सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

एक puncture दिवस

भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर फाल्गुन १५, शके १९३८ (ख्रिस्ती दिनांक ५ मार्च २०१७

मुंबईतील सर्व सायकलिस्ट एकत्र यावेत ही संकल्पनाच खूप भन्नाट आहे.

सायकल कट्टाच्या निमित्ताने आज अनेक जुने नवे सायकल मित्र पुन्हा भेटले.

डोंबिवली प्राईड रन साठी जवळपास २० सायकलिस्ट चा ताफा तयार ठेवूनही सायकल कट्टयासाठी जायला इतर सायकलिस्ट होते. डोंबिवली सायकल क्लबची ही ताकद डॉ. पुणतांबेकर यांच्या सातत्यामुळे आहे.

खरेतर मी आज सायकल घेऊन घराबाहेर पडणार तोच संजय दाते यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांची सायकल puncture असल्याने ते आज सायकलने न येता रेल्वेने येणार आहेत.

सायकलिंग सुरु करण्या आधीच puncture. पण DCC ची ताकद येथेही कामी आली.
मी त्यांना विचारले की दुसरी सायकल मिळाली तर तुम्ही सायकलने याल का? त्यांचा होकार समजताच लगेच ममताला तिची सायकल द्यायला सांगितले. ममता नाही तर तिची सायकल तरी कट्ट्याला जाऊ शकणार होती.

मग ती सायकल घेऊन आमची सायकल कट्टयाकडे दौड सुरु झाली. दरम्यान मिलापनगर येथे महाजनकाका भेटले. ते कट्टयापर्यंत येणार नव्हते म्हणून लगेचच परत गेले. पुढे ठरल्याप्रमाणे वाटेत सामंत पेट्रोल पंपपाशी दुर्गेश आणि त्याचा मुलगा भेटले.
बऱ्याच दिवसांनी शीळ फाट्यापुढचा चढ चढायची संधी मिळाली. त्यानंतर महापेपर्यंत पोचताच दातेंनी घेतलेली ममताची सायकल puncture झाली.

दुर्गेश असल्यामुळे puncture चे काम लवकर होऊ शकले.
पुढे कोपरखैरणे, वाशी मार्गे पुढे खाडीवरील पूल ओलांडताना खूप छान अनुभव आला.

जवळपास ३०-३५ किमी सायकलिंग केल्यामुळे सायकलला नाहीतरी आम्हाला इंधनाची गरज होती. मानखुर्द स्टेशनसमोर इडली वाड्यावर ताव मारून सायकल कट्ट्याला पोचलो.

तेथे सर्व मित्र मैत्रिणींना भेटून आणि कट्याची मजा अनुभवून परत निघालो तेव्हा १.३० वाजून गेले होते.
हॉटेलसमोरील रांग बघून सायन ला जेवण करण्याचा बेत रद्द केला.

वाटेत हॉटेल शोधता शोधता पुन्हा वाशी खाडीवरील पूल आला. अखेरीस वाशीला जेवण करून पुढे निघालो. सकाळची थंड हवा आता नव्हती आणि जेवण झाले होते त्यामुळे शीळ फाट्याचा चढ न चढता वळसा घेऊन शिळ फाट्याला पोचलो.
मग अर्थातच कोकणरत्न येथे चहा आणि विश्रांती घेऊन डोंबिवली ला पोचलो.
ममताची सायकल परत देऊन दातेना मी पूर्व पश्चिम पुलाजवळ निरोप दिला आणि दिवसाचा शेवटही नाट्यमय झाला.
त्यांना निरोप देऊन काही सेकंदातच माझी सायकल puncture झाली.

Puncture ने सुरुवात झालेली ही सायकलयात्रा अखेरीस puncture नेच संपली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...