#Shravanchallange चा आज ६ वा दिवस. भारतीय सौर श्रावण ६, शके १९३९.
रोजच #cycle2work पुन्हा सुरु करायचा विचार करत होतो. पण जागा झाल्यावर श्विनपासून फार वेळ लांब राहणे जमत नव्हते. Cycle2work करायचे तर जागा झाल्यावर घरी २ तास थांबावे लागणार होते. त्यामुळे मी रोज नेवाळी फाटा किंवा शिळ फाटा येथे जात होतो.
पण आज मात्र घरी वेळ काढून cycle2work करायचे नक्की केले.
वास्तविक Tjsb Sahakari Bank च्या मुख्य कार्यालयात रुजू झाल्यावर अजून श्विनला ठाण्याला यायची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आज श्विनही आज खुश होती. श्रावणाची छाप वातावरणात पडली होतीच, पण तरी सावधगिरी म्हणून मी रेनकोट बरोबर घेतला. पण गरम होऊ नये म्हणून तो न घालता, श्विनलाच तो सांभाळायला दिला.
बऱ्याच दिवसांनी कोनगाव - राजनोली - मानकोली (नाशिक ठाणे हायवे) ह्या मार्गाने जात होतो. कोन-पिंपळास मार्ग उन्हाळ्यातच फुटलेला असल्याने पावसाळ्यात त्या मार्गाची परीक्षा घेण्याचा प्रश्नच नव्हता.
राजनोलीहुन (कल्याण फाटा) मानकोली कडे निघालो खरा! वरुणास्त्र म्यान केलेले असले तरी पवनकुमार चांगलेच उत्साहात होते. वारा उजवीकडून डावीकडे जोरात वाहत असल्याने श्विनचा वेग मात्र मंदावला होता. त्यामुळे श्विन हिरमुसली तरी आजूबाजूला पसरलेला श्रावणाची हिरवी उधळण पाहून मी खुश होतो.
मानकोली पार करून पुढे निघालो आणि हिरवा रंग पांघरलेला मुंब्रा डोंगर डावीकडे दिसू लागला. मुब्रा डोंगराची रांग फारच सुंदर दिसत होती. त्याचे फोटो घेऊन मी पुढे निघालो. ठाणे शहर नजरेच्या टप्प्यात येत असताना पवनकुमाराना भलतीच लहर आली. उलट दिशेने इतक्या जोरात वर येऊ लागला कि जोरजोरात पॅडल मारूनही श्विन फारशी पुढे सरकेनाशी झाली. एव्हाना अंदाजे २५ किमी सायकलिंग झाले होते. दरम्यान वरुण राजाने दोन तीन वेळा हूल दिली होती, पण ashadhchallange चा अनुभव असल्यामुळे मी रेनकोट घातला नव्हता. आकाशही निरभ्र होते. ऑफिस जेमतेम ६-७ किमी वर होते. पण जोरात वाहणाऱ्या पवनकुमाराने भराभरा काळे ढग डोक्यावर गोळा केले. मग वरूणराजानाही थोडे स्फुरण चढले. आता मात्र रेनकोट घालावा लागणार अशी चिन्हे दिसू लागली. पण पवनकुमाराने माझ्या ऐवजी वरूणराजाचीच गम्मत केली होती. वरूणराजाची गोळा केलेली सर्व शस्त्रास्त्रे म्हणजे ढगांना पवनकुमारांनी हा हा म्हणता पळवून नेले.
#dombivlicyclingclub #ismartcommute #cyclingzens

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा