महानगरी मुंबईच्या मध्य उपनगरात राहून लोहमार्गावरील विद्युतरथाने प्रवास न केलेला मध्यमवर्गीय सापडणे म्हणजे समुद्रात बुडी मारून कोरडा राहून दाखवण्यासारखेच आहे.
माझे मुंबईच्या ह्या जीवनवाहिनीशी नियमित नाते जुळले ते ख्रिस्ती वर्ष १९९० अर्थात भारतीय सौर वर्ष १९१२ मध्ये. या जीवनवाहिनितून प्रवास करणारे सहप्रवासी एका कुटुंबाचाच भाग असतात. त्यानंतर सुमारे १८ वर्ष मुंबईच्या या विद्युतरथाचा नियमित अनुभव गाठीशी बांधल्यानंतर मी ३ वर्षाकरीता चिंचवडला गेलो. तेथून परत आलो आणि परत ठाण्याच्या कार्यालयात रुजू झालो त्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या या विद्युतरथातील प्रवासीसंख्या खूपच वाढल्याचे जाणवले. पण इथेही लवकरच छान सहप्रवासी मिळाले.
मात्र अधूनमधून सायकलने ठाण्याचा प्रवास करू लागलो. हळूहळू सायकलचा प्रवास सुखद वाटू लागला. तरी अधूनमधून सरकारी विद्युतरथ तर कधीकधी श्विनबरोबर कार्यालयात जाणे सुरु झाले.
आजचा दिवस लोहमार्गावरून प्रवास करण्याचाच होता. श्विन कालच चिखलाने लडबडून आली होती, तिला रात्री स्वच्छ केले होते. पण आज तिला घरी ठेवून डोंबिवली लोहमार्गस्थानकाकडे निघालो. काल दिवसभर शिडकावा करणारा वरुण आज शांत होता. पण तरीही डोंबिवली स्थानकापर्यंत जाईपर्यंत नखशिखांत भिजलो होतो. फरक इतकाच की अंगावरून धावणाऱ्या धारा पर्जन्यधारा नसून घामाच्या धारा होत्या.
फलाटावर पंख्याची दिशा पाहून उभे राहण्याची जागा पटकावली. पंखा फिरताना दिसत असला तरी घामाच्या धारा कमी न होण्यासाठी प्रवाशांना चुकूनही वारा लागू नये याची काळजी पूर्णपणे घेण्यात आली होती. आत्तापर्यंत घाम पुसत पुसत रुमाल ओलाचिंब झाला होता. पुन्हा घाम पुसला तर चुकून रूमालाचाच घाम अंगाला लागेल अशी परिस्थिती आली होती. पण इतक्यात 'ज्यासाठी केला होता अट्टाहास' ती मुंबईची उपनगरीय जीवनवाहिनी फलाटाला लागली.
पोत्यात गहू भरावेत तसे प्रवासी कोंबल्यावर शेवटी मीही गाडीत चढलो. दरवाजातील प्रवासी उभा होता त्याच्यामागेच मी उभा राहिलो. यात मेख अशी होती, की पुढील स्थानकांवरील प्रवाशांची पहिली झटपट त्याच्याशी होईल, पण दरम्यान मला थोडातरी वारा मिळेल.
दिवा स्थानक आल्यावर विरुद्ध दिशेला दरवाजा असूनही प्रवासी चढलेच. अजूनतरी माझी अवस्था ठीकठाक होती. पण मुंब्रा स्थानक आल्यावर मात्र २ जणांच्या जागेत ६ प्रवासी कोंबले जाऊ लागले. आधारासाठी उजवा हात दरवाजाच्या एका कडेला दाबून ठेवत डावा पाय विरुद्ध दिशेला फिरवला. या आसनाचे नाव पतंजलीऋषींनी लिहून न ठेवल्याने मी केवळ कृती सांगितली आहे.
गाडी सुरु होता होता लोकांचा आरडाओरडा, शिव्या, धक्काबुक्की याना ऊत येऊ लागला. एव्हाना माझ्या पुढील आसनाची अथवा आसनाच्या पुढील क्रियेची सुरुवात झाली होती. या अवस्थेत डाव्या पायाचा घोटा किंचित तिरका ठेवून कमरेवरील शरीर खांद्यापर्यंत सरळ रेषेत ठेवणे आणि मान शक्य तेवढी तिरकी करत डोळे बंद करावे लागतात. शेजारच्या माणसाचा हात मानेशेजारी आल्यास मान टेकवण्याचीही सोय होते का याकडे माझे लक्ष होतेच.
या अवस्थेत उभा असतानाच कळवा स्थानकात गाडीने प्रवेश केला. मुंगीच्या पुढील डाव्या पायाची करंगळी ठेवायलाही जागा नसतानाही एकदोन कळवाकर कसे चढले हे मला शेवटपर्यंत कळले नाही. पण त्यांचे दरवाजातील लोकांशी असलेले ऋणानुबंध मात्र लक्षात आले. ठाणे स्थानकात थोडे सरळ उभे राहता आले, आणि माझी आसन मुक्तता झाली. एव्हाना माझी उभ्या उभ्याच समधीवस्थेतील तल्लीनताही अनुभवून झाली होती.
तिथून पुढे गाडी निघाली की मुलुंडलाच थांबणार या अपेक्षेने ठाणे स्थानकातच मुलुंडसाठी मागील प्रवाशांनी मोर्चेबांधणी सुरु केली. पुन्हा एकदा उजवा आणि डावा असे दोन्ही हातांचे पंजे दरवाजावर दाबून मागून येणाऱ्या ५०० किलोच्या रेट्याला थांबवण्याची करामत करावी लागली.
मात्र अधिक परीक्षा न घेता गाडी मुलुंड स्थानकात शिरली आणि मी विनासायास गाडीतून मुलुंड स्थानकात उतरलो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा