अष्टविनायक यात्रेची सिद्धता झाल्यावर श्विनला रात्री अतिशय शांत झोप लागली होती. पहाटे मात्र वेळेवर जाग आली. श्विनने दिवा परिधान केला होता. डाव्या बाजूला नवीन मिळालेली घंटा शोभून दिसत होती. मागील वाहकावर रबरी नळीने सामान लादले होते. स्कॉटही घंटा, दिवा लेऊन छान सजली होती. अद्याप फारसे उजाडले नव्हते. अस्मादिकांनी 'डोंबिवली सायकल क्लब'ने बनवलेली मागे तीन खिसे असलेली खास वर्दी घातली होती आणि त्यावर अंधारात चमकणारे पट्टे असलेले जाकीट परिधान केले होते.
संथ लयीत सुरुवात करून दोघेही डोंबिवली शहराचे ग्रामदैवत श्री गणेशमंदिर संस्थान येथे पोचले तेव्हा डॉ पुणतांबेकर आणि डोंबिवली सायकल क्लबचे इतर सदस्य श्विन, स्कॉटचीच वाट पहात होते. त्यांच्याचबरोबर श्विन स्कॉट मिलापनगर गणेश मंदिरापाशी पोचले.
तेथे पुष्कर जोशी सपत्नीक हजर झाला. सारंग आणि बिराजदार ही डोंबिवली सायकल क्लबची जय , विरुची जोडी असली तरी पुष्कर आणि अस्मादिकांनी मैत्री अगदी महाविद्यालयापासूनची.... म्हणजे ३४-३५ वर्षांपासूनची!

त्यामुळे पुष्कर भेटताच अस्मादिकांचा आनंद आणि उत्साह अधिकच वाढला.
मिलाप नगर येथे DCC सदस्यांचा निरोप घेत श्विन आणि स्कॉट वेगाने निघाले. ठाण्याहून निघालेल्या राजीव दुधालकर यांना शीळ फाटा दत्तमंदिरापाशी भेटले. तर विलास (गजानन) वैद्य पळस्पे फाटा येथे आमची वाट पाहत उभा होता. त्याची मुंगूस बराच वेळ तिष्ठत थांबली होती. अस्मादिकांना श्विनचे जसे प्रेम तसेच विलासला त्याच्या 'मुंगूस'चे प्रेम!
पळस्पे फाटा येथे मनसोक्त नाष्टा केल्यावर श्विन, स्कॉट, मुंगूसने लय पकडली. दुधळकरांची ही पहिलीच मोठी यात्रा होती. त्यांनी बरेच सामान घेतलेले होते. त्याचे वजन आता त्रास देऊ लागले होते. त्यामुळे आमचा सरासरी वेग कमी कमी होत होता. दुधालकर कसोशीने प्रयत्न करत वेग वाढवायचा प्रयत्न करत होते. वाटेत चौक येथे चहापान करून आम्ही महड येथे पोहोचलो. आम्ही सायकलवरून अष्टविनायक दर्शन करत असल्याचे समजताच तेथील सेवकांनी आम्हाला अग्रक्रमाने वरदविनायकाचे दर्शन घेऊ दिले.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. येथील वरदविनायक समृद्धी व यश देणारा या रूपात आहे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. पेशवेकाळात १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.
वरदविनायकाचे दर्शन झाल्यावर जठराग्नीला आहुती देणे आवश्यक होते. आपसूकच आम्ही महड येथील पुजारी श्री वसंत जोशी व विनय जोशी यांच्या घराकडे वळलो. त्यांच्याकडच्या जेवणाची चव अनेकदा चाखल्यामुळे जिव्हा आणि जठराग्नी तृप्त होणार याची खात्री होतीच. मात्र त्यांच्याकडे माणसांची कमतरता होती. तरीही आम्ही सायकलवरून सायकलयात्रा करत आहोत हे समजताच त्यांनी आमच्या जेवणाची सोय केली. त्यांच्या अंगणातच रौप्यमहोत्सवी वर्ष अष्टविनायक यात्रा असे नामाभिधान मिरवणारी ऍटलास सायकल दिमाखत उभी होती. शेजारीच हिरो हॉक उभी होती. चौकशी करता उल्हासनगरमधील दोन सायकलपटू सुद्धा अष्टविनायक दर्शनाला निघाल्याचे समजले. आतमध्ये गेल्यावर अटलास आणि हिरो हॉक वरील स्वार अनुक्रमे उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर यांची ओळख झाली. जगद्ममित्र विलास आणि उपेंद्रचे काही सामाईक मित्रही असल्याचे समजले. गप्पा इतक्या छान रंगल्या की जेवणासाठी ताट वाढले तरी कोणी जेवायला बसेना. ते दोघे आदल्या दिवशी थेट पालीला जाऊन आज महडला आले होते. तर आम्हाला आज पालीला जायचे होते. दरम्यान श्विनची ट्यूब पंक्चर झाल्याचे समजले. मग विलासच्या मार्गदर्शनानुसार पंक्चर काढले. पण इतक्यात आणखी एक पंक्चर असल्याचे समजल्याने ट्यूबच बदलली.

आता आमची खरी कसोटी सुरू झाली होती. बराचसा रस्ता कच्चा होता. त्यातच राजीवना सराव नसल्याने त्यांची दमछाक होत होती. सगळेजणच शांत, संथ पण निग्रहाने पेडल मारत होते. मुंगूस आणि श्विन यांची मौजमजा सुरू होती. स्कॉटही अथकपणे पुढे सरकत होती. काळोख पडण्या आधी पाली गाठण्यासाठी श्विनची धडपड सुरू होती. मात्र काफ़िल्याला फार गती मिळत नव्हती.
चढ उताराचे डांबर उडालेले रस्ते परीक्षा पाहत होते. वाटेत चहाच्या निमित्ताने एक दोनदा विश्रांती घेत यात्रेकरू पुढे सरकत होते. अखेरीस संध्याकाळी ६ वाजता पाली शहराचे दर्शन झाले.
मुंगूस बरोबर असताना श्विन निर्धास्त होती. भक्तनिवास मध्ये राहण्याची सोय पाहून आम्ही बल्लाळेश्वराच्या दर्शनाला गेलो.
या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. महडप्रमाणे येथे रांग किंवा गर्दी नव्हती. शांतपणे दर्शन घेऊन आम्ही मंदिरात बसलो. पाली येथे गेल्यावर वर्षानुवर्षे कोणकर यांच्या जेवणाची सवय असल्यामुळे आम्ही सर्वजण थेट त्यांच्याकडे गेलो. यात्रेतील पहिला दिवस पार पडल्याचा आनंद साजरा करण्यास श्रीखंडही घेतले. कोणकर यांच्याकडील जेवण खरोखरच उत्तम होते. रोज रात्री ११- ११.३० जागण्याची सवय असूनही ९.३० वाजताच डोळे मिटू लागले होते. विलास मात्र अजूनही चांगलाच मूडमध्ये होता. आम्ही तिघे पेंगुळलेले पाहून त्याने आम्हाला निद्रादेवीच्या अधीन होऊ दिले.
चढ उताराचे डांबर उडालेले रस्ते परीक्षा पाहत होते. वाटेत चहाच्या निमित्ताने एक दोनदा विश्रांती घेत यात्रेकरू पुढे सरकत होते. अखेरीस संध्याकाळी ६ वाजता पाली शहराचे दर्शन झाले.
मुंगूस बरोबर असताना श्विन निर्धास्त होती. भक्तनिवास मध्ये राहण्याची सोय पाहून आम्ही बल्लाळेश्वराच्या दर्शनाला गेलो.
नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा