रविवार, २८ जून, २०२६

City of Joy: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १०

मुंबई कोलकाता flight सकाळी ९.४५ चे होते. मी सकाळी ६ वाजताच घर सोडले. एअरपोर्टला लवकर जाऊन तिथे नाष्टा करावा लागणार होता. संजय आणि मनोजही अगदी वेळेवर पोचले. एकदा सामान चेक इन केले की आम्ही मोकळेच होतो.


मी, संजय आणि मनोज चेक इन च्या रांगेत उभे राहिलो. माझ्या डोळ्यासमोरून मागील वर्षीचा प्रसंग तरळला. माझी एक हँडबॅग ट्रॉली मध्ये राहिली होती. आम्ही कोलकाता येथे पोचल्यावर आम्ही कंप्लेंट केली होती. तेव्हा आम्हाला सांगितले होते की ती bag मिळाली आहे. परत आल्यावर मला पोलिस कंप्लेंट करायला लावली होती. त्यानंतर त्यांनी मला CCTV कॅमेरामध्ये ती बॅग सुरक्षा रक्षकांनी जमा केल्याचेही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्याच दालनात दाखवले होते. मात्र ती बॅग नंतर वस्तू परत करणाऱ्या काउंटरला गेलीच नव्हती. सुदैवाने माझा GOPRO कॅमेरा मला त्यांनी परत केला होता. मात्र सायकलचे LIGHTS, इतर काही ACCESSORIES, माझा एक HOTPOT हे सगळे गमवावे लागले होते.


असो, आता मात्र आम्ही काळजी घेत होतो. चेक इन झाल्यावर आम्ही लाउंजकडे वळलो. मी कार्ड स्वाइप करून lounge access मिळवला. माझ्याकडे आणखी दोन कार्ड होती. पण त्यावर lounge access मिळणार नाही असे कळले. त्या दोघांकडे कार्ड नव्हते. मी तर स्वाइप केले होते. अखेर मी आतमध्ये नाष्टा करून येईन तोपर्यंत ते बाहेर नाष्टा करतील असे ठरले. लाउंज आमच्या गेटसमोरच होते. 


आम्ही नाष्टा करून गेट समोर जाऊन बसलो. थोड्याच वेळात विमान आले. आपापल्या सीटवर जाऊन बसलो आणि डोळे मिटले. शांतपणा जाणवत होता. लवकर उठल्याने झोप येत होती. तसेही flight मध्ये बसल्यावर मला थोड्या वेळात झोप लागतेच. कोलकात्याचे आकाश निरभ्र होते. मागच्या वर्षी डॉ केळकरांकडे मुक्काम केला होता. ते आता चिंचवडला राहायला आले होते. आम्ही एअरपोर्ट बाहेर आलो. तिथे मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी एकजण भेटायला येणार होता. तो जवळपास १०० किमी दुरून येणार होता. अर्धा पाऊण तास वाट पाहिल्यावर तो आला. आमचे काम झाल्यावर मी संदीपला फोन केला. त्याने लोकेशन पाठवल्या वर आम्ही कॅब बुक केली.

City of Joy म्हणजेच कोलकाता शहर पाहायला आम्ही उत्सुक होतो. कोलकाता शहर ओळखीचे वाटत होते. संदीप बेलूर मठाजवळ राहत असल्याचे समजल्याने मी खुष होतो. मागच्या वर्षी बेलूर मठानेही आमची रहायची सोय केली होती, मात्र वेळे अभावी आम्हाला तिथे जाता आले नव्हते. आता मात्र हा योग जुळून येणार होता.


कॅब बेलूर येथे पोचली. संदीपचे घर एका अरुंद बोळात होते. कॅब ड्रायव्हर स्वभावाने चांगला होता. जेमतेम एक गाडी जाऊ शकेल इतपतच रुंदी असावी. आम्ही त्या बोळात संदीपचे घर शोधू लागलो. तिथे चौकशी करत असताना समोरून एक उंच, सडपातळ माणूस आम्हाला हात करत होता. आम्ही त्याच्या जवळ गेलो. त्याने आम्हाला ओळखले होते. त्याने ओळख करून दिली...मी संदीप...!

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...