गोवा- म्हणजे महाभारत काळातील 'गोपराष्ट्र'- गायींना चरण्यासाठीचा प्रदेश! परशुरामाने निर्माण केलेल्या कोकणातील हा दक्षिण भाग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान, लोकसंख्येच्या दृष्टीने ४ थ्या कमी लोकसंख्येच्या या राज्याला नदी आणि कालवे यांनी संपन्न केले आहे. गोव्यातील लोकांनी या नद्यांना नाव देतानाही एका ऐवजी अनेक नावे देऊन मोकळेपणा जपला आहे. झुआरी (अघनाशिनी), मांडवी (म्हादेई/ म्हादई/महादयी), तेरेखोल (आरवंद), शापोरा (कोलवाळ/कायसुव), गालजीबाग, तळपदी, साळ ह्या सप्तनद्यांसह कुशावती, बागा (Riviera De Goa), म्हापसा, साळावली, सालेरी ११-१२ प्रमुख नद्या आणि ४२ उपनद्यांनी गोव्याची भूमी सजवली आहे. झुआरी नदी ९२ किमी लांब, तर गालजीबाग नदी अवघी ४ किमी लांब. झुआरी नदीपासून मांडवी नदीला जोडणारा कुंभारजुवे (कुंभारजुवा) नावाचा कालवा आहे. त्या कालव्यातून छोट्या नावांची आंतरनदी वाहतूक होते.
अश्या ह्या निसर्गाने नटलेल्या राज्यात प्रवेश केल्यानंतर TJSB बँकेच्या म्हापसा शाखेत झालेली स्वागताने श्विन स्कॉट भारावून गेले होते. मात्र पणजी शाखेतही श्विन आणि स्कॉटची प्रतीक्षा होत होतीच. TJSB बँकेच्या पणजी शाखेमध्ये गोवा रिजनचे प्रमुख श्री अरुण भट यांच्याबरोबर पणजी शाखेचे व्यवस्थापक आणि सर्व कर्मचारीही श्विन स्कॉटची वाट पाहत होते. श्री भटसाहेब तर श्विन डोंबिवली गोवा मोहीम आखत असल्यापासून श्विनच्या संपर्कात होते. ह्या मोहिमेबद्दल समजल्याबरोबर त्यांनी श्विनला गोव्यातील वास्तव्य आणि परतीचा प्रवास याबद्दल श्विनला आश्वस्त केले होते. मापुसा शाखेत पोचल्याबरोबर श्विनने भटसाहेबांना तशी माहिती कळवली होती.
मापुसा शाखा ते पणजी शाखा यामधील अंतर जेमतेम १४-१५ किमीचे. श्विन स्कॉटने मापुसा शाखेतील कर्मचाऱ्यांचा निरोप घेऊन पणजीच्या दिशेने कूच केले. मापसा शहरात वर्दळ होतीच. शहर संपून महामार्गाला लागल्यावरही रहदारी बऱ्यापैकी होती. श्विन आणि स्कॉट रस्त्याची डावी बाजू धरून जात होते. वर्दळीचा रस्ता असला तरी खड्डेविरहित आणि रुंद असल्यामुळे मोकळेपणाने वाहतूक सुरु होती. वाहतुकीला अडथळा असलाच तर मध्ये मध्ये लागणाऱ्या सिग्नलचा. श्विन स्कॉट मात्र सिग्नल आला की क्षणभर विश्रांती घेत तो वेळ सत्कारणी लावत होते. पणजी शहर जवळ येत होते तशी उत्कंठा वाढत होती. बराच वेळ किमीचे दगड किंवा पाटी दिसत नव्हती. त्यामुळे पणजी नक्की किती अंतरावर राहिले आहे याचा अंदाज येत नव्हता. श्विन स्कॉट मात्र सिग्नल वगळता सातत्याने पेडल मारत होते. आणि पणजीचे अंतर दाखवणारा फलक नजरेस पडला.
पणजी शहर जेमतेम ३ किमीवर राहिले होते. श्विन स्कॉटने तो क्षण कॅमेरात कैद केला. पुढे लगेचच पणजी शहराला जोडणारा मांडवी नदीवरील पूल लागला. पूवरी हे उपनगर आणि पणजी हे शहर जोडणारा हा पूल ३७७१ मीटर लांब आहे. ह्या पुलावर अश्वशक्तीधारी वाहनांची भाऊगर्दी झाली होती. त्यांच्याबरोबर पुलावरून वेगात पुढे जात असताना श्विन आणि स्कॉट चांगलेच उत्साहित होत होते. पूल पार करत असताना मांडवी नदीचे विशाल पात्र छायाचित्र काढण्यासाठी निमंत्रण देत होते. मात्र एकंदर वर्दळ पाहता ते शक्य नव्हते. पूल पार केल्यावर पणजी शहराकडे जाण्यासाठी उजव्या बाजूला वळायचे हे श्विनला माहित होते मात्र पूल पार झाल्यावर मात्र भुलभुलैय्यामध्ये अडकल्याप्रमाणे दोघांची अवस्था झाली. थोडावेळ अंदाज घेतल्यावर मात्र त्या भुलभुलैय्याचा उलगडा होत श्विन स्कॉट पणजी शहराकडे वळले. तो भुलभुलैय्या पार केल्यावर ज्या मांडवी पुलावरून श्विन स्कॉट आले होते तो मांडवी पूल पुन्हा एकदा समोर आला होता... मात्र विरुद्ध दिशेने! त्या विशाल मांडवी पुलाला आणि सोबतच्या मांडवी नदीला छायाचित्रबद्ध करायला श्विनला छान संधी मिळाली होती.
त्यानंतर डावीकडे वळत गुगलकाकांच्या मदतीने श्विन आणि स्कॉट TJSB बँकेच्या पणजी शाखेच्या दिशेने निघाले. श्विनस्कॉटचे तेथे पोहोचेपर्यंत पणजी शाखा बंद झाली होती. तेथील रखवालदाराकडे श्विनने चौकशी केली. भटसाहेब पणजी शाखेतच असल्याचे समजले. श्विन स्कॉटने पणजी शाखेमध्ये प्रवेश करताच भटसाहेब, पणजी शाखेचे व्यवस्थापक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी श्विन स्कॉटचे स्वागत केले. पणजी येथील TJSB च्या कुटुंबातील सगळे सदस्य शाखा बंद झाल्यावरही श्विन स्कॉटची वाट पाहत थांबले होते.
TJSB च्या कुटुंबातील ह्या सदस्यांशी भेट होताच श्विन स्कॉटही सुखावून गेले. श्विनचे... श्विनच्या मित्राचे... अविनाशचे २८ वर्षापूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले होते. पणजी शाखेमध्ये छोटेखानी समारंभात श्विनस्कॉटला भेटवस्तू देत गोवा रिजनतर्फे सत्कार केला गेला.

खरतर गोवेकरांनी केलेल्या ह्या स्वागताला उत्तर द्यायला श्विन स्कॉटकडे शब्दच नव्हते. उत्तरादाखल श्विनने एवढेच आवाहन केले की,'आपण मदत द्यायला नेहमी तयार असतो, मात्र मदत मागायला आपल्याला संकोच वाटतो. तो संकोच आपण सोडून दिला पाहिजे'. हे सांगण्यामागे होते श्विनलास्कॉटला आलेले सायकलसफरीतील अनुभव. आपण जेव्हा एखादी मदत करतो तेव्हा आपण सुखावतो. मात्र मदत मागताना आपण संकोचतो, कारण त्यावेळी आपल्याला कमीपणा वाटतो. खरेतर देणारा आणि घेणारा दोघेही एकमेकांना पूरक असतात. घेणाऱ्याशिवाय देणाराही अपूर्ण असतो. मात्र हे दोघे एकत्र येतात तेव्हाच बंध घट्ट होत असतात.
सातारा येथील शंकर बागडे, कोल्हापूर येथील संदीप गुळवणी, पणजी येथील श्री अरुण भटसाहेब यांनी श्विन स्कॉटची राहण्याची केलेली सोय न स्वीकारता हॉटेलमध्ये राहिलो असता आमचे जुने बंध अधिक घट्ट होऊ शकले असते का? मूळ डोंबिवलीकर असलेला श्विन स्कॉटला खाऊ देण्यासाठी ५० किमी सायकलिंग करत आलेला संतोष कांड, श्विन स्कॉटची वाट पाहत महामार्गावर दोन दोन तास उभे राहिलेले भूईंज येथील योगेश शिर्के आणि इतर दोन मित्र हे स्वतःहून स्कॉट श्विनला मदत करायला पुढे आले होते. ह्या सर्व मित्रांशी ओळख होण्यामागे, त्यांचा स्नेह जडण्यामागे त्यांचे मदत करणे आणि श्विनस्कॉटने ती स्वीकारणे हे दोन्ही पूरक होते. सातारची केळेवाली सुद्धा अशीच स्वतःहुन काही देऊ पाहत होती. नाईलाजाने तिच्याकडून ती केळी न स्वीकारली गेल्यामुळे तिला नाराज करावे लागले याची खंत श्विन स्कॉटला निश्चितच वाटत होती.

अर्थातच मैत्रीचे बंध घट्ट करण्यासाठी किंवा नवीन बंध निर्माण करण्यासाठी अश्या सायकलसफरींचे निमित्त हे हवेच....
तेव्हा २८ वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर श्विनच्या डोळ्यात पुढील स्वप्न तरळू लागले होते. आणि आता श्विनच्या जोडीला स्कॉटही स्वप्न पाहू लागली होती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा