गो नी दा यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या कहाणीला जब्बार पटेल, ना धो महानोर आणि मंगेशकर कुटुंबीय यांची स्थान मिळाली तर 'जैत रे जैत' सारखे रत्न रसिकांना लाभावे यात नवल ते काय! मधमाशी आणि माणूस यांच्यातील संघर्षाची ही कहाणी. ठाकर जमातीतील नाग्या हा युवक मधमाशींच्या राणी माशीवर सूड घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची राणी (बायकोवर) म्हणजे चिंधीवर मधमाश्यानी हल्ला करून सुड उगवणे हा दुर्दैवी योगायोग ज्या ठिकाणी चित्रित झाला तो लिंगोबाचा डोंगुर म्हणजे कर्नाळ्याचा किल्ला हे अनेक पर्यटकांचे आकर्षण.
शनिवारी मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी श्विनने आज कर्नाळ्याला जायचे निश्चित केले होते. प्रसाद सरवटे आणि तेजस जोशी दोघांनीही लगेचच होकारही दिला होता. डोंबिवली कर्नाळा डोंबिवली अशी राइड यापूर्वीही श्विनने अनेक वेळा केली आहे. किंबहुना ३०-३२ वर्षांपूर्वी महाविद्यालयाच्या काळात कोणतीही समाज माध्यमं, गुगल मॅप अशी साधन अस्तित्वात नसताना काळा घोडा घेऊन पहिली अथवा दुसरी जी मोठी सायकलफेरी केली होती ती कर्नाळ्याचीच होती.
आज सकाळी ६.१५ वाजता #TJSBBANK च्या डोंबिवली पूर्व शाखा येथे श्विन पोचली तेव्हा प्रसाद त्याच्या स्कॉटबरोबरवाटच पाहत होता. श्विन पाठोपाठ लगेचच तेजस त्याच्या फुजीला घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तिघेही वेळेवर आल्यामुळे सुरुवात छानच झाली होती. ब्रह्ममुहूर्त उलटून गेल्यामुळे सायकलफेरी सुरु करताना पुरेसा प्रकाश होता. डोंबिवली शहरातील वर्दळ वाढली नसली तरी सुरु झाली होती. शिवाय मानपाडा रस्त्यावरील कोट्यवधी खड्डे स्वागत करत होतेच. त्यामुळे श्विन, स्कॉट आणि फुजीने संथपणे सुरुवात केली. मात्र कल्याण शिळ महामार्गाला लागताच तिघांनी लय साधली. संयतपणे मात्र सातत्य राखत तळोजा गाठेपर्यंत सूर्य आकाशात बराच वर आला होता. मात्र तोपर्यंत पुरेसा प्रकाश असला तरी ढग आणि धुकं यांनी सूर्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवल्यामुळे सूर्याचे अस्तित्व जाणवत नव्हते.
वाटेत कोपरखैरणे येथून पळस्पे फाटापर्यंत एकल सायकलफेरीला आलेला एका सायकल पटू श्विनला नजरेस आला. त्याला गाठून ३ फेब्रुवारी २०१८ रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात होणाऱ्या २ऱ्या सायकल मित्र संमेलनाचे आमंत्रण देण्याची संधी श्विनने साधली. एव्हरेस्ट सायकल क्लब ह्या सायकलक्लबचा तो सदस्य होता. त्याच्याशी गप्पा मारेपर्यंत पळस्पे फाटाही आलाच. नेहमीप्रमाणे इडली सांभार वर ताव मारून श्विनने प्रसाद आणि तेजस बरोबर कर्नाळ्याची वाट धरली.
वाटेतील फुलांनी साद घालताच त्यांच्याशी हितगुज करून तिघेही कर्नाळा येथे पोचलो. तेथे पोचल्यावर 'आभाळी गेलेल्या लिंगोबाच्या डोंगरावर' म्हणजे शेंडी सुळक्यावर जाण्याचा मोह स्वाभाविक असला तरी घड्याळबाबा त्याची अनुमती देत नव्हते. 'ठाकर गडी तिथे कदी नाय गेला' तर मग आपण कशाला जायचे अशी स्वतःची समजूत घालत आम्ही डोंगराच्या पायथ्याशीच कर्नाळा येथील निसर्गाचा आस्वाद घ्यायचे ठरवले. पेण कडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या उपहारगृहाकडे आम्ही मोर्चा वळवला. तेथे उपलब्ध असलेल्या मर्यादित पदार्थांमध्ये निवड करण्याला विशेष वाव नव्हता. बटाटाभजी आणि चहा यांची फर्माईश केल्यावर मी तेथे मागे असलेल्या वनराजीकडे वळलो. शेजारीच एक कृश झालेला झरा वाहत होता. त्या झऱ्याचे पाणी तोंडावर मारताच मन प्रसन्न झाले.
पुढे जाताच एक खेकडा दिसला. माझी चाहूल लागताच तो जमिनीत शिरला. मात्र थोड्या पुढेच आणखी एक खेकडा निर्धास्तपणे चालत होता. त्याला छायाचित्रबद्ध करण्यासाठी मी पुढे सरसावलो. माझी चाहूल लागू नये म्हणून थोड्या अंतरावरून त्या खेकड्याला छायाचित्रांमध्ये कैद करताच मला पुढे जाऊन जवळून छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही. त्यालाही माझी चाहूल लागताच तो पळू लागला. त्याबरोबर मी छायाचित्रा ऐवजी त्याचे चित्रीकरण केले.
कर्नाळ्याची वनसंपदा श्विनला हाक मारत होती. दाट वृक्ष सूर्यकिरणांना भूमातेपर्यंत पोचू देत नव्हते. नजर वर करून पाहिले असता आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या वृक्षराजीचा हिरवा रंग दिसत होता.
कोणाही संगीतकाराला जमणार नाही अश्या सुंदर संगीतामुळे श्विनचे भान हरपले नाही तरच नवल! मंजुळ स्वरात गाणाऱ्या पक्ष्यांचे दर्शन त्या घनदाट वृक्षराजीमध्ये होऊ शकत नव्हते त्यामुळे नेत्रसुख मिळत नसले तरी कान मात्र तृप्त होत होते. अखेरीस मनाला मुरड घालून मी उपहार गृहाकडे वळलो.
बटाटा भजी आणि चहा घेऊन निघत असतानाच पालवा सायकल क्लबचा सदस्य अर्जुन त्याच्या बिटविन बरोबर आम्हाला सामील झाला.
कर्नाळा येथे मनसोक्त वेळ घालवल्यामुळे परतीचा प्रवास शक्यतो लवकर करावा लागणार होता. मात्र थोड्याच वेळात अर्जूनच्या बिटविनचे मागील टायर रुसले. मग त्यातील ट्यूब बदलून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.
पनवेल शहरातील अश्वशक्तीधारी वाहनांच्या भाऊगर्दीतून श्विन, स्कॉट, फुजी आणि बिटविन यांनी सहजपणे वाट काढली.
आतापर्यंत सूर्य पूर्ण शक्तीनिशी तळपू लागला असला तरी आमची मजल दरमजल संथ पण ठामपणे सुरु होती. वाटेत पाण्याची बेगमी करत आम्ही घराकडे परतत होतो. प्रसादची स्कॉट मागे पडू लागली होती त्यामुळे श्विनने त्याच्याबरोबर राहायचे आणि फुजीने बिटविनबरोबर पुढे जायचे ठरवले. वाटेत तलोजाजवळील टोल नाक्यावर उतेकर यांनी नेहमीप्रमाणेच स्वागत केले. तेथे पुन्हा पाण्याची बेगमी करून श्विन आणि स्कॉटने खिडकाळी येथील 'पिवळा चहा, लाल वडापाव' गाठले. पुन्हा क्षुधाशांती झाल्यावर दोघेही थेट डोंबिवली मध्ये शिरले. या अगोदर एकही मोठी राइड न केलेल्या प्रसादची स्कॉट घरी पोचली तेव्हा तिचे पहिले अर्धशतक साजरे झाले होतेच... पण तेही जेमतेम अर्धशतक नव्हे तर मोठे अर्धशतक होते. संयम आणि निग्रह यांनी साकारलेले हे अर्धशतक नव्वदीपार झाले असले तरी प्रसादला शतक थोडक्यात हुकल्याची खंत वाटत होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा