सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

SOS चा ध्यास

वेगवेगळ्या सायकल ग्रुप बरोबर पर्यावरण वाचवा हा संदेश देत मी सायकलिंग केले होते. त्या सायकल दौऱ्यात पर्यावरणाविषयीची कळकळ कुठेही दिसून आली नव्हती.
मात्र SOS च्या पहिल्याच कार्यक्रमात वेगळेपण जाणवले. म्हणूनच मग मी पुन्हा एकदा माझा मुंबई गोवा सायकलिंग प्लॅन कॅन्सल केला आणि सह्याद्री च्या डोंगरखोऱ्यात सायकलिंग साठी सहभागी व्हायचे निश्चित केले. अर्थातच या मोहिमेत सामील झाल्यामुळे दृष्टिकोनात जो फरक झाला त्यामुळे माझा निर्णय किती योग्य ठरला हे रोजच जाणवते.
आनंद, बिभास सर यांची कळकळ मनाला भिडली होती. अविनाशचा साधेपणा मन जिंकून गेला होता.
हे सगळं आज आठवायचे कारण म्हणजे रोजच्या प्रमाणे सकाळी नेवाळी फाट्याहुन सायकलिंग करत परत येताना दिसलेला वरील फोटोतील साप.

महामार्ग हवेतच, पण ते हवे असताना निसर्गातील जीवांची हानी कशी कमी करता येईल हा विचार परत येताना मात्र मनाला खिन्न करत होता.

मात्र पुढे शेतातील सुरु असलेली कामं पाहून मानवाने एक हात जरी पुढे केला तरी निसर्ग मात्र त्याच्या ओंजळीपेक्षा खूप जास्त परत देणार आहे याची खात्री पटली आणि पुन्हा मन उल्हसित झाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...