भारतीय राष्ट्रीय दिनांक ८ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २९ डिसेंबर २०१९
(भारत स्वतंत्र होण्याअगोदर ज्या भुभागावर ब्रिटिशांचे राज्य होते तिथे ख्रिस्ती कॅलेंडर वापरात होते. मात्र ज्या जवळपास ५७० स्वतंत्र संस्थांनाशी ब्रिटिशांनी केवळ तह/ करार केले होते आणि राज्य ब्रिटिश करत नसून तेथील संस्थानिकच तेथील राजे होते अश्या जवळपास ५७० संस्थानांमध्ये हिंदू अगर मुस्लिम कॅलेंडर वापरात होते. मात्र भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्या संस्थानांना स्वतंत्र राहणे शक्य नव्हते. कारण ब्रिटिशांशी केलेल्या करारानुसार त्यांना स्वतःचे सैन्य ठेवता येत नव्हते आणि ब्रिटिश भारत सोडून गेल्यावर इतक्या लांबून ते ह्या संस्थानांचे रक्षण करू शकणार नव्हते. अर्थातच ही संस्थाने भारतात विलीन झाली. मात्र संपूर्ण भारताला सामायिक कॅलेंडर असणे जरुरीचे होते. संस्थांनांमधील हिंदू अथवा मुस्लिम असलेली बहुतेक कॅलेंडर चांद्र पद्धती म्हणजे तिथीवर आधारित होती, तर ब्रिटिश राज्य करीत होते त्या भारताच्या भागामध्ये सौर कॅलेंडर असले तरी ते अवैज्ञानिक, केवळ युरोप खंडाशी आणि ख्रिस्ती धर्माशी निगडित होते. आशिया खंडाशी त्या म्हणजे ग्रेगोरीयन कॅलेंडरशी काडीचाही संबंध नव्हता आणि नाही. त्यामुळे भारत सरकारने सर्व अधिकृत कामकाजात वापरता येण्यासाठी सर्वांना सामायिक असे राष्ट्रीय कॅलेंडर निर्माण केले जे कोणत्याही धर्मावर आधारित नसून खगोलशास्त्रावर आधारित सौर कॅलेंडर आहे)
पौष महिन्याची आज ८ तारीख होती. म्हणजे पुणे जम्मू सायकलसफरीचा आज नववा दिवस होता. सायकलप्रवासाची नवलाई संपून आता आम्ही चांगलेच सरावलो होतो. पहाटे गजर लावण्याची सवय फुजी (श्विन) ला नव्हतीच, तशी लवकर उठण्याचीही सवयही नव्हतीच. मात्र या सायकलयात्रेदरम्यान आपोआपच जाग येत होती. श्विनला जाग आल्याबरोबर चहा घ्यावाच लागे. काल रात्री चहाचे दुकान पाहून ठेवले होतेच. अस्मादिकांना जाग आली तेव्हा ५.३०-५.४५ झाले असावेत. लगेचच अस्मादिकांनी चहाकेंद्र गाठले. तर तिथे येथील पालिका उपाध्यक्ष चंपादेवी कुमावत तसेच स्थानिक पूर्व नगरसेवक अशोक कुमावत सायकलपटूंच्या प्रतिक्षेतच होते. खरतर ते नगरसेवक इतक्या लवकर उठत नसत. मात्र खास सायकलपटूंचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना चहा नाष्टा देण्यासाठी ते भल्या पहाटे उठून चहाकेंद्रापाशी हजर झाले होते. त्यांनी लगेचच अस्मादिकांचे स्वागत केले आणि इतर सायकलपटूंबद्दल विचारले.
अस्मादिकांनी ग्लास मधून चहा घेतला तर नगरसेवकांनी आणखी चहा घेण्याचा आणि बिस्किटांचा आग्रह केला. इतक्यात अस्मादिकांचे लक्ष तेथील कुल्हडकडे गेले. श्विनने लगेचच कुल्हडमधून चहा घेतला आणि बरोबर बिस्किटांचाही फडशा पाडला. नगरसेवकांचा निरोप घेऊन अस्मादिक हॉटेलवर परतले आणि इतर सायकलपटूंना नगरसेवक वाट पाहत असल्याचे सांगितले. एव्हाना गौतम हजर झाला होता. त्यामुळे इतर सायकलपटू आपापल्या सायकली घेऊनच चहापानासाठी गेले. अस्मादिकांनीही फुजीचा ताबा घेतला... मात्र.. फुजीची रबरी नळी फुटल्याचे लक्षात आले. एव्हाना बाकी सगळे सायकलपटू सायकली घेऊनच नगसेवकांबरोबर चहा घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आत्ता रबरी नळी बदलायला वेळ नव्हता. त्यामुळे अस्मादिकांनी फुजीला टेम्पोमध्ये ठेवून श्विनला उतरवण्यासाठी गौतमला सांगितले. तो इतर सामान टेम्पोमध्ये लावण्यातच गर्क होता. इकडे सगळ्यांचे चहापान झाले होते. नगरसेवक आणि इतर सायकलपटू अस्मादिकांची वाट पाहत होते. मात्र गौतमने टेम्पोतून श्विनला उतरवल्याशिवाय अस्मादिकांना जाणे शक्य नव्हते. श्विन इतके दिवस टेम्पोत विराजमान असल्याने दिवा, छायाचित्रिकरणाची आयुधे फुजीने परिधान केली होती. गौतमने श्विनला उतरवल्यावर फुजीची आयुधे काढून ती सगळी आयुधे परिधान करायला श्विन थांबली तर इतर सायकलपटूंना उशीर होत होता. अखेर श्विनने त्यांना उशीर होऊ नये म्हणून पुन्हा एकदा दिवा परिधान न करता इतर सायकलपटूंच्या साहाय्याने सुरुवातीचा मार्ग कापण्याचे ठरवले. श्विन चहाकेंद्रापाशी पोचताच तेथील नगरसेवकांनी सगळ्या सायकलपटूंना हार घालून शुभेच्छा दिल्या.
इतक्यात मागून गौतम श्विनकडे आला. त्याला त्याच्या टेम्पोमध्ये ट्रेकने ठेवलेला एक दिवा सापडला होता. तो श्विनला देण्यासाठी तो आला होता. तो दिवा श्विन लावणार तोच बाकी सगळे सायकलपटू पुढे निघाले. ट्रेक मात्र श्विनसाठी थांबली होती. दरम्यान आजूबाजूला जमा झालेले लोकही श्विनची चौकशी करू लागले आणि शुभेच्छा देऊ लागले. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून पुढे गेलेले सायकलपटू कोणी मागे राहिले आहेत की नाही ह्याची फिकीर करणार नव्हतेच. त्यामुळे श्विनने पटकन पुढे जायची तयारी केली. पुढील सायकलपटूंना गाठण्यासाठी श्विन वेग घेत असताना ट्रेकला मात्र वेग घेता येईना. अद्यापि बराच अंधार होता. गौतमने दिलेल्या दिव्याने लगेचच राम म्हटला. ट्रेकला वेग घेता येत नसल्याने श्विननेही वेग कमी केला. मात्र त्यामुळे पुढील सायकलस्वार दिसेनासे झाले. इतक्यात सुमेरगंज गाव लागले. तिथे मोठा चौक होता. पुढे गेलेले सायकलपटू कुठल्या दिशेला गेले आहेत हे कळायला काहीच मार्ग नव्हता. जेमतेम ६.३० वाजले होते, त्यामुळे रस्त्यावरही कोणीही नव्हते. चुकीचा मार्ग धरला तर पुढील सायकलपटूंपासूनचे अंतर क्षणाक्षणाला दुपटीने वाढत गेले असते. त्यामुळे श्विनने चौकातच थांबायचे ठरवले आणि कोणीतरी भेटल्यावर मार्ग विचारून पुढे जायचे ठरवले. श्विन आणि ट्रेक थांबले खरे पण थोड्या अंतरावर एक छोटा दिवा श्विनला दिसला. श्विनने तिथे जाऊन पहायचे ठरवले. तिथे जाऊन पाहिले तर तो रसिकभाईंच्याच सायकलचा दिवा होता. काहीतरी अडथळा आल्यामुळे ते थांबले होते. ते मागोमाग येत आहेत की नाही याची फिकीर न करताच बाकी सगळे सायकलपटू पुढे निघून गेले होते. वास्तविक श्विन रोजच एक नियम सगळ्या सायकलपटूंना सांगत असे, ते म्हणजे 'Look back'. आपल्या पुढच्या सायकलपटूला गाठण्याचा प्रयत्न करू नका, मात्र कायम आपल्या मागे असलेल्या सायकलपटूकडे लक्ष ठेवा. पुढे गेलेल्या सायकलपटूला काही झाले तर आपण तिथे पोचणार आहोतच. पण मागील सायकलपटूला काही झाले आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नसू तर त्याला मदत द्यायला कोणीच नसेल. किंबहुना सगळ्यांनी look back हा नियम पाळला तर शेवटच्या सायकलपटूसाठी त्याच्या पुढचा सायकलपटू थांबेल, तो थांबला की त्याच्या पुढचा थांबेल. असे करत करत अगदी सुरुवातीचा सायकलपटूसुद्धा थांबेल आणि साखळी पूर्ण होईल. त्यामुळे सगळेजण एकमेकांच्या संपर्कातही राहू शकतात आणि एकमेकांना मदतही करू शकतात. त्यासाठी अगदी मागोमाग राहण्याची गरज नसली तरी मागील सायकलपटू आपल्या नजरेच्या टप्प्यात राहील ह्यापेक्षा अधिक अंतर असता कामा नये. दिवसाउजेडी दोन सायकलपटूंमधील हे अंतर अर्धा एक किमी सुद्धा असू शकते, मात्र पहाटेच्या अंधाराच्या वेळी हे अंतर ५-१० फुटपर्यंतच असणे गरजेचे होते.
दुर्दैवाने हा नियम पाळला न जात असल्याने रसिकभाईसुद्धा एकटे पडले होते. मात्र त्यांच्यामुळे श्विन ट्रेकला दिशा सापडली होती. आता तिघेही एकमेकांच्या बरोबरीने जाऊ लागले. उजेड पडेस्तोवर त्यांनी इतरांना गाठले. चहाकेंद्रासाठी थांबा घेईपर्यंत दोन तास 'सायकलवून' झाले होते. अस्मादिकांनी स्वतःला मिळालेला हार श्विनला घातला होता. त्या हारामुळे श्विन खुलली होती.
अस्मादिक चहा घेत श्विनकडे कौतुकाने बघत होते. श्विन ही फुजीप्रमाणे सडपातळ, देखणी रोड बाईक नव्हती तर ती सुबक ठेंगणी माऊंटन बाईक होती. मात्र ती अस्मादिकांची विशेष लाडकी होती. बऱ्याच दिवसांनी फुजी ऐवजी श्विनची साथ मिळाल्याने अस्मादिक विशेष खुश होते. फुजीप्रमाणे आभूषणे परिधान न करताही साधीसुधी दिसणारी श्विन खुलून दिसत होती.
चहा घेत असता कळले की तो चहावालासुद्धा पूर्वी कल्याणला राहत होता. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या परिसरात राहून गेलेला कोणीना कोणी जवळपास रोजच आम्हाला भेटत होता.
अस्मादिक चहा पिऊन श्विनकडे जाताच तेथील बालगोपाळही कुतूहलाने तेथे जमा झाले. त्यांची उत्सुकता, कुतूहल पाहून अस्मादिकही त्यांच्याबरोबर रमले.
आमचा पुढील प्रवास सुरु झाला. आम्ही राजस्थानमध्ये असल्याची जाणीव सतत होत होती कारण आता छोटे छोटे धाबेसुद्धा लांब लांब अंतरावर दिसत होते. त्यातच एका पुलाखालून एका नदीचे भलेमोठे मात्र कोरडे पात्र गेलेले नजरेस पडले.
अर्थात अश्या ह्या रस्त्यावर काही गमतीदार ठिकाणेही नजरेस पडत होती. रस्त्यावरील किमीच्या दगडांवर एक नाव सारखे नजरेस पडू लागले होते. ते पाहून मनात मात्र एक प्रश्न येऊ लागला होता, "हे काय 'बरं'?"
मात्र आमची दिशा 'बरं' पेक्षा वेगळी होती. त्या 'बरं' ने काही काळानंतर आमची साथ सोडली. दरम्यान साडेदहाच्या सुमारास नाष्टा झाल्यावर आम्ही पालीजवळ जेवणासाठी थांबायचे ठरवले होते. पाली शहराजवळील ७२ फूट संकटमोचक हनुमानाचे दर्शन झाले तोपर्यंत पोटातील कावळे कोकलायला लागले होते.
पाली शहर केव्हाच मागे पडले होते तरीही ठरवलेले असूनही पुढे गेलेले सायकलपटू थांबलेले दिसत नव्हते. शिवाय एक धाबा गेल्यावर दुसरा धाबासुद्धा जवळपास दिसत नव्हता. त्यामुळे आता जो धाबा आधी दिसेल तिथे थांबून आधी जठराग्नी शांत करायचे श्विन आणि ट्रेकने ठरवले. बराच वेळ गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक छोटा आणि कच्च्या बांधकामाचा धाबा दिसला. तिथे दोन माणसे दिसत होती. त्यांना विचारले तर १०-१५ मिनिटात जेवण मिळेल असे त्यांनी सांगितले. समोर तयारी तर काहीच दिसत नव्हती. मात्र आता इंधन भरल्याशिवाय पाय मारणे कठीण वाटत होते. अखेरीस शेवभाजीची फर्माईश करून श्विन आणि ट्रेक तिथे थांबले.
आश्चर्य म्हणजे खरोखरच १०-१५ मिनिटात अप्रतिम चवीचे जेवण तिथे मिळाले.
गौतम आणि शैलेशभाई देखील तिथेच जेवायला थांबले. त्यांचे जेवण झाल्यावर श्विन आणि ट्रेक ह्यांनी सायकलवायला सुरुवात केली तर गौतम आणि शैलेशभाई टेम्पोमधून मागोमाग येऊ लागले. तब्बल अर्धा तास पुढे गेल्यावर इतर सायकलपटू जेवायला थांबलेले दिसले.
एव्हाना अडीच वाजून गेले होते. क्षुधाशांती झाल्यामुळे आता प्रवास संथ गतीने होत होता. वस्तीची ठिकाणे एकमेकांपासून फार दूर दूर अंतरावर होती. पांथस्थांना विश्रांतीसाठी थांबायलाही जागा मिळणे दुरापास्त होते. तर इतर प्राण्यांना आधार मिळणे, नव्हे अगदी चारा मिळणेही अवघडच! मात्र सुदैवाने रस्त्यात असलेल्या गोशाळेमुळे मात्र हा प्रश्न सोडवणे थोड्या फार प्रमाणात शक्य झाले होते.
साधारण चार वाजत आले होते. जेवण करून बराच वेळ झाला होता. एकादशीची चहासाठीची 'लक्ष्मणवेळ' होत आली होती. तसे पाहता सोजत जेमतेम ४ किमी वर राहिले होते. मात्र चहाची लक्ष्मणवेळ पाळायची असल्याने आम्ही थांबा घेतला. सायकलपटू चहा, लस्सी घेत होते. तेथील चहावाला देखील अतिशय आपुलकीने चौकशी करत होता. चहाचे 'टॉनिक' मिळाल्यावर आम्ही थेट सोजत गाठले. मुक्कामी हॉटेल 'सनराइझ' येथे पोचलो तेव्हा 'सनसेट' अवघ्या तास-दीड तासावर होता. टेम्पोमधील सामान काढेपर्यंत हॉटेलवाल्याने चहा देऊन आमचे स्वागत तर केलेच पण त्याशिवाय आणखी तीन छोटे यजमानही आमचे मनोरंजन करत होते.

सुंदर लेखन !
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाआपल्या सायकल सफरीचा मूळ उद्देश शरीर स्वास्थ्य जागरूकता हा महान आहेच,पण त्यातून सामाजिक व पर्यायाने वैश्विक कल्याणचे कामही साध्य होईल. जगाला प्रदूषणापासून वाचवायला सायकलिंगचा
उत्तर द्याहटवाजास्तीत जास्त वापर हाच उपयुक्त ठरेल असे वाटते.
आपल्या सायकल सफरीचा मूळ उद्देश शरीर स्वास्थ्य जागरूकता हा महान आहेच,पण त्यातून सामाजिक व पर्यायाने वैश्विक कल्याणचे कामही साध्य होईल. जगाला प्रदूषणापासून वाचवायला सायकलिंगचा