भारतीय दिनांक ७ पौष १९४१
ग्रेगोरीयन दिनांक २८ डिसेंम्बर ? २०१९
महिन्याचे नाव DECA (डेका) म्हणजे दहा पण हा महिना बारावा कसा?
(भारतीय कॅलेंडर हे भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर असून ते कोणत्याही धर्मावर आधारित नाही. भारतीय कॅलेंडर हे ग्रेगोरीयन कॅलेंडरप्रमाणे सौर कॅलेंडर आहे. मात्र ग्रेगोरीयन कॅलेंडरमधील दोष काढून टाकून तयार केलेले भारतीय कॅलेंडर हे सर्वात अद्ययावत (modern), शास्त्रीय (scientific) कॅलेंडर असून सर्व अधिकृत (official) कामकाजात वापरणे आवश्यक आहे.
ग्रेगोरीयन कॅलेंडर युरोप खंडाच्या इतिहासावर आणि ख्रिस्ती धर्माच्या देवतांवर आधारित असून प्रत्यक्ष खगोलशास्त्राशी फारकत घेणारे असल्याने अशास्त्रीय तर आहेच शिवाय ते केवळ युरोप खंडातील तेही फक्त ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित आहे. भारतातील ख्रिस्तेतर तर राहोच पण भारतीय ख्रिस्ती लोकांचाही ग्रेगोरीयन कॅलेंडरशी काडीमात्र संबंध नाही)
भास्करचार्यांनी दक्षिण सीमेला भोज्या करून उत्तरेच्या दिशेने कूच केल्यापासून आज केवळ ७ वा दिवस! अर्थातच त्यांचे क्षितिजावरील आगमन बऱ्यापैकी उशिराने होणार होते. विषुववृत्त गाठायला त्यांना अद्यापि ८३ दिवस बाकी होते. अर्थातच गारठा चांगलाच जाणवत होता. दरम्यान अमावास्येला केवळ २ च दिवस होऊन गेल्याने रजनीशही लपून बसला होता. त्यामुळेच कौमुदीही (चंद्राचा प्रकाश) कोमेजलेली होती. तिमिराचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले होते. निशाराणीने घातलेल्या मोहिनीतून बाहेर पडायला मन मानत नव्हते.
धर्मशाळेतील खोलीमध्ये पाणी नसल्याने चहासाठी पाणी आणण्यासाठी बाहेर ठेवलेल्या कुलर पर्यंत जावे लागणार होते. कुडकुडत कुलरपर्यंत जाऊन पाणी आणले आणि विजेवर चालणाऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतले. दूध पावडर आणि चहाची पुडी टाकून केलेला चहा अमृतासमान भासत होता. अबुरोड येथील धर्मशाळेतील रात्रीच्या मुक्कामाने आम्हाला दिलेल्या थंडीची भेट आता आम्हाला चांगलीच जाणवत होती. मात्र त्या भेटीचा स्वीकार करत आम्ही पुढे कूच करण्यासाठी तयार झालो. सगळ्या स्वारांनी कडेकोट बंदोबस्त होईल असा पेहराव परिधान केला होता. फुजीसह तिच्या सर्व सख्यांनी हाताळ्यावर परिधान केलेले दिवे अंधारात सुंदर दिसत होते. घड्याळबाबा ६.३० ची वेळ दर्शवत असले तरी आदित्यमहाराजांच्या आगमनाची कोणतीही चाहूल लागत नव्हती. धर्मशाळेच्या आवारातून बाहेर पडताना सगळेजण पायउतार होऊनच जात होते. रस्त्याला लागताच अबू पर्वताकडे जाणारी दिशा पकडत सगळेजण स्वार झाले खरे पण लगेचच चहाकेन्द्र दिसल्याने सगळ्यांनी लगोलग लगाम खेचले. पहाटे पहाटेच एवढ्या संख्येने बाहेर पडलेले सायकलस्वार पाहून केन्द्रचालक आश्चर्यचकित झाला मात्र चांगली बोहनी होणार हे जाणून तो खूषही झाला. लगेचच चहा मिळाल्यामुळे सायकलस्वारही खूष झाले होते.
चहापान झाल्यावर पुन्हा एकदा अबू पर्वताकडे जाणारी दिशा पकडत सायकल यात्री जाऊ लागले. किंचित चढण असलेला रस्ता पहाटेच्या वेळी त्रासदायक वाटत नव्हता. सुरुवातीला काही अंतरावर पश्चिम बनास नदी आम्हाला समांतर जात होती. मात्र थोड्या वेळातच तिने एकदम उजवीकडे वळण घेतले. आम्ही मात्र तसेच पुढे अबू पर्वताच्या दिशेने जात राहिलो. साधारण ४ किमी अंतरावर आम्हीदेखील उजवीकडे वळण घेतले आणि अबू पर्वतापासून फारकत घेतली. मात्र एव्हाना पश्चिम बनास नदी आमच्यापासून बरीच लांब गेली होती. सुरुवातीपासूनच रस्ता फारसा रुंद नव्हता. रहदारीही फार नव्हती. आम्ही संथ गतीने पुढे जात होतो. आणखी पाचेक किमी अंतर कापले न कापले तोच पश्चिम बनास नदी झटक्यात वळून आमच्या रस्त्याला छेद देऊ लागली. अंथला पुलावरून आम्ही नदी ओलांडली. अबू पर्वताचा रस्ता आम्ही सोडला असला तरी डाव्या बाजूला दूरवर अर्बुदांचल आम्हाला साथ करत होताच. आता पश्चिम बनास नदिसुद्धा आमच्या डाव्या बाजूला आली. ती आता आम्हाला समांतर जाऊ लागली होती. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा राष्ट्रीय महामार्ग २७ ला लागलो. जवळपास पाऊण - एक तास चाल केल्यानंतर प्रथमच एक क्षुधाशांतिगृह आम्हाला दिसले. एव्हाना जवळपास २० किमी अंतर पार झाले होते. क्षुधाशांतिगृहापुढे बरीच मोठी मोकळी जागा होती. फुजी आणि तिच्या सख्यांना दावणीला बांधून सगळे स्वार तडक जठराग्नीला आहुती देण्यासाठी धावले. खाकरा, बिस्किटे ह्यांचा क्षणात चट्टा मट्टा होत होता. तेथील आवारात एक शेकोटी नजरेस पडली. त्याबरोबर सगळ्यांनी आपापले हात शेकून घेतले. बंद बूट घालायला फुजी (श्विन)ला बंदी असल्याने फुजी(श्विन)च्या पायाची बोटंही गारठली होती. त्यामुळे फुजीने आपले पायही शेकून घेतले.
पहाटे ८अंश तापमान असताना आम्ही निघालो होतो, त्यामुळे अंगावर कपड्यांचे थर रचून आम्ही निघालो होतो.
आता मात्र ह्या जामानिम्याचे ओझे वाटू लागले होते. अद्यापि थंडी फार कमी झाली नसली, तरी ओझे कमी करण्याच्या दृष्टीने एकेकजण अंगावरील कपड्यांचे थर कमी करत होता. मात्र पुन्हा मार्गाला लागल्यावर पुन्हा थंडी वाजण्याची शक्यता होतीच. उतरवलेला भार टेम्पोचालक गौतम आणि अहमदाबादकर शैलेशभाई पटेल ह्यांच्या स्वाधीन करून सगळेजण पुन्हा कूच करू लागले. श्री शैलेशभाई हे सायकल यात्रेमध्ये सामील झाले असले तरी ते कायम टेम्पोमध्येच बसत असत.
शैलेशभाई पटेल हे कॅनडामध्ये होते. अहमदाबादकर यात्रेत सामील होण्याच्या साधारण २० दिवस आधी ते अहमदाबाद येथे परतले होते. त्यानंतर त्यांचा सायकलशी संबंध आला..तेही आसाभाईंनी केलेल्या प्रेमपूर्वक आदेशामुळे. अहमदाबाद येथे सायकल चालवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आसाभाई करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून शैलेशभाई पटेलांना आसाभाईंनी पुणे जम्मू सायकलयात्रेत भाग होण्याचा आदेश दिला होता. अर्थात फुजी, एकादशी आणि इतर डोंबिवली- पुणेकरांना पटेलांचा असा सहभाग पटला नव्हता. मात्र आसाभाईंच्या खेळकर स्वभावामुळे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जादूमुळे सगळेजण गप्प होते.
पुन्हा एकदा मार्गाला लागल्यावर थोड्या वेळातच डाव्या बाजूला पश्चिम बनास धरण लागले. मात्र बराच पल्ला बाकी असल्याने सायकलस्वार अगदी नाकासमोर पाहून पुढे जात होते, त्यामुळे हे धरण पाहण्याचा योग मात्र आला नाही. अबू रोड हुन बाहेर पडल्यापासून रस्त्याला फारशी वस्ती नव्हतीच. महामार्ग असूनही लांब लांब अंतरापर्यंत छोटेसे टपरीवजा दुकानही नजरेस पडत नव्हते. सूर्यदेव आकाशात उंचावर आला होता. मानववस्ती तर राहोच पण एखादं दुसरे झाडही दूरवर दिसत नव्हते. निसर्गातील हिरवा रंग जणू हरवलाच होता. त्यामुळे सायकलिंग करत बराच वेळ गेला असे वाटून सगळे जण एके ठिकाणी जमा झाले. पोटोबाची सेवा बिस्कीट आणि चिक्कीवर करत फुजी(श्विन) ने टेम्पोमध्ये स्थान मांडले. इतक्यात एकजण तिथे आला आणि चौकशी करू लागला. फुजीने पुणे जम्मू सायकलप्रवासाचा कार्यक्रम सांगताच तो एकदम चमकला. त्याने त्याची ओळख दिली. तो सुमेरपूर येथील पत्रकार होता. त्याने आमचे समूह छायाचित्र घेतले. आमचा आजचा मुक्काम सुमेरपूर येथे होणार असल्याचे ऐकताच त्याने तेथे कोणतीही मदत हवी असल्यास संपर्क साधण्यासाठी आग्रहपूर्वक सांगितले. त्याचे आभार मानून आम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वार झालो.
थोड्या वेळातच जवळपास काही क्षुधाशांतिगृह आहे का ह्याचा अंदाज घेत फुजीने थांबा घेतला. इतक्यात शेजारून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने फुजीला पाहिले. तो फुजी जवळ येताच त्याने फुजीची चौकशी केली. बाकीचे सायकलदळही पाठोपाठ आलेच. फुजीने त्या दुचाकीस्वाराला क्षुधाशांतिगृहासंबंधी विचारताच तो अगदीच खूष झाला. त्याने जवळपास २० किमी अंतरावर सिरोही येथील हॉटेल रामदेव विषयी सांगितले. माहिती सांगताना तो अतिशय उत्साहित झाला होता. आम्ही जणू त्याचे घरचे पाहुणेच आहोत अश्या आनंदाने तो सांगू लागला. तो म्हणाला ते हॉटेल जवळपास एक किमी लांबीचे आहे. तुम्हाला ते हॉटेल लगेचच लक्षात येईल. अश्या ओसाड प्रदेशात इतके मोठे हॉटेल असल्याचे ऐकून आम्हीही आश्चर्यचकित झालो. मात्र थोडा सावध होत तो म्हणाला एक किमी नसले तरी अर्धा किमी तरी लांबीचे ते हॉटेल आहे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे जेवण मिळेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५०-५० गाड्या तरी तिथे उभ्या असतील.
इतके चांगले हॉटेल मिळणार असेल तर २० - २५ किमी न थांबता जायला आम्ही एका चाकावर तयार होतो. सगळ्यांना पुढे जाऊन देत देवधर, फुजी, आसाभाई आणि रसिकभाई मागे राहिले. सगळ्यांचा उत्साह वाढला होता. हिरवा रंग फार दृष्टीस पडत नसला तरी आता महाकाय दगडांचे आकार नजरेस पडत होते.
सगळेजण एकमेकांपासून थोड्या थोड्या अंतरावरून जात होते. इतक्यात एक छानसा घाट लागला. तेथे छायाचित्र घेण्याचा मोह रसिकभाईंना आवरेना. फुजीनेही रसिकभाईंना साथ देण्याचे ठरवले. बाकी सायकलस्वार मात्र पुढे निघून गेले. तेथून रसिकभाई आणि फुजीने पुन्हा कूच केले आणि लगेचच एक बोगदा समोर दिसू लागला. त्या बोगद्याच्या थोड्या आधीच रस्त्याची अर्धी बाजू बंद केलेली दिसू लागली. बोगदा किती मोठा आणि किती अंधारा आहे ह्याची कल्पना येत नव्हती. हाताळ्याला लावलेल्या दिव्यांच्या साहाय्याने जात असताना अरुंद बोगद्यातून जाणे धोक्याचे ठरू शकत होते. कारण जर तो बोगदा लांबलचक आणि अंधारा असता तर समोरून वेगाने येणाऱ्या मोठ्या वाहनांच्या चालकाला फुजी आणि रसिकभाई दिसणे अवघड होते. त्यामुळे दोघांनी मागून येणाऱ्या गौतमच्या टेम्पोच्या प्रतीक्षेत थांबण्याचे ठरवले.
इतक्यात बोगदयाच्या आधी नयना आघारकरही थांबलेल्या दिसल्या. गौतम येताच त्यांनी टेम्पोमध्ये बसणेच स्वीकारले. टेम्पोच्या पुढे फुजी आणि रसिकभाई जाऊ लागले. सुदैवाने तो बोगदा अगदीच छोटा होता. त्यापुढे चांगलाच उतार दिसत होता. त्या उतारावरून वेगात जात असतानाच लांबवर हॉटेल रामदेव असा फलक दिसू लागला. आपण इतक्या लवकर कसे पोचलो याचे आश्चर्य वाटत फुजी आणि रसिकभाई आणखी वेगात उतार उतरू लागले. जवळ जात असूनही हॉटेल काही नजरेस पडत नव्हते, तो फलक मात्र दिसत होता. ओह, फलकाजवळ जाताच उलगडा झाला... हॉटेल आणखी ८ किमी दूर आहे असा तो फलक होता. नयना आघारकर पुन्हा सायकलवर स्वार झाल्या. मात्र आता रस्त्याचा उतार संपून सरळ रस्ता सुरू झाला होता. काही वेळातच आम्हाला रस्त्याच्या उजव्या बाजूला लांबवर पसरलेल्या वास्तूचे दर्शन झाले. रस्त्याच्या डावीकडे गाड्या नसल्या तरी उजव्या बाजूला मात्र थोड्याफार गाड्या उभ्या होत्या. रामदेवांची कृपा अखेर झाली होती. ती वास्तू म्हणजेच होते हॉटेल रामदेव!

खुप सुंदर छान👌👌👍🚴🚴🎉
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा