*स्वप्न*
क्षितिजावरील गुलाबी रंग नेहमीप्रमाणे सकाळी आमचा उत्साह वाढवत होता. चिंचवड येथे बदली झाल्यावर आम्ही चार सहकारी रोज मोकळ्या हवेत फिरायला जात असू. एकमेकांशी गप्पा मारत नदीकिनारी फेरी मारण्याची मजा येत असे. रोजची सकाळ नवी आणि उत्साह वाढवणारी होती. आमचं चिंचवडमधील वास्तव्य सकाळच्या फेरफटक्याने सुरु होत असे, तर रात्री जेवण झाल्यावर आइस्क्रिम, फालुदा खाऊन आम्ही दिनक्रम संपवत होतो. एकंदर दिवस छानच जात होते. तसे पाहिले तर घरापासून दूर राहण्याची आम्हा सर्वांचीच पहिलीच वेळ होती. वाणिज्य शाखा निवडल्याने कॉलेजमध्ये असताना होस्टेलला राहण्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे खरं तर आम्ही एकंदरीत घरापासून लांब राहण्याचा आनंदच लुटत होतो. आमचे एक वरिष्ठ सहकारी तर म्हणालेच दिवस आपले नाही घरच्यांचे वाईट आहेत म्हणून आपण इथे आलोय. आमच्यासाठी तर आनंदी आनंद गडे अशी परिस्थिती होती.

एके दिवशी ऑफिसमध्ये पंडितसाहेबांनी त्यांच्या कक्षात बोलावले. त्यांच्या हातात एक लिफाफा होता. लिफाफ्याकडे पाहिल्याबरोबरच त्यात काय आहे हे कळत होते. तरी माझी उत्सुकता मात्र कायम होती. त्यात एक निकाल लपलेला होता. यात लपलेल्या निकालाची मला अनेक वर्षांपासून अपेक्षा होती. अपेक्षित असलेला निकाल माझे जीवन बदलवू शकत होता. माझी दिनचर्या बदलवणारा ठरणार होता. काही दिवसांपूर्वी आमच्या कार्यालयातर्फे कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली होती. तशी चाचणी घेण्याची ती पहिलीच वेळ होती. त्या आरोग्यचाचणीचाच तो निकाल होता. काहीश्या उत्सुकतेनेच मी तो लिफाफा हातात घेतला. लिफाफा उघडून त्यातील निकाल पाहताच माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला. घराण्याची परंपरा मी राखली होती. होय, मी मधुमेहाच्या जगात प्रवेश केला होता. वडिलांना वयाच्या ३३ व्या वर्षी भेटलेल्या मधुमेहाने मला भेटायला उशीरच केला होता. मी अतिशय आनंदाने घरी फोन केला. हसत हसत मी माझ्या अर्धांगिनीला लागलेला निकाल ऐकवला. मी हसत हसत सांगितल्याने तिला आश्चर्यच वाटत होते. मात्र वडलांचा मधुमेहाबरोबरील अनुभव माझ्या गाठीशी असल्याने मी निर्धास्त होतो. खरं सांगायचं तर पूर्वीच्या तीन पिढ्यांना साथ करणारा मधुमेह मला कधी साद घालतोय याची मी वाटच पाहत होतो.
आपल्या जीवनात यापूर्वी जो आनंद अनुभवला नाही, तो अनुभवण्यासाठी मधुमेह मार्गदर्शक ठरणार होता. मधुमेहाशी ओळख म्हणजेच चाकोरीत न अडकता निसर्गात मोकळा श्वास घेण्यास सुरुवात करण्याची आठवण. ती आठवण होताच आमची सकाळची फेरी मी थोड्या शिस्तीत आणि लयबद्ध रित्या करू लागलो आणि रात्रीचे आइस्क्रीम, फालुदा बंद केले. सकाळची फेरी संथपणे आणि रस्त्यावर न करता, नदीच्या शेजारील मोरया गोसावी मंदिराशेजारील बागेत योग्य वेगात करण्यास सुरुवात केली. चालण्याचे तीन टप्पे केले. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात हळूहळू सुरुवात करत मधल्या दुसऱ्या टप्प्यात माझा वेग जास्तीत जास्त वाढत असे आणि शेवटच्या टप्प्यात पुन्हा कमी होत असे. बागेत धावण्याचा व्यायाम करणाऱ्यांचा वेग आणि माझा मधल्या टप्प्यातील चालण्याचा वेग हा जवळजवळ सारखाच होता. पतंजली क्लीनिक मधील डॉक्टरांचे मार्गदर्शन, त्यांच्या सूचनेप्रमाणे पथ्य, औषधे आणि नियमित चालणे यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे १५ दिवसांतच मधुमेह आटोक्यात आला.
दरम्यान माझी मावशी निरुपमा भावे दोन चाकांवर संपूर्ण भारत पालथा घालत होती. तिने मला सुचवले, 'तू सायकलिंग पुन्हा सुरु कर'. खरतर माझी आणि माझ्या हिरो सायकलची जोडी तब्बल २० वर्ष अतूट होती. मी शहरात फिरताना हिरोला घेतल्याशिवाय कुठेही जात नव्हतो. मात्र दोनेक वर्षांपूर्वी मी ती सायकल एका गरजू मुलाला भेट दिली होती. त्याबरोबर माझे सायकलिंग पूर्ण थांबले होते. अश्या वेळी एक सच्चा मित्र मला भेटला होता, ज्याच्या भेटीमुळे मला पुन्हा सायकलिंगची ओढ लागू शकली. होय, जीवनाला मार्ग दाखवणारा माझा तो सच्चा मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक होता मधुमेह!
माझी ओळख होती दणकट हिरो सायकलशी. मात्र माझी मावशी सुचवत होती ती गियरवाली नाजूक सायकल. मी तिला म्हटले ,'मला त्या गियरवाल्या सायकलींमधले काही कळत नाही तूच मला सायकल घेऊन दे.' मावशीने मला केवळ सायकलच घेऊन दिली नाही तर लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे, सायकल दौऱ्याचे वेडंही लावले. मावशीबरोबरच मी इंदोर झाँसी हे पहिले १००० किमी सायकलिंग केले आणि..... माझ्या सुप्त मनातील स्वप्न पुन्हा जागे झाले. ते स्वप्न जसे माझे होते तसेच किंबहुना माझ्याही पेक्षा माझ्या एका शाळासोबत्याचे होते. इंदोर झाँसी सायकलिंग दौऱ्याच्या दरम्यान काळाचा पडदा उलगडला गेला. मन भुतकाळात जाऊ लागले. मनाच्या जखमेवरील खपली उडाली होती. मी आणि माझ्या शाळासोबत्याने जागेपणी पाहिलेले स्वप्न पुन्हा बेचैन करू लागले होते. ते स्वप्न साकार करायचे वेध पुन्हा लागू लागले. माझा मित्र काळाच्या पडद्याआड जाऊन बराच काळ लोटला होता, मात्र आता माझ्या मनाने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेण्याचे ठरवले होते. मी माझ्याही नकळत माझ्या मित्राला ते स्वप्न पूर्ण करण्याचे वचन दिले.
अविनाश...
'अविनाश, मला सायकलची एक फेरी देशील का?', मी विचारले. अकरावीत असताना मी सायकल चालवायला शिकलो, पण माझ्या कडे सायकल मात्र नव्हती. मग कॉलेजमधून आल्यावर मी कधीतरी अविनाशची सायकल चालवायचो. पुढच्याच वर्षी मलाही सायकल मिळाली. ती अर्थातच 'हिरो' कंपनीची नॉन गियर काळी मजबूत सायकल होती. सायकल घरी आल्यापासून मी आणि सायकलचे अतूट नाते सुरु झाले.
डोंबिवलीमध्ये फिरताना हिरो आणि मी कायम बरोबरच असू. अविनाशसुद्धा त्याच्या ऍटलास बरोबर फिरत असे. हळूहळू आमची हिम्मत वाढत गेली. मी आणि अविनाश हिरो आणि ऍटलासला घेऊन डोंबिवली बाहेर जाऊ लागलो. कॉलेजमध्ये गेल्यावर आम्हाला कल्याण शिळ रस्ता खुणावू लागला. मात्र त्या काळात गुगलराज सुरु झाले नव्हते, समाजमाध्यमे माहीतही नव्हती. किंबहुना संगणक हा शब्दसुद्धा हिब्रू भाषेप्रमाणे लांबच होता. मात्र तरीही आम्ही एकदा पेंढारकर कॉलेजहून शिळ फाट्यापुढील चढावर गेलो. आमच्या मानाने रपेट बरीच झाली होती. शिळ फाट्यापुढील चढ तेही काळ्या सायकलने चढताना दमछाकही झाली होती. रस्त्याच्या बाजूची करवंदाची झाडी आम्हाला खुणावू लागली. हिरवी हिरवी कच्ची करवंदे खाऊन आम्ही भरपेट मेजवानी लुटली. कच्च्या करवंदाची ती चव आम्हाला पुन्हा पुन्हा शिळ फाट्याकडे खेचून नेऊ लागली. आमचा लांबवर सायकलिंग करण्याचा आत्मविश्वास, उत्साह वाढला.
मग आम्ही डोंबिवली गणेशपुरी डोंबिवली अशी सायकलफेरी करायचे ठरवले. मार्गदर्शन करायला कोणीच नव्हते.. ना कोणी मोठा माणूस, ना गुगल मॅप, ना इंटरनेट. आम्ही ST च्या ऑफीसमध्ये जाऊन रूट, त्यावरील स्थानके, वळणे, अंतर समजावून घेतले. गणेशपुरी सफर यशस्वी झाल्यावर कर्नाळा येथेही मोहीम केली. मी स्वतः अश्या मोहिमांवर समाधानी होतो. एव्हाना आम्ही १२ तुन TY Bcom ला पोचलो होतो. अविनाशला मोठे ध्येय खुणावू लागले होते. त्याने मला विचारले. मी तत्क्षणी होकार दिला. मुंबई गोवा मोहीम करण्याचे त्याने ठरवले. मात्र आम्हाला मोहीम आखण्याची दिशा सापडेना. गणेशपुरी, कर्नाळा इथवर जाऊन परत यायला एक दिवस पुरेसा होता. डोंबिवली मधील ST कर्मचाऱ्यांनी रस्ता समजावला होता. पण पुढे वाटेत कोणाला रस्ता विचारणार आणि कोण समजावणार? आम्ही दोघेही कधी पनवेलच्या पुढेही गेलो नव्हतो. कोकण म्हणजे आमच्यासाठी घनदाट अरण्य होते. त्या मार्गावरील गावांची नावेसुद्धा आम्हाला आफ्रिकेतील गावांप्रमाणेच अज्ञात होती. दरम्यान अविनाशला समजले युथ हॉस्टेल (YHAI) तर्फे मुंबई गोवा मोहीम आखली जाते. आमची TY ची परीक्षा झाली. मी मुंबई गोवा मोहीम विसरूनच गेलो होतो. माझ्यासाठी ते स्वप्नवत होते. आम्ही YHAI चे ऑफिस शोधण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत मी फार पुढाकार घेतला नाही पण अविनाश मात्र कसोशीने प्रयत्न करत होता.
मात्र आम्हाला मार्ग सापडत नव्हता. त्यातच वैशाखातल्या त्या रखरखीत दिवसात अनपेक्षितरित्या ती दुर्दैवी बातमी समजली. अविनाश काळाच्या पडद्याआड गेला होता. त्याच्या कुटुंबियांबरोबरच आम्हा सर्व मित्रांनाही तो अनपेक्षित धक्काच होता. अबोल असलेला अविनाश आता कधीच बोलणार नव्हता.
मात्र ह्यानंतरही हिरो माझी साथ करत होती. कोणताही सहकारी न मिळाल्याने माझी रपेट मात्र शहरापूरतीच मर्यादित झाली होती. अखेरीस जवळपास २० वर्ष साथ दिल्यावर जवळपास ६ महिने पावसाळ्यात हिरो एकाच जागी उभी राहिली. तिला त्या अवस्थेत मला बघवेना. त्यातच एका गरजू मुलाला सायकल हवी असल्याचे समजताच मी अक्षरशः काळजावर दगड ठेवून माझ्या 'हिरो'ला त्याच्या स्वाधीन केले. आणि त्यानंतर माझे सायकलिंग पूर्णपणे थांबले. पुन्हा सायकलिंग करता येईल हा विचारही मनात येत नव्हता. मात्र पुढील दोन वर्षातच भेटलेल्या जीवश्च कंठश्च मित्रामुळे ....मधुमेहामुळे आणि माझ्या मावशीमळे मी पुन्हा सायकलिंगकडे वळलो. त्यातच इंदोर झाँसी सायकलसफरीमुळे जुनी खपली निघाली. अविनाशने पाहिलेले स्वप्न माझी झोप उडवू लागले.
नकटीच्या लग्नाला...
पहिल्या वहिल्या १००० किमी सायकलसफरीमुळे मुंबई गोवा प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरायचे वेध लागू लागले. मे २०११ मध्ये माझी पुन्हा ठाणे येथे बदली झाली. मग मी डोंबिवली ठाणे डोंबिवली असे cycle2work सुरु केले. पुण्याच्या धर्तीवर डोंबिवली मध्येही सायकलमित्रांचा ग्रुप सुरु करावा असे वाटू लागले. आनंद पर्वते बरोबर ऑर्कुट ह्या समाजमाध्यमाद्वारे आणि वैयक्तिक चर्चाही झाली. मात्र तो गट जोर धरू शकला नाही. सुदैवाने लवकरच श्री दीपक देशपांडे, डॉ पुणतांबेकर यांच्या पुढाकाराने आम्ही ९ जणांनी डोंबिवली सायकल क्लब सुरु केला. गोवा खुणावत होतेच. संगणक, इंटरनेट, गुगल हे सर्व मदतीला होते. YHAI तर्फे दर वर्षी मुंबई गोवा सायकल सफर आयोजित करण्यात येते असे समजले.
मी पुन्हा गोवा सफरीचे बेत आखू लागलो. समाजमाध्यमांद्वारे ओळखी वाढत होत्या. गोव्याचे मांडे मनात खात असतानाच YHAI तर्फे गोवा कन्याकुमारी अशी मोहीम आखली जात असल्याचे समजले. एकंदर बदललेल्या वातावरणामुळे, ओळखी, अनुभव, साधनांची उपलब्धता पाहता गोव्याला कधीही जाता येईल असे वाटू लागले. त्याचवेळी कन्याकुमारीची हाक गोव्यापेक्षा जोराने ऐकू येऊ लागली. मग मी मुंबई गोवा ऐवजी गोवा कन्याकुमारी अशी ११५० किमीच्या सायकलसफरीवर जायचे निश्चित केले. ते २०१४ साल होते. सफर छान झाली. ओळखी वाढत होत्या, क्षितिज विस्तारत होते.
मी पुढच्या वर्षी- २०१५ ला YHAI बरोबर मुंबई गोवा सायकल सफर करण्याचे ठरवले. दरम्यान डोंबिवली सायकल क्लबच्या (DCC) रविवारच्या राईडनंतर परत येताना DCC चे सदस्य सुमित मोकल आणि ममता परदेशी यांनी कल्पना मांडली की अशी राइड DCC तर्फेच आयोजीत केली तर.. कल्पना आवडली. प्लॅन सुरु झाले. मात्र दिवस पुढे सरकत असताना DCC तील इतर सदस्य राहोच सुमित आणि ममताकडूनही काही प्रतिसाद मिळेना. मग मी एकटाच प्लॅन करू लागलो. मात्र या वेळी वैशाल धरमसी मदतीला आला. सरावासाठी डोंबिवली तळेगाव डोंबिवली अशी सफर साखरेकाका आणि अंकुर अगरवाल यांच्याबरोबर झाली. मात्र प्लॅन चा मसुदा अंतिम टप्यात येत असताना माझ्या पायाला दुखापत झाली. ती दुखापत वाढत गेली आणि गोवा सफर पुन्हा रद्द झाली. त्यानंतर पाय बरा झाल्यावर अय्यरकाकांबरोबर अष्टविनायक सायकलसफर पूर्ण केली. नयना आघारकर यांच्या बरोबर डोंबिवली बरोडा सफरही आत्मविश्वास देऊन गेली.
वर्ष सरकले आणि पुन्हा गोव्याचे वेध लागत असताना बिभास आमोणकर यांच्या रांगडा महाराष्ट्र पालथा घालणाऱ्या saveoursahyadri ह्या मोहिमेविषयी समजले. महाराष्ट्राचे उत्तर टोक असलेले नवापूर आणि दक्षिण टोक असलेल्या सावंतवाडीवरून वेगवेगळ्या गटाद्वारे सफर सुरु होऊन दोन्ही गट महाबळेश्वर येथे भेटणार होते. निसर्गसंपन्न कोकणापक्षा अधिक अंतर सायकलिंग करता यावे म्हणून मी उत्तर मार्ग निवडला. अर्थातच पुढे मुंबई गोवा करताना दक्षिण मार्ग होणार असल्याचे मनात होतेच. मात्र यावेळी २०१६ साली saveoursahyadri साठी मुंबई गोवा राइड पुन्हा पुढे ढकलली होती.
पुढील वर्षी म्हणजे २०१७ साली माझा अत्यंत लाडका फलंदाज श्री सुनील गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२ इतके किमी सायकलिंग करण्याचे ठरवले. रोजचे ६०-६२ किमीचे cycle2work सुरु असताना या वर्षी दुसऱ्या पायाच्या करंगळीला जखम झाली. २०१५ प्रमाणेच २०१७ सालीही दोन महिने सायकलिंग थांबले. पुन्हा गोव्याचा विचार रद्द केला. यावेळीही सर्व प्लॅन तयार होता, सायकलसुद्धा तयार करवून घेतली होती. मन खट्टू न होते तरच नवल. मात्र नयना आघारकर यांनी धीर दिला,' शशांक, तुझे गोवा नेहमी रद्द होतेय यामागे काहीतरी कारण (विधिलिखित) असावे.' अविनाशला गोव्याला जाता आले नाही म्हणून मला जाता येत नाहीये का, हा विचार मनात आला. पण तो क्षणभरच! उलट डोंबिवली गोवा सायकल सफर करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेला अविनाश मला ते स्वप्न पूर्ण करायला मदतच करेल असे मन सांगू लागले.
वर्षाच्या उर्वरित दिवसात नियमितपणे ६०-६२ किमी cycle2work करून १०१२२ किमी सायकलिंग पूर्ण केले. अटलबिहारी बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेम्बर २०१७ रोजी माननीय नेते श्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर संस्थेतर्फे माझ्या ध्येयासक्तीमुळे मला 'आदर्श डोंबिवलीकर' हा पुरस्कारही मिळाला.
या पुरस्कार मिळाल्याच्या आनंदापेक्षा डोंबिवली शहराने सायकलिंग ची दखल घेतल्याचा आनंद अधीक होता. खरतर हा पुरस्कार माझ्यापेक्षा सायकलिंग/ सायकलचा होता. मी निमित्तमात्र होतो. ह्या पुरस्कारामुळे इतर कोणाला प्रोत्साहन मिळाले असेल तर उत्तमच. मात्र माझी अर्धांगिनी नक्कीच प्रोत्साहित झाली. तिनेही सायकलिंग सुरु करण्याचे ठरवले. २०१८ च्या जानेवारीपासून तिने सायकलिंग सुरु केले. आता माझी अर्धांगिनीही माझ्याबरोबर मुंबई गोवा सायकलिंग सफर करण्याबद्दल बोलू लागली. दोघांचाही सराव नियमितपणे सुरु झाला. डोंबिवली तळेगाव डोंबिवली अश्या सफरी एप्रिलच्या उन्हात आणि जुलैच्या पावसातही झाल्या. पुन्हा एकदा डोंबिवली गोवा सायकलसफरीचा प्लॅन शिजू लागला...

Chhan. Due to awe factor, i am at loss of words. Will definitely like to know various small or big precautions a cyclist should take. Thanks.
उत्तर द्याहटवाThanks dear. I ll try to sum up the precautions to be taken in next part of the blog. Your suggestion has definitely given me new vision to develop my writing. Please keep giving suggestions
हटवा