जगाच्या इतिहासात लागलेला सर्वात क्रांतिकारी शोध कोणता? याचे उत्तर 'चाकाचा' शोध हेच असावे. ह्या दोन चाकांच्या साहाय्याने चालणारी सायकल हे सर्व स्तरातील लोकांना जवळ आणणारे वाहन म्हणायला हरकत नाही. दुधवाले, डबेवाले यापासून पंतप्रधान पदावरील व्यक्तीपर्यंत कोणालाही सहजसाध्य असणारी सायकल ही सगळ्यांनाच समान आनंद देते.
सर्व स्तरातील सायकलप्रेमींना एकत्र येण्यासाठी, आपापल्या भूमिका/अपेक्षा मांडता येण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी 'सायकल मित्र संमेलन' ही संकल्पना मांडण्यात आली. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहराने नवनवीन संकल्पना स्वीकारताना नेहमीच पुढाकार घेतला. डोंबिवली येथे भरलेल्या पहिल्या सायकल मित्र संमेलनातच पुढील सायकलमित्र संमेलन ठाण्यात व्हावे असा आग्रह ठाणेकरांनी धरला. त्यानुसार ३ फेब्रुवारी २०१९ रोजी २ रे सायकल मित्र संमेलन ठाणे येथे आयोजित करण्याचे ठरले. सायकल ह्या संकल्पनेला धरून पूर्ण दिवस भरणारे हे पहिलेच सम्मेलन असेल.
सकाळी ७ वाजता शिवाजी मैदान येथून सुमारे १२०० सायकलपटूंच्या सायकलफेरीला सुरुवात होईल. ह्या सायकलफेरीमध्ये विविध सायकल क्लबचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक हे सहभागी असतीलच. मात्र त्याचबरोबर साता समुद्रापार कीर्ती मिळवणारे मुंबईचे डबेवाले, घरोघरी जिव्हाळा जपणारे पोस्टमन, आपल्या संरक्षणाची जबाबदारी निभावणारे पोलीस आणि एअरफोर्स मधील सदस्यही ह्या सायकलफेरीमध्ये सहभागी होणार आहेत. सदर सायकलफेरीचा समारोप डॉ काशिनाथ घाणेकर सभागृह येथे करण्यात येईल. हि सायकलफेरी निशुल्क असून सहभागी सायकल पटूंना ठाणे महानगरपालिकेतर्फे मोफत टी शर्ट, टोपी व नाश्ता देण्यात येईल. त्यानंतर डॉ काशिनाथ घाणेकर सभागृह येथे संमेलनाची सुरुवात येईल.
रिसायकल क्लब, स्वत्व आणि iCAN यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या संमेलनाला क्रीडा मंत्रालय (महाराष्ट्र राज्य), पोलीस कमिशनर ठाणे, ठाणे महानगरपालिका यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच मुंबई, ठाणे, डोंबिवली पासून पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रभरातील अनेक सायकल क्लब तसेच सुरत, अंकलेश्वर अश्या महाराष्ट्राबाहेरील शहरातील सायकलक्लबचाही सहभाग सदर संमेलनात असणार आहे. सायकल क्लब्स व्यतिरिक्त फुटार्दो'ज स्कुल ऑफ म्युझिक, FOCI, रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन, इनर्वहिल क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी, संस्कार भारती, फोर्टीस हॉस्पिटल अश्या अनेक संस्था ह्या संमेलनात सहकार्य करत आहेत.
सकाळी ८ वाजता काशिनाथ सभागृह येथे पोलीस बँड आयोजित करण्यात आला असून त्यानंतर सकाळी ८.३० पर्यंत फुटयार्दो'ज स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई द्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील. त्याचदरम्यान संमेलनासाठी नोंदणी करण्यात येऊन ८.३० वाजता प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येईल.
मा. श्री विनोद तावडे (आदरणीय अतिथी), मा. श्री एकनाथ शिंदे (प्रमुख पाहुणे), मा. सौ मीनाक्षी शिंदे, मा. श्री संजय जयस्वाल, मा. विवेक फणसळकर, मा. श्री राजेश नार्वेकर (प्रमुख पाहुणे), मा. श्री नरेश म्हस्के (स्वागताध्यक्ष), मा. श्री दीपक मेजारी (संमेलनाध्यक्ष) यांची उपस्थिती सदर संमेलनास लाभणार आहे.
संमेलनाच्या अनेक हेतूंपैकी वाहतुकीचे प्रमुख साधन, त्याचबरोबर वित्त आणि आरोग्य यामधील सामाजिक फरक दूर करणारे साधन म्हणून सायकल हा पर्याय पुढे आणण्याचा हेतूही आहेच. नागरिकांनी आपल्या वाहतुकीची समस्या, आरोग्यविषयक समस्या अश्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्यासाठी उत्तेजन देणे हाही या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे.
संमेलनाची रूपरेषा:
१)९ ते १० दरम्यान उदघाटन समारंभ झाल्यावर दिवंगत सायकलपटू खळे काका यांना श्रद्धांजली तसेच पुणे येथे सायकल संग्रहालय निर्माण करणारे श्री विक्रम पेंडसे, आशियातील सर्वात तरुण आयर्नमन श्री रविजा सिंघल यांना गौरवण्यात येईल तसेच मुलुंडकी सायकलवाली आणि मुंबईतील CYCLE2WORK ची आदर्श फिरोझा सुरेश हिचे सादरीकरण करण्यात येईल.
२) महाराष्ट्र सरकारतर्फे सायकलविषयक धोरणांची माहिती दिली जाईल
३) त्यानंतर सायकलपटूंच्या सायकलसफरीविषयक मुलाखती घेतल्या जातील.
४) आंतर राष्ट्रीय सायकलिंग संबंधीे RAAM मधील सहभागी डॉ महाजन बंधू, ले कर्नल भारत पन्नु, श्री. उल्हास जोशी, श्री. योगी, लिली पानीच (अमेरिका), पनिंग यामे ( आसाम), टाका तामुत ( अरुणाचल), श्री संतोष दुबे (एयर फोर्स, आसाम) यांच्या मुलाखती आणि मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात येईल.
५) मेकिंग ऑफ आयर्न मॅन या कार्यक्रमा अंतर्गत श्री चेतन अग्निहोत्री (आयर्न मॅन), श्री अमर मियाजी (आयर्न मॅन), डॉ मिलिंद पिंपरीकर, डॉ नेमुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन करण्यात येईल.
६) त्यानंतर सांगीतिक मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला जाईल.
७) नंतर तज्ञ सायकल पटूंचे मार्गदर्शन आणि सादरीकरण करण्यात येईल.
८) कार्यक्रमाचा समारोप करत असताना दोन भाग्यवान विजेत्यांना ओरोबोरस या सायकल कंपनीतर्फे लकी ड्रॉ द्वारे २ सायकली भेट देण्यात येतील.
पर्यावरण दक्षता मंडळाने संमेलनाच्या स्मरणीकेची जबाबदारी घेतली असून कीर्ती प्रिंटर्स हे संमेलनाच्या मुद्रणाची जबाबदारी सांभाळत आहेत.
हे सम्मेलन केवळ व्यावसायिक किंवा हौशी सायकलपटू किंवा सायकल व्यवसायिक ह्यांच्यासाठी नव्हे तर आपले मूल प्रथम सायकल चालवत असताना त्यांच्या बरोबर धावणाऱ्या आई, बाबा, दादा, ताई यांच्यासाठीही हे सम्मेलन आहे. तेव्हा, तुम्ही येताय ना... ३ फेब्रुवारी २०१९ सकाळी ८ वाजता डॉ काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे!
Ticketing partner: BOOK MY SHOW
Website of the Summit :
https://2ndcyclesummit.com/

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा