सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

सात हजारी मनसबदार

सातहजारी मनसबदार

सौर श्रावण १७, शके १९३९.

आजची #office2home राइड खासच होती.

TJSB House मधून श्विनने सुरुवात करून सर्व्हिस रोडने माजीवाडा नाका गाठला. तेथे नेहमीप्रमाणे पुलावरील वाहनांच्या रांगेमुळे श्विनला आजही पुलावर उजवीकडे नाशिक महामार्गाकडे सहजपणे वळता आले. खरेतर सगळी अश्वशक्तीधारी वाहने रडतखडत जात असताना श्विनने चांगलाच वेग पकडला होता. अर्थात आजची राइड पूर्ण होताना जी विशेष गोष्ट घडणार होती त्यामुळेही श्विन रंगात आली होती.
इतर वाहनांची हि गम्मत पुढे पुन्हा पुन्हा अनुभवास येत होती. पिंपळास फाटा, रांजणोली नाका येथे सर्व अश्वशक्तीधारी वाहने गोगलगायीच्या गतीनेच जात होती. रांजणोली नाक्याला तर फक्त श्विनच कल्याणकडे झटकन वळू शकली. बाकीची वाहने मात्र एकमेकांकडे गुरगुरत उभी राहिली होती.
कोनगावातही अशीच गम्मत अनुभवून श्विन दुर्गाडी किल्ल्याकडे पोचली. तोच 'तुम्ही रोज ठाण्याला जाता का.. मी तुम्हाला रोज बघतो' असे म्हणत एक मोटरसायकलिस्ट श्विनला समांतर गाडी चालवू लागला. गप्पा आणि ओळख वाढवण्याची इच्छा होती, कारण अशी प्रशंसा केवळ सायकलिस्टलाच मिळू शकते.

मात्र आज दुर्गाडी येथे पोचताच एक विशेष टप्पा पार केल्याने श्विनला एक सेल्फी दुर्गाडी किल्यासह घ्यायचा होता. मग त्या मोटरसायकालिस्टचा निरोप घेतला आणि श्विन थांबली.

ग्रेगोरियन कॅलेंडर वर्ष २०१७ मध्ये Sunil Gavaskar सुनील गावस्करच्या एकूण कसोटी धावा १०१२२ इतके किमी अंतर पार करायचे उद्दिष्ट समोर ठेवून सुरु झालेल्या वर्षातील १ जानेवारीपासून ७००० किमी चा टप्पा दुर्गाडीसमोरच पूर्ण झाला होता. शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षिने हा टप्पा पूर्ण करण्यापेक्षा मोठे भाग्य तरी काय असेल.

श्विनची २०१७ मधील आत्तापर्यंतची घोडदौड:

जानेवारी २०१७- १५२२ किमी
फेब्रुवारी २०१७- १०१६ किमी
मार्च २०१७- ११२० किमी
एप्रिल २०१७- ११०६ किमी
मे २०१७- ८१० किमी
जून २०१७-५०७ किमी
जुलै २०१७ -६४१ किमी
१ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट-  २८५ किमी
एकूण ७००७ किमी

#ismartcommute #cyclingzens #dombivlicyclingclub #tjsbbank #saveoursahyadri

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...