आषाढ संपता संपता वरूणराजाने चांगलाच ताल धरला आहे. मात्र मी सायकलिंगला निघालो की सुरताल आवरून ठेवण्याचा प्रघात वरुण राजाने आजही कायम ठेवला होता.
श्विनला आज कोणी सोबत मिळाली नव्हती. मात्र 'अकेले है तो क्या गम है, चाहे तो अपने बस मी क्या नही' असा विचार करत श्विनची राइड सुरु होती.
मानपाडा रस्ता संपता संपता समोरून गाय आणि वासरूंचा एक कळप येत होता. एक वासरू सगळ्यात मागे राहिलेले पाहून एक श्वानपथक त्या वासरावर तोंडसुख घेऊ लागले. ५- ६ जणांच्या त्या पथकाला घाबरून ते वासरू जर उधळले असते तर मधल्या मध्ये मी आणि श्विनची ताटातूट होण्याचा संभव होता. त्यामुळे श्विनने वाट थोडी वाकडी करून मार्ग काढला.
बदलापूर पाइपलाइन रोडला लागल्यावर तर अक्षरशः दर २-४ किमी मागे एक अशी अनेक श्वानपथके वाट पाहत असल्यासारखीच श्विनकडे बघत होती. अश्यावेळी मी ती पथके जवळ यायच्या आधीच श्विनचा वेग कमी करत होतो. अर्थात त्या टोळक्याकडे लक्ष असून त्यांच्या डोळ्याला डोळा न भीडण्याची काळजी घ्यावी लागत होती. न जाणो एखाद्याला श्विनचे आकर्षण वाटायचे.
तरीही तळोजा फाट्याला एका श्वानाला श्विनचे आकर्षण वाटलेच. पण ते थोडक्यात आवरले.
नेवाळी फाट्यापर्यंत कोणीही सायकलिस्ट न दिसल्याने आश्चर्य वाटत होते. पण परत निघाल्यावर मात्र (बहुतेक) बदलापूरचे दोन सायकलिस्टस आणि त्यांच्या बरोबर आणखी एकजण बाईकवर जाताना दिसले. ते सायकलिस्टस आणि बरोबरचा यंत्रचलीत दुचाकीवरील स्वार पाहता पाहता माझ्या पुढे निघून गेले. त्या दोन सायकल पाहता मला अभिषेक कोयंडे (@abhishek koyande) च्या सायकलचीच आठवण झाली.
थोड्या अंतरावरच आणखी एक सायकलिस्ट समोरच्या दिशेने येताना दिसला. एकमेकांना अंगठे दाखवून प्रोत्साहित करून आम्ही दोघंही आपापल्या दिशेने पुढे गेलो.
पाइपलाइन रोडवरील आजची श्वानसंख्या पाहता उद्यापासून नेवाळी फाट्या ऐवजी शिळ फाट्याला जायचे ठरवत मी घरी परतण्यासाठी कल्याण शिळ रोडला वळलो तर तेथेही श्वानपथके तयारच होती.
पूर्वी पावसाळा आला की खेकडे आणि बेडकांची लगबग दिसायची. मात्र प्राणिप्रेमींमुळे कुत्र्यांची संख्या वाढत असली, तरी वेगाने झालेल्या शहरीकरणामुळे आजच्या बालगोपाळाना मात्र खेकडे आणि बेडूक चित्रातच दिसतील.
#saveoursahyadri #tjsbbank #cyclingzens #ismartcommute

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा