राष्ट्रीय दिनांक भारतीय सौर कार्तिक १५, शके १९३९
ऑफिसहून निघताना श्विनने उदरभरण करण्याची इच्छा व्यक्त केली. वास्तविक तिला फार हवेची गरज नव्हती. पण तरी तिचे समाधान करून आम्ही परतीचा मार्ग सुरु केला. TJSB House सोडताना टायरवर टिचकी मारून श्विनचा आत्मा शांत झाल्याची खात्री करून घेतली. वास्तविक मलाही थोडी क्षुधाशांती करायची होती. पण उशीर होऊ नये म्हणून मी वाटेत तो कार्यक्रम साधायचे ठरवले.
सूर्याचे दक्षिणायन सुरु झाल्याने सूर्य लवकर अस्त्र म्यान करू लागला आहेच. त्यातच कार्तिक या चांद्र महिन्याचा कृष्ण (वद्य) पक्ष सुरु झाल्यामुळं चंद्रही त्याचा प्रकाश आवरता घेत असल्याने पथदिवे आणि वाहनांचे दिवे याखेरीज उजेड नव्हता. सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताच मी डाव्या हातातील पुढच्या ब्रेकवर हात ठेवत उजव्या हाताने सफरचंद खाऊन घेतले. तोपर्यंत माजीवाडा नाका जवळ आला होता. पुलाखालून ठाणे नाशिक महामार्ग गाठला.
खारेगाव पूल ओलांडताच संध्याकाळ असूनही शिर्डीला जाणारे पदयात्री मार्गक्रमण करताना दिसत होते. त्यांचा आजचा मुक्काम दापोडे येथील लोढा साईमंदिरात असावा. मात्र ते बऱ्यापैकी लांब होते.
श्विनने रांजनोली नाका गाठला तर तेथे वाहतूक सुरळीतपणे असल्याचे दिसले. आश्चर्याचा हा धक्का पचवत श्विनने कल्याणच्या दिशेने उजवीकडे वळण घेतले मात्र... तेथे मात्र चांगलीच कोंडी झाली होती. त्यातून सुटका केल्यावर कोनगावापर्यंत श्विन आरामात गेली. कोनगाव-दुर्गाडी पूल येथे सर्व वाहनांनी केलेल्या वेढ्यातून सुटणे तसे कठीणच. पण श्विनने तेथेही बाजी मारली. दुर्गाडीजवळील चंद्र कुठे आहे याचा मागोवा घ्यायचा मी प्रयत्न केला पण व्यर्थ!
९० फूट रस्त्यावरून येताना एक सायकलिस्ट संथ गतीने जाताना दिसला. त्याला गाठत मी त्याच्याशी परिचय करून घेतला आणि त्याला #dombivlicyclingclub च्या रविवारच्या फेरीला यायचे आमंत्रण दिले आणि आजची cycle2work फेरी सार्थकी लावली
#tjsbbank

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा