निधर्मी (secular) दिनांक: भारतीय सौर २२ पौष १९४०
(हिंदू तिथी : पौष शुक्ल ६, शके १९४०)
सडपातळ आणि कमनीय बांधा, नाकीडोळी नीटस, लालसर रंग असलेली फुजी घरात येऊन बरेच दिवस झाले होते. तसे पाहिले तर श्विन आणि फुजी या दोघांचे वय जवळपास सारखेच. श्विनची चाल दमदार, कोणत्याही ठिकाणी जायला नेहमी तयार. तर हायब्रीड फुजी श्विनपेक्षा चपळ आणि जलद. फुजी श्विनपेक्षा दिसायलाही देखणी!
फुजी घरात आल्यावर तर श्विनची उचलबांगडी करायचाही विचार मनात आला होता. खरतर समाजमाध्यमांवर तसा संदेशही प्रसारित केला. तो संदेश प्रसारित करून मी मुलुंड स्टेशन येथे बसमध्ये चढलो आणि छातीत शब्दशः धडधडायला लागले, श्वास अडकल्यासारखा वाटायला लागला.... न जाणो कोणी श्विनला मागणी घातली तर! बसमधून उतरेपर्यंत अक्षरशः जीवाची घालमेल होत होती. जीवाचा तुकडाच तो.. तो असा कोणाला द्यायचा? मी वागळे इस्टेट येथील रोड नं १६ या थांब्यावर उतरलो तोवर पुष्करचा 'श्विनची उचलबांगडी करू नकोस' असा संदेश आला होताच. इतक्यात मेघेशचा फोन आलाच.... 'शशांक, श्विन तुझ्याकडेच राहू दे. श्विनला दूर करू नकोस. श्विनने तुला खूप चांगली साथ दिली आहे, यश दिले आहे'. माझ्या मनाची घालमेल मी न सांगताच दूर अंतरावर असूनही जिवाभावाच्या दोन्ही मित्रांना जणू समजली होती. मी तर जणू या दोघांच्या संदेश/ फोनची वाटच पाहत होतो. मी तात्काळ मेघेशला म्हटले,'नाहीरे, मी श्विनला दूर करणार नाही. अरे, 'श्विन' हीच तर माझी ओळख आहे'. खरोखरच सायकलजगतातच नव्हे तर इतरत्रही माझी ओळख शशांक म्हणून नव्हे तर श्विन म्हणूनच झाली होती. मी श्विनला दूर करणार नाही असे मेघेशला सांगताच माझ्या छातीतील धडधडही थांबली, श्वास पुन्हा मोकळा झाला.
अर्थातच, काही चूक नसूनही नव्याने घरात आलेल्या फुजीकडे दुर्लक्ष होऊन पुन्हा श्विनचेच कौतुक सुरु झाले. फुजिला उद्या फिरायला नेऊ, आज श्विनलाच घेऊन जाऊया असे करता करता बरेच दिवस झाले. MTB घराण्यातील श्विनवर माझा अधिक विश्वास. हायब्रीड घराण्यातील सदस्यांवर मी सहजी विश्वास ठेवायला तयार नव्हतो. फुजी मात्र काहीही तक्रार न करता शांत होती. तिला केवळ एक संधी हवी होती. आज ख्रिस्ती कॅलेंडरच्या महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने कार्यालयात जायचे नव्हते. मग अस्मादिकांनी श्विनबरोबर नेवाळी फाट्याला फिरायला जायचे ठरवले. सकाळची आन्हिके उरकून मी गच्चीमध्ये उभ्या असलेल्या श्विनकडे गेलो. श्विनशेजारीच इतके दिवस दुर्लक्ष झालेली फुजी उभी होती. श्विनसह फुजीची विचारपूस करू लागताच ती लगेचच खुलली. बरेच दिवस एका जागी थांबूनही फुजी आळसावलेली नव्हती. नेवाळी फाट्याला जाण्यासंबंधी विचारताच फुजी ताबडतोब तयार झाली. ती उत्साहात पुढे येताच श्विनसुद्धा समजूतदारपणे जागेवर थांबली. फुजीला बाहेर नेण्यासाठी तयार व्हायलाही विशेष वेळ लागला नाही. मुळातच खानदानी देखणेपण असल्याने तिला फार नट्टापट्टा करावा लागला नाही.
फुजीची डोंबिवली शहरातील आज पहिलीच दौड होती. हायब्रीड घराण्यातील फुजीची दौड सावधपणेच सुरु झाली. आम्हा दोघांनाही एकमेकांची सवय नव्हती. एकमेकांचा अंदाज घेत डोंबिवली शहर आम्ही मागे टाकले. एव्हाना फुजीने लय पकडली होती. पेंढरकर महाविद्यालयावरून पुढे जात फुजीने कल्याण शिळ रस्ता गाठला. तेथे तिच्या हायब्रीड घराण्यातील वैशिष्ट्येे ती सहजतेने दाखवू लागली. काटई नाका येथे डावे वळण घेत फुजीने बदलापूर पाइपलाइन रस्ता पकडला.
दक्षिणेच्या टोकाकडून परतीच्या प्रवासाला लागून सूर्याला अजून महिना व्हायचा असल्याने सूर्यकिरणे आल्हाददायक वाटत होती. सूर्योदयानंतर दोन तास होऊनही काटई नाक्यापुढे धुक्याची चादर पसरलेली दिसत होती. मात्र फुजी थांबायला तयार नव्हती. पहिलीच एकत्र दौड असूनही फुजी आणि माझे सूत सहजच जुळले होते.
फुजीने अंबरनाथ औद्योगिक परिसर मागे टाकत बदलापूर शहराकडे धाव घेतल्यावर मात्र मी फुजीचा लगाम खेचला. सहजच एकंदर अंतर आणि वेळेचा अंदाज घेतला तर एकमेकांचा अंदाज घेत सावध सुरुवात करूनही फुजीने तिच्या हायब्रीड घराण्याचे नाव राखत श्विनच्या सरासरी वेगापेक्षा जवळपास २०- २५% अधिक वेग राखला असल्याचे जाणवले. शिवाय अजूनही फुजीला विशेष श्रम झाल्याचे जाणवत नव्हते. तेथून मात्र माघारी फिरवत मी फुजीला परतीच्या मार्गाला लावले. फुजीची काहीही तक्रार नव्हती. अवखळ श्विन बऱ्याचदा माझ्या नकळत दिशा बदलू न देता पुढे जात असे. पहिल्याच फेरीत तरी फुजीने असा विचार केला नव्हता... किमान आचरणात तरी आणला नव्हता. परतीच्या प्रवासातही फुजीने वेग कायम राखला. संधी मिळाल्यावर हायब्रीड घराण्याचे नाव सार्थ करत वेगवान दौड करणाऱ्या फुजीने पहिल्याच फेरीत घरी येईपर्यंत नाबाद अर्धशतकी दौड पूर्ण केली होती.. तेही दिवसभराच्या पहिल्या सत्रातच! फुजीची हि अर्धशतकी दौड विनाथांबाही होती, तरीही घरी पोचल्यावर फुजी ताजीतवानी होती.
दिवसातील दुसरे सत्र अजूनही बाकी होतेच. मात्र दिवसातील दुसऱ्या सत्रात स्कॉटबरोबर श्विनला संधी द्यायची की फुजीला पहिल्याच दिवसात शतक साजरे करायची संधी द्यायची हे अवघड कोडे अस्मादिकांना पडले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा