एखादी भाषा शिकणे आणि त्या भाषेतून शिकणे यातील फरक न समजणाऱ्या लोकांना सुशिक्षित तरी कसे समजायचे?
एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याकडे ज्या भाषेतील शब्दसंचय अधिक असेल त्याखेरीज इतर कोणती भाषा उपयुक्त असणार? एखादे मूल जेव्हा भाषा आत्मसात करत असते तेव्हा त्याला मातृभाषा आणि स्थानिक भाषा ह्याच सतत कानावर पडत असल्याने ह्याच भाषांतील शब्दसंचय अधिक विकसित होत असतो. अर्थातच वेगवेगळ्या विषयात 'ज्ञान' मिळवण्यासाठी मातृभाषा किंवा स्थानिक भाषा हेच उत्तम माध्यम असू शकते.
दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर शिक्षण त्या भाषेच्या माध्यमातून घेण्याची नव्हे तर त्या भाषेच्या शिक्षणाची आवश्यकता असते. दुर्दैवाने हा फरक न समजू शकलेले पालक त्यांच्या पाल्याना त्या परक्या भाषेच्या माध्यमातून शिकवायचा प्रयत्न करतात. मग सुरु होते निव्वळ घोकंपट्टी!
रामायण, महाभारत, इसापनीती आणि लहान मुलांच्या इतर अनेक गोष्टी ज्या आजीआजोबा मातृभाषेतून सांगतात त्या सहजपणे कळतात. मात्र परक्या भाषेतून शिकताना ह्याच गोष्टी 'पाठ' कराव्या लागतात. त्यामुळे परक्या भाषेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण मिळवण्याच्या काळात मुलं इतिहास, भूगोल आदी विषय न समजून घेता निव्वळ 'पाठांतर' करतात.
शिवाय मातृभाषा, स्थानिक भाषाचे लिहावाचायचे ज्ञानही तिसऱ्या स्तरावर राहिल्याने त्यांना स्थानिक लेखक आणि कवी यांचे साहित्यही वाचता येत नाही. त्यातही इंग्रजी सारख्या सातासमुद्रापार भाषेत जर प्राथमिक/ माध्यमिक शिक्षण घेतले तर त्यांना थेम्स नदीकाठची संस्कृती, इतिहास, भूगोल समजला तरी इंद्रायणी काठच्या संस्कृती, इतिहास, भूगोलापासून ही परक्या भाषेत शिक्षण घेतलेली अभागी मुलं दूरच राहतात.
#Dombivlicycleclub मधील सदस्य गन्धार डोम्बिवलीकर (गन्धार कुलकर्णी) मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी आज भारतीय राष्ट्रीय दिनांक १० आषाढ १९४० रोजी सायकलवरून भारत भ्रमणासाठी निघाला आहे. तो जवळपास ५५० दिवस सायकलिंग करत भारतभर फिरणार आहे. या दरम्यान वाटेत लागणाऱ्या गावात संवाद साधत तो मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व सांगणार आहे.
या मोहिमेबद्दल गंधारला मनपूर्वक शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा