आकाशवाणी ब केंद्र आणि सकाळची शाळेत जाण्याची धावपळ यांचे एक अतूट नाते होते. त्या केंद्रावर सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या वेळेनुसार सकाळची आन्हिकं आटोपत असत. घड्याळबाबांची तेव्हा गरजच लागत नसे.
दूरदर्शन सुरु झाला असला तरी त्याची वेळ संध्याकाळी... आणि तेही ठराविक दिवशी! मंगळवारी संध्याकाळी किलबिल, गुरुवारी छायागीत, शनिवारी मराठी चित्रपट आणि रविवारी हिंदी चित्रपट एवढाच काय तो दूरदर्शनचा संबंध! दूरदर्शनचे दर्शन केवळ संध्याकाळी. मात्र दिवस उजाडायचा तो केवळ आणि केवळ आकाशवाणीच्या साथीने!
बालपणीची सकाळ आकाशवाणीने व्यापलेली होती. आकाशवाणी वाद्यवृंदाने एकसुरात म्हटलेली गाणी,'हवामान वृत्त', 'गांधी ने कहा था' याचबरोबर सकाळची धावपळ आणखी एका महत्वाच्या कार्यक्रमाशी जोडलीे होती. खरतर त्या कार्यक्रमात काय सांगितले जाते ते ऐकायला वेळ नसायचा. तो कार्यक्रम होता ७.०५ च्या बातम्या!
आजच्या काळातील खाजगी वाहिन्यांवरील रंजकपणा (आणि अतिरंजितपणा) असलेल्या बातम्या न सांगता, स्पष्ट आणि सरळ शब्दात त्या बातम्या सांगितल्या जायच्या. खरेतर एखादे गाणे ऐकावे तश्या प्रकारे तालबद्ध आणि सुरात त्या बातम्या सांगितल्या जायच्या.
आजही सकाळी दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवरील कार्यक्रमाने माझी सकाळ उगवत नव्हती. मात्र महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी दूरदर्शनवरील खाजगी वृत्तवाहिनी सुरु केली... आणि बातमी ऐकली ती आकाशवाणीचा आवाज हरवल्याची. हो, तोच आवाज जो सकाळी ७ वाजून ५ मिनिटे झाल्याची जाणीव करून द्यायचा. मला शाळेसाठी घरातून निघण्याची वेळ झाल्याची सूचना देणारा तो आवाज हरवल्याची बातमी आज दूरदर्शनच्या खाजगी वाहिनीवर सकाळी ऐकू येत होती. बालपणीचा आणखी एक दुवा निखळल्याची ती बातमी होती. आता यापुढे तो लयबद्ध आवाज कधीच ऐकू येणार नव्हता...
'सुधा नरवणे बातम्या देत आहेत' हा आवाज कायमचा बंद झाला होता!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा