'To be or not to be' is the question. 'Cycle2work' or 'no cycle2work' हे द्वंद्व मनात अनेक दिवस चालू होतं. Cycle2work म्हणजे उत्साहपूर्ण जीवन आणि no cycle2work म्हणजे आळसयुक्त जीवन हि संकल्पना मनात निश्चित होती.
शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी cycle2work बंद करतो. पुन्हा शाळा सुरु झाल्या की पुन्हा cycle2work सुरु करतो. मात्र ती सुरुवात होऊन यावर्षी पुन्हा cycle2work ला लगेच ब्रेक लागला होता.
Cycle2work, palva cycle2work, nisarg cycle mitra, DCC या समाजमाध्यमांवरील गटांमध्ये सायकलिंग संबंधित येणारे रोजचे संदेश अस्वस्थ करत होते.
माझे आळशी मन cycle2work सुरु करताना निरनिराळी कारणं पुढे करत होतं. Cycle2work ची तयारी करूनही श्विनचे कुलूप काही निघत नव्हते. मात्र TJSB मधील अरविंद जोशी, प्रशांत इंगवले, चिन्मय जोशी, किशोर कुवळेकर, शेखर बापट हे आणि इतर मित्र तसेच जितेंद्र वैद्य सारखे सायकलमित्र वेळोवेळी ऑफिसला आज सायकलने आलास का , याची चौकशी करत होते.
माझे आळशी मन आणि कृतिशील मन यातील द्वंद्व आज सकाळीही सुरु होते. जवळपास दोन आठवडे आळशी मनाचा विजय होत मी ट्रेनने ऑफिसला येत होतो. ऑफिसला आल्यावर मात्र श्विनला का आणले नाही याविषयी मन खट्टू होत होते. आजही दोन्ही मनांचे जोरदार द्वंद्व सुरु झाले. आज कोणाचा विजय होणार, कोणता निर्णय होणार हे मला शेवटपर्यंत कळत नव्हते. कृतिशील मनाचे ऐकून मी cycle2work साठी तयार होत होतो. आळशी मनाचे पारडे कमी होऊ लागले तसे त्याने अखेरचा उपाय म्हणून घड्याळबाबांकडे बोट दाखवले. पण कृतिशील मनाने ते मनावर न घेता विजय मिळवला. अखेरीस मी श्विनला बंधमुक्त केले आणि आमची ऑफिसकडे दौड सुरु झाली.
जेष्ठ पौर्णिमेला आळशी मनावर कृतिशील मनाने विजय मिळवला होता. बऱ्याच दिवसांनी एका जागी उभी राहिल्याने श्विनलाही आळसावल्यासारखे झाले होते. श्विन आणि मी एकमेकांचा अंदाज घेत पुढे सरकत होतो. ठाकुर्ली येथील रेल्वेवरून जाणारा उड्डाणपूल नव्यानेच सुरु झाल्याने तेथून जाताना श्विन खुश होती. मर्यादित वेगाने ९० फुटी रस्त्यामार्गे श्विनने दुर्गाडी किल्ला गाठला. शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुजरा करत श्विनने दुर्गाडी पूलाच्या दिशेने वळण घेतले. तेथे मात्र अश्वशक्तीधारी वाहनांची भाऊगर्दी झालेली दिसत होती. महाराजांचाच गनिमी कावा उपयोगात आणून श्विनने ती कोंडी सहजरीत्या फोडली आणि कोनगाव गाठले.
कोनगावात रस्त्याची दैना उडालेली दिसत होती. सर्व वाहने जलयुक्त खड्डे (की शिवार?) टाळत सावधतेने पुढे सरकत असल्याने इथेही रेंगाळत होती. श्विनने वेग कमी करत आणि अंदाज घेत सरळ त्या जलयुक्त खड्डयांमधून धाव घेत पुन्हा सर्व अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकले. कोनगाव मागे पडल्यावर मात्र मार्ग निर्धोक होता. नाशिक ठाणे रस्त्याला लागताच मी ठाण्याच्या क्षितिजाकडे नजर टाकली. तेथून ठाणे जवळपास १६ किमी अंतरावर होते. गेल्या वर्षीचा अनुभव जमेस धरता आणि क्षितिजावरील दृश्य पाहता ठाण्यापर्यंत पावसाची शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे मी निर्धास्त झालो. मानकोलीनंतर थोडा शिडकावा होऊ लागताच मी पुन्हा क्षितीजाकडे पाहिले. ठाण्याच्या दिशेकडून वारा येत होता. याचा अंदाज घेत पावसाचा जोर वाढणार नाही हे स्पष्ट होत होते.
त्यामुळे येणारे दोन चार शिंतोडे अंगावर घेत श्विनने प्रवास सुरूच ठेवला. पुढे डाव्या बाजूला मुंब्रा येथील डोंगररांगा हिरवा रंगात रंगल्या होत्या. ते दृश्य मन मोहून टाकत होते. त्याबरोबर श्विनचा उत्साहही वाढत होता.
निसर्गाची उधळण मनात साठवत ठाणे कधी गाठले हे कळलेही नाही. ऑफिसला पोचल्यावर मात्र कृतिशील मनाने मिळवलेल्या विजयामुळे आज बऱ्याच दिवसांनी cycle2work करता आले याचे समाधान लाभले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा