीभोवती जो वेळ लागतो त्यानुसार वर्ष मोजण्याची पद्धत म्हणजे चांद्र पद्धत. हिंदू आणि मुस्लिम यांचे वर्ष चांद्र पद्धतीवर अवलंबून आहे. खगोलशास्रनुसार पौर्णिमा (full moon) आणि अमावस्या (no moon) ह्या चंद्राशी संबंधित मुख्य दोन स्थिती. म्हणूनच हिंदूंचा महिना पोर्णिमेनंतरच्या प्रतिपदेला तर काहींचा अमवस्येनंतरच्या प्रतिपदेला सुरु होतो.
पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतो तो वेळ म्हणजे सौर वर्ष. वर्ष मोजण्याची हि सौर पद्धत. ख्रिस्ती कॅलेंडर हे सौर पद्धतीवर अवलंबून असल्याने ते सौर वर्ष आहे. खगोलशास्त्रानुसार सूर्याशी निगडित चार मुख्य दिवस-
१) उत्तर गोलार्धाच्या अती उत्तरेला जातो तो म्हणजे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस (२१ जुन)
२) सूर्य दक्षिण गोलार्धात अती दक्षिणेला असतो तो म्हणजे सर्वात लहान दिवस (२२ डिसेंबर)
३) सूर्य विषुववृत्ता हुन उत्तर गोलार्धात प्रवेश करतो तो दिवस जेव्हा दिवस आणि रात्र समसमान असतात (२१ मार्च)
४) सूर्य विषुववृत्ता हुन दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो तो म्हणजे (२२ सप्टेंबर)
अर्थातच सौर कॅलेंडर असल्याने शास्त्रीय दृष्ट्या ख्रिस्ती कॅलेंडर वर्ष या चार पैकी कोणत्या तरी दिवशी सुरु व्हायला हवे. किंबहुना या चारही दिवशी ख्रिस्ती महिना सुरु तरी व्हायला हवा किंवा संपायला तरी हवा. मात्र सौर वर्ष असूनही ख्रिस्ती कॅलेंडर वर्ष सुरु होते तो दिवस वरील चार दिवसांपैकी कोणताही नसून तो दिवस आहे १ जानेवारी. ह्या १ जानेवारीला खगोलशास्त्रीय दृष्टया काहीही महत्व नाही. मात्र तो दिवस ख्रिस्ती धर्मसंस्थापकाशी/ख्रिस्ती धर्मप्रसारकाशी संबंधित आहे.
भारताचे राष्ट्रीय वर्ष हिंदू किंवा मुस्लिम वर्षाप्रमाणे चांद्र वर्ष नसून ख्रिस्ती वर्षाप्रमाणे सौर वर्ष आहे.
मात्र भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर कोणत्याही धर्माशी संबंधित नसून जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडर आहे. भारतीय राष्ट्रीय नवीन वर्ष सुरु होते तो दिवस आहे ज्या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो तो दिवस म्हणजेच वर उल्लेख केलेला १२ तास दिवस १२ तास रात्र असलेला दिवस अर्थात भारतीय सौर दिनांक चैत्र १. म्हणजेच भारताचे राष्ट्रीय वर्ष हे शास्त्रीय वर्ष आहे. ख्रिस्ती वर्षात मात्र ह्या दिवशी वर्षातील ३रा महिना (मार्च) मधील २२ वा दिवस (लिपवर्षात २१ वा दिवस) असतो.
भारतातच केवळ भारतीय नागरिकांनीच नव्हे तर नेहमी हिंदू आणि मुस्लिम किंवा भारतीय लोकांच्या अंधश्रद्धेवर बोट ठेवून शास्त्रीय दृष्टिकोनाचा आग्रह धरणाऱ्या पश्चिमात्यांनीही ख्रिस्ती कॅलेंडर गुंडाळून ठेवून शास्त्रीय आधार असलेले भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर स्वीकारावे.

राष्ट्रीय दिनांक 2 आश्विन 1940 कुणी लिहीलाय.
उत्तर द्याहटवाराष्ट्रीय दिनांक २ अश्विन १९४० सोमवारी आहे जेव्हा ख्रिस्ती दिनांक २४ सप्टेंबर २०१८ आहे
उत्तर द्याहटवा