सौर वैशाख ८, १९४१
उगवतीच्या दिशेला तेजोनिधी दिसू लागण्याच्या सुमारास श्विन आणि ट्रेकने इंदापुरहून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. इंदापुरहून बाहेर पडून कोलाडच्या दिशेने जात असताना काही ठिकाणी रस्ता थोडा अरुंद झाला होता. त्यामुळे मागील येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत आणि समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष देत श्विन आणि ट्रेक सावधपणे जात होते. त्याचवेळी श्विनचे लक्ष उजवीकडे पूर्वेकडेही होते. तेथील डोंगराच्या कडेने लाल बिंब बाहेर येताना दिसू लागताच त्या अरुंद रस्त्याच्या कडेला थांबण्याकडे श्विन चाहूल घेत होती. थोड्या वेळात तशी जागा सापडताच श्विनने थांबा घेत त्या सूर्यबिंबाला मोबाइलमध्ये कैद केले.
त्यानंतर दोघेही पुन्हा मार्गाला लागले. अरुंद रस्त्यामुळे फारशी गती घेता येत नसली तरी दोघेही सातत्य राखत होते. थोड्या वेळातच श्विन आणि ट्रेक नागोठणे येथील गोविंदा हॉटेलमध्ये क्षुधाशांतीसाठी पोहोचले. उदरभरण होताच पुन्हा मार्गक्रमणाला सुरुवात करून दोघांनी वेग वाढवला. वाटेत निरापान करून दोघे वडखळ नाक्याला पोचले. एव्हाना १०.१५ चा सुमार झाला होता. मात्र सूर्य आग ओकू लागला होता. दोघांनी वडखळ येथे थांबा घेतला. साधारण १२- १ पर्यंत पनवेल येथे पोचून शालेय मित्र Mukund Moghe याच्या घरी विश्रांती घेण्याचा दोघांनी विचार केला होता. मात्र एकंदर तापमानाचा विचार करता दोघांनी पनवेलपर्यंत न जाता पेण येथेच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
महामार्गाचे रुंदीकरण करण्याच्या नादात रस्त्यालगताची वृक्षसंपदा गेल्या दोनेक वर्षात नाहीशी झाली होती. त्याच्यामुळे वाटसरूंना मिळणारी सावली नाहीशी झाली होती. त्यामुळेही श्विन आणि ट्रेकला वाटेत विश्रांती घेता येत नव्हती. वाढत्या उन्हात पेण पुढील चढ चढतानाही सावली देण्यासाठी आजूबाजूची वृक्षराजी शिल्लक नव्हती. ह्या सगळ्याचा विचार करत असताना पेण येथे थांबण्याचे नक्की केले. मात्र हा विचार करताना महामार्गाचे रुंदीकरण करत असताना रुंद महामार्गाच्या बाहेरीलही वृक्षराजी का नष्ट केली गेली हा प्रश्न उरत होताच.
खरंतर मुंबई गोवा हि महानगरं जोडताना वाटेतील गावांचा विकास होण्याऐवजी ती गावं भकास मात्र केली गेली होती. लहानपणी गोष्टी वाचताना मैलोनमेल चालत प्रवास करणारे वाटसरू वाटेतील झाडाखाली विश्रांती घेत असत, हे चित्र आठवून ते वाटसरू ह्या भकास महामार्गात पायी प्रवास करताना जिवंत तरी राहतील का हा प्रश्न मात्र श्विनला पडत होता.(#saveoursahyadri Bibhas Amonkar Anand Pendharkar)
अखेरीस वडखळ येथे ORS आणि अर्धा डझन केळी रिचवून दोघेही पेण येथे विश्रांतीसाठी गेले. वडखळ येथून आम्ही येत असल्याची वर्दी श्री शरद सोमण यांना दिली होती. त्यांच्या घरी क्षुधाशांती झाल्यावर श्विन आणि ट्रेकने वामकुक्षी घेतली.जाग आली तेव्हा ३ वाजले होते. सूर्यास्तानंतर मार्गक्रमण करणे श्विनला आवडत नसल्याने रात्रीचा मुक्काम Ajit Modak कडे कळंबोली येथे करण्याचे ठरले.
दोघेही चांगलेच ताजेतवाने झाले होते. जी चढण दुपारच्या उन्हात चढायचे श्विन आणि ट्रेकने टाळले होते ती चढण दोघांनी लीलया पार केली. कर्नाळा जवळ येऊ लागताच कर्नाळ्याचा अंगठा श्विन ट्रेकला खुणावू लागला. तो अंगठा कितीही वेळा छायाचित्रबद्ध केला तरी समाधान होत नाही. त्यामुळे तेथून जाताना प्रत्येक वेळी तो मोह होतोच. वाटेत लिम्बु सरबत घेऊन तो अंगठा श्विनसह कैद करण्यासाठी योग्य जागा अस्मादिक शोधू लागले. कर्नाळ्याच्या थोडे आधीच तशी जागा सापडताच अस्मादिकांनी रस्त्यावर बैठक घेत 'लिंगोबाच्या डोंगूराला' श्विनसह छायाचित्रबद्ध केले.
डोंबिवली पर्यंत जायचे नसल्याने वेळ हाताशी होताच. त्यामुळे तेथे मनसोक्त थांबून श्विन ट्रेकने आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेतला. मात्र येथेही महामार्गाच्या बाजूला उंचच उंच कठडे करून बाजूचे जंगल महामार्गापासून तोडले होते. त्यामुळे कोणत्याही वाटसरुला आजूबाजूच्या वृक्षराजीखाली विश्रांती घेता येणार नव्हतीच पण दोन्ही बाजूचे जंगल पूर्णपणे विभागले गेले होते. यामुळे जे काही उरले सुरले वन्य प्राणी, सरपटणारे जीव शिल्लक असतील त्यांनाही महामार्ग ओलांडून पलीकडील जंगलात जाता येणे केवळ अवघड नव्हे तर अशक्यच झाले होते. अर्थात याचा परिणाम ह्या प्राण्यांच्या संख्येत मोठ्या वेगाने घट होण्यात झाला होता. शिवाय यामुळे काही वंश नष्टही झाले होते, होत होते, होत राहणार होते. ह्याला खरच विकास म्हणायचे का?
श्विन ट्रेक महामार्गापासून तोडलेल्या वृक्षराजीकडे पाहत पुन्हा मार्गाला लागले. कर्नाळ्याच्या चढ चढून पुढच्या उतारावर मिळालेला वेग आवरता घेत दोघेही 'क्षणभर विश्रांती' येथे थांबले. तेथे लस्सीचा आस्वाद घेऊन मग मात्र दोघांनी पुन्हा वेग मिळवला. त्या वेगात दोघांनी लवकरच अजितचे घर गाठले तरी वाटेतील वृक्षसंपदेची आर्त हाक आणि वन्य प्राण्यांची बावरलेली अवस्था पंचेंद्रियासमोरून जात नव्हते.
#saveoursahyadri Tjsb Sahakari Banktjsb #dombivlicycleclub #cycle2work #ismartcommute Avinash Harad Prashant Gautam Nanaware Anand Parvate

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा