पुणे शहराकडून साताराकडे जाताना राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या नऱ्हे येथे श्विन आणि स्कॉटचा रात्रीचा मुक्काम होता. शांत झोप झाल्यावर दोघांनाही पहाटे ब्राह्म मुहूर्तावरच जाग आली. सूर्य ढगांच्या दुलईतून बाहेर यायला अवधी होता. हवेतला गारठा जाणवत होता. त्यामुळे श्विन आणि स्कॉट थोडे आरामातच तयार झाले. पहाटेच्या निरव शांततेचा भंग न करता दोघंही संकुलाबाहेर पडले, तेव्हा सन युनिव्हर्स ह्या संकुलामध्ये अजून सामसूम होती. संकुलाबाहेर लगेचच कात्रजमार्गे साताऱ्याकडे जाणारा प्रशस्त महामार्ग सुरु होतो. श्विन आणि स्कॉटने संथ गतीने सुरुवात करत त्या प्रशस्त महामार्गाची डावी बाजू पकडली. दोघेही आजूबाजूचा परिसर न्याहाळत पुढे जात होते.
स्कॉट थोडी पुढे जात असताना श्विन मात्र एका वळणावर थबकली होती. डावीकडे दिसणारा प्रशस्त तलाव लक्ष वेधून घेत होता
श्विनची नजर तलावाकडे खिळलेली असताना स्कॉट मात्र बरीच पुढे गेली होती. श्विन भानावर आल्यावर स्कॉटला गाठण्यासाठी श्विनने गती वाढवली. दरम्यान स्कॉटने विश्रांती घेतल्यामुळे श्विनने स्कॉटला लवकरच गाठले. आत्तापर्यंत थोडी राइड झाल्यामुळे पाय मोकळे झाले होते त्यामुळे स्कॉटने गती वाढवायचे ठरवले. मात्र बराच वेळ प्रयत्न करूनही गती विशेष वाढत नव्हती. टायरमधील हवा, ब्रेक हे दोन्ही चाचपून पाहिले तर त्यात काहीच दोष दिसत नव्हता. एवढ्यात सहजपणे दोघांनी मागे वळून पाहिले मात्र आणि गती न वाढण्याचे कारण दोघांनाही लक्षात आले. हा रस्ता पेडलिंग करताना जाणवत नसला तरी चढाचा होता. चढाची तीव्रता पेडलिंग करताना डोळ्यांना दिसत नव्हती, तरी तो चढ बराच लांबवर पसरलेला होता.
थोड्याच वेळात कात्रज बोगदा दिसू लागला. श्विन आणि स्कॉट थोडा वेळ थबकले असतानाच मागून आणखी एक सायकलस्वार त्यांच्या जवळ आला. ह्या बोगद्यानंतर चिंचवड येथील मित्र मंडळी भेटणार होती. ह्या सायकलस्वराचा वेष पाहताच श्विनला हा सायकलस्वार त्याच मित्रमंडळीमधील असल्याचे लक्षात आले. तो होता श्रीकांत खटके. आमची भेट झाल्याची वार्ता श्रीकांतने लगेचच इतरांना कळवली. श्विन स्कॉटला त्याने पुढे जायला सांगितले.
समोर दिसणारा कात्रज बोगदा हा लांबूनही लक्ष वेधत होता. बोगद्याच्या वर असणारा डोंगर अवाढव्य असले तरी एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासमान भासत होता. तेथून जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी त्याने हलकेच वाट उपलब्ध करून दिली होती. कात्रज बोगदा हा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांना जोडणाऱ्या सुवर्ण चतुर्भुज रस्त्याचा भाग होता. हा बोगदा १२२३ मीटर इतका लांब असून येण्या जाण्यासाठी वेगवेगळे बोगदे आहेत. आणि बोगद्यातील रस्ताही रुंद आहे. यातून केलेली राइड हा एक विलक्षण अनुभव होता.
कात्रज बोगदा पार करून पुढे गेल्यावर पुण्याकडून येणारा दुसरा रस्ता मिळतो. त्या ठिकाणी चिंचवड येथील मित्रमंडळी भेटणार होती. श्रीकांत मागे राहिला होता. बोगदा पार केल्यावर वेग वाढला असला तरी श्विनचे लक्ष दुसरा रस्ता कुठे येऊन मिळतोय याकडे होते. मात्र श्विनपेक्षाही चिंचवड येथील सुनील पाटील आणि सहकारी अधिक सावध होते. श्विनला समोरून येताना पाहताच त्यांनी उत्साहाने स्वागत केले. सुनील पाटील बरोबर संतोष कांड,राजेंद्र दोशी, अजय मते, अतुल माने आणि राहुल शहा ही पूर्ण टीम श्विन आणि स्कॉटला भेटण्यासाठी आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला आले होते. पाठोपाठ श्रीकांत ही तेथे पोचला. इतके आपुलकीचे स्वागत पाहून स्कॉटही भारावून गेली. श्विन स्कॉटशी सर्वांशी ओळखपरेड झाली आणि लगेचच सर्वजण चहासाठी वळले. चहाबरोबर बिस्किटांचाही फन्ना उडत होता. सर्वजण हास्यविनोदात दंग झाले होते. भेटीची तृप्तता थोड्या वेळात होणे शक्य नसले तरी श्विन स्कॉटला पुढील पल्ला गाठायचे असल्याचे भान सर्वानाच होते. श्विन आणि स्कॉट ला देण्यासाठी आणलेला खाऊ संतोष कांडने दिला. त्याहूनही आनंदाची गोष्ट ही होती की संतोष, राजेंद्र आणि अजय श्विन आणि स्कॉट यांना आणखी थोडावेळ साथ करणार होते. सुनील, अतुल माने व राहुल शहा मात्र परत फिरणार होते. त्यामुळे भेटीची आठवण टिपण्यासाठी सर्वांचे समुह छायाचित्र घेेण्यात आले.
परत जाणाऱ्या सवंगड्यांचा निरोप घेऊन स्कॉट श्विन सह संतोष, अजय, राजेंद्र पुढे निघाले. आता सगळ्यांनीच वेग घेतला होता. कात्रज बोगद्याआधी असलेल्या कमी वेगाची पूर्ण भरपाई आता होत होती. एकमेकांशी गप्पा मारत पुढील रस्ता पटापट संपत होता. संतोष, अजय आणि राजेंद्र एका शिवमंदिराकडे जाणार होते. जाता जाता पुढील रस्त्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या ठिकाणांची माहिती द्यायला ते विसरत नव्हते. तिघांबरोबर जाताना श्विन स्कॉटचा उत्साह आणि वेग वाढत असला तरी थोड्या वेळातच नसरापूर येथे त्यांचाही निरोप घेण्याची वेळ लवकरच आली.
पुढे जात असताना पंढरपूर फाटा येथे असलेली पेशवेकालीन विहीर पाहण्याची सूचना ह्या मित्रांनी केली होती. त्या विहिरीविषयी श्विनची उत्सुकता वाढली होती.
वाटेत धांगवडी गावाजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर श्विनला दिसले. ते पाहताच श्विनला त्याविषयी कुतूहल वाटू लागले. धांगवडी हे भोर तालुक्यातील एक छोटेसे गाव. जेमतेम ३०० च्या आसपास कुटुंबे असलेल्या ह्या गावाची लोकवस्ती साधारण १५०० जणांची आहे. मंदिराजवळ जाऊन पहिले असता ते पांडवकालीन अडबलनाथ मंदिर असल्याचे समजले. मंदिर पुरातन असल्याचे दुरूनच समजत होते. आजूबाजूला मात्र कोणी दिसत नसले तरी मंदिरातील परिसर स्वच्छ दिसत होता.
या मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी आरती व पूजा असते. व मंदिरात येणाऱ्या सर्व लोकांसाठी जेवणही असते. तिथे पाण्याची पण सोय आहे. गावची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
मंदिरापाशी घटकाभर थांबून श्विन आणि स्कॉटने दौड पुढे सुरु केली. दोघांनी वेगही छानच पकडला होता. त्याच वेगात पुढे जात असताना शिरवळ गाठले. जठराग्नी पुन्हा एकदा जागृत होत होता. शिरवळ येताच श्विनने वेग आवरला आणि स्कॉट पुढे गेली. सेवा रस्त्याला काही उपहारगृहे होती, मात्र स्कॉटने मुख्य रस्ता सोडला नसल्याने जठराग्नीला आहुती मिळू शकली नाही. शिरवळ मागे पडल्यावर दोघांनी पुन्हा वेग घेतला आणि दोघेही लवकरच पंढरपूर फाटा येथे पोचले. श्विनला पेशवेकालीन विहिरीविषयी उत्सुकता वाटत होती. तेथे पोहोचताच श्विनने जवळपास त्या विहिरीविषयी चौकशी केली. मात्र दुर्दैवाने तेथील कोणालाही तशी माहिती नव्हती. मात्र तेथे काही उपहारगृहे मात्र दिसत होती. लगेचच जठराग्नीला आहुती देण्याचा निर्णय घेऊन श्विन आणि स्कॉट थांबले. तेथील एका छोट्या घरगुती उपहारगृहाकडे दोघांची पावले वळली. विहिरीची तहान पोहे आणि चहावर भागवली. उपहारगृहाचे चालक आपुलकीने चौकशी करत होते. त्याच आपुलकीने बनवल्यामुळे पोहे अधिकच चविष्ट वाटत होते. तृप्त मनाने श्विन स्कॉटने पुढील वाटचाल सुरु केली. पोटोबाची शांती झाल्यामुळे पुन्हा एकदा वेग वाढला होता.
चिंचवड येथील मित्रमंडळींनी पुढील घाट चढण्याआधी उदरभरणासाठी एक ठिकाण सांगून ठेवले होते. घाटाच्या पायथ्याशी जिथे दोन रस्ते सुरु होतात तेथे असलेले ते ठिकाण होते भैरवनाथ मिसळ केंद्र. खरतर भुकेची जाणीव झाली नव्हती, पण घाट चढण्याआधी थोडी विश्रांती घेण्यासाठी श्विन स्कॉट तेथे थांबले. मुंबई पुणे मधील खंडाळा घाट चढण्याची सवय असल्यामुळे पुणे सातारा मधील खंडाळा घाट चढणे सोपे असणार याची श्विन स्कॉटला खात्री होतीच. घाट चढता चढता तीच अनुभूती येत होती. आजूबाजूचा परिसर न्याहाळत दोघेही आरामात घाट चढत होते. दोघांची तयारी इतकी होती की घाट कधी संपला हे कळलेही नाही.
सायकलजगतातील मैत्र ज्योतीने ज्योत लावावी तसे वृद्धिंगत होत असते. दोन चार दिवसांपूर्वीच सुनिल पाटील आणि समूह सायकल फेरीसाठी गेले असताना तेथे भुईंज येथील काही सायकलपटू त्यांना भेटले होते. सुनील पाटील यांनी त्यानांही एका 'काय अप्पा' (व्हाट्स अँप) समूहावर सामील करून घेतले होते. त्या समूहात श्विन स्कॉटची सफर त्यांना समजली होती. त्यामुळे त्यांनी श्विनशी संपर्क साधून भुईंज येथे वाट पाहत असल्याचे कळवले होते. त्यांना भेटायचे असल्याने श्विन स्कॉटही वेगात जात होते. दरम्यान एके ठिकाणी पाणी पिण्यासाठी विश्रांती घेतली असता मागून एका दुचाकीवरून श्विन स्कॉटला एका महिलेने साद घातली. श्विन स्कॉटशी ओळख करतानाच त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून जात होता. ती होती अपर्णा कुलकर्णी. सायकलवरून जगप्रवासासाठी निघालेल्या वेदांगी कुलकर्णी हिची ती आई होती. अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण जग सायकलद्वारे कवेत घेण्याचा वेदांगीचा उपक्रम खरोखरच साहसी आणि प्रेरणादायी होता. संतोष कांड प्रमाणेच अपर्णा कुलकर्णी सुद्धा मूळ डोंबिवलीकरच. बोलता बोलता अनेक संदर्भ लागत गेले. अपर्णा आणि श्विनची शाळाही एकच होती. जग गोल असल्याची प्रचिती पुन्हा पुन्हा येत होती. वेदांगीबद्दलची काळजी आणि अभिमान अपर्णा कुलकर्णी यांच्या बोलण्यातून जाणवत होता. तिघांनाही किती बोलू आणि किती नाही असे झाले होते. मात्र वेळेची मर्यादाही सगळ्यांनाच माहित होती. एकमेकांचा निरोप घेता घेता कोल्हापूर येथे घरी यायचे आग्रहाचे निमंत्रण अपर्णा यांनी दिले.
दरम्यान भुईंज येथे योगेश शिर्के आणि दोन सायकलमित्र वाट पाहत होते. श्विन स्कॉटने पुन्हा वेग वाढवला. वाट पाहून भुईंज येथील मित्र फर्लांग दोन फर्लांग पुढे येऊन सेवा रस्त्यावर थांबले होते. मुख्य रस्त्यावरून वेगात चाललेल्या श्विन स्कॉटला त्यांनी पाहिले आणि लगेचच हाक मारली. तिघेही व्यावसायिक होते. दोघे मेडिकल व्यवसायात होते तर तिसरा कपड्याचा व्यापारी होता. आपला व्यवसाय बाजूला ठेवून तिघेही भर उन्हात श्विन स्कॉटची वाट पाहत महामार्गावर येऊन थांबले होते. अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने त्यांनी श्विन स्कॉटचे स्वागत केले. त्यांचा जेवणाचा आग्रह न स्वीकारणे कठीणच होते. मात्र भेटीची तृप्तताही मोठी होती. त्यांच्या विनंतीला मान देत श्विन स्कॉटने लस्सीचा स्वाद घेतला. त्यांचा निरोप घेत असतानाही तिघांनी अतिशय आग्रहाने ORS चे सहा पॅक देऊ केले. मात्र एवढे पॅक घेता येणे खरोखरच शक्य नसल्याचे श्विन स्कॉटने त्यांना सांगितले. त्यांचा आग्रहही मोडवत नव्हता. त्यामुळे त्यातील तीन पॅक बरोबर घेऊन श्विन स्कॉटने सातारचा रस्ता धरला. दरम्यान आपण वेळेच्या खूपच आधी सातारला पोचणार असल्याचे लक्षात येताच सातारा ऐवजी कराड पर्यंत पुढे जायचा विचार श्विनच्या मनात घोळू लागला होता. स्कॉटनेही सुरुवातीला तयारी दाखवली. मात्र सातारा जवळ येत असताना तीव्र चढ उतार लागू लागल्यावर स्कॉटची दमछाक होऊ लागली. कराडपर्यंत पुन्हा असेच चढ उतार असले तर... ही धास्ती वाटू लागल्याने स्कॉटने विचार बदलला. स्कॉटची गती चांगलीच मंदावली होती. त्यामुळे सातारा शहराचा रस्ता दिसू लागताच ठरल्याप्रमाणे सातारा येथेच मुक्काम करण्याचे ठरले. ठरवलेल्या वेळेपेक्षा स्कॉट आणि श्विन तब्बल तीन तास आधी भोसल्यांची राजधानी सातारा शहरात प्रवेश करत होते. संतोष कांड याने दिलेला खाऊ, चिंचवड येथील सायकलमित्रांबरोबर घेतलेला चहा, अपर्णा कुलकर्णी यांच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा, भुईंज येथील सायकलमित्रांशी जुळलेले मैत्र यांच्यामुळे श्विन स्कॉट तृप्त झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा