अष्टविनायक यात्रेदरम्यान सर्व गणपतींचे दर्शन झाल्यावर पुन्हा प्रथम गणपतीचे दर्शन घेतले तर अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. शास्त्रोक्त पद्धतीने ही यात्रा करत असताना ज्या गणपतीचे सर्वप्रथम तसेच सर्वात शेवटी दर्शन घ्यायचे तो गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर! सिंधू ह्या दैत्याचा वध करणारा हा मयुरेश्वर! माघी चतुर्थी तसेच भाद्रपद चतुर्थी या दिवशी चिंचवड येथून गणेशाची पालखी मयुरेश्वराच्या देवळात येते.
हे मंदिर नेमके कधी बांधले याचा कालावधी निश्चित नसला तरी मोरया गोसावी यांचा मात्र या मंदिराशी थेट संबंध आहे. पेशव्यांच्या काळात या देवालयाची भरभराट झाली. मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावर समर्थ रामदासांना 'सुखकर्ता दुखहर्ता' ही आरती स्फुरली.
मंदिर उंच दगडी भिंतीने संरक्षित आहे. ती भिंत चारही कोपऱ्यातील मिनारांनी जोडलेली आहे. ते मिनार मंदिराच्या स्थापत्यकलेवरील मुस्लिम प्रभावाची साक्ष देत आहेत. काही काळ एक मुस्लिम सरदार या मंदिराचा आश्रयदाता आणि संरक्षक होता. या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वार एकेका युगाचे प्रतिनिधित्व करतात. पूर्वेच्या प्रवेशद्वारावरील बल्लाळविनायकासमवेत राम आणि सीता 'धर्माचे' प्रतीक आहेत आणि सृष्टीचा रक्षणकर्ता विष्णूचे मूर्त स्वरूप आहेत. दक्षिण प्रवेशद्वाराकडील विघ्नेश शिव आणि पार्वतीसह 'अर्थ' म्हणजेच संपत्ती आणि कीर्तीचे प्रतीक असून सृष्टीचे विसर्जन करणाऱ्या शिवाचे मूर्त स्वरूप आहेत. पश्चिमेकडील चिंतामणी हा कामदेव आणि रती सह असून 'काम' म्हणजेच अभिलाषा, प्रेम, कामुक आनंदाचे प्रतीक असून निराकार ब्राह्मणाचे मूर्त स्वरूप आहे. तर उत्तरेकडील महागणपतीसह वराह आणि त्याची पत्नी महीसह 'मोक्ष' चे प्रतीक आहे जो ब्राह्मणाचे मूर्त स्वरूप आहे.
मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून चौकोनी आवारात दोन दीपमाळा आहेत.
मोरगाव येथे श्विन स्कॉट पोचले तेव्हा बऱ्यापैकी अंधार झाला होता. तेथील चिंचोळ्या बोळातून त्या अंधारात मुख्य रस्ता शोधणे कठीणच होते. मोरगाव येथे श्री ढोले भाऊ यांनी श्विन आणि स्कॉटची भक्तनिवासात सोय केलेली होती. भक्तनिवासात थोडी विश्रांती घेऊन आणि स्नान करून दोघेही मयुरेश्वराच्या दर्शनाला निघाले. शांत वातावरणात दोघांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले.
मंदीरामध्ये काही काळ प्रसन्न वातावरणाचा लाभ घेऊन श्विन आणि स्कॉट क्षुधाशांतिगृह शोधू लागले. जवळपास मोजकीच क्षुधाशांतिगृह दिसत होती. खरतर अद्याप ८-८.३० चा च सुमार झाला होता. मात्र मुख्य रस्त्यावरही सामसूम झाली होती. थोडा फेरफटका मारून श्विन स्कॉटने एक क्षुधाशांतिगृह निवडले. तेथील जेवण खरोखरीच रुचकर होते. त्यानंतर दोघेही भक्तनिवासात जाऊन निश्चीन्तपणे निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. मात्र दरम्यान श्विनच्या डोक्यात पूढील ४ दिवसांचा पल्ला ३ च दिवसात कसा पार पाडता येईल याचे नियोजन होत होते.
दुसऱ्या दिवशी दोघांनाही पहाटेच जाग आली. जवळपास चहापान करत असता मोरगाव कडून केडगाव चौफुलाकडे जाणारा रस्ता दोघांनी विचारून घेतला. भक्तनिवास मंदिराच्या शेजारीच होते. मोरगाव सोडण्याअगोदर श्विन स्कॉट पुन्हा मंदिराकडे वळले.
पहाटेच्या प्रकाशात मंदिर अतिशय सुंदर दिसत होते. मंदिराचे दर्शन घेऊन श्विन स्कॉटने कूच केले. सुरुवातीचा रस्ता अतिशय चिंचोळा होता. त्यामुळे दोघेही थोडे गोंधळात पडले होते. मात्र तो चिंचोळा रस्ता संपून सुपेच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागल्यावर मात्र दोघे निर्धास्थ झाले. रस्ता फारसा रुंद नव्हता. दोघांनीही संथ गतीने जाणेच पसंत केले.
काही काळातच डाव्या हाताला मयुरेश्वर अभयारण्य लागले.

अभयारण्यात जाण्यास मज्जाव असल्याचा फलक तेथे होताच. तसेच श्विन स्कॉटलाही अभयारण्यापेक्षा सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची ओढ लागली होती. दोघेही अभयारण्य मागे सोडून पूढे जाऊ लागले. रस्ता थोडासा ओबडधोबड आणि अरुंद असल्याने वेग वाढवता येत नव्हता. तरी दोघेही सातत्याने पुढे जात होते.
साधारण सकाळचे ९ वाजण्याच्या सुमारास दोघेही केडगाव चौफुला येथे पोचले. श्विनच्या डोक्यात रात्री शिजलेल्या योजनेप्रमाणे पुढील ४ दिवसांचा प्रवास ३ च दिवसात पूर्ण करायचा असल्यास आज सिद्धटेकला जाऊन न थांबता परत मागे केडगाव चौफुला येथे येणे गरजेचे होते. त्यामुळे दोघांनी केडगावला पोचताच प्रथम रात्री राहण्याची सोय होईल का ते पाहिले. सुदैवाने पहिल्याच ठिकाणी त्यांना राहण्याची उत्तम सोय होत असल्याचे समजले. त्या इंद्रप्रस्थ लॉज मध्ये आगाऊ रक्कम देऊन दोघांनी रात्री राहण्याची सोय नक्की केली.
केडगाव येथे नाष्टा करायला न थांबता दोघेही पुढे पाटस येथील टोलनाक्याला पोचले. तेथील क्षुधाशांतिगृहात मनाजोगता नाष्टा झाल्यावर दोघांनी दौंड शहराकडे मोर्चा वळवला. नाष्टा होईपर्यंत सकाळी १० चा सुमार झाला असावा.
पाटस येथील टोळ नाक्या पासून अवघ्या १३ किमी वर दौंड शहर तर तेथून पुढे जेमतेम २० किमी वर सिद्धटेक. म्हणजे पाटस टोळ पासून सिद्धटेकला जाऊन येऊन अंतर होते ६६ किमी. तर त्यांनंतर पुन्हा केडगाव येथिल इंद्रप्रस्थ लॉज फक्त १० किमी अंतरावर. श्विन स्कॉटच्या अंदाजाप्रमाणे सिद्धिविनायकाच्या दर्शन आणि ७६ किमी अंतराचा प्रवास यास साधारण ६-७ तास पुरेसे होते. मात्र यापुढे मात्र वेगळेच विधिलिखित ठरले होते.
दौंडकडे दौड सुरू झाली खरी पण रस्त्याची अवस्था पाहता ती दौड दुडकी ठरत होती. येथील हमरस्ता पाहता डोंबिवली शहरातील रस्ताही सुंदर वाटू लागला होता. फुटाफुटाला पडलेले खड्डे श्विन आणि विशेषतः स्कॉटची परीक्षाच पाहत होते. श्विन स्कॉट मधले अंतर वाढत होते, त्यामुळे श्विन थोड्या थोड्या अंतरावर स्कॉटसाठी थांबत असे.
स्कॉटची वाट पाहण्यासाठी विश्रांती घेण्यास श्विनला मिळालेले एक आसन
रस्ता खड्याखड्यांनी जोडलेला आहे असेच वाटत होते. श्विन पुढे जाऊन थांबत असल्याने श्विनला थोड्या थोड्या वेळाने विश्रांती मिळत होती. स्कॉटला मात्र वेग कायम राखता येत नसल्याने विश्रांतीसाठी न थांबता मार्गक्रमण करावे लागत होते. मजल दरमजल करत दोघेही दौंड च्या वेशीवर पोचले. चहापानाच्या निमित्ताने विश्रांती घेऊन झाल्यावर दोघांनी दौंडहुन सिद्धटेकच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. यापुढचा रस्ता पाहता प्रवास आणखीच बिकट होणार याची प्रचिती लगेचच येऊ लागली.
मध्यान्हीचा समय झाल्यामुळे सूर्यदेव डोक्यावर आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती फुलली होती. रस्त्यावरील खड्यांची महिरप अधिक फुलत होती. श्विन आणि स्कॉट अथकपणे पुढे सरकत होते. सिद्धटेक जवळ येत असताना एक अनोखे दृश्य श्विनला दिसले
बाजूच्या शेतात अनेक ट्रॅक्टर हारीने उभे होते. ते दृश्य पाहून श्विनने पुन्हा टाच मारली खरी, पण.. श्विनच्या वाहकावर रबरी नळीने बांधलेली सॅक आता धावकावर स्थिर राहायला तयार नव्हती. पाटस-दौंड- सिद्धटेक या रस्त्यावरील प्रवास त्या सॅकलाही मानवेनासा झाला होता. तिने आता अस्मादिकांच्या खांद्यावरूनच प्रवास करण्याचा हट्ट धरला. दोघांचेही सामान त्याच सॅकमध्ये होते. पण आता श्विनचा नाईलाज तर होताच मात्र दिलासादायक बाब म्हणजे सिद्धटेक आता जवळ होते. काही काळातच श्विन सिद्धटेकच्या वेशीवर पोचून स्कॉटची वाट पाहू लागली. शेजारीच सिद्धटेक येथील प्रसिद्ध झुणका भाकरी केंद्राची झोपडी होती. त्यातून श्विनला झुणका भाकरीविषयी विचारणा झाली. श्विन मात्र स्कॉटच्या प्रतीक्षेत होती. इतक्यात 'शशांक....' अशी हाक ऐकू आली. महड येथे भेटलेली उल्हासनगरची जोडगोळी उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर तेथे ... त्याच झोपडीत आराम करत होती. हितेश श्विनच्या स्वागताला पुढे आल्याबरोबर श्विनने खांद्यावरील सॅक हितेशच्या हवाली केली. इतक्यात स्कॉटही तेथे पोचली.
सॅक हितेशकडे दिल्यावर श्विन आणि स्कॉट सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोचले. सिद्धिविनायकाच्या पुजाऱ्याला दोघेही सायकलने अष्टविनायक दर्शन करत आहेत हे समजताच त्याने श्विन स्कॉटच्या मागणीप्रमाणे देवाचे हार सायकलकरीता दिले. श्विन आणि स्कॉटने ते हार परिधान करताच दोघांचा रुबाब आणखीच वाढला.
एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती. दौंड शहर सोडता सोडता दोघांनी चहा बिस्किटांचा समाचार घेतला. आता त्या फुटक्या रस्त्यावरूनही जलदीने जायचा दोघे प्रयत्न करू लागले. अंधार पडायच्या आत पाटस गाठण्यासाठी दोघेही आटापिटा करू लागले. मात्र तेजोनिधीने अर्ध्या रस्त्यातच श्विन स्कॉटची साथ सोडली. श्विन स्कॉटचे दिवे अपुरे पडत होते. अंधाराचे साम्राज्य चांगलेच पसरले. तरी पाटस टोल जवळ येत असल्याचे चिन्ह दिसत नव्हते. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही अश्या मिट्ट काळोखात दोघेही बेभानपणे पुढे सरकत होते. किती वेळ जातोय हे कळत नव्हते मात्र पाटस टोल नाका मात्र अजूनही येत नव्हता. प्रत्येक क्षण हा युगासारखा वाटू लागला होता आणि प्रत्येक पुढील पेडल मारताना अधिकाधिक धडकी भरत होती. अंधाराच्या साम्राज्यात स्कॉट किती मागे आहे हेही श्विनला कळू शकत नव्हते. अरुंद रस्ता आणि अंधार यामुळे मागे राहिलेल्या स्कॉटसाठी वाटेत कुठे थांबताही येत नव्हते. स्कॉटनेही जोर लावला होताच. थोडं थोड्या वेळाने पाटस टोळ आला असे वाटत होते, मात्र ते मृगजळाप्रमाणे होते.
बराच अवधी गेल्यावर अखेरीस पाटस नाका आला. तेव्हा मात्र श्विन स्कॉटच्या जीवात जीव आला. दोघांनी लगोलग तेथे भरपेट नाष्टा करून घेतला. श्विनने केडगाव चौफुला येथील इंद्रप्रस्थ लॉजमध्ये भ्रमणध्वनी करून एकूण प्रकारची कल्पना दिली. तेथील लॉजच्या व्यवस्थापक मालकाने पाटसपासून केडगाव चौफुला पर्यंत सेवा रस्ता असून सेवा रस्त्यानेच या असे निक्षून सांगत श्विन स्कॉट ला आश्वस्तही केले. त्यावेळी ते बोलही फार आधार देणारे ठरले. सकाळी साधारण १० वाजता ज्या पाटस टोल हुन सिद्धटेककडे जाऊन त्याच पाटस टोलनाक्याला परत आले तोपर्यंतचे ६६ किमी अंतर पार करेपर्यंत संध्याकाळचे ७.३०- ८ वाजले होते. ६६ किमीचे अंतर हे साधारणपणे सिद्धिविनायकाच्या दर्शनासह ५- ६ तासात कापले जायला हवे त्यासाठी तब्बल ९.३०- १० तास लागले होते.
मात्र इंद्रप्रस्थलॉजच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे पाटस हुन केडगाव चौफुलयापर्यंत सेवा रस्ता होता. मुख्य म्हणजे तो खड्डेविराहित होता. त्यामुळे पाटस हुन इंद्रप्रस्थ लॉजपर्यंत मात्र श्विन स्कॉट विनासायास पोचले.

सिद्धटेक येथे आलेल्या भक्त गणांना श्विन आणि स्कॉटविषयी उत्सुकता वाटत होती. काहीजणांना श्विन आणि स्कॉट बरोबर छायाचित्र काढून घ्यायचे होते. श्विन स्कॉटने आनंदाने छायाचित्र काढू दिले. बरेच जण श्विनची चौकशी करत होते. त्याचदरम्यान डोंबिवली सायकल क्लबमधील श्री आवटीकाकांचे एक मित्र श्री दामले भेटले. श्री दामले सध्या पुणेकर असले तरी पूर्वी ते डोंबिवलीकर होते. मंदिरात थोडावेळ थांबून तेथे भेटणाऱ्या सिद्धिविनायकाच्या भक्तांशी गप्पा मारून श्विन स्कॉट पुन्हा निघाले. सिद्धिविनायकाचे मंदिर अतिशय सुंदर दिसत होते.
श्विन आणि स्कॉटला एव्हाना चांगलीच भूक लागली होती. उपेंद्र आणि हितेश थांबलेल्या झोपडीत गेल्यावर श्विन स्कॉटने जेवणाची फर्माईश केली. गरमागरम भाकरी, झुणका, वांग्याचे भरीत बरोबर कांदा, मिरचीचा ठेचा असा फक्कड बेत पाहून भरपेट जेऊन तेथेच ताणून द्यावी असा विचार येत होता. मात्र एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. श्विन स्कॉटला परत केडगाव चौफुल्याला जायचे होते तर हितेश आणि उपेंद्र मात्र दुसरा रस्ता पकडणार होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा रांजणगाव येथे भेटायचे ठरवून श्विन स्कॉटने त्यांचा निरोप घेतला.
आता पुन्हा एकदा सिद्धटेक दौंड पाटस या रस्त्याने जायचे होते. प्रत्येक पावला पावलाला श्विन आणि स्कॉटची परीक्षा घेतली जात होती. श्विन आणि स्कॉट चांगलेच तावून सुलाखून निघत होते.दोघेही MTB अर्थात माऊंटन बाइक श्रेणीतील असल्याने त्यांचा निभाव लागत होता. मात्र दौंड अवघ्या ३-४ किमी वर असताना श्विनच्या रबरी नळीतील हवा कमी होऊ लागल्याचे जाणवू लागले. धावकावरील सॅकचे वजन आणि रस्त्यातील खड्डे यामध्ये श्विनच्या मागच्या चाकातील रबरी नळीला छिद्र पडले होते. श्विन स्कॉटने रस्त्यात ठाण मांडून ते छिद्र शोधण्याचा प्रयत्न केला. ते छिद्र अतिशय सूक्ष्म होते. केवळ डोळ्यांना किंवा कानांना ते छिद्र जाणवत नव्हते. श्विन स्कॉटला तेथे रस्त्यावर बसून रबरी नळीचे काम करताना पाहून एक दुचाकीस्वारही तेथे थांबला. त्याने सिद्धटेककडे जातानाही श्विन स्कॉटला पाहिले होते. त्यालाही श्विन स्कॉटच्या अष्टविनायक सायकलयात्रेविषयी उत्सुकता वाटत होतीच. तो आणि त्याचा साथीदार श्विन स्कॉटला मदत करू लागले. मात्र त्यांनाही ते छिद्र सापडले नाही. अखेरीस श्विनने पायउतार होत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. स्कॉट पुढे जाऊन चौकशी करू लागली. चौकशी करता जवळच मोठ्या गाड्यांच्या टायरचे काम करणारा कारागिर जवळ असल्याचे समजले. तो सायकलचे काम करणारा नसला तरी श्विनकडे सर्व साहित्य होते. श्विन स्कॉटची अष्टविनायक यात्रा लक्षात घेता त्या कारागिराने तत्परतेने मदत केली.
एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती. दौंड शहर सोडता सोडता दोघांनी चहा बिस्किटांचा समाचार घेतला. आता त्या फुटक्या रस्त्यावरूनही जलदीने जायचा दोघे प्रयत्न करू लागले. अंधार पडायच्या आत पाटस गाठण्यासाठी दोघेही आटापिटा करू लागले. मात्र तेजोनिधीने अर्ध्या रस्त्यातच श्विन स्कॉटची साथ सोडली. श्विन स्कॉटचे दिवे अपुरे पडत होते. अंधाराचे साम्राज्य चांगलेच पसरले. तरी पाटस टोल जवळ येत असल्याचे चिन्ह दिसत नव्हते. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही अश्या मिट्ट काळोखात दोघेही बेभानपणे पुढे सरकत होते. किती वेळ जातोय हे कळत नव्हते मात्र पाटस टोल नाका मात्र अजूनही येत नव्हता. प्रत्येक क्षण हा युगासारखा वाटू लागला होता आणि प्रत्येक पुढील पेडल मारताना अधिकाधिक धडकी भरत होती. अंधाराच्या साम्राज्यात स्कॉट किती मागे आहे हेही श्विनला कळू शकत नव्हते. अरुंद रस्ता आणि अंधार यामुळे मागे राहिलेल्या स्कॉटसाठी वाटेत कुठे थांबताही येत नव्हते. स्कॉटनेही जोर लावला होताच. थोडं थोड्या वेळाने पाटस टोळ आला असे वाटत होते, मात्र ते मृगजळाप्रमाणे होते.
बराच अवधी गेल्यावर अखेरीस पाटस नाका आला. तेव्हा मात्र श्विन स्कॉटच्या जीवात जीव आला. दोघांनी लगोलग तेथे भरपेट नाष्टा करून घेतला. श्विनने केडगाव चौफुला येथील इंद्रप्रस्थ लॉजमध्ये भ्रमणध्वनी करून एकूण प्रकारची कल्पना दिली. तेथील लॉजच्या व्यवस्थापक मालकाने पाटसपासून केडगाव चौफुला पर्यंत सेवा रस्ता असून सेवा रस्त्यानेच या असे निक्षून सांगत श्विन स्कॉट ला आश्वस्तही केले. त्यावेळी ते बोलही फार आधार देणारे ठरले. सकाळी साधारण १० वाजता ज्या पाटस टोल हुन सिद्धटेककडे जाऊन त्याच पाटस टोलनाक्याला परत आले तोपर्यंतचे ६६ किमी अंतर पार करेपर्यंत संध्याकाळचे ७.३०- ८ वाजले होते. ६६ किमीचे अंतर हे साधारणपणे सिद्धिविनायकाच्या दर्शनासह ५- ६ तासात कापले जायला हवे त्यासाठी तब्बल ९.३०- १० तास लागले होते.
मात्र इंद्रप्रस्थलॉजच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे पाटस हुन केडगाव चौफुलयापर्यंत सेवा रस्ता होता. मुख्य म्हणजे तो खड्डेविराहित होता. त्यामुळे पाटस हुन इंद्रप्रस्थ लॉजपर्यंत मात्र श्विन स्कॉट विनासायास पोचले.

Khup sunder....khilawun thevnare warnan....Abhinandan...aadhiche lekh kuthe milu shakatil...Salute to you both.
उत्तर द्याहटवाधन्यवाद. shwinnsafari या ब्लॉगवर आपण आधीचे लेख पाहू शकाल.
हटवाआपले नाव कळू शकेल का?
Nice
उत्तर द्याहटवा