भारतीय राष्ट्रीय म्हणजेच जागतिक शास्त्रीय दिनांक :११ पौष १९४१
ग्रेगोरीयन म्हणजेच युरोप खंडातील ख्रिस्ती धार्मिक अशास्त्रीय दिनांक १ जानेवारी २०२०
ग्रेगोरीयन कँलेडरचे अशास्त्रीय आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे स्वरूप उघड करणारा आजचा दिवस! अवकाशात कोणतीही खगोलभौतिकी घटना घडत नसताना आज ग्रेगोरीयन कँलेडरचा वर्षारंभ का? तर... ख्रिस्ती (रोमन) देवता जेनस चा आज स्मरणदिन..या कारणामुळे आज वर्षारंभ असलेले ग्रेगोरीयन कँलेडर अशास्त्रीय, केवळ ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांपुरते मर्यादित असल्याचा हा अनेक पुराव्यांपैकी एक पुरावा!
मेडताहून डीडवानाला येताना राजस्थानमधील वन्यजीवन पाहता आल्यामुळे राजस्थान मधील सफर चित्तथरारक होत होती. वास्तविक डीडवाना आमच्या मार्गापेक्षा थोडे बाहेर होते. पण आमच्या मार्गावर रहायला व्यवस्था न मिळाल्याने आम्ही वाट वाकडी केली होती. मात्र वाट वाकडी केल्यामुळे आम्हाला अश्या शहरात मुक्काम करता आला होता की ज्या शहरानजीक मानवी जीवनाचे लक्षावधी वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले होते. पुणे येथील डेक्कन कॉलेज मधील भुगर्भशास्त्रज्ञांना उत्खननात येथे काही शस्त्रे/ आयुधे मिळाली ज्यांंचे रेडिओ डेटिंग ७९७००० वर्षांपूर्वीचे होते. पैरीस येथील राष्ट्रीय प्राकृतिक इतिहास संग्रहालयातील तज्ञांनीही ह्यावर संशोधन केले होते. पंचांगानुसार कलियुगातील ५१२१ वर्षे संपली आहेत. हे पाहता ही शस्त्रेे/ आयुधे कलियुगापुर्वी झालेल्याा द्वापारयुगातील आहेत. (द्वापारयुगाचा काळ ८६४००० वर्ष असल्याचा उल्लेख पंंचागात सापडतो.)
ऐतिहासिक शिलालेखांत २००० वर्षांपूर्वी सध्या वसलेल्या शहरापासून पुर्वेला ३ किमी अंतरावर आभानगरी नावाचे शहर कुषाण साम्राज्यात सामिल असल्याचा उल्लेख सापडतो. क्षत्रप राजांनी हे शहर उध्वस्त केले. मात्र त्यानंतरच्या काळात येथील प्रधान शेषराम ह्याचा मुलगा डीडूशाह ह्याने येथे नगर वसवले ज्याचे नाव डीडूवाणक असे ठेवण्यात आले. त्याचेच पूढे डीडवाना असे नाव प्रचलित झाले. डीडवाना येथे असलेल्या ३ चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या तलावासाठी अनेक लढाया झाल्या आहेत. मुघलांच्या काळात येथील मीठ संपूर्ण भारतात विकले जात असल्याने हे मोठे व्यापारी केंद्र झाले होते.
आमचे लक्ष ह्या इतिहासापेक्षा वर्तमानावरच होते. भुगोलाबाबतीत आम्हाला एवढेच जाणवत होते की आज आम्हाला आमच्या यात्रेतील दिवसभरातील सर्वात जास्त म्हणजे १४०-१५० किमी अंतर पार करायचे होते. पहाटे हॉटेलसमोरच चहा मिळाला. चहा घेऊन आम्ही कुच केले. अंगावर कपड्यांचे चारपाच थर आणि प्रत्येक थरांमध्ये एकेक वर्तमानपत्र अशी भक्कम तटबंदी केली होती. नाककानही घट्ट बांधलेले होते. त्यामुळे थंडी पासुन बचाव होत होता, मात्र शहर संपताच धुक्याने आक्रमण केले. सगळे जण मंदावले होते. काही वेळातच एक दोन फुटावरही विजेरीचा प्रकाश दिसेना. हिच अवस्था श्विन आणि निरूपमा भावे ह्यांंनी ९ वर्षांपूर्वी इंदोर झांसी सायकल सफर करत असताना खजुराहो शहर सोडताना अनुभवली होती. त्यावेळी सगळ्या सायकलस्वारांनी एका रांगेत दोन सायकलमध्ये जेमतेम २-३ फूट अंतर ठेवत प्रवास केला होता. आत्ताही त्याचीच गरज होती. ट्रेक आणि नयना आघारकर ह्यांंचा वेग मंदावल्याचे पाहताच फुजीनेही 'Look back' चा मंत्र जपत वेग कमी केला. मात्र बाकीचे सायकलस्वार हा मंत्र विसरत तसेच पुढे जात राहिले. थोड्या वेळातच आपल्यामूळे इतरांना उशीर होऊ नये म्हणुन ट्रेकने सहाय्य वाहन म्हणजे टेम्पोचा पर्याय निवडला.
फूजी आणि नयना आघारकर आता टेम्पोच्या प्रकाशात रस्ता पहात जाऊ लागले. भास्कर चांगलाच आळसावलेला दिसत होता. त्याने धुक्याची चादर घट्ट लपेटून घेतली होती. आम्ही किती वेळ पाय मारतोय कळत नव्हते. मुळात वेळेचाच अंदाज येत नव्हता. पुढे गेलेले सायकलस्वार दिसत नाही तोपर्यंत न थांबता पाय मारत रहायचे एवढे मात्र पक्के ठरवले होते.
अखेरीस एका चहाकेंद्रापाशी पुढे गेलेले सायकलस्वार थांबलेले दिसले. फुजी (श्विन), नयना आघारकर, ट्रेक पाठोपाठ गौतमही तिथे पोचला. त्यावेळी घड्याळबाबा ९ वाजल्याचे सांगत होते. सायकलस्वार जरी घड्याळबाबांंचे ऐकत असले, तरी भास्कर मात्र त्यांंना जुमानत नव्हता. मात्र आमचे चहापान सुरु होताच त्यालाही कुतूहल वाटू लागले. तो धुक्याच्या दुलईतुन हळूच डोकावु लागला. श्विननेही त्याच्या या लोभस लीला टिपायला सुरुवात केली. भास्कर खरतर इतका शीतल दिसत होता की जणू पौर्णिमेचा शशांकच! फक्त ससा मात्र त्याच्या अंगावर नसल्यानेच तो शशांक नसून भास्कर आहे हे कळत होते. श्विनने भास्कराला विविध ठिकाणी बध्द करत त्याची रूपे कैद केली....मग ती दिव्यांची माळ असो वा रस्त्यावर असलेली नुसती दोरी असो की निष्पर्ण वृक्ष असो.
चहा झाल्यावर सगळे सायकलयात्री पुन्हा मार्गाला लागले. गौतम मात्र लगेच निघाला नाही. थोड्या वेळातच वाटेत उजवीकडे जाणारा महामार्ग दिसला. अय्यर सगळ्यात पुढे होते. त्यांंनी सरळ जाणारा मार्ग सोडून उजवे वळण घेतले. सगळे सायकलस्वार पाठोपाठच होते. त्यांनीही अय्यरकाकांपाठोपाठ ते वळण घेतले. मात्र श्विनला शंका आली. वळण घेताच फुजी (श्विन) ने देवधरांना सावध करून थांबायला सांगितले. श्विन गुगलकाकांंकडे चौकशी करत असताना श्विनच्या इशाऱ्याकडे देवधरांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केले. फुजी (श्विन) मात्र जागेवरच थांबला. पाठोपाठ ट्रेक आली. श्विनने सगळेजण चुकीच्या मार्गाने जात असल्याचे सांगत ट्रेकला थांबवले. श्विनच्या दिशा ओळखण्याच्या क्षमतेवर ट्रेकचा पुर्ण विश्वास होता. एव्हाना पुढे गेलेले स्वार दिसेनासे झाले होते. सावध करूनही चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या सायकलस्वारांपाठोपाठ आपण एकही पेडल मारत बसायचे नाही असे ट्रेकला सांगत श्विनने मागे थांबलेल्या गौतमला बोलावून घेतले. मग श्विन आणि ट्रेक टेम्पोमध्ये बसुन पुढे गेलेल्या सायकलपटूंना परत फिरवायला निघाले. ह्या चुकिच्या मार्गाने गेल्यावर जवळपास ३० किमी अंतर पार केल्यावर पुन्हा दुसऱ्या मार्गाने आजच्या गंतव्यस्थानी जाता येणार होते. मात्र त्यामुळे तब्बल ३० किमी अंतर वाढले असते तसेच आणखी एक विश्रांतीसह ३ तास वाढले असते.
हे सगळे टाळण्यासाठी श्विन, ट्रेकने गौतमसह टेम्पोने जात सगळ्या सायकलपटूंना थांबवले. एव्हाना चुकीच्या मार्गाने ३-४ किमी अंतर पार झाले होते. तरी परत मागे न फिरता तेथेच डावे वळण घेतले तर पुन्हा योग्य मार्गावर जाता येणार होते. गौतमने सर्व सायकलपटूंना पहिले वळण न घेता दुसरे वळण घेण्यासाठी सांगितले. अय्यर आघाडी घेत पुढे निघाले. बाकी सायकल स्वार त्यांंच्यापाठोपाठ निघाले. श्विन, ट्रेकने मात्र योग्य रस्ता लागेपर्यंत टेम्पोमध्येच बसायचे ठरवले होते. सायकलपटू थोडे पुढे जाईपर्यंत टेम्पो थांबला. अय्यर पुढे जात आहेत हे पाहताक्षणी गौतमने श्विनला सांगितले की ते नक्की पहिले वळण घेतील. आणि तसेच झाले. त्यांंच्यापाठोपाठ इतरही गेले. तो रस्ता सुजानगड गावात जात होता. गावातील रस्ता इतका अरुंद, गर्दीचा होता की सगळ्यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे आणखीच वेळ वाढणार होता. इतके होउनही सायकलपटूंनी तेथील बाजारात खरेदीची हौस भागवून घेतली.
गाव पार करुन हमरस्त्याला लागेपर्यंत वेळेचा अपव्यय बराच झाला होता. आमचा दुसरा थांबा घेण्याची वेळ उलटून गेली होती. त्यामुळे आता थोड्या वेळात सायकलस्वार थांबतील तेथे आपण पुन्हा रस्त्यावर उतरू म्हणजे वेळेचा आणखी अपव्यय होणार नाही असा विचार करत श्विन, ट्रेक टेम्पोमध्येच बसले होते. आजुबाजुला प्रदेश निर्मनुष्य होता. राजस्थानचे वैभव मात्र इथेही जाणवत होते.
कालापव्ययामुळे नाश्ता न करता सगळ्यांनी जेवणच लवकर करण्यासाठी थांबा घेतला. येथील धाब्यावरही अत्युत्कृष्ट जेवण होते. जेवण झाल्यावर फुजी (श्विन) आणि ट्रेकही रस्त्यावर उतरले. पून्हा एकदा फुजी, ट्रेक आणि नयना आघारकर एकत्र जाऊ लागले.
श्विनच्या डोळ्यावर झापड येऊ लागली होती. तरी पाय मारत आणि मान झटकत झोप टाळण्याचा श्विनचा प्रयत्न सुरु होता. काही वेळा तर पुढचा थोडा रस्ता पाहुन डोळे मिटुन आकडे मोजतही श्विनने पेडल मारले. पण त्यानेही झोप जाईना. मग मात्र श्विनने रस्त्याच्या कडेलाच हेल्मेट डोक्याखाली घेत २-३ मिनिटे झोप घेतली. मात्र बरेच अंतर बाकी असल्याची जाणीव असल्याने झोपही लागेना. मग पुन्हा एकदा स्वार होत श्विनने चहाकेन्द्र गाठले. हा उपाय मात्र जालिम ठरला. बहूतेक रक्तातील चहा कमी झाल्यामुळेच श्विनला झापड येत होती. चहापान झाल्यावर श्विन चांगलाच हुश्शार झाला.
सकाळी ऊशीरा जागा झालेला भास्कर आता पुन्हा आळसावला होता. सगळे सायकलस्वारही मंदावले होते. सगळ्यांमधील अंतर वाढले होते. रसिकभाई नेहमीप्रमाणे प्रसन्नतेने सायकलवत असताना रस्त्याच्या ऊजवीकडुन एका बाबांंनी त्यांना चहासाठी बोलावले. त्यांच्या मागे थोड्या अंतरावर असलेल्या श्विनने ते पाहिले. मात्र त्यांंच्या मागे आपणही आगंतुकपणे जाणे श्विनला पटेना. त्यामुळे श्विन पूढे गेला. मागे फक्त टेम्पो होता. मात्र रसिकभाई रस्त्याच्या ऊजव्या बाजूला असल्याने टेम्पोमध्ये असलेल्या गौतमला दिसणार नाहीत अशी शंका येऊन श्विनने टेम्पो येईपर्यंत थांबायचे ठरवले. श्विनची शंका खरी ठरली. गौतमला रसिकभाई दिसले नव्हते. त्याला रसिकभाईंंसाठी थांबायला सांगुन श्विन पुढील स्वारांना थांबायला सांगण्यासाठी पुढे निघाला. थोड्याच अंतरावर पुणेकर आणि आसाभाई थांबले होते. त्यांना सगळ्या प्रकाराची श्विनने कल्पना दिली. ते सगळे त्यांंच्या जवळील उत्तेजक पेय घेत तिथे थांबले. श्विनला त्यामध्ये रस नव्हता. त्यामुळे आम्ही पुढे जाऊन चहा घेत थांबतो असे सांगुन श्विन आणि ट्रेक पूढे निघाले. थोड्याच अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक उपहारगृह दिसले. समोर बरीच मोकळी जागा होती. आपण आत बसलो तर मागुन येणाऱ्यांना दिसणार नाही म्हणून श्विन, ट्रेकने चहा बिस्कीटे बाहेरच मागवली. बाजूला काही धीट पक्षी श्विनची चौकशी करू लागले.
दरम्यान उपहारगृह चालकाने दोन दिवसांपुर्वी रात्री २-३ वाजता नाशिकहून निघालेले काही सायकलस्वार तेथे थोडावेळ थांबले होते. त्यामध्ये एक मुलगी असल्याचेही त्याने सांगितले. सकाळी ९ वाजताही आम्हाला स्वच्छ सुर्यप्रकाश आज दिसला नव्हता. ८ वाजेपर्यंत तर २ फुटांवरचेही दिसत नव्हते. आणि हे रात्री २-३ वाजताही सायकल चालवत होते.
चहा घेऊनही बराच वेळ झाला तरी मागील कोणी येईना. भास्करही परतीच्या मार्गाला लागला होता. मग श्विनने देवधरांना भ्रमणध्वनी केला. त्यांनी श्विनला पुढे जाऊन सरदारशहरच्या आधी १५ किमी वर थांबायला सांगितले. त्याप्रमाणे श्विन, ट्रेक पुढे जाऊन पुन्हा थांबले. काही वेळाने सगळे जण आले. तेव्हा समजले की आसाभाई सायकल वरून पडल्याने त्यांंना डोक्याला मार लागला होता. आसाभाई, अय्यर, शैलेशभाई टेम्पोमध्ये बसले होते. आता संध्याछाया पसरू लागल्या होत्या, त्यामुळे नयना आघारकर, श्विन आणि ट्रेकनेही टेम्पोमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. मात्र आता टेम्पोमध्ये तेवढी जागा नव्हती. सायकलसफर सुरु करण्यापूर्वीच असा प्रसंग आल्यास सगळ्या सायकलपटूंसह सायकल टेम्पोमध्ये ठेवता येईल असा मोठा टेम्पो श्विनने ठरवला होता. जवळपास महिना दिड महीना देवधरांनी अंतिम निर्णय दिला नव्हता. आणि अचानक मोहिमेच्या १५-२० दिवस आधी त्यांनी एकतर्फी निर्णय घेत गौतमचा टेम्पो ठरवला होता. अर्थशास्त्राचा नियम सांगताना एक महत्वाचे गृहीतक असते, ते म्हणजे..'If all other things are equal....'
म्हणजेच 'जर इतर सर्व समान असेल तर...' श्विनने ठरवलेल्या टेम्पोचा निर्णय देवधरांनी लोंबकळत ठेवूनही त्यांंचा मान राखत श्विनने अर्थशास्त्राच्या ह्याच गृहीतकाचा आधार घेत गौतमला प्राधान्य देण्यास मान्यता दिली. मात्र देवधर 'all other things equal' आहेत का, याबाबत खुलासा न करता आपला हेका सोडेनात. सफर ४-५ दिवसांवर आल्यावर गौतमच्या टेम्पोबाबत 'all other things' equal नाही हे बिंब फुटण्याची वेळ येताच मी येणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. वास्तविक ह्या मोहिमेची कल्पना त्यांंची होती, मोहिमेच्या तयारीसाठी त्यांंनी बरीच मेहनत घेतली होती. मोहीमेची सगळी सुत्रेही त्यांनी धुर्तपणे स्वतःच्याच हातात ठेवली होती. त्यामुळे नाइलाजाने पुन्हा एकदा धोका लक्षात आणुन देऊन श्विनने गौतमच्या टैम्पोला मान्यता दिली होती. वास्तविक सफरीदरम्यान गौतमनेही त्याला यायचे नव्हते, मात्र देवधरांना तसे थेट सांगता येत नसल्याने मी जास्त पैसे मागितले तेही देवधरांनी दिले असे श्विनजवळ सांगितले होते. अर्थात ह्यात देवधरांचा स्वार्थ काहीच नसुन गौतमवरील विश्वास आणि इतरांवर टोकाचा अविश्वास होता.
देवधरांच्या आडमुठेपणाचा फटका आता मात्र श्विन आणि ट्रेकला बसत होता. गौतमने मात्र ह्यावेळीही समंजसपणा दाखवत तुम्ही येथे थांबा मी ह्या चार जणांना सोडून तुम्हाला घ्यायला परत येतो असे सांगितले. मात्र आसाभाईंना दवाखान्यात न्यावे लागणार होते. त्यानंतर गौतम किती वेळाने येईल याची खात्री नव्हती. भास्कर अस्ताला चालला होता. परीसर पुर्णपणे निर्मनुष्य तर होताच शिवाय वन्य श्वापदांचीही भीती होती. त्यामुळे सगळे सायकलस्वार एका रांगेत अंतर पडू न देता...'look back' चा नियम पाळतील ह्या अटिवर श्विनने सायकलवायचे कबुल केले. परिस्थितीचे गांभीर्य जाणून देवधरांनीही ते कबूल केले. मग टेम्पो वेगाने पुढे गेला. अंधाराचे साम्राज्यही पसरले. मात्र मग आम्ही सातही सायकलस्वार थोड्या थोड्या वेळात आपापले क्रमांक पुकारत रांगेत पुढे जाऊ लागलो. अंधारात आम्ही मागच्याला वळून पाहु शकत नसलो तरी आपापले क्रमांक पुकारल्याने मागील स्वार बरोबर असल्याची खात्री होत होती. Saveoursahyadri ह्या मोहीमेत भाग घेतल्यामुळे श्विनला ही कल्पना आज सुचली होती.
मुक्कामी पोचल्यावर हॉटेल मालकाने आमचे अतिशय आपुलकीने स्वागत केले. आज आमच्या म़ोहीमेतील दिवसभरातील सगळ्यात जास्त अंतर (जवळपास १५० किमी) पार झाले होते. विविध घडामोडी घडल्या होत्या. मात्र आमचा दिवसभराचा शीण हॉटेल मालकाच्या आपुलकीने गेला होता.
आसाभाईंना सिटी स्कैन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेले होते. जेवणासाठी आम्हाला बाहेर जावे लागणार होते. ते हॉटेल बंद होण्यास कमी वेळ उरला होता. त्यामुळे आम्ही लगेचच निघालो. 'जैनको' मध्ये आम्हाला खूपच छान जेवण मिळाले. सायकल सफरीवर असताना गुलाबजाम खायला मिळाले की दिवस पुर्ण झाला असे श्विनला वाटत असे (ह्याचेही श्रेय save our sahyadri मोहिमेचेच). पुणे जम्मू सफरीमध्ये मात्र हा योग अजून येत नव्हता. 'जैनको'मध्ये श्विनची ही ईच्छाही पुर्ण झाली.
आम्ही मुक्काम केला होता त्या S R Palace ह्या हॉटेलमध्ये तळघरात एक छानसे दुकान होते. आम्ही परत येईपर्यंत ते बंद झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर निघणार असल्याचे कळताच हॉटेलमालकाने आमच्यासाठी ते दुकान पुन्हा उघडले. तेथील संग्रह खुपच छान होता. जवळपास प्रत्येकाने तिथे काही ना काही खरेदी केली. सगळेजण झालेल्या खरेदीमुळे समाधानी असले तरी आमचा उत्साहाचा मेरुमणी असलेला अहमदाबादी सिंह मात्र सिटी स्कैन करावे लागल्याच्या चिंतेने हिरमुसला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा