भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक १८, शके १९३९
सूर्याचे दक्षिणायन सुरु असल्यामुळे दिवस लवकर मावळत आहे. त्यामुळे ऑफिसहून निघेपर्यंत सूर्य क्षितिजापलिकडे गेला होता. अंधाराचे साम्राज्य सुरु झाल्याने पथदिवे सुरु होते. अश्वशक्तीधारी वाहनांचे दिवेही सुरु होतेच. या दिव्यांच्या उजेडात श्विनचा ऑफिसहून घराकडे प्रवास सुरु झाला. मागील वाहनांना श्विनचे अस्तित्व कळावे यासाठी श्विनने एक मिणमिणता दिवा धारण केला होता.
मुलुंड चेकनाका- ठाणे क्लब-रघुनाथनगर मार्गे श्विन सेवा रस्त्याला लागली. तिथे उजेड कमी असल्याने श्विनने लगेच मुख्य रस्ता पकडला. पहिल्याच चौकात अश्वशक्तीधारक वाहनांच्या घोळक्यात श्विनही अडकली. पण सर्व वाहनांच्या मधून वाट काढत श्विनने उजवीकडील सेवा रस्ता गाठला.
माजीवाडा नाक्याला फुटलेल्या रस्त्यामुळे सर्व वाहने अडखळत असताना श्विनने पुन्हा बाजी मारली. ठाणे नाशिक महामार्गाला श्विनला सरासरी दर सेकंदाला एक वाहन मागे टाकत होते. मात्र हा महामार्ग पुरेसा रुंद असल्याने रस्त्याला गर्दी जाणवत नव्हती. खरतर या वाहनाच्या साथीने श्विनला उजेडही छान मिळत होता.
डावीकडून काही रस्ते या महामार्गाला मिळतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी महामार्ग फुटलेला असल्याने तेथील वाहनेही सावकाशपणे येत असतात. त्यामुळे त्या वाहनांचाही श्विनला अडथळा नसतो. मात्र मानकोली चौकाअगोदर रस्ता दोन भागात विभागाला जातो. डावीकडील मार्ग पुलशेजारून तर उजवीकडील मार्ग पुलावरून जातो. श्विनला पुलावरून यायचे असल्याने तेथे मागील वाहनांचा अंदाज घेत उजवीकडील मार्ग गाठावा लागतो.
इथेही रस्ता फुटलेला आहेच. त्यामुळे इथे नजर समोर ठेऊन कान मागे असावे लागतात. खरेतर दोघांनाही स्वतःच्या कामाबरोबर एकमेकांचेही काम करावे लागते. संपूर्ण महामार्गावर साधारण परिस्थिती अशीच असते. पुढील अंदाज डोळ्यांनी घेत असताना मागील वाहनांचा केवळ आवाजच कानांनी ऐकायचा नसून त्याबरोबर कानांनी ते वाहन 'पहावे'ही लागते. म्हणजे ते वाहन किती अंतरावर आहे, किती वेगात आहे याचा अंदाज बांधण्यासाठी मेंदूला केवळ कानांवर अवलंबून रहावे लागते.
याची सवय झाल्यामुळे कानांनी ऐकून आणि 'पाहून' मी श्विनला देत असलेल्या इशाऱ्यांचा श्विनलाही अचूक अंदाज येतो. याच जोरावर मानकोली पूल श्विनने लीलया पार केला.
रांजनोली नाक्याअगोदर वाहनांची रिघ लागली होती. अगोदर सेकंदाला एक प्रमाणे श्विनला मागे टाकणारी वाहने चांगलीच अडकली होती. आता श्विनची वेळ होती.
एकेक पॅडलला ४ वाहने या गतीने श्विन अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकत होती. १०० मिटरसाठी श्विनला अंदाजे १७ पॅडल मारावे लागतात. या गतीने रांजनोली नाक्याला सुमारे ३०० -३५० वाहनांना मागे टाकत श्विनने रांजनोली नाक्याला कल्याणकडे वळण घेतले.
रांजनोलीपासून कोनगाव येईतो मोकळा रस्ता मिळाला, पण कोनगाव सुरु झाल्यावर दुर्गाडी पूल पार करेपर्यंत श्विनला पुन्हा २००-२५० वाहनांना मागे टाकण्याची संधी मिळाली. त्याच दिमाखात श्विन दुर्गाडी किल्यासमोर पोचली. गोविंदवाडी बायपासचा पूल उतरताच १८ गतिरोधकांचे अडथळे स्वागत करत होते. जी वाहने दुर्गाडी पूल पार करून इथे पोचत होती, त्यांचा उरलेला जीव काढण्यासाठी हे गतिरोधक पुरेसे आहेत. अश्वशक्तीधारक वाहनांची रग आणि मस्ती इथे पार उतरते. तेथील अडथळे पार करून श्विन पत्रिपुलमार्गे कचोरे गावाकडे वळली तर आज तिथेही वाहनांची कोंडी झाली होती. हे सर्व पार करत श्विनने ९० फुटी रस्ता गाठला. इथे पोचताच प्रसन्न वातावरणाने सर्व शीण निघून गेला. सोसायटीत पोचल्यावर मी घरी जाण्यासाठी वळलो तरी श्विनमात्र आणखी १० किमी जायला तयार होती...
#dombivlicyclingclub #tjsbbank #cycle2work

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा