वसईजवळच्या डोंगररांगात वसलेल्या साधारण ८५.७ चौरस किमी क्षेत्राला भारतीय राष्ट्रीय दिनांक २ कार्तिक १९२५ अर्थात ख्रिस्ती दिनांक २४ ऑक्टोबर या दिवशी अभयारण्याचा दर्जा मिळाला. हे तुंगारेश्वर अभयारण्य भटक्यांचे आवडते ठिकाण न झाल्यासच नवल. शिवाय येथील तुंगारेश्वराचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थानदेखील आहे.
या अभयारण्यातील जैवविविधता आपल्याला मोहिनी घालते. साग, शिसव, खैर, ऐन, आवळा, हिरडा, बेहडा अश्या विविध वनस्पती येथे आहेत. तसेच बिबटे, रानडुक्कर, ससे, भेकर, लंगूर यांच्यासह पक्ष्यांच्या १५० प्रजाती इथे पाहावयास मिळतात. तसेच अनेक प्रजातींच्या फुलपाखरांनी हे जंगल समृद्ध आहे. या क्षेत्रातील जवळपास २८ गावे ही अतिसंवेदलशील क्षेत्रात मोडतात.
भरत परत गेल्यानंतर पुणे जम्मू सायकलसफर करणारा गट आता या अभयारण्याच्या दिशेने निघाला होता. त्यांच्याबरोबर गंधार कुलकर्णी आणि कौशिक कुलकर्णी होतेच. आधीच्याच रविवारी संजय दात्ये आणि अभय कुलकर्णी पारोळ पर्यंतच्या रस्त्याची टेहळणी करून आले होते. त्यांनी ह्या रस्त्याला प्रमाणपत्र दिले होतेच.
रस्ता अरुंद असला तरी वर्दळ फार नव्हती. येथून पारोळपर्यंत रस्ता सरळ असल्याने श्विनने पुन्हा एकदा पिछाडी सांभाळायचे ठरवले. इतर सर्व सायकलपटू पुढे निघाले. श्विनने आता गोप्रो कॅमेराचा लाभ घेण्याचे ठरवले.
सगळे सायकलस्वार एकामागोमाग पुढे जात असताना श्विन अभयारण्यातील ठेवा अनुभवत पुढे जात होती. वर्दळ नसल्याने संपूर्ण रस्ता पुणे जम्मू सायकलस्वारांनाच आंदण दिल्यासारखाच वाटत होता. पारोळपर्यंतचा प्रवास अगदी सुखेनैव झाला. मात्र पारोळपाशी गंधार आणि कौशिकही परत फिरणार होते. दरम्यान गंधारने पुणे जम्मू चमुमधील प्रत्येकाबरोबर स्वयंछायाचित्र काढून घेतले होते. जुनांदूरकीहुन पारोळला पोचल्यावर डावीकडे वळल्यास शिरसाड नाक्यावर मुंबई अहमदाबाद महामार्ग लागतो, तर उजवीकडे वळल्यास वज्रेश्वरी मार्गे भिवंडी वाडा रस्त्याला जाऊ शकतो. श्विनने गंधारला आल्या वाटेने परत फिरण्यापेक्षा वज्रेश्वरी मार्गे भिवंडीकडे जाण्यास सुचवले. तर आम्ही सर्वजण शिरसाड फाट्याच्या दिशेने वळलो. श्विनने सगळ्यांना आपल्या मागील सायकलपटूची काळजी घेत पुढे जाण्याची आठवण केली. शिरसाड फाट्यापासून रामकृष्ण मिशनचा आश्रम जवळ असल्याचे श्विनला माहीत होते. त्यामुळे तेथेच नाष्टा करण्याचे श्विनने योजले होते.
शिरसाड फाट्याला पोचल्यावर सगळे सायकलस्वार थांबले. आजूबाजूची मंडळी कुतूहलाने पाहू लागली. उड्डाणपुलाखाली उभे राहून एका गृहस्थाकडे रामकृष्ण मिशनची चौकशी करत असता त्याने चहा नाश्त्यासाठी आग्रह केला. समोरील क्षुधाशांतिगृहात नाष्टा करत असता त्यांची ओळख झाली. मुंबई येथील एका शाळेत निवृत्त होऊन शिरसाड जवळ स्थायिक झालेले ते शिक्षक म्हणजे कुडू सर होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. कुडू सरांबरोबर गप्पा मारताना वेळ कसा गेला हे समजलेही नाही. सर स्वतः थोड्या गडबडीत होते. एका स्पर्धेसाठी त्यांना जायचे होते. मात्र तरीही वेळ काढून त्यांनी आम्हा सर्वांबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांचा निरोप घेऊन आम्ही अहमदाबाद महामार्गाला लागलो.
मुंबई अहमदाबाद महामार्ग म्हणजे वाहनचालकांसाठी पर्वणीच. अतिशय प्रशस्त आणि गुळगळीत महामार्ग असल्याने सगळेच सायकलस्वार वेगाने पुढे जात होते.
निरुपमा भावे, मीरा, श्विन आणि त्यांच्यामागे टेम्पो चालवत गौतम अशी शेवटची फळी होती. आम्ही तिघे सायकलस्वार अधूनमधून एकमेकांच्या पुढे मागे जात असताना मनोर नाका आला. पुढे गेलेले चार सायकलस्वार जेवणासाठी इथे थांबणे अपेक्षित होते. त्यांचा अंदाज घेण्यासाठी मीरा आणि श्विनने वेग वाढवला. दोघांनीही उड्डाणपूल घेतला नाही. मात्र उड्डाणपुलाखाली श्विनच्या रबरी नळीने 'राम' म्हटला.
बाकी सायकलपटू थोडे पुढे होतेच. त्यांना 'हॉटेल सिमला इन' मध्ये थांबायला सांगून श्विनने पायउतार होत मार्गक्रमण सुरू केले. येथून पुढे साधारण १५-२० किमी क्षुधाशांतीच काय पण पाणीही प्यायला मिळणार नाही हे श्विनला माहीत होते. त्यामुळे 'सिमला इन' मध्ये सगळ्यांनी उदरभरण केले. मात्र श्विन आता जखमी असल्याने टेम्पोत उभी राहणार होती. त्यामुळे श्विन ऐवजी फुजीला संधी मिळाली. श्विन ही MTB म्हणजे mountain bike या श्रेणीतील असल्याने कच्च्या रस्त्यानेही जाऊ शकत असे. तर फुजी रोड बाइक होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्णी लागल्याने फुजी चांगलीच खुलली. गुळगुळीत महामार्गावर फुजी झोकात पुढे जात होती. तिच्याबरोबर आणखी सहा सख्या होत्याच. महामार्ग चांगलाच रुंद होता, तर दोन्ही बाजूला घनदाट झाडे होती.
येथील प्रदेश म्हणजे वाघ्यादेवाचा प्रदेश! वारली समाज मुख्यतः डहाणू, तलासरी येथील जंगल आणि डोंगराळ प्रदेशात आढळतो. येथील गावांमध्ये मोठमोठ्या झाडांच्या सानिध्यात गावदेवाचे मंदिर असते. दरवर्षी कापणी नंतर गावदेवाची पूजा केली जाते. त्यामध्ये वाघ्यादेव म्हणजे 'वाघ देवता', कणसरी म्हणजे कणसांची देवता आणि इतर देव देवतांची पूजा केली जाते.
वाघ्यादेवाच्या प्रदेशात वाहतूक मात्र तुरळक होती. मनुष्यवस्तीही नव्हतीच. मध्येच थोडाफार चढ लागत होता. पुढे लांबलचक उतार आहे, असे सांगत फुजी सगळ्यांचा उत्साह वाढवत होती. सगळेजण शांतपणे पण निग्रहाने मार्गक्रमण करत होते. पुढे उतारावरून वेग घेत सर्व सायकली चारोटी जवळील टोळनाक्याला पोचल्या. इथे पाण्याची बेगमी करण्यासाठी एक थांबा घेतला
आता चहासाठी सगळे आतुरले होते. तेथून कूच करत सगळ्यांनी महामार्गालगत असलेले महालक्ष्मी मंदिर गाठले. मंदिराशेजारी अनेक क्षुधाशांतिकेंद्र व इतर दुकाने होती. मंदिराच्या रस्त्याला लागल्यावर पहिल्याच क्षुधाशांतिकेंद्रावर सगळ्या स्वारांनी चहाचा आस्वाद घेतला. पृथ्वीवरील अमृतपानाचा लाभ झाल्यावर सगळे ताजेतवाने झाले होते. आजचे गंतव्यस्थान तलासरी आता नजीकच होते. महालक्ष्मी मंदिर सोडून महामार्गाला लागल्यावर चांगलाच उतार सुरू झाला. फुजीने आता आघाडी घेतली. इतर सर्व सायकलस्वार पाठीमागून येत आहेत याची खातरजमा करतच फुजी वेग घेत होती. धुंदलवादी मागे टाकून दापचरी येथील टोळ नाक्याला सगळे सायकलस्वार एकत्र येण्यासाठी फुजीने वेग मंदावला. येथील टोळनाका चांगलाच रुंद आहे. तो महाप्रचंड टोळनाका मागे टाकून सायकलस्वार पुन्हा पुढे निघाले.
वाटेत नारळपाणी पिण्याचा मोह मात्र कोणालाच आवरला नाही.
नारळपाणी घेऊन पुन्हा सर्व स्वार एकापाठोपाठ जाऊ लागले. आता सगळ्यांनाच गंतव्यस्थानी पोचण्याची आस लागली होती. मात्र आजचे गंतव्यस्थान फुजीलाच माहीत असल्याने पुन्हा फुजीने आघाडी घेतली. संथ मात्र जागरूकपणे आजूबाजूचा कानोसा घेत फुजी जात होती. तलासरी जवळ येत होते. ओळखीची खूण पटू लागली. फुजी आणि पाठोपाठ इतर सहा सख्या सेवा रस्त्याला लागल्या आणि महामार्गाखालून इंग्रजी U आद्याक्षराप्रमाणे वळण घेत सगळेजण आजच्या गंतव्यस्थानी पोहोचले... समोर आम्हा सर्वांचे स्वागत करत होते 'वनवासी विकास प्रकल्प, तलासरी'!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा