चिंतन शहा - एकदम हसतमुख आणि शांत स्वभावाचा. तो फार बोलत नाही. एकदा #dombivlicyclingclub (DCC) च्या सदस्यांबरोबर रविवारच्या नियमित राइडसाठी गेलो असता भेटला. श्विन दर आठवड्यात एकदातरी #cycle2work करते हे त्याला माहित होतेच. श्विनकडे पाहत त्याने विचारले ," काय रे, किती कि.मी. झाले आत्तापर्यंत?"
खरे तर मी अंतर कधीच मोजत नव्हतो. आपण केवळ पॅडल मारावे. अंतर मोजायची मी कल्पनाच केली नव्हती. पण त्याच्या ह्या प्रश्नाने विचार आला की काय हरकत आहे अंतर मोजायला!
त्यामुळे मी #strava च्या साहाय्याने सायकलिंगचे अंतर मोजणे २०१६ या वर्षी सुरु केले. दरम्यान जुलै २०१६ मध्ये मुंबई गोवा मध्ये cycle2work (C2W) अशी स्पर्धा घेण्यात आली. त्यात माझे रोज घर- ऑफिस-घर असे ६२ किमी सायकलिंग सुरु झाले. मी त्यात २रा क्रमांक पटकावला. त्यानंतर डिसेम्बर २०१६ मध्ये #saveoursahyadri (SOS) ह्या मोहिमेत भाग घेतला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच जण आपले वर्षाचे उद्दिष्ट ठरवतात.
भारतीय क्रिकेटला सन्मान प्राप्त करून देणारा आणि निवृत्त होताना विक्रमांचा विक्रम रचून ठेवणारा शैलीदार फलंदाज Sunil Gavaskar हे माझे अत्यंत आदराचे स्थान. गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२. त्यांच्या प्रेमापोटी तसेच C2W आणि SOS च्या अनुभवाच्या जोरावर २०१७ या ग्रेगोरियन वर्षाचे ध्येय मी ठरवले ते सुनीलच्या एकूण कसोटी धावांइतके कि.मी. म्हणजे १०१२२ कि. मी. सायकलिंग करणे.
जानेवारी २०१७ पासून श्विनची दौड जोमाने सुरु झाली. जे व्यसन आपल्याला लागले ते इतरांना लागावे यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतातच. सर्वाना नियमित सायकलिंगची गोडी लागावी यासाठी मी २१ दिवसांची एक मोहीम आखली. त्यात २१ जणांनी भाग घेतला. मोहीम यशस्वी झालीच. पण त्यातील २१ जणच नव्हे तर इतर सायकलिस्टसुद्धा प्रेरित झाले होते. शिवाय याआधी सायकलिंग कडे न वळलेलेही सायकलिंग बद्दल विचारू लागले होते. यामुळे माझा उत्साहही चांगलाच वाढला.
त्या उत्साहात श्विनची नियमितता वाढली होती. पहिल्या ४ महिन्यातच ५००० किमी सायकलिंग पूर्ण झाले होते. त्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला होता. या दरम्यान #cycle2work वर पूर्ण भर दिला होता. डोंबिवली -ठाणे - डोंबिवली लोकलप्रवासात होणारा त्रास वाचवून हेच अंतर रोज श्विनबरोबर पार करताना स्वतःशी व्यक्त होण्याची, स्वसंवाद साधण्याची संधी तर मिळाली होती. शिवाय रोज निसर्गाचे नवनवीन मुड पाहण्याची आणि मुख्य म्हणजे रोजच पिकनिकची मजा लुटण्याचीही संधी मिळत होती.
घर- ऑफिस-घर या प्रवासातच व्यायामही होत असल्याने व्यायामासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नव्हता आणि आरोग्यही चांगले राखता येत होते. याशिवाय श्विनच्या सफारीबद्दल लिहीण्याचाही छंद जडला. DCC चे सदस्य, शाळा- कॉलेजमधील मित्रमैत्रिणी, Tjsb Sahakari Bank मधील सहकारी, आप्तस्वकीय यांनी केलेल्या कौतुकामुळे श्विनसफारीबरोबरच लेखनाची खुमखुमीही वाढत राहिली. त्या लेखांमुळे आम्हालाही नियमित सायकलिंगची प्रेरणा मिळते असा अभिप्राय सुखावत होताच, पण खरेतर त्या लेखांमुळे माझेही सायंकलिंग नियमित होऊ लागले होते.
गावस्करांनी पहिल्याच मालिकेत केलेल्या भरघोस धावांप्रमाणेच श्विननेही पहिल्याच महिन्यात चांगला पल्ला गाठला.
पहिल्या ४ महिन्यातच जवळपास निम्मे अंतर पार झाल्याने वार्षिक ध्येय गाठण्यासंबंधी मी निर्धास्त होतो. वैशाखातही श्विन थांबायला तयार नव्हती. मात्र गावस्करांची बॅट जशी अचानक रुसली होती त्याचप्रमाणे महिन्यात तब्बल १० वेळा श्विनचे टायर पंक्चर झाल्याने मी कंटाळलो होतो. #cycle2work ला ब्रेक लागलाच पण रोजचे सायकलिंगही अनियमित झाले. जुनमध्येही सूर गवसेना.
सुनील गावस्कर यांचा जन्मदिवस १० जुलै जवळ येऊ लागल्याबरोबर श्विनला पुन्हा लक्ष्य खुणावू लागले. श्विनची दौड पुन्हा सुरु झाली. मात्र तेवढ्यात घात झाला. पायाला झालेल्या जखमेमुळे १३ ऑगस्टपासून पुढील २ महिने मला सायकलिंग करता आले नाही.
काम - काळ-वेग ह्या त्रैराशिकाचे गणित शाळेत मला आवडत असे. ते डोक्यात ठेवून लक्ष्य किती अंतरावर आहे हे आठवत मी रोजचा दिवस ढकलत होतो. श्विनबरोबर लेखणीही थांबली होती. मात्र DCC सदस्य मला लेखणी थांबवू देईनात. मग मी जगप्रवास करत असलेल्या मॅट आणि जेस्सी बद्दल लेखणी सुरु केली. त्यामुळे श्विनसफारी थांबली असली तरी माझा आत्मविश्वास कायम राहिला.
ऑक्टोंबरच्या मध्यास श्विनसफारी पुन्हा सुरु झाली. Cycle2work ही जोमाने सुरु झाले, मात्र नोव्हेंबरमध्ये अनाकलनीय कारणांमुळे cycle2work थांबवावे लागले.
मग सकाळ संध्याकाळ #dombivli हुन #thakurli येथे जाऊन ९० फुटी रस्त्यावर सायकलिंग सुरु केले. सकाळचे सायकलिंग करताना Pushkar Joshi, Vaishal Dharamsey अनेकदा भेटत होते. सकाळचे १.५-२ तास सायकलिंग करून ऑफिसला जायचे आणि ऑफिसहून घरी आल्यावर पुन्हा ९० फुटी रस्ता गाठायचा हा दैनंदिन कार्यक्रम सुरु झाला. गन्धार डोम्बिवलीकर, Arnav Kulkarni Marcella, Rohan Sakhare हे संध्याकाळी नियमित भेटत होते. त्यामुळे cycle2work बंद झाल्याची खंत कमी होऊन सकाळी आणि संध्याकाळी ९० फुटी रस्त्यावर सायकलिंग करण्याची मजा येऊ लागली.
१०००० चा जादुई आकडा जवळ आला होता. तेवढ्यात Sumit Patil, Prashant Gautam Nanaware, Ashish Agashe या मित्रांनी घाटाचा राजा Ashok Khale यांना श्रद्धांजली म्हणून आखलेल्या #khopoli - #khandala - #खोपोली या सायकलमोहिमेविषयी कळले. Sanjay Datye यांच्या बरोबर डोंबिवली- खोपोली - खोपोली सायकलिंग करत घाटाच्या राजाला मानाचा मुजरा करण्याचे ठरवले. लोकलने खोपोली पर्यंत जायचे ठरवून डोंबिवली स्टेशनवर गेलेली ममता एका फोन कॉल वर आम्हाला सामील झाली. पुढे पळस्पे फाटा येथे #YHAI KANDIVALI मधील Arvind Sahasrabuddhe, Sunil K Gadgil, Rajendra Dusharekar हेही भेटले. मग मात्र खंडाळा पर्यंतचा प्रवास अतिशय सहजतेने झाला. संजय दात्ये ह्यांनी साथ दिल्यामुळे आम्ही खंडाळा डोंबिवली अंतरही सायकलिंग करत पार केले. ह्या प्रवासात अशोक खळे यांची स्मृती सतत जाणवत होती. डोंबिवली- खोपोली- डोंबिवली ह्या दिडशतकी सायकलिंग मोहिमेबरोबर १०००० किमी सायकलिंगही पूर्ण झाले. पुढच्या दोन दिवसातील सकाळ संध्याकाळच्या ९० फुटी रस्त्यावरील श्विनसफारीमुळे सुनील गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२ इतके कि.मी. अंतर सायकलिंग करण्याचे ध्येयही गाठले ते १२ दिवस राखून!
हे ध्येय पूर्ण करताना माझे लहानपणीचे दोन आदर्श -अशोक खळे आणि सुनील गावस्कर ह्यांच्या प्रती मन भारावून गेले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा