कोणतीही मोहीम यशस्वी करायची असेल तर त्याची पूर्वतयारी ही खूप महत्वाची असते. आपण एखादी वार्षिक परीक्षा देण्यासाठी वर्षभर अभ्यास करणे अपेक्षित असते तसेच काहीसे मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतही आहे. सफर जेवढी मोठी तेवढीच पूर्वतयारी जास्त अभ्यासपूर्ण हवी.
सफर सुरू होण्याआधी ती आपल्या मनात आकार घेणे गरजेचे असते. नियमित सराव, आवश्यक साधनसामुग्री, संपर्क व्यवस्था, प्रस्तावित ठिकाणे आणि मार्ग ह्यांची सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती आणि त्यातील अचूकतेची पारख हे सगळे मोहिमेच्या पूर्वतयारीचाच भाग.
नियमित सराव तर सुरू होताच. साधनसामुग्री मध्ये सायकल संबंधित साधनसामुग्री आणि सायकलस्वारांची साधनसामुग्री दोन्ही महत्वाची. अर्थातच त्याचीही सूची केली तर मर्यादित मात्र आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी बरोबर असल्याची खात्री होऊ शकते. (सूचक यादी ह्या भागात अखेरीस देत आहे)
मुंबई, पुणे येथील सुहृद मार्गदर्शक जमेल ती मदत करतील ह्याची खात्री होतीच. मात्र त्याच बरोबर कोलकाता, गुवाहाटी तसेच वाटेतील इतर ठिकाणे येथे काही व्यक्तींचा संपर्क होऊ शकतो का ह्याची चाचपणी मी सुरू केली.
अनुभवी सायकलपटू तसेच सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते ज्यांचा बंगाल, आसाम येथे संपर्क असू शकतो अश्यांना मी विचारणा करत होतो. तसेच couchsurfing, warmshower अश्या फिरस्त्यांना एकमेकांना संपर्क साधू देणाऱ्या सोशल साईट्स वरही सातत्याने माझी चाचपणी सुरू झाली होती.
ज्या भागात आपण भेट देणार आहोत तेथील समाज जीवन, त्यांचे आदर्श, तेथील इतिहास आपल्याला माहिती असेल तर आपण त्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो. ह्या बाबींची माहिती घेऊन त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवली तर तेथील लोक आपल्याला स्वीकारू शकतात. तेथील संस्कृतीचा मान आपण ठेवला तर त्या भागातील लोकांनाही आपल्याबद्दल आपुलकी वाटू शकते. अर्थातच ही सगळी माहिती हासुद्धा आपल्या मोहिमेच्या पूर्वतयारीचाच भाग असतो.
त्या भागातील रस्ते कोणत्या दर्जाचे आहेत, तेथील भागात चढ उतार किती प्रमाणात आणि किती तीव्रतेचे आहेत हे माहित असेल तर आपल्याला त्याप्रमाणे आणि त्या प्रमाणात सराव करता येऊ शकतो. मोहिमेचे यशापयश प्रत्यक्ष मोहीम सुरू असतानाच्या घटनांवर अवलंबून असते तेवढेच आपल्या पूर्वतयारीवरही अवलंबून असते.
-------
* सायकल सफर करण्यासाठी सूचक गोष्टींची यादी:
१) Cycle Ride:-
-Head Lamp
-Tail lamp(LED)
-Cycle bell,
- Mirror, (if required and if u r used to)
-Gloves
-Goggles
-Two bottles of water
-Two cotton scarf
-Basic medicine
-Electoral sachet,
-Dryfruits/ Dryfruit laddoos (or similar energetic food as per own choice.)
-Mini sack / sling bag
-Camera/Gopro, if necessary
-Used shoes (new shoes not recommended)
-Padded cycling shorts
&
In the baggage:-
-Tooth brush / paste
-Soap / Shampoo
-Body wash
-Sun screen lotion, if required
-Odomos / mosquito coil
-Kailas Jeevan
-Mobile charger
-Two T-shirts
-Two track pants
-Undergarments
-Two pair of socks
-Slippers
-1 plate + Glass+ spoon
-Spare batteries – for torch, tail lamp LED
-Sleeping bag (if available) or two bed sheets
-Hangers to dry clothes
-One fresh dress for return travel
Cycle Accessories:
-Repairing Kit,
-2 spare tubes,
Cycle cleaning:-
-Old tooth brush
-1mx1m - Piece of cotton cloth
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा