भा रा भागवत यांचा कथानायक फास्टर फेणे हा माझा लहानपणचा आदर्श! त्याचे कारनामे वाचताना मी गुंग होत असे. त्याच्याचमुळे मला सायकलिंग ची आवड निर्माण झाली होती. मात्र सायकल चालवण्याची कला मला महाविद्यालयामध्ये गेल्यानंतरच साध्य झाली. साधारण १९८६ च्या सुमाराला मला माझी पहिली सायकल मिळाली. ती होती काळ्या रंगाची हिरो सायकल! तेव्हापासून सायकलचे आणि माझे अतूट नाते सुरू झाले. हिरो घरी आल्यापासून डोंबिवली शहरात फिरताना माझ्याबरोबर हिरो असणार हा अलिखित नियमच झाला होता. वीस वर्षे साथ दिल्यानंतर एका गरजू मुलाला मी हिरो भेट दिली. अर्थातच त्यानंतर माझे सायकलिंग मात्र थांबले.
त्यानंतर दोन वर्षांनी माझी चिंचवड येथे बदली झाली. सुदैवाने मला तिथे गेल्यावर दोन- तीन महिन्यातच एक मार्गदर्शक मित्र भेटला. खरतर तो आमचा पिढ्यानपिढ्यांचा स्नेही. त्याने मला व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. तो मित्र होता मधुमेह! माझी मावशी डॉक्टर निरुपमा भावे हिने मला सायकलिंग सुरू कर असा सल्ला दिला आणि मी हो म्हणतोय न म्हणतोय तोपर्यंत तिने मला सायकल घेऊनही दिली. तिच्या घरापासून माझ्या घराचे अंतर जवळपास २० किलोमीटर होते. रेल्वेने सायकल घरी आणायची तर त्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. रस्ता रेल्वे मार्गालगतच होता. मावशीने सुचवले जेवढी सायकल चालवता येईल तेवढी चालव आणि मग हवी तर रेल्वेतून ने. मात्र मी अगदी सहजपणे ते पंधरा वीस किलोमीटर अंतर सायकलनेच पार केले. दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळचे सायकलिंग सुरू झाले. आठवडाभरातच रोज तीस किलोमीटरची सकाळची सायकलफेरी नियमितपणे सुरू झाली. त्याच दरम्यान इंदोर झाशी ह्या साधारण एक हजार किलोमीटर अंतराच्या सायकल फेरीचा आनंदही घेतला.
तीन वर्षांनी माझी बदली पुन्हा ठाणे येथे झाली. मी परत डोंबिवली येथे राहू लागलो. मात्र डोंबिवलीतील रस्त्यांच्या भयानक अवस्थेमुळे माझे रोजचे सायकलिंग अनियमित झाले. मी त्यावर उपाय शोधून काढला. मी आठवड्यातून एकदा डोंबिवलीहुन ठाण्याला ऑफिसला सायकलने जाऊ लागलो. तसेही चिंचवडहून परत आल्यावर लोकलची वाढलेली गर्दी त्रासदायक वाटत होतीच. लोकलने ऑफिसला जाताना होणारी धक्काबुक्की, लोकांचे शिव्याशाप, लोकलची रोजची अनियमितता ह्यावर cycle2work हा उपाय छानच होता. हळूहळू मी जवळपास रोजच cycle2work करू लागलो. लोक वर्षातून एकदा किंवा महिन्यातून एकदा किंवा फारतर आठवड्यातून एकदा सहलीला जातात. मात्र cycle2work मुळे मी रोजच सहलीला जाऊ लागलो. ह्याचबरोबर वर्षातून एकदोनदा ५०० किमी किंवा अधिक अंतराची सायकल फेरी होतच होती.
महाविद्यालयात असताना पाहिलेले मुंबई गोवा सायकलसफरीचे स्वप्न मला पुन्हा पडू लागले होते. मी मुंबई गोवा सफरीचे नियोजन करू लागलो. मात्र सतत ४ वर्ष पूर्ण नियोजन करूनही मला ती सफर पूढे ढकलावी लागत होती. यादरम्यान मी गोवा कन्याकुमारी सायकलसफरही केली, पण मुंबई गोवा सफर काही केल्या सुरु होत नव्हती. सततच्या अडथळ्यांमुळे माझा निर्धार मात्र अधिक तीव्र होत होता. चौथ्यांदा मुंबई गोवा सफर पुढे ढकलावी लागली तेव्हा नयना आघारकर यांनी म्हटले, 'तुझे मुंबई गोवा रद्द होते आहे यामागे काहीतरी विधिलिखित असेल'.
२०१७ साली मी cycle2work करत वर्षभरात सुनील गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२ एवढे म्हणजे १०१२२ किमी सायकलिंग करण्याचे ठरवले. मात्र त्यातील चार महिने आजारपणामुळे मला सायकलिंग करता आले नाही. त्यामुळे शेवटच्या दोन महिन्यात मी ऑफिसला जाण्याआधी आणि ऑफिसहून आल्यावर परत सायकलिंगला जाऊ लागलो. डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत माझे १०१२२ किलोमीटरचे ध्येय पूर्ण झाले. मात्र ह्यादरम्यान माझा घरात राहण्याचा वेळ कमी झाला.
माझी पत्नी मीरा हिलासुद्धा सायकलिंगची आवड होतीच. मी पुण्याहून डोंबिवलीला परत आल्यावर एक जुनी सायकल तिला मिळाल्यावर ती एकदोनदा माझ्याबरोबर सायकलिंगला आलीही होती. मात्र ती सायकल जड असल्याने तिने तेव्हा सायकलिंगचा नाद सोडला होता. मात्र २०१७ ह्या वर्षातील अखेरच्या दोन महिन्यातील माझ्या रोजच्या सायकलिंगमुळे माझ्या बरोबर राहण्यासाठी तिने पुन्हा सायकलिंग सुरु करायचे ठरवले. ह्यावेळी मी माझ्या मावशीचाच कित्ता गिरवला. जसे माझ्याकडून होकारातील पहिले अक्षर बाहेर पडताच संधी साधत मला फार विचार करू न देता मावशीने सायकल घेऊन दिली होती, त्याचप्रमाणे माझ्या पत्नीने होकारातील पहिले अक्षर बाहेर काढताच मीही संधी साधली.
कल्याणला साहिर शेखच्या मार्गदर्शनाप्रमाणे घेतलेली स्कॉट मात्र माझ्या पत्नीला चांगलीच आवडली. ह्या हलक्या वजनाच्या सायकलशी ... स्कॉटशी तिची लगेचच गट्टी जमली. आठवडाभरातच तिचेही रोजचे २५-३० किमी सायकलिंग सुरु झाले. त्याबरोबर मुंबई गोवा सायकलसफरीसाठी माझ्याबरोबर येणार असल्याचे तिने जाहीर केले. मग आठवडाभर ती रोज २५-३० किमी सायकलिंग करत असे आणि दर रविवारी आम्ही दोघं एकत्र ५०-१०० किमी सायकलिंग करू लागलो. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढत होता. वैशाख महिन्याच्या रणरणत्या उन्हात डोंबिवली ते तळेगाव ही पहिली शतकी सायकलफेरी करायचे ठरले. ह्या सफरीमध्ये खोपोली खंडाळा घाटसुद्धा तिने पार केला. दर रविवारच्या सफरी सुरु होत्याच. पावसाळ्यातदेखील पुन्हा एकदा डोंबिवली तळेगाव सायकलफेरी पूर्ण केली. महड गणपती, टिटवाळा गणपती, अंबरनाथ शिवमंदिर, मलंगगड अश्या सायकलसफरी सुरूच होत्या.
मी पुन्हा डोंबिवली गोवा सायकलसफरीचा आराखडा आखला. ह्यावेळी ही सफर पूर्ण होणार ह्याचा पहिल्यापासूनच विश्वास वाटत होता. गोवा सफरीच्या तयारीसाठी मीराने माझ्या मावशीचा डॉ निरुपमा भावे यांचाही सल्ला घेतला. मावशीच्या आश्वासक सल्यामुळे मीराचा आत्मविश्वासही वाढला. ही सफर आखत असल्यापासून अनेकांचे सहकार्य लाभत गेले. एकंदर सफर ५ दिवसांची ठरवली. या सफरीदरम्यान अनेक ओळखीच्या लोकांचे मार्गदर्शन/ सहकार्य मिळत होतेच, पण कित्येक नवीन ओळखी होत होत्या आणि त्यांचेही सहकार्य वेळोवेळी लाभत होते. 'देणाऱ्याचे हात हजारो, किती घेशील दो करांनी' अशी अवस्था होत होती. डोंबिवली गोवा सफर विनासायास पार पडली.
नयना आघारकर यांचे म्हणणे खरे ठरले होते. गोवासफर मी माझ्या पत्नीबरोबरच पूर्ण व्हावी यासाठीच कदाचित यापूर्वी लांबणीवर पडत होती.
सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी शेजारी बसलेली पत्नी असो की युद्धासाठी घरातून निघताना ओवळणारी पत्नी असो, ती साथ करत असते तेव्हा कार्याला यश मिळणे क्रमप्राप्तच असते.
सावित्रीने प्रत्यक्ष यमालाही परत पाठवले होते. मग ही तर केवळ सायकलसफर होती
ह्या सफरीदरम्यान आलेल्या विलक्षण अनुभवांमुळे गोवा सफर पूर्ण होताच माझ्याबरोबर माझी पत्नीही पुढील सायकलसफरीचे स्वप्न पाहू लागली होती....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा