जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार: दिनांक १४ पौष १९४१
यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ४ जानेवारी २०२०
परगटसाहिब गुरुद्वारासाहिब येथील लंगरमधील व्यवस्था अतिशय नेटकी होती. एका मोठ्या सभागृहात रांगेत बसून जेवणाची सोय केलेली होती. जेवण झाल्यावर आपापले ताट, वाटी, भांडे उचलून बाहेर घेऊन जायचे आणि राखेने धुवून परत ठेवायचे. साबणाच्या द्रवाच्या हिशेबात मी थोडीशी राख घेतली आणि ताट धुवू लागलो. एक सरदारणीने ते पाहिले आणि लगेच माझ्याजवळ आली. अन् काहीतरी पुटपुटत पटकन माझ्या हातातील ताट घेऊन तिने त्या ताटाला भरपूर राख फासली आणि ताट लख्ख केले. ती काय बोलत होती ते तिच्या बोलण्यातून काहीच कळले नसले तरी कृतीतून कळले होते. त्यामुळे मी वाटी आणि भांड्यालाही राखेने पूर्ण मढवून काढले आणि वाटी, भांडे स्वच्छ केले. इथे १० लिंबाची शक्ती उपलब्ध नव्हती हे कळायला मला थोडा वेळच लागला होता. राखेने भांडी धुवायची भारतातील प्राचीन कला महानगरांमध्ये लोप पावली तरी गुरुद्वारामध्ये मात्र टिकून होती.
गुरुद्वारामधून आम्ही निघालो तेव्हा डोळ्यासमोर एकच लक्ष्य होते- लवकरात लवकर फिरोजपुरला पोचून तेथील सैन्याची कवायत पाहणे. आम्ही निघालो तेव्हा जेमतेम २ वाजले होते आणि २७ किमी अंतर बाकी होते. त्यामुळे ते सहजशक्यही वाटत होते.
मग अधिक वेळ न दवडता आम्ही ते अंतर न थांबता एकाच दमात गाठले. शहरामध्ये शिरण्याआधी दोन रस्ते फुटले होते. मग आम्ही आमचे फिरोजपुर येथील यजमान सोहन सोधी ह्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही शहरात शिरलो. एका मोठ्या चौकात सोधी आणि इतर काहीजण आमची वाट पाहत होते. एव्हाना ३.३० वाजले होते.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी दीड वर्ष सायकलवरून भारत भ्रमण करणाऱ्या डोंबिवलीकर गंधार कुलकर्णीने सोधींचा संपर्क आम्हाला दिला होता. त्या चौकात आम्ही पोहोचताच आमचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. येथेही आम्हाला सिरोपा बांधण्यात आले. चौकाशेजारीच असलेल्या एका बंगल्यामध्ये आम्हाला नेण्यात आले. अबोहरप्रमाणेच येथेही आम्ही पूर्णपणे यजमानांच्या ताब्यात गेलो होतो. बंगल्यातील आवारात आमचे स्वागत आणि कौतुक झाल्यावर यजमान मंडळींची ओळख सुरू झाली... आणि आम्ही उडालोच. आमचे स्वागत ज्या बंगल्यात होत होते तो प्रत्यक्ष जिल्ह्याच्या डे. कमिशनरचा बंगला होता आणि प्रत्यक्ष जिल्हा डे. कमिशनर आमचे स्वागत करत होते. आम्ही खरोखरच भारावून गेलो होतो. एक आठवण भेटही आम्हाला देण्यात आली.
मात्र आमचा पाहुणचार एवढ्यावरच मर्यादित नव्हता. तर हुसैनिवाला येथील सीमारेषेवर होणारी कवायत आम्हाला पाहता यावी याचीही खबरदारी आमच्या यजमानांनी घेतली होती. फुजी आणि तिच्या मैत्रिणींना डे. कमिशनर बंगल्यामध्ये राहण्याची व्यवस्था करून सायकलस्वारांना हुसैनिवाला सीमारेषेपर्यंत जाण्यासाठी चारचाकी स्वयंचलित गाड्यांचीही सोय करण्यात आली होती. गाड्या अतिशय आरामदायक होत्या. सोधी आणि इतर काहीजण आमच्याबरोबर होतेच. फिरोजपुरपासून हुसैनिवाला सीमारेषा जेमतेम १०-१२ किमी अंतरावर होती. सतलज नदीवरील पूल ओलांडून आम्ही हुसैनिवाला सीमारेषेजवळ पोचलो.
लगेचच आम्ही प्रेक्षागृहात पोचलो. आम्ही तेथे पोहोचताच कवायतही सुरू झाली. भारत आणि पाकिस्तानचे सैनिक आवेशपूर्ण सादरीकरण करत होते. कवायत सुरू होण्यापूर्वीच धर्मावर आधारित घोषणा देऊ नयेत अश्या सूचना करण्यात आल्या होत्या. सैनिक जेवढ्या आवेशाने सादरीकरण करत होते तेवढ्याच उत्साहाने भारत आणि पाकिस्तानचे नागरिकही घोषणा देत आपापल्या सैनिकांचे कौतुक करत होते आणि त्यांचा उत्साहही वाढवत होते. दुसरे महायुद्ध संपल्यावर मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र हवे ह्या मागणीचा जोर वाढला होता. त्यावेळी उर्दू कवी असगर सोदाई ह्याने दिलेली 'पाकिस्तानका मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह' (अल्लाहखेरीज इतर कोणताही देव नाही) ही घोषणा पाकिस्तानचे प्रेक्षक बेधडकपणे देत होते. ही घोषणा धर्मावर आधारित नव्हती?
भारतीय प्रेक्षकही तेवढ्याच जोराने 'वंदे मातरम' चा जयघोष करत पाकिस्तानी प्रेक्षकांना प्रत्युत्तर देत होते. सगळे वातावरण जादूमय झाले होते. खरतरं पुणे जम्मू सायकलसफरीदरम्यानचा हा उत्कर्षबिंदू होता.
ही कवायत पाहिल्यावर आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. मात्र अजूनही उत्कंठावर्धक क्षण आमची वाट पाहत होते. सोधी आणि त्यांच्या मित्रमंडळींपाठोपाठ आम्ही यंत्रवत जात होतो. पुढे जाताच आम्ही पोचलो ते युद्ध स्मारकाजवळ!
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे अंतिम संस्कार झाले ते हे ठिकाण! फाळणीदरम्यान हे गाव पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या दबावामुळे भारत सरकारने १९६१ साली फजिल्का जवळील १२ गावांच्या बदल्यात हे ठिकाण पाकिस्ताननकडून घेतले. बटूकेश्वर दत्त आणि भगतसिंगांच्या मातोश्री विद्यावती यांचाही अंतिम संस्कार येथेच झाला होता.
स्वातंत्रलढ्यातील ह्या तीन तेजस्वी वीरांना आदरांजली देण्यासाठी एक ज्योत येथे आज तेवत आहे. ह्याच ठिकाणाहून फिरोजपुरहुन आज पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कसूर- पेशावर कडे जाणारा रेल्वेमार्ग पूर्वी अस्तित्वात होता. मात्र भारत पाकिस्तानच्या युद्धांमध्ये हा रेल्वेमार्ग उध्वस्त झाला. शहिद दिनानिमित्त दरवर्षातून एकदा फिरोजपुरहून येथे एक विशेष गाडी मात्र चालवली जाते.
हुसैनिवाला येथील कवायत, शहिद स्मारक येथील भेट ह्यामुळे वातावरण अगदी मंतरलेले होते. त्या आठवणी सोबत घेऊनच आम्ही पुन्हा डे. कमिशनरच्या बंगल्याकडे परतलो. फुजी आणि तिच्या मैत्रिणी तिथे आमची वाट पाहत होत्या.
फुजी आणि तिच्या मैत्रिणींची डे. कमिशनर बंगल्यामध्ये चांगली सोय झाली होती. त्यामुळेच खरतरं आम्ही निर्धास्तपणे त्यांना तिथे ठेवून हुसैनिवाला येथे जाऊ शकलो होतो. कमिशनर बंगल्यावर पोचल्यावर मात्र मी लगोलग फुजीला जवळ घेतले. श्विन आजही टेम्पोमध्ये होती. सगळेजण पाठोपाठच तिथे पोचले आणि लगेचच आपापल्या मैत्रिणींना घेऊन आजचे वास्तव्यस्थान असलेल्या हॉटेल जनक येथे पोचलो. हॉटेलमध्ये पोचल्यावरही आम्हाला थोडे शिथिलगात्र होता यावे म्हणून सोधींनी थोडी मोकळीक दिली खरी.. मात्र इतक्यात देवधर ह्यांची बहीण आणि एकादशीच्या अश्याच एका ओळखीतून आमचे कौतुक करण्यासाठी काहीजण येऊन पोचले. देवधर आणि मी त्यांना सामोरे गेलो. देवधरांच्या ओळखीतील गृहस्थ एका शाळेमध्ये ट्रस्टी होते. हॉटेलमध्येच आमचे आदरातिथ्य करण्यात त्यांचे समाधान होत नव्हते. त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी अमृतसरला जाताना त्यांच्या शाळेत येण्याचे आग्रहाने निमंत्रण दिले. त्यांचे अगत्य आम्हाला जाणवत होते. त्यांची विनंती मोडणे आम्हाला अवघड जात होते. देवधरांनी त्यांना दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन जाण्याचे आश्वासन दिल्यावरच त्यांनी आमचा निरोप घेतला.
रात्रीचे जेवण होईपर्यंत आम्ही पूर्णपणे थकलो होतो. सगळेजण आपापल्या खोलीत गेले. इतक्यात श्री अय्यर यांचे मित्र श्री बक्षी ह्यांचा मुलगा श्री अय्यर ह्यांना भेटायला आला. त्याला पाहताच श्री अय्यर पुन्हा उत्साहात आले. त्यांना किती बोलू आणि किती नको असे होत होते. मी, देवधर, बक्षी आणि सोधी फक्त श्रवणभक्ती करत होतो. आमची स्थिती सोधींना कळली होती तशीच बक्षीच्याही लक्षात आली होती. मात्र अय्यरांना थांबवणे आमच्या कोणाच्याही आवाक्यात नव्हते. देवधर आणि मी तर केव्हाही खाली पडू अश्याच स्थितीत होतो. प्रत्येक क्षण आता युगासारखा वाटत होतं. मात्र अय्यर बोलताना आम्हाला संधीही देत नव्हते. त्यानंतर अय्यरांचा एकपात्री प्रयोग संपून बक्षी व सोधींचा निरोप घेत आम्ही रूमवर परतलो तेव्हा निद्रादेवीने क्षणार्धात आमचा ताबा घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा