जागतिक निधर्मी कॅलेंडर नुसार दिनांक अर्थात भारतीय राष्ट्रीय दिनांक: ३ पौष १९४१
युरोप खंड आणि ख्रिस्ती धर्म ह्यावर आधारीत अशास्त्रीय कॅलेंडरनुसार दिनांक: २४ डिसेंबर २०१९
निद्रादेवीच्या मोहपाशातून सगळ्या सायकलस्वारांनी भल्या पहाटेच सुटका करून घेतली. करसनभाई तर भल्या पहाटे ६ वाजताच हॉटेलमध्ये हजर झाले होते. उजाडायला बराच वेळ असल्याने सर्व सायकलींच्या हाताळ्यावर विजेऱ्या लावल्या गेल्या. हमरस्त्यालगतच हॉटेल असल्याने शहरांतर्गत अरुंद रस्त्या ऐवजी आम्ही थेट हमरस्त्यालाच लागणार होतो.
सगळेजण सुरुवात करेपर्यंत ६.४५ चा सुमार झाला होता. आजचे अंतर फारच कमी होते. रस्ता सुंदर असल्यामुळे सूर्यप्रकाश नसला तरी विजेऱ्यांच्या प्रकाशात सगळे स्वार झोकात आणि लयीत जाऊ लागले. एकामागोमाग जात असल्यामुळे अंधाराचा त्रास जाणवत नव्हता. सगळ्यांच्या मागे आमच्या संरक्षक वाहनाबरोबर .. टेम्पोबरोबर गौतम होताच.
तासाभरातच २१ किमी चा पल्ला पार झाला होता. कालच्या दिवसात सायकलींची तब्बेत बिघडली नसली तरी, सायकलस्वारांची तब्बेत मात्र एकापाठोपाठ बिघडू लागली होती. एव्हाना ४ जणांना पचनशक्ती धोका देत असल्याची लक्षण दिसत होती.
युरोप खंड आणि ख्रिस्ती धर्म ह्यावर आधारीत अशास्त्रीय कॅलेंडरनुसार दिनांक: २४ डिसेंबर २०१९
निद्रादेवीच्या मोहपाशातून सगळ्या सायकलस्वारांनी भल्या पहाटेच सुटका करून घेतली. करसनभाई तर भल्या पहाटे ६ वाजताच हॉटेलमध्ये हजर झाले होते. उजाडायला बराच वेळ असल्याने सर्व सायकलींच्या हाताळ्यावर विजेऱ्या लावल्या गेल्या. हमरस्त्यालगतच हॉटेल असल्याने शहरांतर्गत अरुंद रस्त्या ऐवजी आम्ही थेट हमरस्त्यालाच लागणार होतो.
सगळेजण सुरुवात करेपर्यंत ६.४५ चा सुमार झाला होता. आजचे अंतर फारच कमी होते. रस्ता सुंदर असल्यामुळे सूर्यप्रकाश नसला तरी विजेऱ्यांच्या प्रकाशात सगळे स्वार झोकात आणि लयीत जाऊ लागले. एकामागोमाग जात असल्यामुळे अंधाराचा त्रास जाणवत नव्हता. सगळ्यांच्या मागे आमच्या संरक्षक वाहनाबरोबर .. टेम्पोबरोबर गौतम होताच.
तासाभरातच २१ किमी चा पल्ला पार झाला होता. कालच्या दिवसात सायकलींची तब्बेत बिघडली नसली तरी, सायकलस्वारांची तब्बेत मात्र एकापाठोपाठ बिघडू लागली होती. एव्हाना ४ जणांना पचनशक्ती धोका देत असल्याची लक्षण दिसत होती.
मात्र उदरभरण करणेही आवश्यक होतेच. इडलीसांभारवर ताव मारून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. एव्हाना निरुपमा भावे, अय्यरकाका यांनी संरक्षक वाहनाचा लाभ घेतला होता. जम्मू अजून दूर असल्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक होतेच. मी आणि देवधर मात्र पोटाच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करत सायकलींवर स्वार झालो होतो. मी पहाटे हॉटेलमधून निघतानाच दोन गोळ्या घेतल्या होत्या. 'आजीबाईंच्या बटव्याची' महती अश्यावेळी नक्कीच पटते.
इडलीचा खुराक खाऊन मनुष्यशक्तीच्या इंधनाचा साठा वाढला होता. त्या इंधनाच्या जोरावर सायकलींचा वेग वाढत होता. शक्यतो श्विन/फुजी वाटेत येणारा उड्डाणपूल सोडत नाहीत. सायकलींच्या गियरचा खरा फायदा चढणीच्या वेळेसच होत असतो. बऱ्याच जणांना गियर आणि अक्सीलरेटर यामधील फरक कळत नाही. अक्सीलरेटरचा उपयोग वेग वाढवण्यासाठी होत असतो. अश्वशक्तीवर चालणाऱ्या प्रदूषणकारी दुचाकी, तीचाकी, चारचाकी आणि बहुचाकी वाहनांना अक्सीलरेटर असला तरी सायकलींना मात्र अक्सीलरेटर नसतो.
मात्र चढ चढताना यंत्रावर अतिरिक्त ताण येऊन गाडी बंद पडू नये यासाठी गियर कमी करावे लागतात, त्याचप्रमाणे सायकलच्या साखळीवर व सायकलचालकाच्या पायावर अधिक ताण येऊ नये याकरता सायकलचे गियरही कमी करावे लागतात. सायकलचे गियर कमी केले की साखळी दट्ट्या बदलत छोट्या अंतरावरील दट्ट्यांवर सरकते. त्यामुळे पाय मारताना कमी जोर लावावा लागतो आणि साखळीवर ताण न येता सायकल पुढे सरकत राहते. जोर कमी लावावा लागल्यामुळे सायकलच्या साखळीप्रमाणेच सायकलस्वाराच्या पायावरही कमी ताण येेतो. त्यामुळे चढ चढतानाही सायकल व सायकलस्वार दोघेही ताजेतवाने राहतात.
उड्डाणपूल चढताना याच युक्तीचा वापर करत चढ पार करायचा आणि उतार सुरू झाल्यावर पुन्हा गियर वाढवत वेग घ्यायचा ही नीती श्विन/ फुजीला आवडत असे. मात्र इतर सायकलस्वार चढ चढण्याच्या मानसिक दडपणामुळे उड्डाणपूला ऐवजी बाजूचा रस्ता निवडत असत.
असाच एक उड्डाणपूल आला असता पुढील सर्व सायकलस्वार बाजूच्या रस्त्याने जाऊ लागले. फुजीही उड्डाणपुलाऐवजी त्यांच्या मागे बाजूच्या रस्त्याने जाऊ लागली. साधारण अर्धापाऊण किमी अंतर गेल्यावर मात्र त्या रस्त्याला अडसर असल्याचे लक्षात आले. अखेरीस सर्व स्वार पायउतार झाले आणि शेजारील पायवाटेवरून पुढे निघाले. ती पायवाट उड्डाणपुलाला समांतर जात होती. ती पार केली तेव्हा उड्डाणपुल पार करून आमची वाट पहात थांबलेला गौतम आमच्या संरक्षक वाहनासमवेत थांबलेला दिसला.
थोड्या वेळातच अंकलेश्वरकडे जाणारा रस्ता दृष्टीस पडला. मुख्य हमरस्ता उजवीकडे वळत होता, तर अंकलेश्वरकडे जाणारा अरुंद रस्ता डावीकडे जात होता. तो पाहताच नयना आघारकर यांच्याबरोबर तीन चार वर्षांपूर्वी डोंबिवली बरोडा सायकल यात्रेदरम्यान अंकलेश्वर मधून जातानाचा रस्ता आठवला. त्या आठवणीप्रमाणे फुजीने आघाडी घेत अंकलेश्वर शहराचा मार्ग निवडला. शहरातील रस्त्यामध्ये बरीच रहदारी होती. वाटेत दुरुस्तीची कामेही सुरू होती. ते अडथळे पार करत आमचा चमू पुढे निघाला. साधारण एक किमी अंतरानंतर मात्र आम्ही शहराबाहेर पडलो. पुढे मात्र अगदीच तुरळक रहदारी होती.
थोड्या वेळातच नर्मदा नदीवरील पूल समोर दिसू लागला. हा पूल अतिशय अरुंद होता. त्यामुळे रहदारी तुरळक असली तरी एक दिशेने एकावेळी एकच वाहन जाऊ शकत असल्याने पाठोपाठच्या वाहनांमध्ये अंतर राहू शकत नव्हते. पूल दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद केला होता. नर्मदा नदीच्या पात्राची रुंदी चांगलीच जाणवत होती. ही नदी पार करत असताना एक अनामिक सुख जाणवत होते. पुलापालिकडॆ गेल्यावर सगळे सायकलस्वार पुन्हा पुलाकडे वळून थांबले. येथे छायाचित्र काढण्याचा मोह कोणालाच आवरला नाही.
तेथून पुढे भरुच रेल्वेस्थानकाजवळून उजवीकडे वळून सर्व सायकलस्वार मार्ग काढू लागले.
आमची भरुच येथील व्यवस्था पाहणारा इसम आणि आमच्या चमुमध्ये समजुतीचा घोटाळा झाल्यामुळे थोडा उलटसुलट फेरा मात्र पडला. मात्र अखेरीस त्यांनी आम्हास गाठले आणि आजच्या मुक्कामाचे ठिकाण स्वामीनारायण मंदिर (BAPS SWAMINARAYAN MANDIR) गाठले. एव्हाना दुपारचे जेमतेम २ वाजले होते.
स्वामीनारायण मंदिराचा परिसर बराच मोठा आणि चित्तवेधक होता. अतिशय सुंदर मंदिर आणि त्याच्या एका बाजूला तीन मजली राहण्याची व्यवस्था होती. त्याशेजारीच उदरभरणाची उत्तम सोय होती. परिसरातील झुडुपांनाही वेगवेगळे सुंदर आकार दिले होते. त्याच आवारातच पुस्तके आणि भेटवस्तूंचे प्रदर्शन व विक्री दालन होते.
परिसर पाहत असताना दिवसभर केलेला सायकलप्रवासही विसरायला झाला. त्या सुंदर परिसराने अक्षरशः मोहिनीच घातली होती. विश्रांती, भूक ह्यांचाही विसर पडला होता.
विश्रांती झाल्यावर सगळे सायकलस्वार नर्मदा नदीकाठी असलेल्या निळकंठेश्वर मंदिराकडे जाण्यास सिद्ध होत होते. देवधर आणि मी एकाच खोलीमध्ये होतो. त्यामुळे आम्ही दोघांनी एकावेळी बाहेर पडणे स्वाभाविक होते. मात्र मला काहीही न कळवता ते बाहेर पडले. मी थोडावेळ खोली मध्ये त्यांची वाट पाहून बाहेर आलो. समोर अय्यरकाका दिसले. त्यांनाही काहीच माहीत नव्हते. मी आणि अय्यरकाका त्यांना शोधू लागलो. पण देवधर, गौतम आणि महिला मंडळाचा काहीच पत्ता लागेना. अखेर फोन लावल्यावर कळले की ते सर्वजण पुढे निघून गेले आहेत. त्यांना पुढे जायचे असले तरी मागे राहिलेल्यांना तसे किमान कळवणे ही तसदीही त्यांनी घेतली नव्हती. मी आणि अय्यरकाका मात्र इतर सर्वांना शोधत मंदिराच्या परिसरातच अडकलो होतो. अश्या बेजबाबदारपणा आणि बेफिकीरीचा अनुभव ह्याआधी केलेल्या कोणत्याही सायकलसफरीत आला नव्हता. अय्यरकाकांना भराभर चालता येणे शक्य नव्हते. अखेरीस आम्ही निळकंठेश्वर मंदिराच्या मार्गाची चौकशी करत हळूहळू निळकंठेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. तोपर्यंत इतर सगळ्यांचे नौकानयनही झाले होते
नर्मदानदीकाठी देखावा अतिशय मनोहर दिसत होता. उजव्या बाजूला पुलावरून जाणाऱ्या रस्त्याची रहदारी, पथदिवे चित्तवेधक दिसत होते.
अय्यरकाका त्या गटात सामील झाले. मात्र पुढे गेलेल्या गटाला त्यांच्या बेजबाबदारपणाची जाणीव व्हावी ह्यासाठी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत, मौन राखत, अस्मादिकांनी एकट्यानेच स्वामीनारायण मंदिराकडे परत जाणे पसंत केले.



















Khoop chhan! Pudhil lekhachi aaturtene vaat pahaat aahot.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा👍👍👍
हटवा