खजिन्याची लूट
भारतीय राष्ट्रीय दिनांक (अर्थात जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडर नुसार तारीख)भारतीय सौर १२ मार्गशीर्ष, शके १९३९
हिंदू तिथी मार्गशीर्ष पौर्णिमा, शके १९३९
डोंबिवली शहरच नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा बराचसा भाग उल्हास नदीने जिवंत ठेवला आहे. या नदीच्या खोऱ्यात विपुल जैवविविधता तर आहेच, पण अनेक मानववंशसुद्धा सामावले आहेत. उल्हास नदीच्या या अथांग संपन्नतेची जपणूक करणे आणि ती जगासमोर आणणे हा ध्यास घेऊन #कल्याण #मुरबाड रस्त्यावरील #रायते या गावातील Avinash Harad हा तरुण जीवाचे रान करत आहे.
#dombivlicyclingclub (DCC) चे सदस्य नवीन खजिन्याच्या शोधात असतातच. रविवार हा तर त्यासाठी हक्काचा दिवस. आज मार्गशीर्ष पौर्णिमेचा (दत्तजयंती)मुहूर्त साधत DCC ने अविनाशच्या खजिन्याची लूट करायचे ठरवले. अविनाश तर त्याच्या खजिन्याची उधळण करायला केव्हाही तयार असतोच. त्याला फोन करून कळवताच त्याने आनंदाने आणि आग्रहपूर्वक होकार दिला होताच.
मग काय DCC चे शिलेदार सज्जच झाले. टिटवाळा येथील गांपतिमंदिर हे DCC सदस्यांचे आवडते ठिकाण. तेथून जवळच अविनाशचे संग्रहालय उभे राहत असल्याने दोन्हीचा लाभ एकत्रितरित्या मिळणार होता.
मार्गशीर्षातील प्रभातकाळी DCC तील जुन्या सदस्यांबरोबरच काही नवीन सदस्यही जमले होते. सूर्यनारायण अद्याप दक्षिण गोलार्धातील दक्षिण टोकाकडे जात असल्याने त्यांची किरणे अद्याप उपस्थिती दर्शवत नव्हती. मात्र उगवती अगोदरच गणपती मंदिराजवळ ठरलेल्या वेळेत DCC सदस्य उत्साहाने दाखल झाले. देवने जमलेल्या सदस्यांचे फोटो काढल्यावर सर्वजणांनीं आपापल्या सायकली दामटवायला सुरुवात केली. वाटेत इतर काही सदस्य दाखल होतच होते.
Pushkar Joshi, Sumit Mokal Vaishal Dharamsey , या DCC तील मुरब्बी सायकलपटुंबरोबरच Shrikrishna Gawas , abhi kamathe Swapnil Satam, Yogesh Dhage, Alpesh Pasad ,Shubham Nagle हे उत्साही सायकलपटूही हजर होते. दुर्गाडी किल्ल्याजवळ Durgesh Zipre आणि Nayana Agharkar सामील झाले तर पुढे Gajanan Keshav Vaidya (विलास) सामील झाल्याने आमच्या ताफ्याला आणखी ऊर्जा मिळाली.
दुर्गाडी किल्ला, शहाड पूल, शहाड विठ्ठल मंदिर पार केल्यावर निसर्ग आमच्याशी बोलू लागला. त्याने काय आणि किती खजिना उघड करावा ह्याला मर्यादाच नव्हती. लहानपणी चित्र काढायचे म्हटले की दोन तीन त्रिकोण आणि मागे अर्धगोल काढून डोंगरामागून उगवणारा सूर्य हे चित्र बरेचजण काढतात. निसर्गाने ह्या डोंगरामागून उगवणाऱ्या सूर्याचे खरे अप्रतिम रूप आज आम्हाला मोकळया हवेत उघड केले. काल रात्री चतुर्दशीच्या चंद्राचे विलोभनीय रूप तर आज पहाटे डोंगरामागून उगवणाऱ्या सूर्याचे रूप!
पांचवा मैल पार करून उल्हास नदीच्या पुलावर जाताच सर्वजण एकामागोमाग जागेवरच खिळले. नदीपात्रात पडलेले सूर्यबिंबाचे दर्शन सर्वाना मोह पाडत होते. अखेरीस मनाला मुरड घालत आम्ही टिटवाळा येथील गांपतिमंदिरापाशी पोचलो. अविनाश आम्हाला घ्यायला तिथे आला होताच. आम्ही मंदिराहून अविनाशबरोबर संग्रहालायकडे जाणार त्याआधीच ममता आणि Vikas Nagda हेही हजर झाले.
संग्रहालयाबाहेर छोटीशी ओळखपरेड करून आम्ही आत शिरलो. अविनाशच्या संग्राहक वृत्तीबरोबरच त्याची ओघवती वाणी सर्वांना मंत्रमुग्ध करत होती. कोणताही आडपडदा न ठेवता तो संग्रहालयातील विविध वस्तूंबरोबर उल्हास नदीच्या खोऱ्यातील प्राचीन संस्कृती, विविधता यांबरोबर ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, सागरी खजिना यांच्या माहितीचा खजिना आमच्यासमोर उघड करत होता. सर्वजण त्याच्या ज्ञानामुळे तृप्त होत होते. खरेतर कोणालाही पुन्हा बाहेर पडावेसे वाटत नव्हते, पण आम्ही पुन्हा पुन्हा परत येऊ याची अविनाशला ग्वाही देतच सर्वजण बाहेर पडले.
अविनाशच्या वाणीपुढे लपलेली भुकेची जाणीव परतीच्या प्रवासाला प्रारंभ करताच जागृत झाली. मग मात्र प्रत्येकजण आपली जिव्हा आणि जठराग्नी तृप्त करूनच परतीचा मार्गाला लागला.
#tjsbbank #saveoursahyadri

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा