भारतीय राष्ट्रीय दिनांक ७ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती २८ डिसेंबर दिनांक २०१९
(भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर आणि ग्रेगोरीयन कॅलेंडर दोन्ही सौर कॅलेंडर असल्याने दोन्हीमध्ये एका वर्षात ३६५ दिवस असतात. मात्र ग्रेगोरीयन कॅलेंडरच्या महिन्यांची नावे युरोपमधील सरदार, ख्रिस्ती/ रोमन देवता ह्यांच्या नावावरून आहेत. शेवटच्या ४ महिन्यांची नावे आकड्यांवर आधारित आहेत... मात्र चुकीच्या क्रमांकावर आहेत. Septem म्हणजे सात पण सप्टेंबर महिना मात्र ९ वा, तीच स्थिती Octo (८), novem (९) आणि decem (१०) या महिन्यांबद्दल. महिन्यांची नावे ८, ९ आणि १० पण त्यांची स्थाने मात्र अनुक्रमे १०, ११ १२ व्या क्रमांकावर! सगळाच धेडगुजरी कारभार.
ग्रेगोरीयन कॅलेंडरमधील ह्या तसेच इतर चूका टाळून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर तयार केले आहे. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये महिन्यांची नावे कोणत्याही विशिष्ट प्रदेश वा धर्माच्या देवांच्या नावाऐवजी अवकाशात असलेल्या नक्षत्रांच्या म्हणजे ताऱ्यांच्या समूहावरून ठेवलेली आहेत... ही नक्षत्रे तर संपूर्ण जगाला, सगळ्या धर्मांना सामायिक आहेत. म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर हे खऱ्या अर्थाने एकमेव जागतिक कॅलेंडरही आहे)
सिरोही बाह्य वळण रस्त्याने बोगद्यापासून साधारण १७ किमी अंतरावर वेरावीलपूर नावाचे छोटे गाव आहे. खरंतर गाव म्हणण्याएवढीही वस्ती तिथे नाही. त्या ठिकाणी महामार्गाला लागून असलेले हॉटेल रामदेव म्हणजे खरतर एक छोटा मॉलच होता. एखाद्या अजगराप्रमाणे लांबलचक पसरलेल्या त्या इमारतीमध्ये एका रांगेत बरीच दुकाने होती. त्यातील काही दुकांनापुढे जेवणासाठी लाकडी मेज आणि प्लास्टिक खुर्च्या रांगेत मांडल्या होत्या. शेजारशेजाराच्या दोन मेजांभोवतीच्या खुर्च्यांवर कब्जा करून आम्ही आरामात बसलो होतो. आजचे गंतव्यस्थान आता जेमतेम २५-३० किमी म्हणजे तास दीड तासांवर होते आणि जेमतेम मध्यान्ह उलटत होती. सगळेजण आपापली गात्रे शिथिल करत हास्यविनोद करत बसलेले असताना आमच्या गटाचा तरुण चेहरा मात्र तेथे दिसत नव्हता. तो अत्यंत निराश मनाने सगळ्यांपासून लांब जाऊन एकटाच बसला होता. बहुतेक घराच्या आठवणीमुळे त्याचा चेहरा ओढग्रस्त दिसत होता.
रामदेवाचा कृपाप्रसाद मिळाल्यावर आम्ही पुन्हा सज्ज होत होतो. दरम्यान मीराने एका दुकानात एक वस्तू पाहून ठेवली होती. पण तिच्यामुळे सगळ्यांना उशीर व्ह्यायला नको म्हणून तिने खरेदी करण्यात वेळ घालवायचा नाही असे ठरवले. मात्र आसाभाई, रसिकभाई अजून तयार झाले नव्हते. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी मीरा सगळ्यांना सूचना देऊन पुन्हा एकदा रामदेव मॉल मधील त्या दुकानात गेली. इतक्यात आसाभाई, रसिकभाई आले. ते येताच मीराची वाटही न पाहता सगळ्यांनी कूच केले. फुजीमात्र ट्रेकची वाट पाहत थांबली होती. अर्थात असा अनुभव आता नित्याचाच झाल्यामुळे फुजी, ट्रेक आणि नयना आघारकर ह्यांनी मात्र खुण गाठ बांधली. मीरा थोड्याच वेळात भेटवस्तू घेऊन आली. ती भेटवस्तू तिच्या भावासाठी अमूल्य होती.
शेवगंज येथील मेजवानीमुळे पोटोबाबरोबर मनही तृप्त झाले होते. शेवभाजी, रोटीवर आडवा हात मारल्यावर जठराग्नीला आहुती मिळाली असली तरी गारठ्याने हुडहुडी भरायला लागली होती. मात्र धाब्यावरील सेवा पंचतारांकित हॉटेलपेक्षाही चांगली, विनम्र आणि तत्पर होती. हात धुण्यासाठी आमच्यासाठी त्यांनी गरम पाण्याची व्यवस्था केली. इतक्यात आमचे लक्ष शेजारील चुलीकडे गेले. पेटते कोळसे तिथे धगधगत होते. आम्ही लगेचच त्याभोवती कोंडाळे केले. थंडी इतकी जाणवत होती की त्या निखाऱ्याला जवळजवळ स्पर्श केला तरी हात भाजणार नाहीत असे वाटत होते.

थोड्या वेळातच सगळे जण सुमेरपूरजवळ पोचले आणि हॉटेल शिवम्बाची चौकशी करू लागले. गाव छोटेसेच होते. हॉटेल लगेचच सापडले. चारमजली लांबलचक इमारतीमध्ये ते हॉटेल होते. हॉटेलमध्ये आमचे चांगले स्वागत स्वागत झाले. टेम्पोमधून सामान काढण्याचे काम सुरू असताना एकादशी कोल्हटकर यांचे कवायत क्लास सुरू झाले. एकादशीचा हा गुण वाखाणण्यासारखा होता. रोज १००- १२५ किमी सायकलिंग केल्यानंतर शरीराचे स्नायू मोकळे करणे आवश्यक असते. एकादशी स्वतः तर ते करत असेच शिवाय इतरांनाही स्नायू मोकळे करण्यासाठी कवायत करायला लावत असे.
फुजी, ट्रेक आणि नयना आघारकरांनी लगेचच चहाकेन्द्र शोधले. गंतव्यस्थानी पोचलो तेव्हा जेमतेम ४.३० वाजले असल्याने आसपास फिरण्यासाठी बराच वेळ हाताशी होता. आजूबाजूच्या ठिकाणांची चौकशी करताना कळले की आम्ही उतरलो ते गाव शेवगंज होते आणि एक किमी पुढे सुमेरपूर गाव होते. सगळेजण सुस्तावले होते. आम्ही बाहेर पडेपर्यंत दक्षिण गोलार्धातील रवी अस्ताला गेला होता. आम्ही सुमेरपूरपर्यंत चालत जायचे ठरवले. रस्ता मोकळा होता. साडेसात वाजेपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. गारठाही पडायला सुरुवात झाली होती. इतक्यात वाटेतील एका धाब्याने अय्यरकाकांना मोहित केले. आम्ही थोडे पुढे होतो. सुमेरपूर गाव समोर दिसत होते. मात्र अय्यरकाका थांबलेले दिसल्याने आम्ही परत फिरलो. रविराजाने त्याची प्रभा आवरती घेतली तरी रजनीश आकाशात अवतरला होता. शुक्ल पक्षातील तृतीयेचे त्याचे रूप लोभसवाणे दिसत होते.
अय्यरकाका थांबले होते त्या धाब्यापाशी आम्ही पोचलो. धाब्यावरील एका बाजूला मोठाले पापड भाजले जात होते. त्यावर कांदा टोमॅटो, चीझची पखरण करून तो झकास सजवला जात होता. ते दृश्य पाहून आम्हीही थबकलो. खरतर एवढ्यात जेवण्याची इच्छा नव्हती. पण त्या सजवलेल्या पापडाने जिभेला पाणी सुटू लागले. एका मागोमाग एक पापड भाजले जात होते आणि तेवढ्याच गतीने त्या धाब्यातील ग्राहक ते संपवत होते. 'मेरा नंबर कब आयेगा' असा विचार करत आम्ही वाट पाहत होतो. अखेरीस बऱ्याच प्रतीक्षेनंतर आमचेही भाग्य उजळले. तो पापड जेवढा सुंदर सजवला होता तेवढाच तो स्वादिष्ट सुद्धा होता. पापडाची आहुती पडताच जठराग्नी चांगलाच जागृत झाला. लगेचच आम्ही जेवणाची फर्माईश केली. शेवभाजी असल्याचे कळताच फुजी आणि ट्रेकने लगेचच शेवभाजी मागवली. एव्हाना थंडी मी म्हणायला लागली होती. काल रात्र आणि आज सकाळच्या थंडीच्या अनुभवाने आंम्ही गरम कपडे घातले होतेच. शेवभाजी येईपर्यंत आम्ही आम्ही पापड संपवत होतो. तो संपल्यावर मात्र आमची चुळबुळ वाढली. 'शेवभाजी कब आयेगी?' असे विचारताच वाढायला येणारा पटकन मराठीत उत्तरला, 'थांबा, तयार आहे. आणतो लगेचच'. आम्ही बुचकळ्यात पडलो इथे राजस्थानच्या सीमेपासून सव्वाशे किमी आत असलेल्या खेड्यात हा वाढपी मराठी कसा काय बोलतोय. चेहऱ्यावरून तो ५५-६० वर्षांचा वाटत होता.
आम्ही चौकशी केल्यावर त्याने त्याची कहाणी ऐकवली. तो बरीच वर्ष भिवंडीला राहत होता. तिथे तो पानगादी चालवत असे. मात्र आर्थिक फसवणूक झाल्यामुळे दहा वर्षांपूर्वी राजस्थानला परतला आणि सध्या धाब्यावर वाढप्याचे काम करत होता.
त्याने शेवभाजी आणि बटर रोटी आणून दिली. पहिल्या घासालाच रसनेने शेवभाजीच्या अप्रतिम चवीला दाद दिली. डोंबिवली मध्ये अनेकदा शेवभाजी खाल्ली होती, मात्र ती तिखट असे. त्यामुळे शेवभाजी म्हणजे तिखटच असणार हे आमचा समज मात्र पार मोडीत निघाला. शेवभाजी तिखट अजिबातच नव्हती पण खाताच त्या शेवभाजीची एकच चव सांगता येणार होती.. ती म्हणजे चविष्ट!
शेवगंज येथील मेजवानीमुळे पोटोबाबरोबर मनही तृप्त झाले होते. शेवभाजी, रोटीवर आडवा हात मारल्यावर जठराग्नीला आहुती मिळाली असली तरी गारठ्याने हुडहुडी भरायला लागली होती. मात्र धाब्यावरील सेवा पंचतारांकित हॉटेलपेक्षाही चांगली, विनम्र आणि तत्पर होती. हात धुण्यासाठी आमच्यासाठी त्यांनी गरम पाण्याची व्यवस्था केली. इतक्यात आमचे लक्ष शेजारील चुलीकडे गेले. पेटते कोळसे तिथे धगधगत होते. आम्ही लगेचच त्याभोवती कोंडाळे केले. थंडी इतकी जाणवत होती की त्या निखाऱ्याला जवळजवळ स्पर्श केला तरी हात भाजणार नाहीत असे वाटत होते.
त्या गरम निखाऱ्यांची ऊब घेत आम्ही हॉटेल शिवम्बाकडे परतू लागलो. वाटेत फुजी(श्विन)चे लक्ष उद्या सकाळी लवकर चहाची सोय कुठे होईल याकडे लागले होते. शिवम्बा च्या चौकाजवळच एक चहाचे दुकान दिसले. तिथे जाताच आम्हाला समजले की त्याच दुकानात आमची सकाळच्या चहा नाश्त्याची सोय तेथील नगरसेवकांनी केली आहे. वाटेत भेटलेल्या पत्रकाराने आमची चांगलीच प्रसिद्धी केली होती, त्याचाच हा परिणाम होता. आम्ही पहाटे ६ वाजता निघणार असल्याचे समजताच तो नगरसेवक आमच्यासाठी लवकर हजर राहणार होता. अश्या प्रेमळ पाहूणचाराची आम्ही कल्पनाही केली नव्हती.

Khoop chhan v chavishta cycle tour! Shashank,tu Banker, cyclist,Abhyasu-lekhak,v Uttam khavayya ahes tari kay kay ajun!
उत्तर द्याहटवाTrivar vandan!
धन्यवाद
हटवाPudhil pravas varnachi aaturtene vaat pahat aahot!
उत्तर द्याहटवाधन्यवाद.लवकरच लिहितो
हटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवा