देव हे सत्य आहे की नाही या फंदात न पडता, जे सत्य आहे त्यालाच देव मानले तर.... गांधीजींची ही संकल्पना मला खूप भावते. बीजगणित हा माझा आवडता विषय. अ= ब हे सिद्ध करता येत नसेल तर ब= अ हे सिद्ध करता येते का हे पाहायचे. गांधीजींनी बिजगणिताचीच युक्ती देव ही संकल्पना तपासण्यासाठी वापरल्यामुळे मला ही पद्धत लगेचच पटली.
जे सत्य आहे ते तर आहेच. सत्यालाच देव मानले तर मग देव या संकल्पनेबद्दलचा सर्व गोंधळ दूर होतो. आप, तेज, वायू, जमीन आणि आकाश ही पंचमहाभूते तर अस्तित्वात आहेतच. म्हणूनच त्यांना देव मानून त्यांची प्रतिकात्मक पूजा हिंदू धर्मात केली जाते.
देव म्हणजेच या पंचमहाभूतांना वंदन केल्यावर कोणती गोष्ट असाध्य राहील? मात्र ही पंचमहाभूते किंवा हा देव चालता बोलता नाही, म्हणूनच आपल्याला गुरुची गरज भासते. देव मानाला तरी तो मानवी रुपात दिसत नाही, म्हणूनच तो गुरु किंवा आदर्श व्यक्ती या रुपात अधिक भावतो. श्रीगणेशाचे दर्शन घेऊन श्विन आणि स्कॉटने डोंबिवली हुन प्रस्थान केले तरी चालत्या बोलत्या देवाच्या सदिच्छा पाठीशी असणे नक्कीच अधिक प्रेरणादायी ठरणार होते. म्हणूनच २-३ दिवस आधी श्विनने आपले गुरु किंवा आदर्श ह्या प्रवासादरम्यान भेटेल याची चाचपणी करून ठेवली होती.
दरम्यान सुमित मोकल पहाटे पहाटे नियोजित वेळेनुसार सामंत पेट्रोल पम्पापाशी पोचला होता. श्विन स्कॉट थोडे मागे होते. मग श्विनशी बोलून सुमित शिळ फाट्याच्या गणेश घोळ मंदिरापाशी जाऊन परत शिळ फाट्याला येऊन थांबेल असे ठरले. श्विन आणि स्कॉट संयतपणे डोंबिवली शहराबाहेर पडले. सामंत पेट्रोल पम्प येथे विश्रांती घेऊन कल्याण शिळ रस्त्याला मात्र दोघांनी वेग घेतला. आजचे ध्येय डोळ्यासमोर असल्याने श्विन आणि स्कॉट लवकरच शिळ फाट्याला पोचले. सुमितच्या अंदाजापेक्षा लवकरच श्विन स्कॉटने शिळ फाटा गाठला होता. सुमित मात्र त्यावेळी अजून गणेश घोळ मंदिरातच होता. मग सुमितशी भ्रमणध्वनी द्वारेच चर्चा केली. श्विन- स्कॉटची तब्बेत ठणठणीत असल्याचे कळताच, त्याने वेळ न दवडता पुढे जायला सांगितले.
एव्हाना व्यवस्थित सूर्यप्रकाश पसरला होता. उत्साहही चांगला होता. शिळ आणि तळोजा मधील टोळ नाका हा श्विन स्कॉटचा हक्काचा थांबा.
तेथे क्षणभर विश्रांती घेऊन दोघांनी लयबद्ध रीतीने वाटचाल सुरु ठेवली. लवकरच श्विन स्कॉट तळोजा, कळंबोली मार्गे पनवेल शहरात शिरले. श्विनला गुरुतुल्य असे व्यक्तिमत्व पनवेल मध्येच होते. खरतर श्विनच कशाला मुंबईतील तमाम गिरिप्रेमी, निसर्गप्रेमी, सायकल पटू यांचा आदर्श पनवेल येथे वास्तव्य करत होता. पनवेल शहरात शिरताना स्कॉटला मात्र तो वेळेचा अपव्यय वाटू लागला. कारण पुढील खोपोली खंडाळा घाट तिला डोळ्यासमोर दिसत होता. काम, काळ, वेग हे त्रैराशिक श्विनने शालेय जीवनातही लीलया सोडवलेले होते. किंबहुना ते त्रैराशिक सोडवणे हा श्विनचा छंदच होता. त्यामुळे आजही हे त्रैराशिक श्विनच्या डोक्यात फिट्ट होते. त्यामुळे श्विनमात्र वेळेबाबत निर्धास्त होती.
पनवेल शहरातील अरुंद रस्त्याने आम्ही निघालो. एका चौकात पत्ता विचारण्यासाठी एका दुकानात शिरलो. दुकानात पत्ता विचारला आणि इतक्यात समोरून येणाऱ्या एका युवकाने श्विन आणि स्कॉट कडे पाहत विचारले,' तुम्हाला धनंजय मदन यांच्याकडे जायचे आहे का?'.
सायकल पाहिल्यावर आम्ही पनवेल शहरात कोणाच्या घराची चौकशी करत आहोत हे कोणताही सायकलपटू सहज ओळखु शकत होता. त्याने आम्हाला अप्पांचे (धनंजय मदन) घर दाखवले. आप्पांचे घर हे केवळ मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर जगातील कोणत्याही सायकल पटूंचे हक्काचे आश्रयस्थान आहे. स्वतः अप्पा उर्फ धनंजय मदन हे केवळ श्विनच नव्हे तर इतर अनेक मुंबईकर गिरिप्रेमी, निसर्गप्रेमींचे, सायकल पटूंचे प्रेरणास्थान, आदर्श आहेत. आम्ही घरी पोचताच त्यांची कन्या प्रिसिलियाने आमचे स्वागत केले. कोणीही सायकलसफर करत असेल तर स्वतःच सायकलसफर करत असल्याप्रमाणे अप्पा उत्साही असतात. अप्पांनी स्वतः संपूर्ण भारत डोंगरखोऱ्यांसह पायी आणि सायकलने अनेक वेळा पादाक्रांत आणि चक्राक्रांत केलेला आहे. त्यांची अत्यंत नम्र, मितभाषी आणि सात्विक मूर्ती आम्हाला नेहमीच हत्तीचे बळ देऊन जाते. त्यांच्याबरोबर सायकलिंग करताना पनवेल ते गोवा सायकलप्रवास एखादा १०-१२ वर्षीय मुलगाही सहज पार करतो तेव्हा म्हणूनच आश्चर्य वाटत नाही. मग त्यांच्या सदिच्छा पाठीशी असताना श्विन स्कॉटला गोवा गाठणे कितीसे कठीण जाणार होते!
स्कॉटला वेळेचा अपव्यय वाटत असलेला श्विनचा खटाटोप यासाठीच होता. वाटेत एखादी डोंगराएवढी अडचण आलीच तर त्यातून वाट काढणे अप्पांच्या सदिच्छा पाठीशी असताना सहजशक्य होते याची जाणीव श्विनला होती. अप्पांच्याच बरोबर प्रिसिलियाची भेट हा तर बोनसच होता. वडीलांच्याच पावलावर पाउल ठेवून ती पेडल मारत होती. कोणतेही सहाय्य न घेता एकटीने पनवेल ते कन्याकुमारी सायकलिंग करूनही ती समाधानी नव्हती म्हणून नंतर सुमित परिंगे बरोबर प्रिसिलियाने बांबू सायकलवरून कन्याकुमारी ते खारदूंगला हे सुमारे ४५०० किमी अंतर पार केले होते.
अप्पांकडे सकाळचा भरपेट नाश्ता करत असताना आप्पा नेहमीप्रमाणेच नकळत काही टिप्स देत होते. खरतर त्यांच्या भेटीमागे ह्या टिप्स मिळवणे हेच तर खरे इप्सित होते. अप्पा आणि प्रिसिलिया आपुलकीने आमची चौकशी करत होते. गप्पांदरम्यान पुण्यातील सायकलिस्ट निरूपमा भावे ही माझी सख्खी मावशी असल्याचे आप्पाना प्रथमच समजले. अर्थातच माझ्या सायकलिंग, माझी जिद्द यामागचे खरे प्रेरणास्थान किंवा खरे गुपित त्यांना सहजच उलगडले असावे.
आमचा नाश्ता झाल्यावरही आप्पांनी थोडा खाऊ बरोबर नेण्यास सांगितले. त्या खाऊची गरज केव्हाही लागू शकत होती, हे श्विनला माहित होते. मग त्यातील तीन केळी सायकलिंग शर्टच्या मागे असलेल्या तीनपैकी एका खिशात ठेवून आम्ही निघालो. आप्पाही आमच्या सायकली पाहण्यासाठी आले. आम्ही आमचे सामान कसे अडकवतो, सायकली व्यवस्थित स्थितीत आहेत की नाही, टायर ठीक आहेत ना, सायकलसाठी काही साहित्य हवे आहे का या आणि अनेक गोष्टींची खातरजमा अप्पांनी सहजपणे केली.
.
त्यानंतर आप्पांचा निरोप आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन श्विन आणि स्कॉट मोहिमेतील पुढील वाटचालीस निघाले. पहाटे झालेले श्री गणेशाचे दर्शन आणि त्यानंतर झालेले गुरुसमान आणि आदर्शवत अप्पांची भेट (आणि अर्थातच प्रिसिलियाची भेट) यामुळे डोंबिवली गोवा सायकलसफर विनासायास होणार याबद्दल आता श्विनच्या मनात किंचितही शंका राहिली नव्हती.

नेहमी प्रमाणेच उत्तम वर्णन आणि त्यात फोटो एड केल्याने अधिकच छान हिट आहे. Keep it up 👍🚴👍🚴
उत्तर द्याहटवा