भारतीय राष्ट्रीय दिनांक ६ पौष १९४१
फुजी(श्विन) आणि साथीदारांनी गुजरात राज्य पार करून राजस्थान राज्यात प्रवेश केला होता. आज जरी ही दोन राज्ये वेगळी असली, तरी मुघल साम्राज्यापूर्वी गुजरातमधील काही भाग आणि राजस्थान मिळून गुर्जर भूमी अथवा गुर्जराष्ट्र म्हणून ओळखले जात असे. तसेच ब्रिटिशांच्या काळात तर वायव्य कर्नाटकच्या भागापासून सध्याच्या पाकिस्तानमधील सिंधपर्यंत संपूर्ण क्षेत्र मुंबई इलाख्यातच समाविष्ट होते.
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २७ डिसेंबर २०१९
फुजी(श्विन) आणि साथीदारांनी गुजरात राज्य पार करून राजस्थान राज्यात प्रवेश केला होता. आज जरी ही दोन राज्ये वेगळी असली, तरी मुघल साम्राज्यापूर्वी गुजरातमधील काही भाग आणि राजस्थान मिळून गुर्जर भूमी अथवा गुर्जराष्ट्र म्हणून ओळखले जात असे. तसेच ब्रिटिशांच्या काळात तर वायव्य कर्नाटकच्या भागापासून सध्याच्या पाकिस्तानमधील सिंधपर्यंत संपूर्ण क्षेत्र मुंबई इलाख्यातच समाविष्ट होते.
आज मात्र, फुजी आणि साथीदार राज्याची सीमा ओलांडत सिंहाच्या राज्यातून चिंकारा आणि उंटाच्या राज्यात प्रवेश करत होते. चिंकारा हा राजस्थानचा राज्य वन्यप्राणी आहे तर उंट हा राजस्थानचा राज्य पाळीव प्राणी आहे. चिंकारा देखील उंटाप्रमाणेच अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो. पुणे जम्मू मार्गाची आखणी करताना गुजरातमधून जाताना श्विनला काळजी वाटत नव्हती. मुख्य म्हणजे श्विनने यापूर्वीही गुजरातचा काही भाग चक्राकांत केला होता, शिवाय अहमदाबादकर सामील होणार असल्याने गुजरातमधील काळजी ते घेणार होतेच.
राजस्थानमधील प्रवासाबद्दल मात्र फुजी(श्विन)ला प्रथमपासूनच काळजी वाटत होती. राजस्थानमधून सायकलप्रवास करतानाचा आधीचा अनुभव श्विन(फुजी) ला नव्हता तसेच याआधी ज्यांनी तसा प्रवास केला होता त्यांनी राजस्थानमधील अरुंद रस्ते आणि बेदरकार ट्रकचालक यांचे अनुभव सांगितले होते. अर्थात श्विन(फुजी)ला राजस्थानमधील रोमांचक अनुभव घेण्यासाठीही उत्सुकताही वाटत होती. याचे मुख्य कारण राजस्थानशी श्विन(फुजी)चे एक हळवे नाते होते. ते म्हणजे श्विन(फुजी)चा घट्ट मित्र संजय कोचर ह्याचे मूळ गाव राजस्थानमधीलच होते. श्विन(फुजी) आणि संजयची मैत्री ही बालवाडीपासून आजतागायत टिकून आहेच. ते नाते जीवाभावाचेही आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये प्रवेश करताना संजयची आठवणही येत होती.
'केसरीया बालम आओ नी पधारो म्हारे देश' म्हणत स्वागत करणाऱ्या राजस्थानबद्दल म्हणूनच एकाच वेळी काळजी आणि उत्सुकता लागून राहिली होती. राजस्थानमधील स्वागत तरी अगदी राजेशाही पद्धतीने बागेमध्ये चहा घेत झाले होते. चहाची 'लक्ष्मण'वेळ पाळत चारच्या आत चहा घेऊन झाल्यावर सगळे सायकलस्वार पुन्हा मार्गाला लागले. आता जेमतेम ९-१० किमी अंतरच पार करायचे असल्याने सगळेजण अतिशय धीम्या गतीने जात होते. फुजीने आघाडी घेतली होती. मागोमाग सगळेजण रांगेत येत होते.
अबूरोड पश्चिम बनास नदीच्या जवळ वसलेले आहे. सिरोही जिल्ह्यातील अबूरोड चे मूळ नाव खराडी असे होते.
अरावली पर्वतरांगेत वसलेला अबू पर्वत हा अबू रोड पासून वायव्येला अवघ्या २७ किमी अंतरावर आहे. अबू पर्वताचे मूळ नाव अर्बुदाचल तसेच अर्बुदारण्य असे होते. अबू हे त्याचेच संक्षिप्त रूप आहे. वनवासाच्या १२ वर्षाच्या काळातील प्रवासादरम्यान अर्जुनाने येथून प्रवास केला होता.
सिरोहीचा महाराजा महाराव शिवसिंग ह्याच्या कारकिर्दीत म्हणजे तब्बल १८० वर्षांपूर्वी अबू पर्वताकडे जाणारा रस्ता बांधला गेला. तर त्यांनतर ४० वर्षांनी राजपुताना रेल्वे विभागातील ह्या ठिकाणी रेल्वे स्थानक बांधले गेले आणि त्या स्थानकाला अबूरोड असे नाव देण्यात आले. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हापासून केवळ तिसऱ्या दिवशी ह्या स्थानकाला तब्बल १४० वर्ष पूर्ण होणार होती.
आमची गाठ मात्र येथील इतिहासापेक्षा अधिक येथील भूगोलाशीच पडणार होती. याची किंचितही कल्पना आम्हाला अबुरोड येथे प्रवेश करताना आलेली नव्हती.
अबू रोड येथे प्रवेश करताना आम्हाला ना येथील इतिहासाची माहिती होती, ना येथील भूगोलाची काळजी. आम्ही आमचे आजचे वसतिस्थान शोध होतो. सिरोही जिल्ह्यातील हे सर्वात मोठे शहर असले तरी पुणे, डोंबिवली, अहमदाबादपेक्षा खूपच लहान होते. लोकवस्ती तर जेमतेम ६०००० पर्यंतच होती. थोडी चौकशी करत आम्ही अबू रोड येथील मानपूर विभागातील अबू तलेटी जैन तीर्थ येथे पोहोचलो.

Sunder!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा