रजनीश अंमळ उशिरा प्रगटला होता. तेजोनिधी भास्कर आज लवकर हजर राहणार नसल्याने, रजनीश स्वच्छंदपणे विहरत होता. तेजोनिधी भास्कराचार्यांना उशीर होण्यास कारणही तसेच होते. आजपासून भास्कराचार्यांना दक्षिणेकडील राज्यकारभार हळूहळू आवरता घेत उत्तरेकडील राज्य अधिकाधिक वृद्धिंगत करायचे होते. तर रजनीश आता कलेकलेने दक्षिणेकडील मोहीम तीव्र करणार होता. अर्थातच वर्षातील सगळ्यात मोठी रात्र संपून आता उत्तरेकडील दिवस कलेकलेने वाढत जाणार होता. सूर्याशी संबंधित ह्या दिवसाची ठळक नोंद घेत आज भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये पौष ह्या दहाव्या महिन्याची सुरुवात म्हणजे पहिली तारीख होती.
सौर दिनांक १ चैत्र (२२ मार्च) या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो.सौर दिनांक १ आषाढ (२२ जूनला) तो उत्तरतम अंतरावर येतो.त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन (सूर्याची दक्षिणेकडे वाटचाल)सुरू होते.सौर दि. १ आश्विन (२३ सप्टेंबर) रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर दि.१ पौष (२२ डिसेंबर) यादिवशी तो दक्षिणतम अंतरावर येऊन नंतर पुनः त्याची उत्तरेकडे वाटचाल (उत्तरायण) सुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्त्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या भारतीय सौर कालगणनेत निश्चित केला आहे. दुर्दैवाने केवळ धार्मिक आणि केवळ युरोप खंडातील राजे यांचा विचार केलेल्या ग्रेगोरीयन कॅलेंडरमध्ये मात्र हे चारही दिवस महिन्याच्या अधेमध्येच येतात. त्यामुळे ग्रेगोरीयन कॅलेंडर सौर असूनही खगोलशास्त्राशी काडीमोड घेणारे आणि अशास्त्रीय ठरते.
(हिंदू पंचांग आणि मुस्लिम कॅलेंडर मात्र सौर कॅलेंडर नसून चांद्र कॅलेंडर म्हणजे तिथींवर आधारित असल्याने हिंदू व मुस्लिम कॅलेंडरचा भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरशी संबंध नाही.)
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणी, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो. किंबहुना भारताची राष्ट्रीय कालगणना असल्याने प्रत्येक नागरिकाने सर्व अधिकृत कामकाजात अशास्त्रीय, ख्रिस्ती ग्रेगोरीयन कॅलेंडर ऐवजी भारताच्या राष्ट्रीय कालगणनेचाच वापर करणे अपेक्षित आहे.
श्रेष्ठ गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन ह्यांचा सौर कालगणनेनुसार वाढदिवस असल्याने आजचा दिवस 'भारत राष्ट्रीय गणित दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. तर इंडोनेशिया ह्या देशात आज मातृदिन साजरा केला जातो.
डोंबिवलीकर सायकलपटूंसाठी आजचा दिवस आणखी विशेष होता. कारण पुणेकरांबरोबरच आज डोंबिवली येथील ४ सायकलपटूसुद्धा पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सामील होणार होते. त्यामुळेच श्विनलाही आज ब्राह्म मुहूर्तालाच जाग आली. फुजी आणि स्कॉट आदल्या रात्रीच स्कॉटसह गौतमच्या टेम्पोमध्ये विराजमान झाल्या होत्या. त्यामुळे जम्मू मोहिमेला सुरुवात करण्याचा मान श्विन आणि ट्रेकला मिळाला होता. भास्कर क्षितिजावर यायला अजून बराच अवकाश होता. अस्मादिक आणि मीरा मोहिमेची सुरुवात करण्यास तयार झालो तेव्हा माझी मावशी डॉ निरुपमा भावे आमच्याबरोबरच होती. श्विनने हाताळ्यावर नवी विजेरी, नवीन कर्णा परिधान केला होता तसेच शेपटाकडेही दिवा परिधान केला होता. सुदैवाने गृहसंकुलाबाहेर पडल्यावर कोणतेही श्वान आम्हा तिघांकडे आकृष्ट झाले नाही. सावध आणि संथ सुरुवात करत आम्ही तिघेही डोंबिवली शहराचे ग्रामदैवत श्री गणेशमंदिर संस्थान येथे पोहोचलो. डोंबिवली सायकल क्लब आणि पेडल रिपब्लिकचे सदस्य तेथे हजर होतेच. डोंबिवली सायकल क्लब मधील सदस्य दर रविवारी एकत्रितरित्या प्रभात फेरीला सुरुवात करताना श्रीगणेशमंदिरापासूनच सुरुवात करत. हा पायंडा क्लबची स्थापना झाल्यापासून म्हणजे दिनांक १६ माघ १९३३ (५ फेब्रुवारी २०१२) पासून अव्याहत आणि अखंडपणे सुरू होता. गेल्या ७-८ वर्षात क्लबच्या सदस्य संख्येत गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ होत होती. काही सदस्य रविवारच्या छोट्या फेरीवर समाधानी असले तरी काही सदस्यांची भूक त्यात भागत नव्हती. त्यामुळेच आठवड्यातील सर्व दिवस साधारण ३० किमीची तर रविवारी ५० हुन अधिक किमीची फेरी काढणे, सायकलफेरी गटाच्या शिस्तीप्रमाणे करणे अश्या विचारांनी पेडल रिपब्लिक हा गट स्थापन झाला होता.
डोंबिवली सायकल क्लब सुरू झाला तेव्हा अवघ्या पाच सात वर्षांचे असताना क्लबमध्ये सामील झालेले जिया शाह आणि श्रीराज अय्यर हे आज पुणे जम्मू सायकलसफरीच्या सदस्यांना ध्वज दाखवण्यासाठी खास हजर झाले होते. डोंबिवली सायकल क्लब आणि पेडल रिपब्लिक यांतील इतर सदस्यही मोठ्या संख्येने आणि उत्साहात हजर झाले होते. नयना आघारकर, जयंत देवधर आणि एकादशी कोल्हटकर तसेच श्री विश्वनाथ अय्यर हे पुणे जम्मू सफरीतील सहभागीसुद्धा श्रीगणेशमंदिरापाशी आले होते.
श्रीराज अय्यर
जिया शाह
पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सहभागी पुणे व डोंबिवली येथील सायकलपटू
डोंबिवली सायकल क्लब आणि पेडल रिपब्लिकच्या सदस्यांसह पुणे जम्मू सायकलसफरीतील सहभागी
श्रीराज अय्यर
जिया शाह
पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सहभागी पुणे व डोंबिवली येथील सायकलपटू
डोंबिवली सायकल क्लब आणि पेडल रिपब्लिकच्या सदस्यांसह पुणे जम्मू सायकलसफरीतील सहभागी
डोंबिवली शहरातील प्रत्येक महत्वाच्या सायकल फेरी आधी अडूरकाका शंखनाद करत. त्याप्रमाणे ते सज्ज झाले. एकूण सातजण आज डोंबिवली हुन जम्मूसाठी निघणार होते. श्री गणेशाचे दर्शन घेऊन, समूहछायाचित्र काढून झाल्यावर सगळे सायकलपटू रांगेत उभे राहिले होते. श्विनने सगळ्यात मागे राहायचे ठरवले होते. त्याप्रमाणे श्विन सातव्या क्रमांकावर होती. श्विन तेथील उपस्थितांचा निरोप घेत असतानाच अचानक पुढील सायकलपटू जाऊ लागले. श्विनने इतर सायकलपटूंबरोबर मोहिमेची सुरुवात केली. DCC आणि पेडल रिपब्लिक चे सदस्य बरोबर होतेच. श्रीगणेश मंदिर संस्थानापासून निघाल्यावर ९० फुटी रस्त्यावर पोचल्यावर शिरगणती झाली. DCC चे सदस्य पत्रीपुलापर्यंत येणार होते. तेथे पोचल्यावर श्विनने DCC सदस्यांचा निरोप घेतला. पेडल रिपब्लिकच्या सदस्यांचे मात्र इतक्यात समाधान होणे शक्य नव्हते. ते पुढे येतच होते. दुर्गाडी किल्ल्यापुढील चौकात शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ मूर्तीपाशी डावे वळण घेत सगळ्यांनी कोन गावाकडे मोर्चा वळवला. रस्त्याला वर्दळ फार नव्हती. त्यामुळे हळूहळू सगळ्यांचा वेग वाढत होता. कोनगाव केव्हा मागे पडले हे कळलेही नाही. एव्हाना १० किमीचा टप्पा पार पडला होता. गोवेगावही मागे पडले. एकमेकांमागोमाग सगळेजण लयीत जात होते. रांजणोली गावापुढे कल्याण भिवंडी रस्त्याला छेद देणारा नाशिक ठाणे महामार्ग लागला. पेडल रिपब्लिकच्या सदस्यांचा निरोप घेण्याची वेळ आली होती. DCC सदस्य पत्रिपुलापासून जसे परत फिरले होते, तसेच आता पेडल रिपब्लिकचे सदस्य माघारी फिरणार होते. पत्रिपुलापाशी अरुंद रस्त्यामुळे छायाचित्र घेता आले नव्हते. मात्र रांजणोली नाक्यापाशी चौक रुंद होता. त्यामुळे पेडल रिपब्लिकच्या सदस्यांचा निरोप घेतानाचा क्षण कैद करण्याचा मोह आवरणे शक्य नव्हते.
पेडल रिपब्लिकचे स्वारही आता माघारी फिरणार असले तरी भाषाप्रभु गंधार डोंबिवलीकर (गंधार कुलकर्णी), शीघ्र कवी भरत यांनी पुढेही साथ देण्याचे ठरवले होते. यापुढील रस्त्याची टेहळणी अस्मादिकांनी नयना आघारकरांसह आधीच्या रविवारी केली होती. त्यामुळे आता अस्मादिकांनी आघाडी घ्यायचे ठरले.
नाशिक ठाणे हमरस्ता ओलांडून अस्मादिकांपाठोपाठ सगळेजण रांगेत जाऊ लागले. सुरुवातीचा थोडा खराब रस्ता गेल्यावर नव्याने बांधलेला उड्डाणपूल दिसू लागला. या उड्डाणपुलावरून जाण्याची मजा श्विन आणि नयना आघारकरांनी घेतली होतीच. त्यामुळे त्या उड्डाणपुलापाशी पोचताच श्विनचा उत्साह अधिकच वाढला. सगळे सायकलस्वार पाठोपाठ आहेत याची खात्री केल्यावर श्विनने उड्डाणपूल चढायला सुरुवात केली. हा भिवंडीच्या दिशेने जाणारा एकदिशा मार्ग होता. परतीच्या प्रवासात उड्डाणपुलाखालून यावे लागते. उड्डाणपुलावरील रस्ता खूपच अरुंद आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर मागे वळूनही बघता येणार नव्हते आणि थांबताही येणार नव्हते. श्विनने आघाडी घेत उड्डाणपुलावर कूच केले. बाकी सायकलिस्टही एकामागोमाग रांगेत येऊ लागले. हा उड्डाणपूल अरुंद असला तरी बऱ्यापैकी लांब आणि उंच होता. श्विनने वेग घेतला. उड्डाणपूल पार झाल्यावर लगेचच दुसरा उड्डाणपूल होता. त्या उड्डाणपुलावर उजवे वळण घ्यावे लागणार होते. मात्र सलग दुसरा उड्डाणपूल घेतला तर, मागे सगळे सायकलस्वार आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी थांबता येणार नव्हते. कारण दोन्ही उड्डाणपुलांमध्ये फार जागा नव्हती. त्यामुळे श्विनने पहिल्या उड्डाणपुलानंतर रस्त्याच्या डावीकडे मोर्चा वळवला. पाठोपाठ ४-५ सायकलपटू आले. बाकीचे अजून पुलावरच होते. त्यांची वाट पाहत थांबलो असता आजूबाजूचे लोक आमच्या सायकलसफरीबद्दल चौकशी करू लागले. आम्ही जम्मूपर्यंत सायकलप्रवास करणार असल्याचे समजताच ते आम्हाला चहानाश्त्यासाठी आग्रह करू लागले. आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला. शेवटचा सायकलपटू आल्याची खात्री झाल्याचार श्विनने पुन्हा पुढे कूच केले. पुढील चौकात उजवे वळण घेत वाडा शहराच्या दिशेने जाणारा रस्ता पकडला. खरेतर भिवंडीहून तलासरीकडे जायला चारपाच वेगवेगळे मार्ग होते. श्विन आणि नयना आघारकर यांनी आठवडाभर आधीच एक खुष्कीचा मार्ग शोधून ठेवला होता.
वाडा रस्त्याला लागल्यावर कामोरी नदी ओलांडून शेलार गावाजवळ मीठपाडा रस्त्यापाशी श्विनने थांबा घेतला. इथे डावीकडे वळण घ्यायचे होते. श्विनने पून्हा एकदा शिरगणती करत सगळे सायकल स्वार असल्याची खात्री केली आणि मगच डावीकडे वळण घेत मीठपाडा रस्त्याकडे मोर्चा वळवला. रस्ता थोडा अरुंद आणि खडबडीत असल्याने सगळ्यांचा वेग मंदावला होता. मात्र हळूहळू त्यावर मात करत सगळेजण वेग घेत होते. थोड्या वेळातच सर्व सायकलयात्री पारोळ रस्त्याला लागले. वर्षभरापूर्वी जम्मू कन्याकुमारी सायकलयात्रा करणाऱ्या सुनील ननावरे, सुनिल पाटील यांच्या गटाला तलासरीहून डोंबिवलीकडे घेऊन येताना पारोळ रस्त्याने श्विनला भुरळ घातली होतीच. आता त्याच रस्त्याने मात्र विरुद्ध दिशेने जायचे होते.
एव्हाना डोंबिवली शहर मागे पडून दीड-दोन तास झाले होते. सगळेजण चहाच्या शोधात होते. श्विनला पुढे जुनांदूरकी गावाजवळ चहा मिळेल याची खात्री होतीच. श्विनचा अंदाज खरा ठरला कांबे गावाजवळ चहापानाची पहिली संधी मिळाली. सर्व स्वारांनी त्वरित आपापल्या हातातील लगाम खेचत चहाकेंद्राकडे मोर्चा वळवला.

चहा घेत असतानाच जठराग्नीला आहुती देण्याचे यज्ञकर्मही केव्हा सुरू झाले हे कळलेही नाही. जम्मू मोहिमेच्या शुभारंभाच्या पहिल्यावहिल्या यज्ञकर्मात सगळेच गुंग झाले होते. पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सामील झाल्याचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. गप्पांनाही उधाण आले होते. भास्करचार्यही सगळ्या सायकलपटूंकडे कौतुकाने पाहत होते. मात्र शीघ्र कवी भरत आता परतणार होते. कांबे गावापाशीच त्यांचा निरोप घेत आता पुणे जम्मू सायकलसफरीतील सहभागी तुंगारेश्वर अभयारण्याच्या दिशेने जाऊ लागले.

खुप सुंदर मस्त🚴🚴👌👍✍️सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद. आपले नाव समजेल का?
हटवा