#margshirshchallange
जागतिक एकमेव शास्त्रीय सौर कॅलेंडर अर्थात जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडरनुसार तारीख भारतीय सौर मार्गशीर्ष १८, शके १९३९
हिंदू कॅलेंडरनुसार तिथी (चांद्र कॅलेंडर) मार्गशीर्ष वद्य (कृष्ण) ७, शके १९३९
ख्रिस्ती कॅलेंडरनुसार तारीख (सौर कॅलेंडर मात्र ख्रिस्ती धर्म संस्थापकाच्या जन्मतारखेनुसार तयार केलेल्या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांसाठी बनवलेले अशास्त्रीय कॅलेंडर) डिसेंबर ९, शके २०१७
जन्मतः च सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण करणाऱ्या हनुमानाच्या उपासनेचा आजचा वार म्हणजेच शनिवार! श्विनलाही आज शतकी मजल मारून आजचा दिवस साजरा करायचा होता.
पहाटेची थंडी आणि धुके यांच्या युतीमुळे श्विन सफारी थोडी उशिराने सुरु केली. #dombivlicyclingclub च्या सदस्या @nayana agharkar त्यांची रोड बाइक घेऊन आधीच निघाल्या होत्या. सकाळच्या प्रहरी शिक्षणसाम्राज्याची तथाकथित ज्ञानमंदिरे सुरु होण्याच्या वेळेस श्विनने घरातून प्रस्थान केले. शहरातील वाहतूक सुरु झाली असल्याने संथ गतीने श्विन शहराबाहेर पडली. बऱ्याच दिवसांनी मानपाडा रस्त्यामार्गे बाहेर पडत होतो. रिक्त झालेल्या शनिमंदिराच्या समोर अनेक दिवसांनी गायवासरांचा कळप येताना दिसल्याने जुने सवंगडी भेटल्याचा आनंद झाला. दिवसाची सुरुवात तर छानच झाली होती.
आज नेरळ नगरी पर्यंत जाऊन येण्याचा मानस होता. कल्याण शिळ रस्त्याला लागल्यावर श्विनला लय सापडली. श्विनने लगोलग बदलापूर पाइपलाइन महामार्ग गाठला. सुरवातीपासूनच धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसत होते. श्विनच्या पॅडल किती वेळा मारले की किती अंतर पार होते याचे गणित अनुभवाने माहित झाले होते. अंदाजे १५० मिटरपुढील काहीही दिसत नव्हते. श्विनची चाल थोडी मंदावली. कोळेगाव पार केल्यावर थोड्याच अंतरावर नयना मॅडम जाताना दिसल्या. धुक्याचा अंदाज घेत आम्ही दोघंही संथगतीने पुढे सरकत होतो. काही वेळातच धुके कमी होईल या आशेवर आमची मजल दरमजल सुरु होती. तळोजा फाटा - नेवाळी फाटा पार करत आम्ही पुढे पुढे जात होतो. अंबरनाथ औद्योगिक परिसर सुरु होताच धुके अधिकच वाढल्याची जाणीव झाल्याने आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला.
धुक्याच्या परिणामी विमानांना टेक ऑफ अथवा लँडिंग करता न आल्याने घिरट्या माराव्या लागतही असाव्यात. मात्र आजतर धुक्यामुळे श्विनला टेकऑफ (!) साठी बदलापूर पाइपलाइन महामार्गावर घिरट्या मारण्याची वेळ आली होती.
परत फिरताना नेवाळी नाका येथे चहापानाचा कार्यक्रम उरकून आम्ही पुन्हा कोळेगावपर्यंत मागे आलो. तिथे नयना मॅडमचा निरोप घेऊन श्विन पुन्हा अंबरनाथ औद्योगिक परिसराकडे निघाली. एव्हाना ९.१५ वाजले होते. दरम्यान मिनिटभरासाठी आपले मुखकमल दाखवून सूर्यमहाराज पुन्हा धुक्याच्या दुलईत गुरफटले होते. त्यांचे मुखकमल इतके म्लान होते की ते प्रत्यक्ष सूर्यमहाराज आहेत की पौर्णिमेचा चंद्र गगनभरारी घेत आहे हे समजत नव्हते.
अंबरनाथ औद्योगिक परिसरातील हॉटेल वैभव येथे नाष्टयाच्या लाभ घेत धुके कमी होण्याची कल्पना मात्र यशस्वी झाली. माझा नाश्ता झाल्यावर धुक्याची चादर बाजूला सारून सूर्यमहाराज पुन्हा अवतरले होते. दरम्यान इंधन भरले असल्याने श्विनलाही गती प्राप्त झाली. सूर्य पूर्ण तेजाने झळकत नसला तरी आता पूर्ण दृश्यमानता अनुभवाला येत होती. बदलापूर जवळ आल्यावर 'नेरळ २० किमी' हा फलक दिसल्यावर श्विनची नेरळ गाठण्याची इच्छा पुन्हा तीव्र झाली. मनुष्यशक्तीच्या इंधनाचा पुरवठा योग्य गतीने होत असल्याने श्विनने वेग पकडला होता. हा हा म्हणता श्विनने नेरळ गाठले. आजचे ध्येय गाठल्यामुळे तो आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा पृथ्वीवरील अमृताचा लाभ घेतला. दरम्यान सूर्यमहाराज त्यांच्या सहस्त्र नेत्रांनी त्यांच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव करून देऊ लागले होते.
चेहऱ्यावर पाणी मारून आणि ओला रुमाल नाकाला बांधून मी परतीचा प्रवास सुरु केला. अर्थात ही एकल दौड असल्याने वाटेत कुठेही आणि कितीही वेळ थांबण्याची मुभा होतीच. मात्र कोणतीही दौड पूर्ण करताना ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेत ती पूर्ण करणेही महत्वाचे असते. श्विनला मनुष्यशक्तीच्या इंधनाचा पुरवठाही योग्य गतीने होत असल्याने श्विनची दौड सुरु राहिली. मनुष्यशक्तीचे इंधन राखीव (reserve) पातळीपर्यंत खाली येण्याची वाट न पाहता मी परत हॉटेल वैभव येथे नाश्ता आणि अमृतपानासाठी थांबलो. पोटातील कावळे/पेटके चुहे/ butterflies in stomach याना कोणतीही संधी न देता मी जठराग्नी सुरु होण्या आधीच त्यात मेदूवड्याची आहुती दिली.
तेथून निघाल्यावर मात्र श्विनची गती मंदावली. तळोजा फाटा पार केल्यावर पुन्हा सेवा रस्त्याने कोळेगाव येथे पोचेपर्यंत श्विन आणि माझी आणखी एक शतकी भागीदारी पूर्ण झाली होती. त्याच समाधानात श्विन घरी परतली
#tjsbbank #cyclingzens #ismartcommute

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा