भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर अश्विन २६ १९४०
(भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर हे जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडर आहे तसेच ते जगातील एकमेव शास्त्रीय सौर कॅलेंडर आहे)
हिंदू तिथी अश्विन शुक्ल १० शके १९४० (हिंदू कॅलेंडर हे शास्त्रीय मात्र चांद्र कॅलेंडर आहे. मुस्लिम कॅलेंडर सुद्धा चांद्र कॅलेंडर आहे)
ख्रिस्ती दिनांक ऑक्टोबर १८, २०१८ (ख्रिस्ती ग्रेगोरियन कॅलेंडर हे भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणेच सौर कॅलेंडर असले तरी ते अशास्त्रीय आणि ख्रिस्ती धर्मसंस्थापकाच्या जीवनाशी तसेच युरोपमधील राजे, सरदार यांच्या जीवनाशी निगडित आहे.)
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा! विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त. संपूर्ण भारतवर्षातील हा महत्वाचा सण आहे. पांडवांनी शमीच्या झाडावरून शस्त्रे उतरवली तो हा दिवस. कोणत्याही नवीन कार्यासाठी , खरेदीसाठी हा उत्तम मुहूर्त!
ह्या दिवशी मुंबईत सायकलमित्रांनी वेगवेगळ्या फेऱ्यांचे आयोजन करणे स्वाभाविकच! मुलुंड येथील सायकलमित्रांनी जिलेबी राइड आयोजित केली होती. डोंबिवली सायकल क्लबसुद्धा याला अपवाद नव्हता. अर्थातच श्विनला सज्ज करून आज फेरी मारणे आवश्यकच होते. स्कॉटचा तर हा पहिलाच दसरा! श्विन आणि स्कॉटने दसऱ्यानिमित्त नेवाळी फाटा येथे जाऊन यायचे ठरवले.
डोंबिवली शहर मागे पडून कल्याण शिळ रस्त्याला लागताच दोघांनी वेग घेतला. काटई नाक्याला दवे वळण घेत श्विन आणि स्कॉट कोळेगाव चौकात पोचले. तेथे मात्र बेशिस्त तिनचाकी रिक्षांमुळे पुन्हा वेग मंदावला. पुढे बदलापूर पाइपलाइन रस्त्याला असलेल्या लक्षावधी खड्डयांचा विचार करून श्विन आणि स्कॉट सेवा रस्त्याला लागले. सेवा रस्ता अरुंद असला तरी इथे वाहतूक तुरळक असते. अर्थात ठराविक अंतरावर पूर्ण रस्ता व्यापणारे खड्डे आणि गतिरोधक ह्या रस्त्यावर आहेतच. मात्र ह्या अरुंद सेवा रस्त्याच्या दोहो बाजूनी स्वागत करणारा निसर्ग पाहत राइड करणे नेहमीच आल्हाददायक असते. येथील छोटी फुले, त्याभोवती फिरणारी फुलपाखरे, मंजुळ संगीत देणारे पक्षी श्विनला मंत्रमुग्ध करतात.
श्विन आणि स्कॉट एका लयीत जात होते. संयत मात्र सातत्य राखणाऱ्या गतीने दोघेही हा हा म्हणता नेवाळी फाटा इथे पोचले. कल्याणकडून मलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला काटई बदलापूर रस्ता मिळतो तोच हा नेवाळी फाटा. येथून मलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेवाळी गाव आहे.
नेवाळी फाटा येथील परिसर आज गजबजलेला होताच, तसेच नटलेलाही होता. तेथील चौकात झेंडूच्या फुलांनी, हारांनी भरलेल्या टोपल्या लक्ष वेधुन घेत होत्या. झेंडूच्या फुलांच्या मोठमोठ्या माळा घेऊन विक्रेते उभे होते. संपूर्ण परिसराला उत्सवी रूप आले होते. नेवाळी फाटा आज वेगळ्याच रुपात नटला होता. त्याचे अलौकिक रूप पाहताना भान हरपत होते.
गन्धार कुलकर्णी आणि अर्णव कुलकर्णी यांच्याबरोबर नेवाळी फाटा येथे अनेक राइड झाल्यामुळे इथे आल्यावर पृथ्वीवरील अमृताचा आस्वाद घेण्याची सवय श्विनला लागली होतीच. या चौकातच चहाची तीन चार दुकाने आहेत. गन्धार आणि अर्णव ज्या चहावाल्याकडे चहा घेत त्याच्या समोरच्या बाजूला असलेला चहावाला मेघेशने नुकताच दाखवला होता. ती टपरी छोटीशी पण एकदम लख्ख होती. तेथे मिळणारा चहासुद्धा अमृततुल्यच होता. मात्र नेवाळी फाटा येथील फुल आणि हारांची रंगसंगती पाहताना चहाचा ग्लास हातात असूनही आज त्या अमृताकडे लक्ष नव्हते.
काहीवेळ तेथे रंगून गेल्यावर मात्र श्विन आणि स्कॉट परतीच्या मार्गाला लागले. मात्र परतीच्या मार्गात तळोजाफाटा ते काटई या मार्गावरील अगणित खड्डयांचा विचार करून श्विन स्कॉटने खुष्कीचा मार्ग निवडला. उंबर्ली गावाकडून जाणारा हा मार्ग तळोजा फाट्याजवळून सुरु होऊन थेट कल्याण शिळ महामार्गावरील मानपाडेश्वर मंदिरापाशी संपतो.
DCC सदस्य सहसा फक्त दर रविवारी एकत्र भेटलं असले तरी सारंग मुळ्ये ह्याच्यासाठी आजचा दिवस खास होता. तो साजरा करण्यासाठी सारंगने आज एक विशेष राइड आयोजित केली होती. त्यानिमित्ताने काही DCC सदस्य आज उंबर्ली येथील तळ्यापाशी जाणार होते. उंबर्ली गावातून जाणाऱ्या रस्त्यावरून जाताना सारंग भेटण्याची शक्यता होती. १० वी इयत्तेत असताना सारंगला त्याच्या वडिलांनी दसऱ्याच्याच दिवशी एक घोडा सायकल घेऊन दिली होती. सगळ्याच सायकलप्रेमींप्रमाणेच सारंगचेही त्याच्या सायकलवर जीवापाड प्रेम आहे. त्याच्या त्या लाडक्या सायकलचा आज ३२ वा वाढदिवस होता. तो वाढदिवस साजरा करण्यासाठी DCC सदस्य उंबर्ली तळ्यापाशी जमले होते.
श्विन आणि स्कॉट तेथे पोहोचेपर्यंत काही सदस्य माघारी परतले होते. श्विन आणि स्कॉट नेवाळी फाट्याला जाऊन सारंगच्या सायकलचा वाढदिवस साजरा करायला आले होते तसेच प्रमाणेच पुष्कर जोशी, मेघेश कुलकर्णी आणि विनीत शेट्ये हे शिळ फाट्याला जाऊन उंबर्ली येथे पोचले होते.
उंबर्ली येथील तळ्यापाशी एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरासमोरील परिसर नेहमीप्रमाणेच स्वच्छ होता. शेजारील विस्तीर्ण तळे DCC मधील सदस्यांना नेहमीच आकर्षित करत असते. पुष्कर जोशी तेथे असल्यावर त्या तळ्यात डुंबण्याचा परिपाठ ठरलेलाच. श्विन तेथे जाईपर्यंत पोहण्याचा कार्यक्रम आटोपला होता. तळ्याच्या दुसऱ्या बाजूला विश्रांतीसाठी एक शेड बांधलेली आहे. त्या शेडमागे असलेल्या टेकडीजवळून एक पायवाट आहे. ती थेट रिजन्सी जवळ जाते. या पायवाटेवरून जाताना शहर जवळ असल्याचा अंदाजही येत नाही. काही वर्षांपूर्वी येथे घनदाट जंगल असल्याचा अंदाज येतो. तेथे असलेल्या निसर्गसंपत्तीच्या मोहामुळे फिरणारे छायाचित्रकार, निसर्ग भ्रमंती करणारे भटके वगळता फारशी वर्दळ येथे नसते. खरतर डोंबिवली शहराजवळ उरलेल्या मोजक्या संपत्ती पैकी हि टेकडी हा फार मौल्यवान ठेवा आहे. अनेक लहान पक्ष्याप्रमाणेच घारीसारखे मोठे पक्षीही येथे आढळतात. गरुडाचेही अस्तित्व येथे असल्याचे ऐकण्यात आहे.
वैशाल धरमसी या निसर्गवेड्या सायकलपटूचा हा टेकडीजवळील मार्ग अत्यंत आवडता होता. त्या मार्गावरून जाण्याचा मोह आज मात्र श्विनने आवरता घेतला. तरीही बऱ्याच दिवसांनी DCC सदस्य भेटल्यामुळे दसऱ्याचा आनंद द्विगुणित झाला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा